रोझ अतैफ -बिल-अष्टा

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
3 Jul 2015 - 10:14 pm

.

अतैफ -बिल-अष्टा ही एक अरबी पाककृती आहे, काही ठिकाणी ह्या पाककृतीला कतैफ -बिल-अष्टा असे ही म्हटले जाते. ह्यात अतैफ म्हणजे यीस्ट घालून केले पॅनकेक्स, अष्टा म्हणजे पॅनकेकच्या आत भरण्यासाठी तयार केलेले मुलायम, क्रीमी फीलिंग. रमादान मध्ये खासकरुन ही गोडाची पाककृती बनवली जाते. मी ह्या पाककृतीत थोडेसेच बदल केले आहेत.

साहित्य पॅनकेकसाठी

१ वाटी गव्हाचे पीठ + १ वाटी मैदा एकत्र करुन घेणे
१-१/४ वाटी पाणी
१ वाटी दूध
१/२ टीस्पून ड्राईड यीस्ट
१/४ टीस्पून मीठ
२ - टीस्पून साखर

प्रमाण मी छोट्या वाटीचे घेतले आहे ताप्रमाणे ह्या मिश्रणाचे आठ पॅनकेक्स तयार होतात.

.

कृती:

गव्हाचे पीठ + मैद्यात मीठ, साखर व यीस्ट एकत्र मिकस करुन घ्या.
दूध + पाणी कोमट करुन घ्या.
हे कोमट दूध-पाण्याचे मिश्रण पिठात घालून, गुठळ्या होऊ न देता चांगले मिक्स करुन घ्या.
हे मिश्रण झाकून एक तास बाजूला ठेवा.
तासाभराने मिश्रण फुगून वर आलेले असेल.

.

नॉन-स्टीक तवा मंद आचेवर गरम करायला ठेवा.
मी नॉन-स्टीक तवा असल्यामुळे अजिबात तेलाचा वापर केलेला नाहिये.
डावभर मिश्रण तव्यावर ओतावे, पसरवायचे नाही.
पॅनकेकवर जाळी यायला लागली, आणि त्यावरचा ओलसरपणा पूर्ण सुकला की काढावे, उलटवायचे नाही.

.

अशा पद्धतीने सर्व पॅनकेक्स तयार करुन घ्यावे.

साहित्य अष्टासाठी:

१ वाटी दूध
१ वाटी फ्रेश क्रीम (इथे मुळ पाककृतीत अरबी Qaimar क्रीमचा वापर केला जातो, ते न मिळाल्यामुळे मी फ्रेश क्रीम वापरले)
२ टेस्पून कॉर्नफ्लॉर
३ टेस्पून रोझ सिरप ( मुळ पाकक्रुतीत रोझ वॉटर किंवा ऑरेंज ब्लॉसम वॉटर वापरले जाते, माझ्याकडे दोन्ही नव्हते म्हणून मी रोझ सिरप वापरले)
१-२ टेस्पून साखर (सिरपच्या गोडीनुसार प्रमाण घ्यावे)
सजावटीसाठी पिस्त्याची पूड

.

कृती:

दूध व फ्रेश क्रीम एकत्र करुन गॅसवर , मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
कॉर्नफ्लॉरमध्ये थोडे दूध घालमु, मिक्स करुन घ्यावे.
गरम झाल्य्ल्या दुधात कॉर्नफ्लॉरचे मिश्रण घालून सतत ढवळत रहावे.
त्यात रोझ सिरप व साखर घालून ढवळावे.

.

हळू-हळू मिश्रण दाट होऊ लागेल.
मिश्रणाची कंसीस्टंसी कस्टर्डप्रमाणे हवी.
गॅस बंद करुन थोडे गार होऊ द्यावे.
वरुन क्लिंग रॅप लावून ठेवावे म्हणजे वर मिश्रण सुकल्यासारखा थर तयार होणार नाही.
आता हे रेफ्रिजरेट करावे.

.

अस्मेब्लिंगः

तयार पॅनकेकच्या दोन्ही कडा एकत्र करुन, अर्धगोलाकारात दुमडून, हलका दाब देऊन बंद कराव्यात.
एक कोपरा कस्टर्ड भरण्यसाठी मोकळा असावा.

.

तयार कस्टर्डला पायपींग बॅग किंवा रीक्लोझेबल बॅगमध्ये भरुन घ्यावे व बॅगेचे टोक कापावे.
अर्धगोलाकार पॅनकेकमध्ये हे रोझ कस्टर्ड पाईप करुन घ्यावे.
त्यावर पिस्त्याची पूड घालावी.

.

रोझ अतैफ -बिल-अष्टा - नाव जरी कठीण वाटत असले तरी पदार्थ चवीला अप्रतिम लागतो :)
चला तर मग घ्या पटापट खायला.

