एका सुंदर उपक्रमाची आणि जबरदस्त मोहीमेची दखल!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
23 Aug 2017 - 11:05 am

सर्व मिपाकरांना मन:पूर्वक नमस्कार.

एका जबरदस्त मोहीमेची आणि एका सुंदर उपक्रमाची माहिती आपण सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली. एखादी व्यक्ती आपली आवड, पॅशन, छंद ह्यामधून किती सुंदर काम उभं करू शकतो आणि त्याही पलीकडे इतरांना किती मोठी प्रेरणा देऊ शकतो, ह्याचं हे एक उदाहरण आहे. आपल्यापैकी अनेकांना हर्षद पेंडसे हे नाव ओळखीचं असेल. हर्षदजी ९ सप्टेंबर रोजी लेह- खर्दुंगला येथे होणा-या खर्दुंगला चॅलेंज धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. खर्दुंग- खर्दुंगला- लेह ही ५००० मीटर्स पेक्षा जास्त उंचीवरची ७२ किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन आहे आणि त्यात ते सहभाग घेत आहेत!!! आणि त्यासाठी तयारी म्हणून त्यांनी टप्प्या टप्प्याने १० किमी, १५- २०, २५- ३२ आणि मग ५० किमीपर्यंतही धाव घेतलेली‌ आहे! आणि इतकेच नाही, तर ही तयारी करत असताना त्यांना लक्षात आलं की, मेळघाटामध्ये काम करणा-या मैत्री संस्थेला निधीची गरज आहे. म्हणून त्यांनी त्यांची ही साहसी मोहीम मैत्री संस्थेसाठी समर्पित केली आणि लोकांना मैत्रीसाठी निधी देण्याचं आवाहन केलं. त्यांनी हाती घेतलेलं खर्दुंगला चॅलेंज अल्ट्रा मॅरेथॉनचं आव्हान आणि त्याची तयारी इतकी जबरदस्त होती की, ते पाहून अनेकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला! ७२ किमीची अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून त्यातून ७२ दाते समोर यावेत, हा त्यांचा मानस बघत बघता पूर्ण होतोय! आजवर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे अनेक हात मिळाले आहेत.

पुढील तपशील मिपाप्रमाणेच रसिकांचं लाडकं संस्थळ असलेल्या माबोवरच्या हर्षदजींच्या पोस्टमध्ये आहेत:

एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन

मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.

माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.

आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.

मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.

अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/

तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.

मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)

इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.

मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html

मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.

तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.

देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.

“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149
ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद. - हर्षद पेंडसे

आजवरचे एकूण देणगीदार ६४
आजवरची एकूण देणगी रक्कम १,५९,११४/-
(१६ ऑगस्ट रोजीची स्थिती).

ह्या सुंदर उपक्रमाची व तितक्याच जबरदस्त मोहिमेची माहिती इथे आपल्यासोबत शेअर करावीशी वाटली. आणि हे आव्हान व त्यांनी केलेलं आवाहन हे फक्त संस्थेला मदत करण्यापुरतं मर्यादित नाही आहे. त्यांनी आपल्याही फिटनेसला; आपल्याही शारीरिक क्षमतेला आवाहन केलं आहे, प्रेरणा दिली आहे! मी स्वत: त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नव्याने माझं रनिंग सुरू केलं! त्यांच्या अनुभवातून खूप प्रेरणा मिळाली. रनिंगचाही आनंद घेता आला. आणि फिटनेसबद्दलही अनेक गोष्टी समजल्या. आणि अर्थातच संस्थेला रू. १००० देऊन माझाही छोटा हातभार लावता आला.

आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या तयारीची "धाव" बघताना वाटतं की, मी अर्धा तास नेटवर बसतो असं आपण जितकं सहज म्हणतो, तितकं सहज ते म्हणतात, मी आज धावलो, पण ३५ किमी धावलो! आणि विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्यात कुठेही हे काही अतिशय कठीण आहे, असा भाव येत नाही. उलट ते सतत हेच म्हणतात की, मला हे जमू शकतंय तर कोणीही हे करू शकतं. आणि इतक्या मोठ्या "धावफलकाबद्दल" मीही तितकाच आश्चर्यचकीत आहे, असंही ते सांगतात! हे सर्व आपल्यासोबत शेअर करावसं वाटलं. म्हणून त्यांच्या अनुमतीने ही पोस्ट इथे करत आहे. ह्या सुंदर उपक्रमाची नोंद इथले सर्व मान्यवर घेतील आणि त्यापासून सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असं वाटतं.

हर्षद पेंडसेंचं फेसबूक पेज: https://www.facebook.com/runformaitri/ इथे त्यांच्या तयारीचे अपडेट बघता येतील. मीही मधून मधून त्यांचे अपडेट इथे कळवेन. सर्वांना धन्यवाद.

जीवनमानआरोग्यप्रवासक्रीडाप्रकटनविचारप्रतिसादशुभेच्छालेखबातमीआरोग्य

प्रतिक्रिया

इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद..

हार्पेनला वैयक्तीकरीत्या ओळखतो.. अनेकवेळा भेटही झाली आहे. अत्यंत डाऊन टू अर्थ आणि उत्साही माणूस आहे.

त्याच्या उपक्रमास शुभेच्छा..!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Aug 2017 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रेरणादायक व स्पृहणिय उपक्रमाची ही बातमी इथे टाकल्याबद्दल धन्यवाद !

जेडी's picture

23 Aug 2017 - 8:21 pm | जेडी

http://www.maitripune.net/Home.html गिविन्ग ४०४ एरर.. प्लीज करेक्ट करा

Nitin Palkar's picture

23 Aug 2017 - 8:58 pm | Nitin Palkar

१००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे. मी माझा वाट उचल्तोय!!

मार्गी's picture

23 Aug 2017 - 9:21 pm | मार्गी

प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!

@जेडी, संस्थेची वेबसाईट डाऊन दिसतेय सध्या. तुम्ही संस्थेचं फेसबूक पेज बघू शकता: https://www.facebook.com/Maitripune

@ नितिन पालकर जी, खूप अभिनंदन!!! आपण आणि अजून कोणी संस्थेला मदत करणार असतील तर संस्थेला व हर्षदजींना कळवावे, इथेही कळवावे किंवा मला व्यक्तिगत संदेश करावा. धन्यवाद.

मार्गी's picture

24 Aug 2017 - 1:23 pm | मार्गी

मैत्री संस्थेची साईट अपडेट झाली आहे: http://maitripune.net/

मार्गी's picture

24 Aug 2017 - 1:25 pm | मार्गी

ह्या उपक्रमाची संस्थेच्या साईटवरील माहिती: http://maitripune.net/events.php#7

फारच प्रेरणादायी. खूप खूप शुभेच्छा!

मार्गी's picture

26 Aug 2017 - 10:54 am | मार्गी

डॉ. सुहास म्हात्रे ह्यांनी शुभेच्छांसह संस्थेला रू. ३००० योगदान दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

हर्षद पेंडसे लवकरच मोहीमेसाठी निघणार आहेत. त्यांच्या मोहीमेला शुभेच्छा देण्यासाठी मी अनौपचारिक अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली आहे! परभणीमध्ये अन्य दोन अनुभवी धावपटूंसह काल ही मॅरेथॉन पूर्ण केली. तुलनेने कमी ट्रेनिंग असूनही फार त्रास झाला नाही. १९ किमी पळालो व ३ किमी चाललो! काय समाधान वाटलं!


त्यांच्या मोहीमेला मनःपूर्वक शुभेच्छा देतो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2017 - 10:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोहीमेला हार्दिक शुभेच्छा !

* फोटो दिसत नाही. त्याला पब्लिक अ‍ॅक्सेस दिल्यास दिसू लागेल.

