Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मन्या ऽ on Tue, 05/19/2020 - 08:25
ती अन् पाऊस.. खूप दिवस झाले आता पावसात चिंब चिंब भिजून भरलेलं सावळ ते आभाळ नजरेत सामावणारी ती भिजावं का थोडतरी? ह्या येत्या पावसात चिंब चिंब घेऊ न्हाऊन असा विचार करणारी ती गेले कित्येक दिवस दिवस? छे! कित्येक वर्ष छत्रीबाहेर हात काढुन भिजण्याचा प्रयत्न करतीये हा पाऊस मात्र द्वाडच फार भिजवले मलाच फक्त मन मात्र तसेच कोरडे शुष्क तिचे नयन अन् मन तिचे व्याकुळलेले त्या धरेसम कोरडे-तहानलेले! विचार करत दाटल्या मळभाकडे पाहत निष्फळ उसासा टाकत दीनवाणे हसणारी ती आता वाट पाहते आहे ती येत्या आषाढसरींची अगदी आभाळासारखंच तिच मनही भरुन आलंय आता गरज आहे फक्त एकदा धो-धो कोसळण्याची! (अपुर्ण) -दिप्ती भगत (१७मे,२०२०)

Submitted by गणेशा on Tue, 05/19/2020 - 08:40

Permalink

आता वाट

आता वाट पाहते आहे ती येत्या आषाढसरींची अगदी आभाळासारखंच तिच मनही भरुन आलंय आता गरज आहे फक्त एकदा धो-धो कोसळण्याची! +101 वाचत आहे... लिहीत रहा...
  • Log in or register to post comments

Submitted by सुमित_सौन्देकर on Wed, 05/20/2020 - 00:32

Permalink

सुन्दर

खुप छान जमुन आलिय
  • Log in or register to post comments

Submitted by मन्या ऽ on Fri, 05/22/2020 - 16:12

Permalink

गणेशदा, सुमित प्रतिक्रियेसाठी

गणेशदा, सुमित प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2676 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com