वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
21 Jun 2020 - 11:16 pm

पावसाची सर जशी बरसून गेली
वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

गुणगुणत होतीस का तू गझल माझी?
एक कोकीळा इथे गावून गेली!

नभ-नभाला देत होते आज टाळी
वीज अवकाशातुनी चमकून गेली!

आज पदरावर तुझ्या सजवू म्हणालो,
रात सारे चांदणे उचलून गेली!

गारव्याने भाव रोमांचीत झाले,
आठवांची गोधडी उसवून गेली!

—सत्यजित

gajhalgazalपाऊसमराठी गझलशांतरसकवितागझल

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

22 Jun 2020 - 6:24 am | प्राची अश्विनी

आहा! क्या बात!

प्रमोद देर्देकर's picture

22 Jun 2020 - 8:35 am | प्रमोद देर्देकर

वा कविश्वर वा मस्त कविता.

केव्हा तरी पहाटे सारखा तसाच साज आणि तीच चालही छान बसतेय की.

सत्यजित...'s picture

23 Jun 2020 - 12:10 am | सत्यजित...

कविदास म्हणा सर हवं तर,कवीश्वर वगैरे काही नाही हो मी.
भरभरुन दाद दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

वीणा३'s picture

22 Jun 2020 - 10:44 pm | वीणा३

सुरेख !!!

सत्यजित...'s picture

23 Jun 2020 - 12:04 am | सत्यजित...

धन्यवाद प्राची,वीणा.

प्राची अश्विनी's picture

23 Jun 2020 - 8:57 am | प्राची अश्विनी

रच्याकने, तो "जवळूsन" भारीच्च गोड आहे.:)

'गज़ल'चा अर्थच 'बातचीत करणे'.
गज़ल वाचताना अनेकदा,शब्द कवीस अपेक्षित असतील तसेच्या तसे आपणास ध्वनीत होतातच असे नाही!
मला अपेक्षित असल्याप्रमाणेच आपण तो वाचला आहे!
आपल्यातील रसिकास अभिवादन!

रातराणी's picture

23 Jun 2020 - 12:17 am | रातराणी

सुरेख!!

सत्यजित...'s picture

23 Jun 2020 - 12:30 am | सत्यजित...

धन्यवाद!

सस्नेह's picture

23 Jun 2020 - 8:51 am | सस्नेह

मस्तच !
नेहमीप्रमाणे...

सत्यजित...'s picture

24 Jun 2020 - 12:05 am | सत्यजित...

सस्नेह धन्यवाद!

रुपी's picture

24 Jun 2020 - 4:30 am | रुपी

सुरेख!!

कुमार१'s picture

24 Jun 2020 - 7:39 am | कुमार१

आवडली .

सत्यजित...'s picture

24 Jun 2020 - 9:13 am | सत्यजित...

रुपी,कुमार धन्यवाद!