झुरळे, पाली आम्हां सोयरी..

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
10 Oct 2009 - 1:28 pm
मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Oct 2009 - 1:33 pm | अवलिया

आम्हाला पाली आवडतात. आम्ही पाली खातो.

--नु चुंग

***

मस्त लेख

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

यशोधरा's picture

10 Oct 2009 - 1:56 pm | यशोधरा

ईsssss नाना! यक्क! यक्कक्क!! :&

सोनम's picture

10 Oct 2009 - 1:42 pm | सोनम

मला ही पाली दिसल्या की खुपच भीती वाटते, त्यापेक्षा तिला पाहून किळस जास्त वाटते. :( :(

आम्हाला पाली आवडतात. आम्ही पाली खातो.
काय नाना, आतापासून सुरवात केली काय पाली खायला. :? :?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Oct 2009 - 1:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हीहीही ... मस्तच लिहीलं आहेस.

पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणे

हे बरं सांगितलंस. माझ्याही नव्या घरात पाल आहे, कहर म्हणजे रात्री सगळं शांत झालं की या मॅडमना आवाज काढण्याची लहर येते. सुरूवातीला दोन-तीनदा भिती वाटली पण नंतर सवय झाली.

हल्ली घरात रातकिडे आहेत आणि ते दिवस-रात्र कसलीही पर्वा न करता जीवाच्या आकांताने किंचाळत असतात. पण दिसत नाहीत, आता हळूहळू त्यांची सवय झाली आहे आणि आम्ही सरकारी लोकं आणि किडे सरकारी इतमामात मजेत एकाच सरकारी घरात रहातो!

अदिती

यशोधरा's picture

10 Oct 2009 - 2:04 pm | यशोधरा

हो गं अदिती, अशाच असतात पाली, येडपट!

सुबक ठेंगणी's picture

10 Oct 2009 - 2:12 pm | सुबक ठेंगणी

सही लिहिलं आहेस. पाल्केस्ट्रा!!!! =))

अजून माझ्या घरातल्या पालींची धाव ओट्यापर्यंत नाहिये पोचली हे नशीब :D पण इथे येऊन नजर मेली आहे माझी.

बाबा म्हणतात "घर पाळते ती पाल"घ्या! आणि आम्हाला वाटायचं आपणच पालींना पाळतो!!!

सहज's picture

10 Oct 2009 - 2:57 pm | सहज

हा हा हा.

खर सांगतो एकदा एका बाबाजींनी मी हा प्रश्न विचारला होता काय हो, हे किडे, मुंग्या घरात आलेले पसंत नाही त्यांना मारले तर काही शाप, जन्ममरणाचा फेरा सुरु रहाणे. इ इ. मला उत्तर मिळाले "मार बिन्धास्त"!

अवांतर - प्रोबेशनच्या काळात जे काही प्रश्न विचारले होते त्यातला एक तुला पाल, झुरळे वगैरे मारता येतात ना?

यशोधरा's picture

10 Oct 2009 - 5:16 pm | यशोधरा

कोणते बाबाजी? जालंदरबाबा की काय? :D

श्रावण मोडक's picture

10 Oct 2009 - 4:11 pm | श्रावण मोडक

:)
प्रतिसाद संपादित केला. आधी म्हटलं होतं, पेस्ट कंट्रोल करा.
माधव गाडगीळ झिंदाबाद. या पालींना मारू नका. दोस्ती करा त्यांच्याशी.

भडकमकर मास्तर's picture

10 Oct 2009 - 4:25 pm | भडकमकर मास्तर

माधव गाडगीळ झिंदाबाद. या पालींना मारू नका. दोस्ती करा त्यांच्याशी.

पाल मारा पाल मारा असं काम सांगणार्‍यांना सांगायला एक कारण झालं...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

यशोधरा's picture

10 Oct 2009 - 5:20 pm | यशोधरा

पालींशी मी दोस्ती करण्यापेक्षा त्या माधव गाडगीळांकडे सुपूर्द केल्या तर? महाराष्ट्रातील पाली व कन्नडदेशीय पाली ह्यांचा तौलनिक अभ्यास वगैरे करता येईल ना त्यांना? :P :D

श्रावण मोडक's picture

10 Oct 2009 - 5:31 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... करा. काहीही करा. आमची कशालाही ना नाही. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Oct 2009 - 3:12 pm | बिपिन कार्यकर्ते

तुम्हाला एक मैत्रिण आहे इथे... मस्त कलंदर ताईंकडे पण एक पाल आहे म्हणे. स्ट्रॅटेजीची देवाणघेवाण करा. मार्ग लवकर निघेल. बाकी लिहिलंय छान.

