1

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...
घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

एका गारुड्याची गोष्ट १३: धामण: उंदराचा कर्दनकाळ !

Primary tabs

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
2 Dec 2013 - 4:22 am

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !
एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !
एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !

हा भाग मी माझ्या आजीला अर्पण करत आहे, काल (२९ नोव्हेंबर) तिला जाऊन एक वर्ष झाले. तिची अल्पशी ओळख म्हणजे माझी आज्जी छोट्याश्या खेडेगावातील (बोरखेडे) एका शाळामास्तर ची मुलगी, १९४० साली माझ्या आजोबांबरोबर ठाण्यात तलावपाळीवर येऊन स्थाईक झाली आणि मग ठाणेच तिचे आणि आमचे गाव झाले. घर ठाणास्टेशन जवळ आणि आजोबा कॉलेज मध्ये प्रोफेसर त्यामुळे घरात अनेक लोकांचा सतत राबता, पण तरीसुद्धा पैशाचे आणि रेशनचे गणित माझ्या आज्जीने नेहमीच हसतमुखाने जमवले. अजून सुद्धा तिने खाऊ घातलेल्या चटणी-भाकरीची आठवण सांगणारे ठाण्यात मला भेटतात.
गोष्टी सांगण्याची तिची हातोटी आणि तल्लख स्मरण शक्ती याला तोडच नव्हती. गावाकडच्या भोंदू बंगाली बाबाच्या गोष्टीमधून तिनेच मला "नागाची" ओळख करून दिली आणि नागाच्या विषाला उतारा म्हणजे फक्त "डॉ." हे माझ्या मनावर वयाच्या ८ वर्षीच बिंबवले. असो.

कुटुंबाचे आधारस्तंभ: माझी आज्जी, बाबा, दोन काका आणि दोन आत्त्या.

आज्जी

धामणीबद्दल हा लेख आहे आणि त्यात उंदराचा विषय नाही, म्हणजे दुर्वांकुरच्या जेवणानंतर "मठ्ठा" नाही. उंदीर हा महाभयंकर प्राणी आहे, हे मला सर्पोद्यान मध्ये काम करायला लागल्यावर समजले.

आपण सगळी व्हाईट-कालर लोकं,इमारती मध्ये किंवा पक्क्या घरामध्ये आपली बूड टेकणार. त्यामुळे आपला उंदराशी संबध म्हणजे "टोम आणि जेरी" पुरता किंवा "घरात शिरलेला (छोटा) उंदीर आपण कसा ठोकला !" या बाजीराव गोष्टी पुरता. टोम आणि जेरी मधला 'जेरी' म्हणजे "दिखावे पे मत जाव-अपनी अकल लगाव" चे उदाहरण ! खऱ्या लाइफ मध्ये उंदीर गोंडस वगैरे काही नसतो, निसर्गातील 'अल-कायदा'चा अवतार, पण त्यांच्या पेक्षा भयानक. मानवजात उध्वस्त करायचे फुल प्याकेज- बायोलोजिकल वॉरफेअरच्या सगळ्या अस्त्रांनी (पिसवा, जीवाणू) सज्ज आणि मानवाचे अन्नसाठे उध्वस्त करायची क्षमता!

उंदराची एक मादी साधारण पणे ३ वर्ष जगते आणि एका वर्षात ७ वेळा प्रसूत होते, आणि साधरण पणे एकावेळी ८ पिल्लांना जन्म देते. म्हणजे एका वर्षी ती ५ क्रिकेट च्या टीम्स (६० खेळाडू) तयार करते. विचार करा, म्हणजे दहा हजार माद्या दर तीन वर्षाने एक उंदरांची धारावी (१० लाख उंदीर) तयार करतात. वो एक उंदीर...!