.

लगेच सर्व्ह करणार नसाल तर फ्रीजमध्ये ठेवून द्या.
फीलिंग अधिक रीच बनवण्यासाठी रिकोटा चीझचा ही वापर कस्टर्डमध्ये करत येईल.
आवडत असेल तर ह्या अतैफवर मध किंवा मेपल सिरप ड्रिझल करु शकता. तसे काही वेळेला करंजीप्रमाणे पूर्ण दुमडून हे पॅनकेक तळले जातात व साखरेच्या पाकात घोळवले जातात.

प्रतिक्रिया

सूड's picture

3 Jul 2015 - 10:27 pm | सूड

कहर!!

लाजवाब ! एवढ्या उन्हाळ्यात मस्त वाटतंय. पण मला रोझ फ्लेवर आवडत नाही, त्यामुळे ऑरेंज किंवा तत्सम सिट्रस फ्लेवर वापरुन करेन. एक दोन फॅमिलीज ला जेवायला बोलवायचं आहे, काही तरी शाही मेनु हवाच होता. धन्यवाद गं :)

राघवेंद्र's picture

3 Jul 2015 - 10:41 pm | राघवेंद्र

छान दिसत आहेत.

नूतन सावंत's picture

3 Jul 2015 - 10:42 pm | नूतन सावंत

माशा अल्ला!सुब हान् अल्ला!सानिकाबिबी क्या बात है!वाह!वाह!कम्माल कर दी आपने तो!_/\_

सानिकास्वप्निल's picture

3 Jul 2015 - 10:53 pm | सानिकास्वप्निल

नोट मध्ये एक लिहायचे राहून गेले, आवडत असेल तर ह्या अतैफवर मध किंवा मेपल सिरप ड्रिझल करु शकता. तसे काही वेळेला करंजीप्रमाणे पूर्ण दुमडून हे पॅनकेक तळले जातात व साखरेच्या पाकात घोळवले जातात.

पद्मावति's picture

3 Jul 2015 - 11:00 pm | पद्मावति

नेमकं कशाची तारीफ करायची? ह्या अनोख्या रेसेपीची, हा पदार्थ बनविणार्या सुगरणपणाचि की त्याच्या सादरीकरणाची? तीनही साठी एकच शब्द---लाजवाब!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jul 2015 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे एक खाद्यकट्टा बनवा आणि सानिकास्वप्निल यांना हे आणि त्यांच्या इतर सर्व पाकृ खरंच येत आहे हे सिद्ध करायला लावा ! :)

(आम्हाला हे सगळे मस्तं मस्तं पदार्थ खायला मिळाल्याशी कारण ! ;) )

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2015 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा

मी शेवटच्या फ़ोटुत एका केक रोल मधून आत गेलेलो आहे! आता पुढच्या जन्मी भेटु रेsss!

रोज खातैफ -मिळ-नाष्टा मधे दिवंगत झालेला :-
आत्मु खादाड अतृप्तिवाले..

मधुरा देशपांडे's picture

4 Jul 2015 - 12:31 am | मधुरा देशपांडे

खपले आहे. अप्रतिम.

स्वाती२'s picture

4 Jul 2015 - 1:37 am | स्वाती२

एकदम शाही दिसतायत!

जुइ's picture

4 Jul 2015 - 3:44 am | जुइ

नवीनच प्रकार कळाला!

रेवती's picture

4 Jul 2015 - 8:20 am | रेवती

वेगळा आणि मस्त पदार्थ! पहिल्यांदाच बघितला.

अजया's picture

4 Jul 2015 - 8:30 am | अजया

अ प्र ति म!
हे खरंच इतकं सुंदर दिसतं का सानिका जादू करते?

इरसाल's picture

4 Jul 2015 - 9:39 am | इरसाल

तुमच्या कडे हॉबिटवाली सोन्याची रिंग आहे !

सानिकास्वप्निल's picture

5 Jul 2015 - 9:24 pm | सानिकास्वप्निल

हो गोलमने दिलिये ;)

मितान's picture

4 Jul 2015 - 10:39 am | मितान

आईग्गं !!!!!
कधी खायला मिळणार!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Jul 2015 - 10:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाष्ट्याला अष्टा छाने हा :)

विशाखा पाटील's picture

4 Jul 2015 - 11:03 am | विशाखा पाटील

या जन्मात तरी एवढे छान स्वत: करणे शक्य नाही, एवढे बोलून मी हा पदार्थ बहारिनला विकत मिळतो का, याचा आजच शोध घेते.

dadadarekar's picture

4 Jul 2015 - 11:22 am | dadadarekar

नुसती अंबोळी करुन श्रीखंड भरले जाइल

स्नेहानिकेत's picture

4 Jul 2015 - 11:28 am | स्नेहानिकेत

मस्तच!!!

