Skip to main content

**भूत त्याचे ठार काही होत नाही**

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 24/07/2024 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
घोट घे रे यार काही होत नाही जीव जातो फार काही होत नाही. एकदा रक्ताळली बेधुंद झाली. म्यान ही तलवार काही होत नाही. बांधता घर एकदा कळले उन्हाला सावली मग पार काही होत नाही. भूत नसते सिध्द करण्या ठार मेला. भूत त्याचे ठार काही होत नाही. गंजलेल्या जिंदगीला धार देतो आणि मी भंगार काही होत नाही. पोरसवद्या बालिकेची माय होते. स्वस्थ ती घार काही होत नाही. एकदा तिज आपुलेसे मानले कि वेदनेचा भार काही होत नाही. +कानडाऊ योगेशु
लेखनविषय:

वाचने 1788
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

वाह क्या बात है. बरेच दिवसांनी उत्तम गजल वाचली !! गंजलेल्या जिंदगीला धार देतो आणि मी भंगार काही होत नाही. एकदा तिज आपुलेसे मानले कि वेदनेचा भार काही होत नाही. हे दोन शेर एकदम जबरदस्त आहेत. मजा आली. लिहित रहा !

आवडली.