माझे गाणे - 'ये ना तू सख्या' ...
या गाण्याला तसे खुप वर्ष झालीत. तसे पाहिले तर हे माझे पहिलेच गाणे आणि शेवटचे ही :-).
'Maroon color' या आठवणीतल्या लेखामुळे आणि ऑडिओ फाइल्स येथे देता येऊ लागल्याने पुन्हा हे गाणे देतोय.
या गाण्याला तसे खुप वर्ष झालीत. तसे पाहिले तर हे माझे पहिलेच गाणे आणि शेवटचे ही :-).
'Maroon color' या आठवणीतल्या लेखामुळे आणि ऑडिओ फाइल्स येथे देता येऊ लागल्याने पुन्हा हे गाणे देतोय.
नजर..
बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ
तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी
उतारवयात पाऊस
तोच ; पण
नेत्र असतात पाणावलेले,
हक्काची नातीही
दुरावलेली,
कोणीच नसे सोबती;
दोन शब्द बोलायला.
पाऊस असे तोच.
दरसाल तसाच बरसुन जाई
वयाप्रमाणे बदलत
जाई ती आहे
'नजर'
पावसाला अनुभवण्याची!
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
पावसाची सर जशी बरसून गेली
वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!
गुणगुणत होतीस का तू गझल माझी?
एक कोकीळा इथे गावून गेली!
नभ-नभाला देत होते आज टाळी
वीज अवकाशातुनी चमकून गेली!
आज पदरावर तुझ्या सजवू म्हणालो,
रात सारे चांदणे उचलून गेली!
गारव्याने भाव रोमांचीत झाले,
आठवांची गोधडी उसवून गेली!
—सत्यजित
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे
थेंबास ओघळाया हलकेच गाल दे!
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती
क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!
होतील बघ सुरंगी लाजून गाल हे
भेटीत पावसाच्या हाती मशाल दे!
भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी
स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे!
शिणतीलही जराश्या गजर्यातल्या कळ्या
तेंव्हा उश्यास माझ्या दुमडून शाल दे!
—सत्यजित
ती अन् पाऊस..
खूप दिवस झाले
आता पावसात
चिंब चिंब भिजून
भरलेलं सावळ ते आभाळ
नजरेत सामावणारी ती
भिजावं का थोडतरी?
ह्या येत्या पावसात
चिंब चिंब घेऊ न्हाऊन
असा विचार करणारी ती
गेले कित्येक दिवस
दिवस? छे! कित्येक वर्ष
छत्रीबाहेर हात काढुन
भिजण्याचा प्रयत्न करतीये
हा पाऊस मात्र
द्वाडच फार
भिजवले मलाच फक्त
मन मात्र तसेच कोरडे