फादर्स डे स्पेशल -मिक्स पनीर भाजी (झणझणीत नागपुरी स्टाईल)

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
24 Jun 2015 - 7:46 pm

रविवारचा दिवस होता तरी सकाळी योग पाहण्यासाठी सकाळी ६ वाजताच उठलो. योग संपण्याचा आधीच आमच्या भागात पाऊस सुरु झाला. सकाळी ९ वाजता आमच्या चिरंजीवाने ‘हैप्पी फादर्स डे’ केले. संध्याकाळी बाजारातून २५०ग्रम पनीर घेऊन आलो होतो. आल्यावर सौ. ला म्हंटले आज फादर्स डे आहे. शाही पनीर करते का? सौ. उतरली, मिक्सर खराब झाले आहे. मोटर कामातून गेली आहे. गेल्याच वर्षी ठीक केली होती. आता नवीन ‘फूड प्रोसेसर’ घेऊन मगच अश्या ग्रेवीवाल्या भाज्या करायचा ऑर्डर करा.

सौ.चा मूड पार बघडलेला पाहून, सौ.ला खुश करणे गरजेचे होते. मी म्हणालो, आता पनीर आणले आहे, तर मीच करतो काहीतरी. फादर्स डेला फादरने काहीतरी केलेच पाहिजे. फ्रीज उघडला, त्यात शिमला मिरच्या (ढोबळी मिरची) होत्या ४ उचलल्या (१५० ग्रम), थोड्या हिरव्या शेंगा (काय म्हणतात ते फ्रेंच बिन्स) उरलेल्या होत्या त्या सर्व घेतल्या. मला कधी-कधी कळत नाही, बायका थोडी भाजी उरवून का ठेवतात? चिरताना आळस येतो कि बायकांना अशी सवयच असते. कारण एक दिवस आधी फ्रेंच बिन्सची भाजी केली होती. आकारानुसार हिरवी मिरची (३-४), टमाटर (३-४), लसूण (७-८ पाकळ्या), आले एक तुकडा आणि कांदा (२ मध्यम आकाराचे).

आधी हिरवी मिरची, लसूण आले, बारीक चिरून घेतले. नंतर साबणाने हात धुऊन घेतला. हात नाही धुतले तर चुकून मिरचीचा हात डोळ्यांना हा लागतोच. (नवऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू निघाले कि बायकांना खुश होण्याचा मौका मिळतो). हिरव्या शेंगा बारीक चिरून घेतल्या. जमेल त्या आकृतीचे कांदे, टमाटर आणि शिमला मिरची चिरून घेतली. आपल्यालाच भाजी खायची आहे कशीही चिरली तरी चालते.
चिरलेली कांदा मिरची इत्यादी

पनीर आणि टमाटर

आता झणझणीत नागपुरी स्टाईलची पनीरची भाजी बनविण्याचे ठरविले. चांगले ३-४ टेबल स्पून तेल कढ़ाईत टाकले,(तेल भरपूर टाकले कि भाजी आपसूक चांगली बनते, अनुभवाचे बोल आहेत हे, खास करून वांगे [मुटे साहेबांच्या शेतातले मिळाले तर अति उत्तम]). तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली, मोहरी फुटल्यावर, तमालपत्र, दालचिनी आणि २ लवंग टाकल्या नंतर बारीक चिरलेली मिरची, आले आणि लसूण टाकले. १-२ मिनिटे परतल्यावर ३ वाळलेल्या लाल मिरच्या टाकल्या (आमच्या साळीने खास मध्यप्रदेशातून पाठविलेल्या, भयंकर जळजळीत आहेत त्या मिरच्या). नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या शेंगा टाकल्या. शेंगा तेलावर परतल्यामुळे भाजीत त्यांच्या स्वाद ही मस्त आला. त्या थोड्या परतल्यावर, हळद, तिखट (झणझणीत पाहिजे असेल तर ३-४ चमचे ही चालतील), २ चमचे धने पूड, १ चमचा गोड मसाला टाकला. नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि पनीरचे तुकडे त्यात टाकले. (पनीरचे तुकडे कापत असताना ते ५० ग्रम कमी झाले, कसे कळले नाही). चवीनुसार मीठ ही त्यात टाकले. गॅस मध्यम करून ४-५ मिनिटांसाठी झाकण ठेवले. नंतर त्यात शिमला मिरची मिसळी. पुन्हा २ मिनिटे झाकण ठेवले आणि गॅस बंद केला. (शिमला मिर्च जास्ती शिजवली तर तिचा स्वाद बिघडतो).
पनीरची भाजी

भाजी खरोखरच मस्त आणि झणझणीत झाली होती. जेवण झाल्यावर चिरंजीवाने बाजारातून आणलेल्या खास अमूल मिक्स फ्रुट आईसक्रिमला कापून फादर्स डे साजरा केला. (अमूलच्या मिक्स फ्रुट आईसक्रिमचा स्वाद चांगला आहे, लहान मुलांना निश्चित आवडेल).

