पाककृती

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
9 Aug 2015 - 15:37

दाल पराठा

उरलेली शिळी आमटि, दाल फ्राय किंवा दाल तडकाचा ब्येस्ट सदुपयोग!

paratha 1

साहित्यः

माहितगार's picture
माहितगार in पाककृती
6 Aug 2015 - 13:23

संत एकनाथांचा नैवेद्य - काही शब्दार्थ/पदार्थ माहितकरून हवेत

झाल्या धूप दीप नीरांजन । देवासी वोगरावें भोजन ।
नानापरीचें पक्वान्न । अन्न सदन्न रसयुक्त ॥२९०॥
मांडा साकरमांडा गुळवरी । शष्कुल्या अमृतफळें क्षीरधारी ।
दुधामाजीं आळिली क्षीरी । वाढिली परी वळिवट ॥९१॥
मधुवडा कोरवडा । लाडू तिळवयांचा जोडा ।
रुची आला अंबवडा । ठायापुढां वाढिंनला ॥९२॥
पत्रशाकांची प्रभावळी । भात अरुवार जिरेसाळी ।

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
29 Jul 2015 - 21:37

कोकोनट नानकटाई

.

साहित्यः

२५० ग्राम मैदा
२०० ग्राम अनसॉल्टेड बटर किंवा तूप
१७५ ग्राम साखर
५० ग्राम रवा
५० ग्राम बेसन
५० ग्राम डेसीकेटेड कोकोनट
दीड टीस्पून वेलचीपूड
२ टेस्पून पिस्तापूड

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
22 Jul 2015 - 21:17

हिरव्या मसाल्यात तळलेली कोलंबी.

कोलंबीची निर्मिती करताना परमेश्वर नक्कीच खुशीत असला पाहिजे.त्याशिवाय इतकी सुंदर निर्मिती होत नाही.आणि जसे,’पानी रे पानी तेरा रंग कैसा,जिसमे मिलादे मुझे उस जैसा.’ तशीच कोलंबीही ज्या मसाल्यासोबत कराल त्याच्याशी जमवून घेत स्वतःची चव,’बिलकुल उस जैसी ’करून सोडते.कमीत कमी मसाले हेही या कोलंबीच्या तिसऱ्या अध्यायाचे वैशिट्य,तळलेली कोलंबी तुम्ही खूप खाल्ली असेल .एकदा या पद्धतीने करून पहा.पुन्हा पुन्हा क

तळ्यात मळ्यात's picture
तळ्यात मळ्यात in पाककृती
20 Jul 2015 - 09:19

आंबा कलाकंद

आंबा कलाकंद

आंबा कलाकंद

आंब्याचा सिझन संपून गेलाय खरा, पण हल्ली मँगो पल्प तर वर्षभर मिळतो आणि मिपावरची माझी पहिली रेसिपी गोड असावी म्हणून आजचा मान आंब्याला!

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in पाककृती
14 Jul 2015 - 19:15

फोडशी/कुलुची भाजी

फोडशी किंवा कुलु किंवा काल्ला या नावाने हि रानभाजी रायगड जिल्ह्यात ओळखली जाते. इतर भागात या भाजीची नावे वेगळी असू शकतात.
हि भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते.

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
13 Jul 2015 - 22:26

श्रीम्प जंबलाया

श्रीम्प जंबलाया

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
12 Jul 2015 - 11:01

कोलंबीची नारळाच्या रसातील कढी

कोलंबी पुराणाचा दुसरा अध्याय. पहिला कोलंबीची मॉली.ही कढी कधीही करा. फन्ना उडणारच.माझ्याकडे अतिथींचे प्रमाण जरा जास्तच आहे. आम्ही दोघे असल्याने आता स्वयंपाक अजून दोन पाहुणे आले तरी सरतील असा नसतो त्यामुळे चटकन् होणाऱ्या पदार्थांना विशेष पसंती असते माझी. या काधीबद्दल बोलायचं तर विशेष फर्माईश असते आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची. अतिशय कमी साहित्यात होणारी कढीची ही कृती.

किल्लेदार's picture
किल्लेदार in पाककृती
10 Jul 2015 - 10:17

साल्मन !!!!

खरं सांगायचं तर ही काही पाककृती नाही आणि मी काही पाक-कुशल नाही. पण २-४ कलाकारांना एकत्र आणून त्या मेहफिली चा आनंद लुटणारा रसिक नक्कीच आहे. श्रीयुत साल्मन (यातला "ल" हा सायलेंट आहे)हे यातले प्रमुख कलाकार आणि सोबत करायला भरपूर लसूण (हा मात्र सायलेंट असता कामा नये), लेट्युस, ब्रोकोली, लिंबू आणि उगाच थोडं ओलिव्ह ऑईल. मीठ आणि मिरी हे अर्थात निवेदक म्हणून हवेतच.

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
10 Jul 2015 - 01:30

लवेंडर अँड स्ट्रॉबेरी पॉपसीकल्स

साहित्यः

लवेंडर - १ टेबलस्पुन
स्ट्रॉबेरी - १ कप
दुध - १ कप
दहि (ग्रीक योगर्ट)- १ कप
साखर - १ कप

कृती:

१. एका पातेल्यात दुध गरम करण्यास ठेवावे. त्यात १/२ कप साखर व १ टेबलस्पुन लवेंडर टाकुन ५ मिनिटे उकळुन घ्यावे.