मार्गी's picture

29 Aug 2017 - 9:44 am | मार्गी

हो सर, फोटोचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. नवीन गूगल फोटोजमध्ये फोटो आल्बन पब्लिक कसे ठेवायचे, हेच कळत नाहीय. पूर्वी पिकासावर सोपं होतं. अनेक सेटिंगचे प्रयत्न केले, पण फोटो पव्लिक दिसत नाही आहेत. नेमका उपाय माहित असेल तर सांगाल. इंटरनेटवर सर्च करून दिसणारे पहिले एक- दोन उपाय करून बघितले. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2017 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

खाली माहिती दिली आहे. ती उपयोगी न पडल्यास गुगलफोटो वरील आल्बम पब्लिक शेअर करून त्याच्या लिंक्स याच धाग्यावर एका प्रतिसादात टाका. मी फोटो प्रतिसादात / धाग्यात दिसण्याची सोय करेन.

यसवायजी's picture

28 Aug 2017 - 7:53 pm | यसवायजी

शुभेच्छा.
एक मित्र (ओंकार भोपळे) मैत्रीसोबत काम करतो. त्याच्या कामाविषयी खालील लिंकमध्ये वाचता येईल.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1465309176858671&id=10000138...

रच्याकने, ओमक्याला मिपाचा आयडी घ्यायला सांगितलंय आज.

मार्गी's picture

29 Aug 2017 - 9:45 am | मार्गी

अरे वा! मस्त. छान माहिती दिली आहे त्यात!

मार्गी's picture

6 Sep 2017 - 3:24 pm | मार्गी

श्री. पेंडसे लेहमध्ये वातावरणाशी जुळवून घेत आहेत. लवकरच ९ सप्टेंबरला प्रत्यक्ष अल्ट्रा मॅरेथॉन आहे! त्यांना पुनश्च शुभेच्छा!

पैसा's picture

6 Sep 2017 - 4:38 pm | पैसा

हर्षद (हर्पेन)ला तसेच मैत्रीला खूप खूप शुभेच्छा!

मार्गी's picture

8 Sep 2017 - 12:51 pm | मार्गी

सरावासाठी ते स्टोक बेस कँपपर्यंत जाऊन आले. आज खार्दुंग गावात जात आहेत आणि उद्या पहाटे ३ वाजता खार्दुंगला चॅलेंजला सुरुवात!

Nitin Palkar's picture

8 Sep 2017 - 1:17 pm | Nitin Palkar

हर्षद यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

मार्गी's picture

9 Sep 2017 - 9:24 pm | मार्गी

त्यांची मोहीम फत्ते झाली आहे! खार्दुंगला चॅलेंज त्यांनी कट ऑफच्या ३ मिनिटे आधी पूर्ण केले! पूर्ण ७२ किमी पूर्ण केले!! तपशील मिळाले की इथे कळवतोच.

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2017 - 9:31 pm | पिलीयन रायडर

अभिनंदन!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2017 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

हार्दीक अभिनंदन !

फोटो पब्लिक करण्याची कृती सांगायला बराच उशीर झाला याबाबत दिलगीर आहे.

खालील माहिती फोटो मिपावर टाकण्यासाठी उपयोगी पडेल :

१. मिपावर फोटो टाकण्याची कृती

२. गुगल फोटोवरचे फोटो/आल्बमला पब्लिक अ‍ॅक्सेस देण्याची कृती :

अ) प्रथम मिपावर टाकायचे फोटो एक स्वतंत्र अल्बममध्ये एकत्र करा. असे केल्याने तुमचे इतर फोटोंना चुकून पब्लिक अ‍ॅक्सेस मिळणे टाळता येईल.

आ) आल्बम उघडा ठेवून त्याच्या "टायटल बारमध्ये (वरची पट्टी)" उजव्या बाजूला असलेल्या आयकॉन्सपैकी "शेअर" आयकॉन निवडा.