धामणीचे स्टेपल डायेट म्हणजे "काळा उंदीर" मधेच लहर आली तर थोड्या चीचुन्द्र्या पण खाते फाष्ट्फुड म्हणून !
धामण वर्षाला साधरण पणे ५० उंदीर खाते, आणि पंधरा वर्ष जगते. आत्ता करा हिशोब, एक धामण मारून आपण आपलीच किती वाट लावतो आहे. आत्ताच्या "फुकट आणि मस्त" च्या जमान्यात, उंदराचा बिमोड करायला धामणीसारखा दुसरा उपाय मानवजातीकडे नाही. उंदीर आत्ता फक्त खेडेगावापुरते मर्यादित राहिले नाही, जसे whatsapp घराघरात पोहचले तसे उंदीर पण आपल्या घराघरात पोहचले आहेत, आणि आपले नुकसान करत आहेत त्यामुळे, धामण आत्ता फक्त फक्त शेतकऱ्यांचा मित्र राहिला नसून सगळ्या मानव जातीचा मित्र बनला आहे. "धामण पाळा आणि प्लेग टाळा"काही वर्षाने तुम्हाला अशी स्लोगन दिसू शकते.

भारत सोडायच्या महिनाभर आधी एका फोटोग्राफर (overdrive magazine चा ) मित्राचा फोन आला, त्याला सापाबद्दल मदत पाहिजे होती. हा नेहमी सारखा कॉल नाही, हे मला समजले, पण ओळख बघून मी मदतीला होकार दिला.

त्याच्या धनकवडीच्या स्टुडीओ मध्ये पोहचलो, तर तिकडे एक मोठी फेमस मॉडेल (फेमिनाची) आमची वाट बघत होती. कामाचा अंदाज मला एक नव्हता, पण थोड्या वेळातच मित्राच्या हातात धामणीची पिशवी बघून प्रकार ध्यानात आला. थोडक्यात म्हणजे ती मॉडेल अंगावर धामण सोडणार होती आणि माझा मित्र फोटो काढणार होता. (जास्त विचार करू नका, मिलिंद- मधू सारखा फालतू प्रकार इकडे नव्हता.)

माझे काम म्हणजे त्या धामणीला शांत ठेवायचे. आत्ता पर्यंत अनेक विषारी-बिनविषारी साप पकडले होते, हाताळले होते, पण हा प्रकारच नवा होता. बिनविषारी साप असला तरी ती धामण ५-६ फुटी होती. तीने जर मॉडेलच्या तोंडावर चावा घेतला तर त्या मॉडेल चे "करियर" त्याच सापाच्या बिळातच घुसले असते याची मला कल्पना होती. नंतर चे पाच तास माझ्या आयुष्यातील सगळ्यात जास्त टेन्शनमधले तास होते, त्यावरून मी इंजिनीरिंग ची App-Mech ची पण परीक्षा दहा वेळा ओवाळून टाकीन. त्या फोटोशूट च्या लाईटमध्ये धामणीला त्या मॉडेलच्या अंगावर शांत ठेवणे म्हणजे माझ्या आत्ता पर्यंतच्या अनुभवाची कसोटी होती.
पण ती धामण आणि मॉडेल खूप खंबीर आणि प्रोफेशनल असल्यामुळे त्यांनी माझ्या कष्टाला न्याय दिला, दोघांनी पण एकमेकीना सहन करत फोटोशूट पूर्ण केले.

धामण कशी स्मार्ट लुक्स देते आहे बघा !

१

कसोटीचा क्षण !

२

मॉडेल आणि धामणीचा आत्मविश्वास !

३

धामण आणि मॉडेल च्या मधली केमिस्ट्री !

४

पुढच्या भागात बिनविषारी साप आणि विषारी साप यांच्या रूपातला गोंधळ, आणि पुढचा भाग पुण्यामधून :)

सगळे फोटो गौरव ठोंबरे कडून घेतले आहेत आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने बदलण्यात आले नाही.