@ नाना : नु चुंग पेक्षा 'नानु ली' हे नाव कसं वाटतंय?

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

10 Oct 2009 - 7:14 pm | अवलिया

ली घराणे म्हटले की लै भय वाटत ब्बा!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मस्त कलंदर's picture

11 Oct 2009 - 11:08 am | मस्त कलंदर

माझ्या घरातली पाल??? ती पळाली एकदाची....!!!! सारखी चुकचुक करायची!!!
स्ट्रॅटेजी वगैरे काही विशेष नाही हो... तिच्याकडे लक्षच द्यायचं नाही.. जाते मग कंटाळून!!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

डावखुरा's picture

21 Sep 2010 - 11:55 pm | डावखुरा

बिपिनदा "आव ली" पण भारी वाट्तंय..

पण लेख वाचुन बरेच काहे आठवले त्यातले काही...

१) एका सर्पमित्राने पालींचे बिनविषारित्व पटवण्यासाठी केलेला प्रयोग आठवतो..
आपल्या घरी आलेल्या दोन मित्राना मस्त चहा पाजला...
नंतर दोन महिन्यानी परत भेटल्यावर त्याना चहाची पाककृती सांगितली..
ईतर नेहमी सारखीच पण त्यात अ‍ॅडीशनल फक्त पाल उकळवली....
ते दोन्ही मित्र दोन महिन्यानंतर त्या चहाच्या कल्पनेने तिथेच ओकले...

२) आमच्या सरांनी सांगितलेला एक किस्सा...
उन्हाळ्याचे दिवस ...तो उन्हाळा जळ्गावचा....घरी होते ते...
जरा शर्टचे दोन बटनं उघडुन कालर मागे केली आणि घरातच एका दारातुन दुसर्‍या दारात जायला लागले.. दारावरच दबा धरुन बसली होती पाल..तिने मस्तपैकी डाव साधला आणि सरळ सरांच्या सदर्‍यात सुर मारली..नेमकी शर्टची ईन केलेली होती...मस्त वळ्वळ गार मउ स्पर्ष..ई ईईई...ई

३) गेल्या वर्षीचा माझा स्वानुभव...
मी एस. आय. जॉईंट ला गॅप गेल्यामुळे ट्रॅक्शन वर होतो...बेड्रेस्ट..नुकतेच ट्रॅक्शन काढुन मी बसलो होतो... माझा पलंग भिंतीला खेटुन आहे आणि त्यावर ट्युब त्यामुळे...
मी तक्क्याला टेकुन आधाराने कसातरी बसलो होतो..
पप्पा बाजुलाच होते..ते थोडेसे हसले...मी कारण विचारले तर काही नाही म्हणुन त्यानी विषय बदलला..
पण समोरच काकु बसली होती..ती थोडीशी किंचाळलीच पाssss...ल
त्या सेकंदाला मी माझे दुखणे विसरुन जवळ्पास २ फूट पुढे सरकलो एकदम झट्क्यात...आणि मीपण किंचाळलो..सिंहाचा सामना करेल एकवेळ पण पाल ईई...ई...
ईतर वेळेला दुखण्यामुळे हसुही न शकणारा मी....त्या ट्रॅक्शन चे वजन फक्त वर घेउन ठेवले होते.. ते पण खाली सरकुन झट्का बसायचा तो बसलाच..
पण त्यावेळी टप्कण पडुन पाल निघुन गेलेली होती..आणि ती जाताना काकुला दिसली होती..
पण पप्पा का हसले कारण त्यानी ती पाल पड्ताना पाहीली होती... लोल..

४) हे मात्र गम्भीर..
पप्पा असेच ईंडस्ट्रीयल विजीट साठी एका गुट्ख्याच्या कारखान्यात गेले होते...
तिथे सगळी प्रोसेस पाहीली..पण तरीही तो गुट्खा आणि पुडीतला गुटखा यात साम्य वाटत नव्हत..मग त्यानी कारण विचारले..तर तेथील कामगारानी दिलेल्या माहीती नुसार सर्व प्रोसेस झाल्यावर एक ट्युब येते पण त्यातील घटक कोणालाच माहीत नसतो..ती त्या मसाला सुपारीला चोळुन त्या गुट्ख्याला अंतिम स्वरूप येते..
त्या ट्युब मधील घट्का संदर्भात तेथील एका अधिकार्‍यास खोदुन विचारले असता समोर आलेली माहीती..
त्यात पालीच्या पेस्ट्चा वापर केलेला असतो म्हणुन ती गुप्त टेवतात व शेवटी पॅकींग च्या आधी फक्त चोळ्तात..
हा प्रसंग आठवण्याचे कारण ईथे कोणीतरी उल्लेख केलेला आहे की पालीचा उपयोग नशीले पदार्थ निर्मितीत होतो तो असाही असेल...