इ) दिसणार्‍या विंडोमधे तळाला दिसणार्‍या आयकॉन्सपैकी "गुगल+" हा आयकॉन निवडा

ई) त्यानंतर दिसणार्‍या विंडोतिल "CONTINUE TO GOOGLE+" हा पर्याय निवडा.

उ) त्यानंतर दिसणार्‍या विंडोच्या (१) तळात तुमच्या निवडलेल्या आल्बमचे नाव दिसेल (खात्री करा) व (२) मथळ्यात बहुदा खाली दाखवल्याप्रमाणे निळ्या रंगात "पब्लिक" हा पर्याय दिसेल.

"पब्लिक" पर्याय न दिसल्यास तेथे दिसत असलेल्या पर्यायावर क्लिक करा --> सर्व उपलब्ध पर्यायांची यादी दिसेल, त्यातला हवा तो पर्याय (इथे "पब्लिक" पर्याय) निवडा.

झाले काम ! जरा किचकट प्रकार आहे. पण इतर अनेक सोईसवलतींमुळे मला व्यक्तिगतरित्या गुगलफोटो जास्त उपयोगी अ‍ॅप वाटते.

विशेष सुचना : पब्लिक शेअर केलेल्या आल्बममध्ये नवीन फोटो वाढविल्यास तो परत एकदा पब्लिक शेअर करावा. अन्यथा "जुने फोटो दिसतात पण नवीन फोटो दिसत नाहीत" असे होण्याची शक्यता आहे.

मार्गी's picture

9 Sep 2017 - 11:02 pm | मार्गी

धन्यवाद सर, आपल्याला व्य. नि. केला आहे, दुवे पण पाठवले आहेत. धन्यवाद.

मोदक's picture

10 Sep 2017 - 8:32 am | मोदक

अभिनंदन..!!!!!

फिनिश लाईन पार करताना हर्षद..

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Sep 2017 - 2:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

हार्दिक अभिनंदन !

मस्तच..७२ किमी तेही अशा विरळ वातावरणात..खतरनाक..

मार्गी's picture

20 Sep 2017 - 5:04 pm | मार्गी

हर्षद पेंडसेंकडून अद्याप सविस्तर वृत्तांत आला नाहीय. पण काही तपशील आले आहेत: http://ladakhmarathon.com/results/khardungla-challenge-2017/ इथे मॅरेथॉनचा निकाल उपलब्ध आहे. हर्षद शेवटून दुसरे पूर्ण करणारे ठरले. लदाख़ी लोकंच पहिल्या १० मध्ये ९ इतकी जास्त आहेत. दहावा नकुल बुट्टा दिल्लीचा आहे. हा त्यांना स्टोकच्या बेस कॅम्पवर भेटला होता. सध्या पुर्णवेळ धावपटू बनलाय. कोच म्हणून देखिल काम करतो. एकदम भारी रनर पण जमिनीवर पाय असा त्यांचा अनुभव. शिवाय पुण्यात त्यांच्याबरोबर सराव करणारा अमनदीप एकूणात १६ वा आणि बिगर लडाखींमधे ५-६ आलाय.

वृत्तांत आला की इथे कळवतोच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2017 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

Khardung La Challenge मध्ये हिमालयीन वातावरणात समुद्रसपाटीपेक्षा ४००० मीटर उंचीवर ७२ किमी लांबीचे अंतर धावून पूर्ण करायचे असते, त्यातले ६० किमी अंतर तर समुद्रसपाटीपासून साधारण ४००० मीटर उंचावरचे आहे. पुण्यासारख्या, समुद्रसपाटीपासून फारतर ५६० मीटर उंचीवर सतत वास्तव्य असलेल्या व्यक्तीने, ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणे हेच एक मोठे यश आहे ! ...अश्या प्रकारच्या स्पर्धेत कितवा क्रमांक आला हे तुलनेने गौण असते.

वृत्तांताच्या प्रतिक्षेत.

स्वाती दिनेश's picture

20 Sep 2017 - 9:10 pm | स्वाती दिनेश

वॄत्तांताच्या प्रतीक्षेत,
स्वाती