मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(पडुन आहे गात्र कुजुनि)

मेघवेडा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रियालीतैंच्या "भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य" या धाग्यावर केलेलं विडंबन आहे. तेव्हा दोनच कडवी लिहिली होती. आता पूर्ण काव्याचं विडंबन देतो आहे. सुरेश भट साहेबांच्या या अजरामर कलाकृतीचं हे बीभत्स विडंबन केल्याबद्दल त्यांची माफी मागतो. सिच्युएशन अशी आहे : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे. तिला प्रेत आणि आत्मा यांच्या वेशीवर सोडून तो एकटाच सुटला आहे. पडुन आहे गात्र कुजुनि, राजसा जळलास का रे? सोडुनि मज प्रेतरूपी, एकटा पळलास का रे? अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे? आग या मसणात पडलेल्या शवाला लाव ना तू कुजतसे अंगांग माझे, येत आहे वास का रे? बघ जरा कुजतोच आहे, दक्षिणेचा हात माझा नाक आणि कान कुजले, एवढा उरला घसा रे उसळती पोटात माझ्या आम्लपित्ताच्याच लाटा आतडे फुटले बिचारे, यकृताचीही दशा रे गोठलेले थंड सारे, गात्र करि हे बंड सारे विझुन गेलेल्या चितेवर अजुनही मज भरवसा रे ****************************************************************** मूळ गीत. तरूण आहे रात्र अजुनि

वाचन 6627 प्रतिक्रिया 0