समाजजीवनमानछायाचित्रणविचारआस्वादलेखमाहिती

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

2 Dec 2013 - 4:31 am | स्पंदना

कंप्लिट आडवी!! साष्टांग!
कल्प्ना सुद्धा केली नव्हती की सापांच्या लेखात हे असला काही विळखा (टर्न हो) असेल म्हणुन.
झक्कास. ( या धाग्यावर आता मिपाकरांच्या उड्याच उड्या! मंडे बना दिया पब्लिकका।)
बा द वे एक पॉइंट आहे मॉडेल मेकअप ने चमकते आहे अन धामण विदाउट एनी प्रोफेशनल हेल्प.
आजीं आवडल्या. उंदरांची 'ताकद' समजली. अन धामण तर कायमच आवड्ते.

जबरी!!! धामण आणि मोडेल दोघीही

चाणक्य's picture

2 Dec 2013 - 5:55 am | चाणक्य

वर अपर्णाताईंनी म्हणल्याप्रमाणे...मंडे बना दिया :-)

सुधीर कांदळकर's picture

2 Dec 2013 - 6:39 am | सुधीर कांदळकर

वाचून काढले. पण एकाही चित्रात सापबीप कुठे दिसत नाही तो?

स्पंदना's picture

2 Dec 2013 - 7:00 am | स्पंदना

:))

मन डोले मेरा तन डोले...झालेल दिसतय कांदळकर साहेब.

जॅक डनियल्स's picture

2 Dec 2013 - 7:14 am | जॅक डनियल्स

स्वच्छ मनाने बघाल तर दिसेल साप !

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Dec 2013 - 6:15 pm | llपुण्याचे पेशवेll

जे. डी. थोडे धामणीचे पिव्वर फोटो टाका. जरा धामण कशी ओळखायची हे शिकावे म्हणतो.

जॅक डनियल्स's picture

2 Dec 2013 - 11:39 pm | जॅक डनियल्स

पुढच्या भागात टाकणार आहे. पण त्यावरून धामण ओळखता येईल का ते माहित नाही, कारण फोटो आणि खरा साप यात खूप फरत असतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Dec 2013 - 7:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

मला तर मुळात चित्रच दिसत नाहिये :(

जेपी's picture

2 Dec 2013 - 8:58 am | जेपी

हा पण भाग आवडला गेला आहे .

अग्निकोल्हा's picture

2 Dec 2013 - 9:07 am | अग्निकोल्हा

कंप्लीट पैकेज असतात राव!

यशोधरा's picture

2 Dec 2013 - 9:47 am | यशोधरा

धामणीबद्दल इतकेच?

हे हे हे मला एकही फोटु दिसत नैय्ये :(

मी-सौरभ's picture

2 Dec 2013 - 10:32 am | मी-सौरभ

पुरुष आय डी ना दिसण महत्वाच

इरसाल's picture

2 Dec 2013 - 1:32 pm | इरसाल

आम्हाला दिसताय नां मग झाले तर, बाकी कोणाचा गणेशा होवो कि पिवुशा ( ते आपलं पियुशा)!

मला हि फोटु दिसत नैय्ये

अरे मित्रा, मला पण फोटु दिसत नाहीयेत. ब्राऊजर पण बदलुन पाहिला तरी नाही :(
उत्सुकता शिगेला पोचली आहे. पटकन त्या फोटोचं काहीतरी करा.नाहीतर प्रतिसादात परत अपलोड करा.

जॅक डनियल्स's picture

2 Dec 2013 - 11:18 am | जॅक डनियल्स

माझी आज्जी, बाबा , २ काका आणि २ आत्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2013 - 6:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त लेखन आणि फोटो.

हीच पद्धत (गुगल) वापरून पुढचे (आणि जमलं तर मागचे) फोटो टाकले तर माझ्यासह अनेक मिपाकराना ते पाहता येतील.

जॅक डनियल्स's picture

2 Dec 2013 - 11:38 pm | जॅक डनियल्स

हो, आत्ता तसेच टाकीन, आधी फ्लिकर वर फोटो असल्यामुळे गुगल वर टाकायचा कंटाळा करायचो.

