पुणेरी कथालेखक - २

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
27 Nov 2015 - 10:31 pm

पुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने!

१.तुळशीबागेत 'भेटेल' तुला मी. यातील भेटेल शब्दात अत्यंत मोठा गर्भितार्थ आहे. त्यामुळे या शब्दांवर आक्षेप घेणाऱ्यास घाणघापुरचा मेसेज पाठविण्यात येईल!
२.आम्ही पुण्यातील असण्यावर आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने शनिवारवाड्याचा प्रथम मालक कोण याचा शोध घ्यावा. (ती वास्तू आम्ही पेशव्यांना भेट दिली होती)
३."कथा ५१ भागातच का?" हा लाडिक प्रश्न विचारणार्या लोकांस 'एकीवरील आकड्यांचे महत्व' हे चा.द.रसोड यांचे पुस्तक पाठविण्यात येईल. (सोबत बिलसुद्धा पाठविण्यात येईल, काळजी नसावी)
४.शुद्धलेखनाच्या चुका काढणाऱ्या आसामीस २० रुपये देऊन ११ रुपयांची वस्तू घेण्यास पाठविण्यात येईल. (२० रूपये आपल्या तीर्थरूपांकडून व्याजसहित वसूल करण्यात येतील.)
५.जरा मोठा भाग टाकायला हवा होता, अशी प्रतिक्रिया देणाऱ्यास आमच्याकडे विनामूल्य टायपिंग करण्यास मिळेल. (आम्ही सांगू तेच टाईप करावे लागेल.)
६.पुढील भाग टाकण्यास आम्ही पराशेठ यांना आदर्श मानतो.
७.विनाकारण खरडवही भरवू नये, अन्यथा आपली कागद, दौत, व लेखणी घेण्याची ऐपत नाही असे आम्ही समजू.
८.कथेमधील उपमा न समजल्यास आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन करून व्य.नि करु नये. आमच्या असामान्य प्रतिभेचा प्रत्यय आला म्हणून दगडूशेठास ११ रुपयांचा प्रसाद वहावा!
९.आमच्या कथेत नाट्य व काव्य ओतप्रोत भरले असल्याने,यांवर चित्रपट निघू शकतो, असे काही महाभाग विचार करु शकतात. परंतु विश्वाची लोकसंख्या लक्षात घेता, अपूर्ण कलाकारांच्या संख्येमुळे काही पात्रांसाठी परग्रहवासियांना घेण्यास आम्ही उदार अंत:करणाने परवानगी दिली आहे.
१०.कथेवर स्तुतीपर प्रतिसाद देण्यास परवानगी आहे. (पुनश्च उदार अंत:करण!)
११.वाट चुकलेल्या प्रतिसादास व व्यक्तीस कात्रजचा घाट दाखविण्यात येईल!

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानाट्यधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताविडंबनभाषाप्रतिशब्दवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनविनोदतंत्र

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 10:37 pm | DEADPOOL

कात्रज बाइपासतरी दाखवा लवकर पोहोचू खेड शिवापुरच्या ढाब्यांवर.

DEADPOOL's picture

29 Nov 2015 - 1:06 pm | DEADPOOL

आणू की अच्छे दिन!
थाम्बा जरा!

सुबोध खरे's picture

28 Nov 2015 - 6:43 am | सुबोध खरे

अति सर्वत्र वर्जयेत

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

28 Nov 2015 - 8:56 am | दत्ताभाऊ गोंदीकर

कथा कधी लिहिणार ?

एक मराठी कथालेखक आहेत ,ते स्वपिडन करतातात.
तुम्ही परपीडनाचा वसा घेतला आहे का ??

DEADPOOL's picture

28 Nov 2015 - 9:11 am | DEADPOOL

yes!!!!

तुमाला सुबेच्चा आन पुस्पगुच्च

बोका-ए-आझम's picture

28 Nov 2015 - 2:48 pm | बोका-ए-आझम

पूर्वीचं मिपा राहिलं नाही हेच खरं.

महासंग्राम's picture

28 Nov 2015 - 10:12 am | महासंग्राम

तुम्हाला मिपावरचा पाट्याबहाद्दर हा खिताब देण्यात येत आहे….

असहिष्णुतेमुळे आम्ही हा किताब परत करत आहोत!

जव्हेरगंज's picture

28 Nov 2015 - 9:26 pm | जव्हेरगंज

च्यायला, आवडलं राव हे!! मागच्या भागापेक्षा हे जबरी!!
लय भारी!!

DEADPOOL's picture

28 Nov 2015 - 9:40 pm | DEADPOOL

राव काही ग्रामीण कथा येऊ द्या की!

आनंद कांबीकर's picture

29 Nov 2015 - 12:42 am | आनंद कांबीकर

51 भागी कथेची!

आनंद कांबीकर's picture

29 Nov 2015 - 12:46 am | आनंद कांबीकर

51 भागी कथेची!

अहो त्या कथेचा उल्लेख फक्त विनोदासाठी आहे!

शित्रेउमेश's picture

1 Dec 2015 - 8:37 am | शित्रेउमेश

आता कथा येवू द्य), कौतुक झाले असेल तर...(आम्ही पण पुणेकरच...;))

तुम्ही मूळचे पुणेकर दिसत नाही!