लवेंडर अँड स्ट्रॉबेरी पॉपसीकल्स

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
10 Jul 2015 - 1:30 am

साहित्यः

लवेंडर - १ टेबलस्पुन
स्ट्रॉबेरी - १ कप
दुध - १ कप
दहि (ग्रीक योगर्ट)- १ कप
साखर - १ कप

कृती:

१. एका पातेल्यात दुध गरम करण्यास ठेवावे. त्यात १/२ कप साखर व १ टेबलस्पुन लवेंडर टाकुन ५ मिनिटे उकळुन घ्यावे.

p1

२. गरम झालेले दुध गाळुन घेउन गार होऊ द्यावे.
३. दुसर्‍या भांड्यात १/२ कप साखर व स्ट्रॉबेरी घेउन शिजु द्यावे. हे मिश्रण देखिल गार करुन घ्यावे.

p2

४. आता गार झालेल्या दुधामधे १ कप ग्रीक दहि टाकुन चांगले फेटुन घ्यावे.

p3

५. पॉपसीकल्स बनवायच्या साच्यामधे दहि व दुधाचे २ चमचे मिश्रण टाकुन वरुन १-१ चमचा स्ट्रॉबेरीचा केलेला जॅम टाकावा. सगळ्यात शेवटी परत दुध- दहिचे मिश्रण टाकुन साचा भरुन घ्यावा.

p4

p5

p6

६. हा साचा फ्रिजर मधे सेट होण्यासाठी ५-६ तास ठेवुन द्यावा.

p7

७. पॉपसीकल्स सेट झाल्यावर साचा बाहेर काढुन गरम पाण्यात १ मिनिट फिरवुन घ्यावा. त्यामुळे पॉपसीकल्स साच्यामधुन काढण्यास मदत होते.
८. पॉपसीकल्स खाण्यासाठी तयार आहेत.

p8

p9

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

10 Jul 2015 - 1:35 am | श्रीरंग_जोशी

वाह एकदम तोंपासु पाकृ.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2015 - 1:43 am | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआ!!!

स्रुजा's picture

10 Jul 2015 - 2:09 am | स्रुजा

काय सही दिसतंय.. वा वा वा..

रेवती's picture

10 Jul 2015 - 2:22 am | रेवती

छान दिसतायत पॉप्सिकल्स!

पद्मावति's picture

10 Jul 2015 - 4:06 am | पद्मावति

ऐन गरमीच्या दिवसात मस्तं गारेगार रेसिपी आली आहे. फोटो छानच.

जुइ's picture

10 Jul 2015 - 4:47 am | जुइ

फारच छान दिसत आहेत पॉप्सिकल्स!!

स्मिता श्रीपाद's picture

10 Jul 2015 - 10:35 am | स्मिता श्रीपाद

सुंदर !!!..

सुहास झेले's picture

10 Jul 2015 - 10:43 am | सुहास झेले

जबरी... मस्तच झालेत पॉपसीकल्स :)

मस्त. फोटो बघून गारीगार वाटलं. : )

फारच छान आणि तोंपासु पाकृ.

स्वाती दिनेश's picture

10 Jul 2015 - 12:07 pm | स्वाती दिनेश

तोंपासु पाकृ..
उन्हाळ्यात असं गारेगार खायला मजा येते फार..
स्वाती

सध्या कौतुक करायला शब्द नाहीयेत.

नूतन सावंत's picture

10 Jul 2015 - 9:33 pm | नूतन सावंत

निःशब्द.

नूतन सावंत's picture

10 Jul 2015 - 9:33 pm | नूतन सावंत

निःशब्द.

सानिकास्वप्निल's picture

10 Jul 2015 - 10:37 pm | सानिकास्वप्निल

हाय!! हाय! ह्या कडक उन्हाळ्यात हे पॉप्सिकल्स खाण्याची मजा वेगळीच, मी एक उचलले बरं का....थंडा-थंडा.. कूल-कूल :)
फोटो मस्तं.

छान फोटो आणि सुरेख मांडणी ! पाकृही सोपी आहे.

सगळ्यांचे खुप धन्यवाद! :)

मधुरा देशपांडे's picture

12 Jul 2015 - 9:54 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम. तु इकडे येशील तेव्हा हे असे सगळे सुंदर प्रकार कर आणि मी तुझ्यासाठी मेथी, गवार अजुन ज्या ज्या शक्य असतील त्या त्या भाज्या करेन. :)

हाहाहाहा.. गुड आयडिया.. चालेल नक्की. :)

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2015 - 4:35 pm | दिपक.कुवेत

शेवटचे तीन मी(च) गट्टम केले आहेत हे समजावे. हे लवेंडर काय प्रकरण आहे? त्याला काहि पर्याय आहे का? फ्रोझन स्ट्रॉबेरी आणुन करायचा विचार आहे. ग्रीक दह्याएवजी साधं दहि वापरलं तर चालेल का?

पिलीयन रायडर's picture

14 Jul 2015 - 4:41 pm | पिलीयन रायडर

ग्रीक दही????
अरे काय गम्मत चाल्लीये का? तिकडे स्वाती ताई असलेच अगम्य पदार्थ सांगतीये.. इकडे तू..
चेष्टा चालवलीये राव गरीबाची...

आणा इकडे एक पॉप्सिकल!!

लवेंडर एक फुल असते. त्याचा इसेन्स म्हणुन किंवा परफ्युम म्हणुन वापर केला जातो. लवेंडर नसेल तर तुम्ही व्हॅनिला किंवा तुम्हाला आवडेल त्याचा फ्लेवर दिला तरी चालेल. मला वाटते ह्यात रोझ इसेन्स मस्त लागेल.
मी सुद्धा फ्रोझन स्ट्रॉबेरीच वापरल्या आहेत. ग्रीक योगर्ट नसेल तर तुम्ही साधे दही, पण पाणी काढुन वापरु शकता. फक्त ते चक्क्या एवढे आंबट नको. दही वापरायचे नसेल तर हेवी क्रिम वापरु शकता.

पैसा's picture

14 Jul 2015 - 6:28 pm | पैसा

कसलं छान दिसतंय हे प्रकरण!