बापरे! हे गंभीर म्हंजे भलतेच गंभीर आहे!

भडकमकर मास्तर's picture

10 Oct 2009 - 3:58 pm | भडकमकर मास्तर

लेख मजेदार आहे...
पाल मारायच्या पुष्कळ आठवणी जागृत झाल्या...
वृद्ध पाल जमिनीवरती रांगायला लागते , असे माझे एक निरीक्षण आहे.
पाल...
पाल विषारी नसते.... तो एक गैरसमज आहे, असे ठाम प्रतिपादन करणारा एक लेख गेल्या महिन्यात सकाळमध्ये वाचला.
जालावर शोधला नाहीये अजून.
लेखक गाडगीळ आडनावाचे ( वनस्पति(!!)शास्त्रज्ञ ) आहेत....
विषारी हो नाही वगैरे कल्पना नाही पण लेख मस्त होता....
...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

भडकमकर मास्तर's picture

10 Oct 2009 - 4:02 pm | भडकमकर मास्तर

http://beta.esakal.com/2009/06/29224833/editorial-giant-lizard-yashwa.html

लेखक माधव गाडगीळ

(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

पालींमुळे अन्नात विषबाधा होते अशा अनेक चुकीच्या कल्पना लोकांच्या डोक्‍यात घट्ट बसलेल्या आहेत. म्हणून घरात नव्याने कामाला येणाऱ्या सगळ्यांना पटवून द्यायला लागते, की असे काही नाही. त्यांना सगळीकडे, विशेषतः स्वैपाकघरात, जेवणघरात बिनधास्त फिरू द्या. त्या मुंग्या-झुरळांना छान काबूत ठेवतील. याची फलश्रुती म्हणजे माझ्या घरात जन्मभर काहीही विषप्रयोग न करता कीटकसृष्टी मर्यादा सांभाळून आहे. वर मी पालींची मृगया खुषीत पाहत आलो आहे. विशेषतः पावसाळ्यात पंखाची वाळवी, मुंग्यांचे लोंढे आले, की पालींची धावाधाव पाहायला जी मजा असते ती माहीत नसणाऱ्याला म्हणावेसे वाटते ः "हाय कंबख्त! तूने पीही नहीं!'

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

Pain's picture

21 Sep 2010 - 2:19 pm | Pain

पाली इतर किडे खाउन जगतात हे बरोबर आहे पण त्यांचा जर अन्नाशी प्रत्यक्ष संबंध आला तर ते वाईट.
अन्न शिजवताना केवळ एक पाल त्यात पडल्याने (व ते अन्न तसेच खाल्याने) बिचार्‍या आश्रमशाळेतल्या अनेक मुलांना हॉस्पिटलमधे दाखल केल्याच्या घटना वाचनात आल्या आहेत.

टिउ's picture

22 Sep 2010 - 12:16 am | टिउ

प्रकाटाआ

घाटावरचे भट's picture

10 Oct 2009 - 4:39 pm | घाटावरचे भट

छान प्रकटन (असं लिहिलं की प्रतिसादाला मोल येतं असं कोणीतरी म्हणून ठेवलंय. बाकी प्रकटन/अदृष्यन वगैरे आपल्याला समजत नाय बॉ). बाकी पाली,झुरळं अन मुंग्या यांचा भरपूर अणुभव घेतल्यावर एवढेच म्हणावेसे वाटते

कोन्यात मारला स्प्रे अन दिला रंग
चढचढून माळे दुखू लागले अंग
झाडले घराला अवघे वरती-खाली
पण तरी न जाती झुरळे,मुंग्या,पाली...

स्वाती२'s picture

10 Oct 2009 - 4:39 pm | स्वाती२

पाल्केस्ट्रा मस्त!