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
8 Jul 2015 - 21:22

काँबीनात्सिऑन (प्रकार २)

.

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
3 Jul 2015 - 22:14

रोझ अतैफ -बिल-अष्टा

.

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
3 Jul 2015 - 17:13

शेवळाची भाजी

पहिला पाऊस पडला की,एखाद्या आठवड्याभरात बाजारात शेवळं दिसू लागतात.त्यासोबत काकडंही. मातकट,किरमिजी रंगांच्या साधारण सात ते आठ इंची जणू एखाद्या फुलाच्या कळ्याच जणू.एखादीतून तिचा पिवळसर कोंब,एखादीतून चक्क जांभळा कोंब दिसतोय. साधारण आठवडाभरच निसर्गाचे हे नवल पाहायला मिळते आणि पुढची आठ/दहा दिवसात अंतर्धानही पावते.

वडाप's picture
वडाप in पाककृती
1 Jul 2015 - 19:05

भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी

भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी-

dadadarekar's picture
dadadarekar in पाककृती
27 Jun 2015 - 17:49

पिकल्या आंब्याची भाजी / कढी

साहित्य .

चार आंबे .. साल काढुन गराच्या बारीक फोडी कापून घ्याव्यात. थोडा गर क्रश करून आमरस करुन ठेवावा.

अर्धा नारळ किसून घ्यावा. वाटीभर कोमट पाण्यात थोडा वेळ ठेऊन कुसकरुन त्याचे दूध काढून घ्यावे.

फोडणीसाठी .. एक चमचा तेल, एक चमचा तूप, जिरे , मोहरी , हिंग ,हळद

तिखट , मीठ

दोन चमचे चिंचेचा कोळ , दोन चमचे गूळ

............

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
27 Jun 2015 - 11:48

कोलंबीची मॉली

मला वेगळे प्रकार करायला न् खायला भयंकर आवडतं.पाचवीत असल्यापासून आईल २-३ दिवसांसाठी कामासाठी गावी गेली की स्वयंपाक करावा लागत असे.न आई करून जात असे पण तेव्हा फ्रीज नसल्याने कधी खराब झालं तर काही भाजी, आमटी करायची वेळ येत असे. आई स्वयंपाक करताना पहत असे. वाटून कातून द्यायला मदतही करत असे.मासे भाज्यांपेक्षा करायला सोपे वाटत.एक वाटण वाटले की काम झाले.

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
26 Jun 2015 - 20:21

द्वि-पात्री प्रयोग...... नारळाचे दूध, वापरून केलेले टोमॅटो सूप....

डिस्क्लेमर :

१. फोटोची क्वालिटी बघू नका.
२. संपादकांना नम्र विनंती, की त्यांनी फोटोला योग्य तो आकार-उकार द्यावा.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
24 Jun 2015 - 19:46

फादर्स डे स्पेशल -मिक्स पनीर भाजी (झणझणीत नागपुरी स्टाईल)

रविवारचा दिवस होता तरी सकाळी योग पाहण्यासाठी सकाळी ६ वाजताच उठलो. योग संपण्याचा आधीच आमच्या भागात पाऊस सुरु झाला. सकाळी ९ वाजता आमच्या चिरंजीवाने ‘हैप्पी फादर्स डे’ केले. संध्याकाळी बाजारातून २५०ग्रम पनीर घेऊन आलो होतो. आल्यावर सौ. ला म्हंटले आज फादर्स डे आहे. शाही पनीर करते का? सौ. उतरली, मिक्सर खराब झाले आहे. मोटर कामातून गेली आहे. गेल्याच वर्षी ठीक केली होती.

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
20 Jun 2015 - 02:14

ढेमश्याची भाजी

सर्वप्रथम पाककृती द्यायला अक्षम्य उशीर झाला, ह्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

म्हणजे त्याचे असे झाले, की फोटो मी एका मोबाइल मध्ये काढले आणि ऐनवेळी त्या मोबाइलची बॅटरी संपली.सुदैवाने दुसरा मोबाईल होता. त्यात काही फोटो काढले. पहिला मोबाइल मुलाने पळवला आणि त्यातील फोटो त्याच्याकडून डिलीट केल्या गेले.त्यामुळे ढेमसे आणि साहित्य, ह्याचे फोटो नाहीत.

जमल्यास फोटो मिळाले तर बघतो.

आदूबाळ's picture
आदूबाळ in पाककृती
14 Jun 2015 - 04:34

ओव्हनफ्रेश सांडगे

घरासमोर मोठ्ठी गच्ची होती. वाड्यातल्या बर्‍याच बिर्‍हाडांतल्या काकवा, मावश्या, आज्ज्या उन्हाळ्यात वाळवणं घालायला यायच्या. माझी आज्जीही वाळवणं घालायची. पापड, कुरडया, भरल्या मिरच्या. एका कोपर्‍यांत मलमली कापडांत पडदानशीन केलेले सांडगे.