खरेच आपण डिजिटल झालो आहोत?

राजू's picture
राजू in जनातलं, मनातलं
29 Sep 2015 - 8:07 pm

साधरणपणे १० वर्षापुर्वी पर्यंत आपल्यातील बहुतेक जण व काही ठिकाणी आतासुध्दा काही जण सार्वजनिक शौचालय वापरत आहेत.
तेंव्हा त्या शौचालयात काही कलाकृती व गावातील,आळीतील भानगडी,वाद एकतर्फी प्रेमाची जाहिरात वाचायला मिळत असे.

एवढेच नाही त्या बातम्या अपडेट करणारे व त्या चविने वाचणारे,पाहणारे आज बहुसंख्येने व्हाट्स अप वर व उरले सूरलेले ईतर सोशल नेटवर्कवर आजही आहेत.

खरेच या महाभागांमुळे आपण किती डिजिटल झालो आहोत हे समजते आहे.

शांताबाय ....शांताबाय ....या फॉरवर्ड होणाऱ्या गाण्याला व इतर अश्लील क्लिप्स,नॉन-वेज जोक्स आणि फालतू फॉरवर्ड जोक्सला वैतागलेला एक त्रस्त सोशल साईट्स वापरकर्ता.....

( विशेष सूचना- सर्वच व्हाट्स अप व सोशल नेटवर्क वापरकर्ते असे नाहित पण ह्यांच्या मुळे व्हाट्स अप मात्र खुप बदनाम झाले आहे. )

वावरमुक्तकभाषासमाजजीवनमानराहणीप्रकटनविचारलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

29 Sep 2015 - 8:17 pm | चांदणे संदीप

+1

मदनबाण's picture

30 Sep 2015 - 6:54 am | मदनबाण

कायअप्पा बदनाम झाले ? कधी ?
शांताबाय हल्लीच कोणीतरी पाठवले आहे... काल चॅनलवर पण शांताबायचीच चर्चा होती !
बाकी,डिजीटच म्हणाल... तर गावा-गावात इंटरनेट पोहचणार आहे असे सरकार म्हणत आहे,पण त्या आधी शहरातले इंटरनेटचा दर्जा सुधारण्यासाठी कधी प्रयत्न करणार ? इंटरनेट जर काळाची गरज झाली आहे, तर त्याचे दर सामान्य लोकांना परवडणारे आहेत ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bailando (Español) ft. Descemer Bueno, Gente De Zona :- Enrique Iglesias