क्रान्ति's picture

10 Oct 2009 - 6:26 pm | क्रान्ति

मस्त लेख! आणि भटांचा"पालिया" पण!;)

क्रान्ति
अग्निसखा

पिवळा डांबिस's picture

10 Oct 2009 - 9:02 pm | पिवळा डांबिस

एकूण ५ आहेत,
आणि तुझ्या ऑफिसला नेतेस त्या बॅगेतली? काळी कुळकुळीत पाठ आणि करडं पोट असलेली....
ती विसरलीस का?
:)
आता पुढल्या वेळी बॅगेत हात घालतांना तिची आठवण ठेव!!!!
:)

यशोधरा's picture

11 Oct 2009 - 12:06 am | यशोधरा

कायतरीच हां पिंडाकाका तुमचा! :D

१.५ शहाणा's picture

10 Oct 2009 - 8:57 pm | १.५ शहाणा

पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणे

शीव शीव..................

यशोधरा's picture

11 Oct 2009 - 12:09 am | यशोधरा

थ्यांक्यू सगळ्यांना :)

चिरोटा's picture

11 Oct 2009 - 12:19 am | चिरोटा

पुण्यात असताना दूध तापवत ठेवले होते.थोड्या वेळाने येवून बघतो तर उकळत्या दुधात पालीची धडपड चालु होती.अजुनही पाल दिसली की तोच प्रसंग आठवतो.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

अरुण मनोहर's picture

11 Oct 2009 - 2:56 pm | अरुण मनोहर

पाल्केस्ट्रा!!!! मस्त टाईमपास लेख!!!

----* बंगळुरुच्या पाली, पाली भाषेत बोलतात का?

----* आमच्याकडे आंब्याच्या झाडावर एक पाल रहायची. तिचे नाव मी आम्रपाली ठेवले होते.

हेरंब's picture

11 Oct 2009 - 6:18 am | हेरंब

पालीची भीति फक्त बायकांनाच वाटते असे नाही. मी व माझ्या काही मित्रांनाही पालीची प्रचंड भीति व किळस वाटते. त्यात बायकोलाही भीति वाटत असल्यामुळे पाल कोणी मारायची वा हाकलायची हा मोठा यक्षप्रश्न होतो. कदाचित् दोनदा पाठीवरच पाल पडल्यामुळे ही भीति वाटत असेल!

विसोबा खेचर's picture

11 Oct 2009 - 8:02 am | विसोबा खेचर

तुमचं घर पालींनी दुधो नाहो, पुतो फलो! :)

तात्या.

यशोधरा's picture

11 Oct 2009 - 6:02 pm | यशोधरा

आँ?? :O

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2009 - 8:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

यशो, दुधाला तेलुगुमधे पालु म्हणतात.

अदिती

भोचक's picture

11 Oct 2009 - 4:01 pm | भोचक

चुरचुरीत लेख. बाकी, आमच्या नाशिक परिसरात पाली चुकचुक आवाज करत नाहीत, आणि तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पाली आवाज करतात. प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतल्यावर आश्चर्य वाटलं होतं. त्यात कुणीतरी स्पष्टीकरण दिलं. रामाने (म्हणे) नाशिककडच्या पालींना शाप दिला होता, तुम्ही चुकचुकणार नाही. त्यामुळे नाशकाकडच्या पाली म्हणे चुकचुकत नाहीत. ( त्या 'हे राम' म्हणतात असं ऐकतोय.) खरं खोटं तो एक 'राम जाने'.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

हा आहे आमचा स्वभाव

श्रावण मोडक's picture

11 Oct 2009 - 4:34 pm | श्रावण मोडक

हे ऐकले होते मीदेखील.

यशोधरा's picture

11 Oct 2009 - 6:04 pm | यशोधरा

धन्यवाद सर्वांचे :)

चतुरंग's picture

12 Oct 2009 - 1:21 pm | चतुरंग

मस्त चुरचुरीत लेखन!
एकाच झुरळाच्या पाठीमागे लागून ते खाण्यासाठी लढाई चाललेल्या दोन पाली मी बघितल्या आहेत. ट्यूब किंवा बल्बजवळ उडणार्‍या किड्यांना हळूहळू सरकत जाऊन, डोके विशिष्ठ कोनात अ‍ॅडजस्ट करुन, एकाच झपाट्याच्या हालचालीसरशी मटकावणार्‍या पाली निरखत मी कित्येक तास काढलेत! काचेवर बसलेल्या पालीच्या पंजाचे खळगे, खालीवर होणारा गळा आणि किंचित पारदर्शक त्वचा असलेले पांढरट पोट ह्याचेही मी सूक्ष्म निरीक्षण केले आहे. मांजराने पकडायचा प्रयत्न केला तर पाल काय शिताफीने शेपूट तोडुन पळते हेही बघण्यासारखे असते! पाल हा एक विलक्षण प्राणी आहे. (बास इतकेच सांगतो -नाहीतर आता यशोधरा मला पालीच्या तोंडी देईल! ;) )

जाता जाता - पाली भाषेत पालीला काय म्हणतात बरं? :?

