भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी

वडाप's picture
वडाप in पाककृती
1 Jul 2015 - 7:05 pm

भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी-

३१ जूनच्या कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे झालेल्या कट्ट्याला भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी होती ती फार आवडून डुआइडींनी चट्टामट्टा केला. वरिजिनल आइडींनी त्यात विंटरेस्ट दाखवल्याने पाककृती देत आहे. मध्यवर्ती ठिकाण येथील एक कट्टाफेममुवि नामक आइडी पाककृती लिहितांनाही बराच द्विपात्री वगैरे काही मसाला मारतात आणि "घरच्यांची आणि दारच्यांची " वाहवा मिळवतात असे ऐकून आहे. वडाच्या पारंब्यांस उलटे लटकणाय्रा डुआइडींस याचे सोयरे?सुतक!नसल्याने तो मसाला वापरलेला नाही.

पाककृती -आणि फोटो
साहित्य-
१)
कार्ले ,दोन हिरवे टोमॅटो ,लसुण ,सुके खोबरे किसून भाजून

2)कारली आणि टमाटे चिरून

३)तेल गरम करून लसूण आणि खोबरे परता.टोमॅटो टाकून थोडे शिजवा.नंतर कारली टाकून शिजवा .शेवटी मीठ आणि तिखट टाकून भाजी तयार.

४)शिजवेल्या भातात ही भाजी मिसळली की कार्ल्याची बिर्याणी तयार-

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

1 Jul 2015 - 7:10 pm | विवेकपटाईत

आवडली, नवीन कृती. करून बघितली पाहिजे. तसे तेलावर परतलेले कारले मला ही आवडतात.

दमामि's picture

1 Jul 2015 - 7:15 pm | दमामि

फोटु छान आलेत.

तिता's picture

1 Jul 2015 - 7:47 pm | तिता

पण ही बिर्याणी कुठे आहे? हे तर भाजी आणि भात खाल्यासारखे झाले.

बॅटमॅन's picture

1 Jul 2015 - 7:54 pm | बॅटमॅन

वडाप??? पावनं तुमी सांगली-मिरज-कोल्लापुरकडचं हायसा काय?

फोटु दिसंना झाल्यात.

हैद्राबादी श्टाइल एकेक थर देऊन बिर्याणी केलीतर भात कडुझार हुइल की पाव्हनं.

ब्वोका आणि कारलं अंगाला पाणी लावून घित न्हाइत.

%वडाप??? पावनं तुमी सांगली-मिरज-कोल्लापुरकडचं हायसा काय?%
तिक्हडची माहिती हाइ.

भाऊ तुमची भाजी पर्यंतची स्टेप छानच आहे, भाजी दिसत्ये पण मस्त, पण भातात भाजी मिसळून बिर्याणी तयार होते हे काही फारसे काही पटत नाही.
बादवे, भाजी होणार मात्र झकास यात काही वादच नाही. मी कल्पनेतच खाऊन बघितली हापिसातल्या हापिसातच.

भाताला जिर्‍याची फोडणी दिलीत तर अजून मस्त लागेल. आपलं एक सजेशन!

बटाटे,वांगी ,फ्लावर आणि कच्चे टोमॅटो यांच्या फोडी धने जिरे हळद घालून शिजवून ( कारली आणि लसूण खोबरे वगळून ) घ्या .याचे आणि भाताचे एक आड एक थर देऊन थोडे तुप टाकून बंद हांडीत शिजवले की वेज बिर्याणी होते. कारल्याचे असे करता येणार नाही भाताचा ओलावा लागला की कारल्याचा कडूपणा फुफाटेल.