स्वाती दिनेश's picture

4 Jul 2015 - 1:13 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसत आहेत अतैफ बिल अष्टा..
स्वाती

तुषार काळभोर's picture

4 Jul 2015 - 1:15 pm | तुषार काळभोर

इसकी सजा मिलेगी!
बराबर मिलेगी!!

स्पंदना's picture

4 Jul 2015 - 1:46 pm | स्पंदना

काय फोटो आहे पहिलाच!! जिवंत झाले की उरलेली पाकृ वाचेन। तोवर अलविदा अलविदा!

सर्वसाक्षी's picture

4 Jul 2015 - 1:49 pm | सर्वसाक्षी

अगदी पाहिल्याबरोबर खावस वाटणारं नवं मिष्टान्न! अप्रतिम.
धन्यवाद

खतर्नाक .जबर्दस्त. सानिका बच्च्को कि जान लोगी क्या ????

सुहास झेले's picture

4 Jul 2015 - 4:30 pm | सुहास झेले

खतरनाक !!!!

बॅटमॅन's picture

4 Jul 2015 - 5:10 pm | बॅटमॅन

खतरनाक!

इशा१२३'s picture

4 Jul 2015 - 8:09 pm | इशा१२३

वरिल सर्व प्रतिसादाना अनुमोदन.सुरेखच......

कविता१९७८'s picture

4 Jul 2015 - 8:12 pm | कविता१९७८

मस्तच ग, तुझा जवाब नाही

मनुराणी's picture

4 Jul 2015 - 8:42 pm | मनुराणी

वाह्! क्या बात है.

चाणक्य's picture

4 Jul 2015 - 11:33 pm | चाणक्य

सलाम सलाम सलाम. सादरीकरणातच खपल्या गेलेलो आहे. कसं काय जमतं राव तुम्हाला!

बोका-ए-आझम's picture

5 Jul 2015 - 10:13 am | बोका-ए-आझम

अंमळ रोम्यांटिक वगैरे आणि कातिल आलेला आहे. अॅनिव्हर्सरी स्पेशल म्हणून पेटंट घ्यायला हरकत नाही.

मनिष's picture

5 Jul 2015 - 11:41 am | मनिष

ख-प-लो!!!!!!! अशक्य आहे हा पदार्थ! :-)

पियुशा's picture

5 Jul 2015 - 4:36 pm | पियुशा

वाह वाह वाह ! क्या खुब !

सानिकास्वप्निल's picture

5 Jul 2015 - 9:21 pm | सानिकास्वप्निल

सर्व प्रतिसादकांचे आभार :)

पैसा's picture

5 Jul 2015 - 10:01 pm | पैसा

अग्गग्गग्गग! काय जबरदस्त सादरीकरण अन फटु ते! एकदम शाही दावत दिसते आहे!

श्रीरंग_जोशी's picture

6 Jul 2015 - 1:56 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

मला गोड पदार्थ आवडत नाहीत, पण पहिली प्यानकेकची रेसिपी मस्त वाटली. मी त्यात खिमा किंवा मटार पनीर चं मिश्रण भरू शकतो का?

स्मिता श्रीपाद's picture

6 Jul 2015 - 11:12 am | स्मिता श्रीपाद

काय बोलु ? काय लिहु ?
मै कौन हु ? मै कहा हु ?
साष्टांग नमस्कार __/\__

वा वा वा... काय मस्त दिसतोय,.. यम्म्म्म्म एकदम. खुप सुंदर फोटो.

मोहनराव's picture

6 Jul 2015 - 6:09 pm | मोहनराव

_/\_

बापरे! हे असं काही बनवता येतं? महान आहेस : )

मदनबाण's picture

7 Jul 2015 - 4:12 pm | मदनबाण

वल्ला ! बहुत खुबसुरत ! :)

जाता जाता :- पाकॄच्या नावावरुन मला हायफा चे Mosh Adra Istanna गाणे आठवले !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका

उमा @ मिपा's picture

7 Jul 2015 - 6:01 pm | उमा @ मिपा

शानदार!
सानिका, इ लोवे यु!

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2015 - 4:27 pm | दिपक.कुवेत

अष्टा बनवलास? छे काय लिहू तेच सुचत नाहिये....जब्राट.

विवेकपटाईत's picture

14 Jul 2015 - 9:12 pm | विवेकपटाईत

खाद्यपदार्थ आवडला. पाहू प्रयत्न करून

झंप्या सावंत's picture

29 Jul 2015 - 3:40 pm | झंप्या सावंत

निशब्द ....................