चतुरंग(पालकर)

सहमत.

एकदा आम्ही गच्चीत गप्पा मारत होतो. पाल दिसली. मित्राकडून लेसर(?)ची कीचेन घेउन त्याचा लाल ठिपका एका भिंतीवरच्या पालीला दाखवून तिला त्यामागे इकडे तिकडे फिरवायला लावले होते. गप्पा मारण्यात ठिपका हलवायचा राहिला आणि पाल तिथपर्यंत पोचली तरी तिला काही केल्या तो खाता किंवा पकडता येत नव्हता आणि काय होत आहे ते तिला कळतही नव्हते. खूप मजा आली :D

मेघवेडा's picture

21 Sep 2010 - 2:26 pm | मेघवेडा

हा हा हा.. मस्त! "पालीच पाली चहूकडे, गं बाई करू मी रांधप कुणीकडे?" असं एखादं विडंबन पाड! ;)

बाकी आम्हालाही आवडतात पाली लैच! आम्ही बार्बेक्यू करून खातो! ;)

यशोधरा's picture

21 Sep 2010 - 2:54 pm | यशोधरा

>>पालीच पाली चहूकडे, गं बाई करू मी रांधप कुणीकडे?>>>> LOL! :D
त्याला आता लय उशीर झाला! :)

पण विडंबन पाडायला काय जातंय! ;)

हो, आजकाल ते अगदी सोप्पं झालय म्हणे! :D

मेघवेडा's picture

21 Sep 2010 - 4:44 pm | मेघवेडा

किरकिर उंदिर करे सारखा
ओट्यावरही झुरळ चढे
पालीच पाली चहूकडे
गं बाई करू मी रांधप कुणीकडे

घरभर फिरले मारण्या पाली
गोणी, पिंपं, ओट्याखाली
चमकून बघता वरती दिसली
दचकून माझा ऊर उडे
गं बाई करू मी रांधप कुणीकडे..

काप काढली असती तळुनि
(पण) कढई भरली मधमाशांनी
खुणाविते मज फळीवरूनि
घसरत झुरळच दुग्धि पडे
गं बाई करू मी रांधप कुणीकडे

बाकी कडवी सवडीने. ;)

सविता's picture

21 Sep 2010 - 10:39 pm | सविता

क...ह......र............

विडंबन म्हटले की लोक कसे पेटून ऊठतात जणू... सगळी प्रतिभा उफाळून येते :)

अवलिया's picture

21 Sep 2010 - 2:55 pm | अवलिया

पुन्हा लेख वाचला ! मस्तच !!

अब् क's picture

21 Sep 2010 - 3:24 pm | अब् क

मस्तच !!

पुष्करिणी's picture

21 Sep 2010 - 3:43 pm | पुष्करिणी

मला पाली खूप आवडतात. पाली असल्या की झुरळं, ते दिव्याभोवती संध्याकाळी येणार्‍या किड्यांचा आपोआप बंदोबस्त होतो.

पाल अंगावर पडली की म्हणे अंघोळ करावी लागते , परत डाव्या की उजव्या साइडला पडली ह्याचं पण काहीतरी महत्व आहे. माझ्या अंगावर बर्‍याचदा पाली पडल्यात, मी त्यांना हातात घेउन फेकून दिलय्...फार गार गार लागतात.

पालीला मारल्यावर म्हणे काहीतरे प्रयश्चित्त करावं लागतं रामेश्वरला जाउन ! काही लोकं पालीपासून काहीतरी नशीले पदार्थ तयार करतात असं ऐकलय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2010 - 10:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही लोकं पालीपासून काहीतरी नशीले पदार्थ तयार करतात असं ऐकलय.

माझ्या एका मित्रानेच मला पाल सिग्रेटमधे घालण्याबद्दल सांगितलं आहे; म्हणजे त्याने पाल ओढल्याचं सांगितलं आहे.

सध्या माझ्या घरातल्या/घराबाहेरच्या पालीने चुकचुकणं बंद केलंय म्हणून मला ती फार आवडते.