दिपक.कुवेत's picture

2 Dec 2013 - 10:47 am | दिपक.कुवेत

सर्व काहि आवडलं. काहि बाळबोध प्रश्नः अशा सापांबरोबर काढलेल्या फोटोंना जास्त मागणी असते का? असे फोटो काढताना पुर्ण वस्त्रे का घालत नाहित? मधु-मिलिंदनी नीदान बुटांची अ‍ॅड करण्याकरीता त्या अजगराला गळ्यात घेतलं होत. वरील फोटोत कोणत्या प्रॉडक्टची अ‍ॅड होती?

जॅक डनियल्स's picture

2 Dec 2013 - 11:07 am | जॅक डनियल्स

मला मागणीबद्दल माहित नाही. वरच्या फोटो शूट मध्ये पूर्ण वस्त्रे घालून फोटो काढले होते. तुम्ही कुठले फोटो पहिले मला माहित नाही. हे फक्त फोटो शूट होते, जाहिरात नव्हती, पुढे फोटो कशाला वापरले गेले हे मला माहित नाही. पण मॉडेल ने कुठले पण प्रोडक्ट हातात धरले नव्हते.

सविता००१'s picture

2 Dec 2013 - 10:54 am | सविता००१

केवळ भारी लिहितोस तू. उदाहरणं तरी कसली कसली उच्च देतोस रे तू....
मस्त, अप्रतिम, झकास इ.इ. सर्व काही :)

अनिल तापकीर's picture

2 Dec 2013 - 11:20 am | अनिल तापकीर

मस्त , अप्रतिम ,झक्कस्,आनि इतरही सर्व विषेषणे

जेपी's picture

2 Dec 2013 - 11:41 am | जेपी

दिसले फोटो . लय भारी .

सुबोध खरे's picture

2 Dec 2013 - 12:17 pm | सुबोध खरे

आपल्या ताज महालाला आमची वीट --
धामण हि थंड रक्ताचा प्राणी असल्याने तिला आठवड्यात एकदाच शिकार करणे पुरेसे होते. त्यामुळे ती आठवड्यात एक उंदीर या दराने वर्षात पन्नास ते साठ उंदीर खाते. या विरुद्ध घुबड हे गरम रक्ताचा प्राणी (पक्षी) असल्याने त्याला बराच अन्नाचा पुरवठा लागतो आणि पिल्ले असण्याच्या काळात अजूनच जास्त( ग वि ची लेखमाला पहा). त्यामुळे सरासरी दिवसाला तीन या दराने घुबड वर्षात एक हजार पर्यंत उंदीर खाते.
असे असूनही धामण हा शेतकऱ्याचा मित्र कसा? एकतर एका शेतात पंधरा ते वीस पर्यंत धामणी असू शकतात. शिवाय धामण हि बिळाच्या आतपर्यंत जाऊन ( मैल मे छिपे हुए किटाणू को धो डालता सारखे) उंदीर मारू शकते. त्यामुळे जे उंदीर घुबडाना दाद देत नाहीत(घुबड आल्याचे त्यांना कळून ते पटकन बिळात शिरतात)असे हुशार उंदीरसुद्धा धामणीला चकवू शकत नाहीत. झाडे नसलेल्या शेतात घुबडे जगत/ वाढत नाहीत/ पैदास करीत नाहीत अशा ठिकाणी सुद्धा धामणच उंदरांची संख्या नियंत्रित ठेवते.
मागणी तसा पुरवठा या न्यायाने शेतात उंदीर वाढले तितक्या धामणी वाढतात आणि उंदरांची संख्या नियंत्रित ठेवतात. यात मानवाने जर धामणी बिळात धूर करून हुसकावून मारल्या तर शेतात उंदीर बेसुमार वाढतात आणि अन्नाची अपरिमित नासाडी करतात.
हे घुबडाचे आख्यान ग वि यांची लेखमाला असल्यामुळे लोकांच्या स्मरणात राहील या हेतूने लिहित आहे.
बाकी फोटोतल्या "दोघीही" आकर्षक (आणि मादक) आहेत

जॅक डनियल्स's picture

2 Dec 2013 - 11:33 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् !
मस्त माहिती दिली आहे. धामण खूप चपळ असल्यामुळे उंदीर पण तिला चकवू शकत नाही.