प्रतिक्रिया

सूड's picture

24 Jun 2015 - 8:47 pm | सूड

भारी!!

अमितसांगली's picture

24 Jun 2015 - 9:09 pm | अमितसांगली

नवऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू निघाले कि बायकांना खुश होण्याचा मौका मिळतो

नूतन सावंत's picture

24 Jun 2015 - 9:13 pm | नूतन सावंत

छान आहे.

श्रीरंग_जोशी's picture

24 Jun 2015 - 9:16 pm | श्रीरंग_जोशी

पाकृ आवडली. फारसा फाफटपसारा नसल्याने अधिकच आवडली :-).

'मेव्हणीने' ऐवजी 'साळीने' असे वाचून छान वाटले.

पटाईत साहेब वर्‍हाडी आहेत ना राजा अस काउन करता...
१ नंबर पाकृ

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2015 - 8:57 pm | श्रीरंग_जोशी

मी पण वर्‍हाडीच हाय ना भौ... :-) .

होबासराव's picture

25 Jun 2015 - 9:09 pm | होबासराव

मले म्हाईत हाय्..मी बी अकोल्याचाच हाव ना :)

जुइ's picture

24 Jun 2015 - 10:12 pm | जुइ

सोपी पाकृ, खमंग आणि चटपटीत देखिल.

उगा काहितरीच's picture

24 Jun 2015 - 10:30 pm | उगा काहितरीच

मस्त ! (रच्याकने आम्ही पनीर प्रेमी सो हमखास आवडनारच)

पाककलेच्या क्षेत्रात पाऊल टाकल्याबद्दल अभिनंदन. भाजी चांगली दिसतिये.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2015 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा

हम्म्म्म्म!
पनीर काय?
बंरं!

नाखु's picture

25 Jun 2015 - 10:14 am | नाखु

मस्त

तमालपत्र, दालचिनी आणि २ लवंग टाकल्या नंतर बारीक चिरलेली मिरची, आले आणि लसूण टाकले. १-२ मिनिटे परतल्यावर ३ वाळलेल्या लाल मिरच्या टाकल्या

हे तसेच टाकायचे बारीक न करता?

शंकासुर नाखु.

विवेकपटाईत's picture

25 Jun 2015 - 7:01 pm | विवेकपटाईत

चिरून टाका कि अक्खी टाका मिरची तिखटच लागणार. पाऊस पडत असताना आणि सौ.चा मूड ठीक नसेल तर तिखट भाज्या छान लागतात.

नाखुकाका तमालपत्र, दालचिनी आणि २ लवंग टाकल्या असा खडा गरम मसाला पण टाकतात कधीकधी. बारीक न करता!! सुक्या मिरच्यांचा पण तोच प्रकार.

कंजूस's picture

25 Jun 2015 - 7:54 pm | कंजूस

छान साजरा झाला आहे दिवस.
एक शंका- नागपुरी विशेष काय स्टाइल आहे?

पैसा's picture

26 Jun 2015 - 2:47 pm | पैसा

तुमच्या पाकृंना हिंदीचा तडका आणि खुसखुशीत विनोदाचे कोथिंबीर-खोबरे मस्त चव आणते! झकास!

मुक्त विहारि's picture

26 Jun 2015 - 4:27 pm | मुक्त विहारि

पनीर आवडत नसल्याने, बटाटा वापरीन.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2015 - 10:02 pm | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्स्स्स्स्स्स्त.

म्या कंदी कंदी मूड आला की मुळ्याची ठेचा भाजी करतो..त्याची आठवन झाली हो!

त्रिवेणी's picture

27 Jun 2015 - 5:45 am | त्रिवेणी

पनीर न घालता करण्यात येईल.
हल्ली पनीर आवडत नाही.

त्रिवेणी's picture

27 Jun 2015 - 5:45 am | त्रिवेणी

पनीर न घालता करण्यात येईल.
हल्ली पनीर आवडत नाही.

रेवती's picture

27 Jun 2015 - 7:50 am | रेवती

हल्ली?
अनाहितामध्ये उत्तर लिहिणे व हलके घेणे.

त्रिवेणी's picture

27 Jun 2015 - 8:26 am | त्रिवेणी

पनीर khavun कंटाळ ले आहे म्हणून हल्ली म्हणाले ग तायडे.
एकुणात आता नको वाटते बाहेर चे खाणे.

केतकी_२०१५'s picture

19 Jul 2015 - 10:38 pm | केतकी_२०१५

छान रेचीपी आहे. मी जरूर ट्रय करीन.