सविता's picture

21 Sep 2010 - 3:59 pm | सविता

एक नंबर.....................................

सूड's picture

21 Sep 2010 - 9:13 pm | सूड

लहाणपण आठवलं, नववीत असताना रुपाली नावाच्या एका मुलीचं चेतन नावाच्या एका जाड्या मुलाशी अफेअर होतं.
त्याला आम्ही पालीचा गणपती म्हणायचो. :)

यशोधरा's picture

21 Sep 2010 - 9:14 pm | यशोधरा

LOL! कुठून कुठे! =))

आता आठवलं ते लिहीलं

ह्यालाच प्रतिभा म्हणत असावेत !!

ईऽऽऽऽ!
प्रतिसाद देऊ शकणार नाही.
मळमळायला लागलं.

शिल्पा ब's picture

22 Sep 2010 - 12:50 am | शिल्पा ब

छान लेख..मलाही पाली आवडत नाहीत...काहीतरीच दिसतात...किळस येते.
बाकी पालीचा नशेसाठी उपयोग वाचून असेच एखादे घरातल्या पाली मारून टाकायचे कंत्राट घ्यायचा व्यवसाय चालू करू शकता..(ज्या कोणाला इच्छा असेल ते)

नंदन's picture

22 Sep 2010 - 1:15 am | नंदन

हा लेख वाचायचा राहूनच गेला होता.

माझी समजूत होती स्वयंपाकघरातल्या ओट्यावर पाल्केस्ट्रा सुरु असेल, पण नाही.

--- पाल्केस्ट्रा =)). सोबीची अ‍ॅड आठवली :)

नंतरचे २ दिवस पाहिले, तरीही चाहूल नाहीच! झोपण्याच्या खोलीतल्या पण गायब! दिवाणखान्यात एकच दिसली! अरेच्या, म्हटलं झालं काय! गेल्या कुठे सख्या! चक्क मी पालींची वाट वगैरे पाहिली, काय झालं असेल त्यांना, मेल्या की कावळ्याने खाल्ल्या, की अजून काय झालं वगैरे हजारो प्रश्न माझ्या मनात उभे राहिले! चक्क जरा काळजी वगैरे वाटली!

--- "कसं अगदी ओकंओकं वाटतंय!", हे पालीव प्राणी, आपलं पाळीव प्राणी'तलं वाक्य आठवलं ;)

इंटरनेटस्नेही's picture

22 Sep 2010 - 9:15 pm | इंटरनेटस्नेही

एकदा माझ्या कक्षात पाल आली होती. मी तिच्या मानेवरुन स्केल फिरवली, जसं क्रेडिट कार्ड आपण फिरवतो ना स्वाईप करतान तसं. एका मिनिटात गेम खल्लस!

पाल पेस्ट कंट्रोलसाठी उपयुक्त असाली तरी आपल्याला तर बाबा तिची अत्यंत किळस वाटते. माझ्या परसात कधी कधी सरडे दिसतात. त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता नसली तरी किळस वाटत नाही. पण पाल म्हणजे अगदी कल्पनेतही नकोशी वाटते.

पाल पेस्ट कंट्रोलसाठी उपयुक्त असाली तरी आपल्याला तर बाबा तिची अत्यंत किळस वाटते. माझ्या परसात कधी कधी सरडे दिसतात. त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता नसली तरी किळस वाटत नाही. पण पाल म्हणजे अगदी कल्पनेतही नकोशी वाटते.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Sep 2010 - 8:07 am | जाई अस्सल कोल्हापुरी

....माझ्या ओळखीचे एक सद्गृहस्त आहेत. त्यांना प्राणीमात्रांची विषेश आवड आहे.
hight म्हणजे त्यानं घरी Iguanaa पाळलय!....
घरात ३ फूटी इग्वाना?.....
आणि त्याच म्हणे लग्न ठरवायचय. प्राणी आवडणारी बायको हविये म्हणे.
कारण घरात २ कुत्री. त्यातलं एक Pitbull , २पोपट्...मोठ्ठं अ‍ॅक्वेरियम ,आणि ते कमी म्हणुन Iguana
आहे नाहि interesting?

यशोधरा's picture

23 Sep 2010 - 12:25 pm | यशोधरा

कोणाचं? इग्वानाचं?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Sep 2010 - 1:38 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

नाही.... मालकाचं!
आहे का कोणी "स्थळ"?