प्यारे१'s picture

2 Dec 2013 - 12:27 pm | प्यारे१

___/\___

कृशिसानविवि!
भन्नाटच.
बाकी एम ३ लव्कर निघाला काय? ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Dec 2013 - 1:22 pm | बिपिन कार्यकर्ते

जाक्या साठी पुण्यामधे एक जाहिर सत्कार ठेवत आहे. भल्याभल्यांनी आजन्म मौनव्रत घ्यावं अशी चालली आहे ही मालिका!

केवळ सापांबद्दल आहे म्हणून नव्हे तर लेखनशैली, अनुभव, व्यासंग, संयम, परिपक्वता.... _/\_ _/\_ _/\_

आजीला साष्टांग दंडवत!

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Dec 2013 - 2:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

फॅमेली फोटो पण मस्त आला आहे. छान वाटले सगळ्यांना बघुन.

लै म्हणजे लैच मज्जा आली वाचताना.
धामणी बद्दल अजुन लिहीता आले तर बघा.

विसुनाना's picture

2 Dec 2013 - 4:05 pm | विसुनाना

पुस्तक काढणेचे करावे.

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2013 - 4:30 pm | टवाळ कार्टा

लक्की धामण ;)

मार्कस ऑरेलियस's picture

2 Dec 2013 - 6:37 pm | मार्कस ऑरेलियस

पण फोटो दिसले नाहीत ... धामण न दिसल्याचे दु:ख आहे मॉडेल न दिसल्याचे महादु:ख आहे :(

बाकी खरच पाळता येईल का हो धामण ? असं काहीतरी एक्जॉटीक पेट ( पाळीव प्राणी ह्या अर्थाने ) ठेवायचे आहे !!

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2013 - 7:27 pm | टवाळ कार्टा

असं काहीतरी एक्जॉटीक पेट ( पाळीव प्राणी ह्या अर्थाने ) ठेवायचे आहे

=)) =)) =))

जॅक डनियल्स's picture

2 Dec 2013 - 11:31 pm | जॅक डनियल्स

भारतात, १९७२ च्या वन्यजीव कायद्यानुसार साप पाळता येत नाही. फक्त तो कायदा पाळायचा का नाही हे तुमच्या वर आहे,,,;)

अनिरुद्ध प's picture

2 Dec 2013 - 7:39 pm | अनिरुद्ध प

नन्तर दिसले तेव्हा खरेच कळले,असो नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती,पुभाप्र

मुक्त विहारि's picture

2 Dec 2013 - 10:50 pm | मुक्त विहारि

झक्कास....

प्रास's picture

2 Dec 2013 - 11:34 pm | प्रास

दंडवत!
सुंदर चाल्लीय लेखमाला.
आवडला, हा भागही....

किसन शिंदे's picture

2 Dec 2013 - 11:55 pm | किसन शिंदे

भाग आवडला. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2013 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा

शब्द संपलेले आहेत...त्यामुळे फक्त __/\__/\__/\__
==========================================
हां पण येक र्‍हायलं.. ;) धामणी आवाडल्या! =))

मला ही फ्रेडा पिंटो वाटते आहे. कुणी सांगेल का कोण आहे ती?

जॅक डनियल्स's picture

3 Dec 2013 - 9:36 am | जॅक डनियल्स

नाही ती, फ्रेडा पिंटो नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2013 - 11:32 am | बिपिन कार्यकर्ते

"मला ही फ्रेडा पिंटो वाटते आहे. कुणी सांगेल का कोण आहे ती?"

कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं! लेखक सापाबद्दल लिहितो आणि लोकं दुसरीकडेच बघतात! काय मेलं हे वागणं तरी!

;)

अभिजा's picture

3 Dec 2013 - 12:28 pm | अभिजा

नेहमीप्रमाणेच उत्तम जमलाय लेख! पुढील लेखाची वाट पाहतो.

मनराव's picture

3 Dec 2013 - 3:22 pm | मनराव

वाचत आहे........ मस्त लिखाण आणि उत्तम माहिती.....

