Skip to main content

भयानक

भूताच्या भूतकाळाचे गूढ प्रेम...!!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 11/01/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
भूताच्या भूतकाळचे भूत भग्न वाड्यात रोज मध्यरात्री...!! सूडाच्या स्वप्नात मग्न, तो बसलेला असतो मृत्यू लादला गेलेला हा मृतयात्री ...!! भूतकाळाचे भूत, मानगुटीवर घेत "जगतो" --------------------------- गूढ प्रेम मध्यरात्री ती आली... पायवाटेवर बसली, डोळ्यात 'त्या'ची अतृप्त आशा घेवून! त्या रात्री 'तो'ही आला... तीच्यासोबत यायला, स्वतःच्या जीवाला पारखा होवून!
काव्यरस

बुधवारची कविता: (मुद्दाम काढलेले)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 23/12/2009 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मुद्दाम उघडलेले धागे बरेच होते धाग्यात भांडणारे आयडी खरेच होते स्थळात पाहीली या जादू अजब निराळी एकाच चालकाचे चेहरे बरेच होते काहीच उडवाया सांगू नकोस त्याना त्याच्यात गुंतले ते त्यांचे बरेच होते चेपीत सदस्या त्या दाबनार ते कितीसे आंतरजालावरी ते जळले बरेच होते म्हणता असे तुम्ही की "मी पाडिलेच नाही" धाग्यावरीच तुमच्या घडले असेच होते हातात हक्क त्यांच्या दिला पुन्हा कशाला? वळते न हाय त्याना, कथिले बरेच होते बुधवारी या पुन्हा मी लिहीले खरेच आहे पतियाळे परी ते पडले कमीच हो
काव्यरस

बुधवारची कविता : (खवट)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 10/12/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
नियमाप्रमाणे या बुधवारी रात्री देखील आम्ही 'साप्ताहिक सांकृतीक कार्यक्रमास' बसलो. थोडेसे कडक धोरण अवलंबल्याने उतरायला वेळ लागला त्यामुळे हि कविता सेवेत रुजू करण्यास उशीर झाला. त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे. आणि हां बदलीन... असो. आमची प्रेरणा ग्लास जरा मी हाती घ्यावा.. पिता पिता काव्य नवे तेव्हाच पडावे .. पिता पिता सोबत होते तिची नि माझी पेग काही जरा बरा चिवडाही मिळावा.. पिता पिता एकदाही पुढे तुझा प्रतिसाद न यावा इतकी का जळजळ व्हावी ..पिता पिता चुकून जुळती कधीमधी मते आपली आठवही त्याचा न उरावा..
काव्यरस

(अवांतर)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 02/12/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
पेशव्यांच्या विडंबनाची कीर्ती पाहून अर्थातच मत्सर निर्माण झाला. अवांतराने धागा भरला चांदण्या मात्र गायबल्या वैतागाने धुसफुसणारा नवा मिपाकर मी पाहिला घसरले बोल गप्पांवर कैच्याकै कंपू बरळला थांबले मिपा पळभर पाहता लेखकू कोमेजला "जियो जियो" प्रतिसादावर सहमतीचा नाद गुंजला वेड्यांचा हा बाजार पाहून मालक मात्र हिरमुसला "ठेवा गप्पा खरडींपुरत्या व्यनिची सोय केली कशाला? जायचे तर खुशाल जावे कोल्हापूरच्या प्रसिद्ध चपला!"
काव्यरस

<पुन्हा ती भेटली तेव्हा.>

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 30/11/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
गतकाळातले प्रियकर- प्रेयसी अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटतात.. ही कवितेची थीम आहे. अगा गा गा गा गा गा गा गा बो बो बो बो बो अशा चालीत वाचावे.) ============== दिसलीस तू.. भेटलीस तू.. थांबल्या रीक्षा, थांबल्या बशा ( बस चे अनेकवचन) थांबला जणू रस्ता तेवढा जाम ट्रॅफीक .. थांबवलीस तू ! भासलीस तू कापरापरी, काजळी जणू.. काळजावरी लखलखती भिंगे ढापणी सांगती तुझी बातमी खरी न स्मित मोजके, न बोलणे कमी नको त्याच चौकश्या, नको त्या बातम्या.. जे मनात ते, बोललो कुठे? होत राहिले हेच नेहमी.. ढोसणे तुझे.. खुंदणे तुझे.. आळसावणे.. डुलकणे तुझे.. त्या कळा कुठे?

(मी आणि (लेखांचा) पाऊस!)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 24/11/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: आमच्यात मुहूर्ताची वाट पहात नाहीत, त्यामुळे उगा बुधवार, शनिवार का करत बसा?
काव्यरस

[मित्र]

लेखक अमृतांजन यांनी शनिवार, 21/11/2009 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवीची माफी मागून हे विडंबन सादर! आयडी नाही मिळाला तर लॉगिन होणारच कसे? प्रतिसाद नाही मिळाला तर वेळ जाणारच कसे? होईलच मिपा पूर्ण दंग्याशिवाय कसे? मग कंपू आपले अपूर्णच रंगाविना जसे संपादन- स्वोज्वळपणाचे हे सोंग त्यांना कळले नसेल नाही फुटणार ना रे बिंग आयपी ट्रॅकर लावला तर नसेल?.

इलिनॉईच्या दुगाण्या

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 19/11/2009 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित झरणी बोधित करणी मेलामेली भर्तृहरी अमर्त्य सेना वसंतसेना सेनासमथिंग कलहारी तूच सहारा... तूच सहारा रखरखीत या गूगल संकटनेवारी संतसंतिणी , मुग्ध हिरॉईनी उपग्रहाचा त्वरितध्वनी शरीरबांधणी भेटीगाठी रिचर्ड बेकहॅम चपळ त्रिपाठी ओहो राहुल आहा राहुल ब्रायन लारा दत्ता भट ब्रायन लारा दत्ता भट
काव्यरस

<खड्ड्या तुझ्या मिठीत रे....... >

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/11/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : सखये तुझ्या मिठीत..... तुज पाहिल्या क्षणी मी , विरलो जरा तिथेच रस्त्यात होतास एकटा, माणसांच्या या दाटीत रे! कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतास तू गढूळलेला ओलांडता कोलमडलो , चिखलाच्या मिठीत रे! अन्दाज सखोलीचा आला मला न केंव्हा सगळे तुझ्यात झाले , आडवे किती पटीत रे ! स्कूटर मोटार सायकल ; ऐसा भेदभाव कधी न झाला सारेच आडवे झाले ; खड्ड्या तुझ्या मिठीत रे गांगरलो असा मी , दणका तुझा देण्याला भिक्कार भीजलेला , कुठल्या चिखलवटीत रे? खणले तुला न कोणी ; शान तू या रस्त्याला तूज मुजवले कोणी नाही ; खलित्यांच्या रेटारेटीत रे हार मानिली सार्‍यानी ; तू तसाच राहिला खड्ड्या सारेच रे पडले ,