यातली धामण नेमकी कुठली ?

आणि मित्रा... कुठल्याही 'जहरील्या' परिस्थितीत स्वत: 'कूल' राहण्याचं तुझं कसब भल्याभल्या योग्यांना तोंडात बोट घालायला लावेल हो...

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2013 - 7:28 pm | टवाळ कार्टा

जी तुमच्याकडे बघत नाहीये ती :D

अर्धवटराव's picture

3 Dec 2013 - 8:55 pm | अर्धवटराव

आमची 'नजर' बघुन चावायला धावायची/सरपटायची नाहितर (काश...)

ओसु's picture

4 Dec 2013 - 10:29 am | ओसु

जेडी,
लेख नेहमीप्रमाणे सुंदर
लेखात तुम्ही धामण शांत राहण्यासाठी मदत केली. पण म्हणजे नक्की काय केले?

पैसा's picture

6 Dec 2013 - 11:21 pm | पैसा

नेहमीप्रमाणे मस्त लिखाण! फोटोतली सुंदरी ठीकठाक. आधेलं झक्कास!

आनंद's picture

7 Dec 2013 - 11:56 am | आनंद

मस्तच.
धामण "तो" होता कि "ती" होती.
कदाचित "तो" असावा म्हणुन फोटो शूट एंजॉय केलेल दिसतय.

एवढे उन्दीर खाणारी धामिण जर नागाचे स्टेपल फूड असेल, तर नाग हा माणसाचा शत्रू नाही का?

सुबोध खरे's picture

19 Dec 2013 - 10:30 am | सुबोध खरे

नाग उंदिरच खातो.नागराज (किंग कोब्रा) चे मुख्य खाणे धामण आहे.

तुमचा एक लेख वाचाय मिळाला आणि मग सगळेच लेख वाचून काढले. निव्वळ अप्रतिम आणि ग्रेट. तुमच्या कामाला आणि अनुभवाला सलाम. लेखांमधले पंचेस सुद्धा एक नंबर. तुम्ही लिहीत रहा आणि आम्ही वाचत राहू एवढच सांगेन.

जॅक डनियल्स's picture

30 Aug 2016 - 7:49 am | जॅक डनियल्स

धन्यवाद् ! मधल्या काळात शिक्षणामुळे ब्रेक घेतला होता. आता परत लिखाण चालू करीन.

अमित लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद !!!! खूप चांगल्या लेखमालेला मुकलो असतो !!!

अतिशय वाचनीय लेखमालिका. सही!
अवांतर : हा ह्या लेखमालिकेमधला शेवटचा लेख आहे का? की अजून पण भाग आहेत?

जॅक डनियल्स's picture

15 Sep 2016 - 7:32 am | जॅक डनियल्स

धन्यवाद् ! हा शेवटचा भाग नव्हता, पण या नंतर मला लिहायला जमले नव्हते. पण आत्ता लिहीन.

जव्हेरगंज's picture

14 Sep 2016 - 10:00 pm | जव्हेरगंज

संपूर्ण लेखमालिका वाचली!!

जबरदस्त झालीये

साष्टांग !!!

अजून पायजेल ...

जॅक डनियल्स's picture

15 Sep 2016 - 7:33 am | जॅक डनियल्स

धन्यवाद् ! आत्ता जमले तसे लिहीन.

जव्हेरगंज's picture

15 Sep 2016 - 12:37 pm | जव्हेरगंज

'साप' सोडून इतर विषयांवर पण लिहा की!

लिखाणशैली एकदम हटके आहे!

उदा. अमेरीकेतले अनुभव वगैरे इ.

चिनार's picture

15 Sep 2016 - 11:53 am | चिनार

जबराट लेखमालिका !!!!
जॅक राव तुम्हाला सलाम !!!
सापाविषयीचे अनेक गैरसमज दूर झाले. पुण्यात पाषाण भागात राहत असल्यामुळे सापाचे दर्शन अधूनमधून मिळत असते..