एका गारुड्याची गोष्ट १३: धामण: उंदराचा कर्दनकाळ !
धामणीबद्दल हा लेख आहे आणि त्यात उंदराचा विषय नाही, म्हणजे दुर्वांकुरच्या जेवणानंतर "मठ्ठा" नाही. उंदीर हा महाभयंकर प्राणी आहे, हे मला सर्पोद्यान मध्ये काम करायला लागल्यावर समजले.
आपण सगळी व्हाईट-कालर लोकं,इमारती मध्ये किंवा पक्क्या घरामध्ये आपली बूड टेकणार. त्यामुळे आपला उंदराशी संबध म्हणजे "टोम आणि जेरी" पुरता किंवा "घरात शिरलेला (छोटा) उंदीर आपण कसा ठोकला !" या बाजीराव गोष्टी पुरता. टोम आणि जेरी मधला 'जेरी' म्हणजे "दिखावे पे मत जाव-अपनी अकल लगाव" चे उदाहरण ! खऱ्या लाइफ मध्ये उंदीर गोंडस वगैरे काही नसतो, निसर्गातील 'अल-कायदा'चा अवतार, पण त्यांच्या पेक्षा भयानक. मानवजात उध्वस्त करायचे फुल प्याकेज- बायोलोजिकल वॉरफेअरच्या सगळ्या अस्त्रांनी (पिसवा, जीवाणू) सज्ज आणि मानवाचे अन्नसाठे उध्वस्त करायची क्षमता!
उंदराची एक मादी साधारण पणे ३ वर्ष जगते आणि एका वर्षात ७ वेळा प्रसूत होते, आणि साधरण पणे एकावेळी ८ पिल्लांना जन्म देते. म्हणजे एका वर्षी ती ५ क्रिकेट च्या टीम्स (६० खेळाडू) तयार करते. विचार करा, म्हणजे दहा हजार माद्या दर तीन वर्षाने एक उंदरांची धारावी (१० लाख उंदीर) तयार करतात. वो एक उंदीर...!
धामणीचे स्टेपल डायेट म्हणजे "काळा उंदीर" मधेच लहर आली तर थोड्या चीचुन्द्र्या पण खाते फाष्ट्फुड म्हणून !
धामण वर्षाला साधरण पणे ५० उंदीर खाते, आणि पंधरा वर्ष जगते. आत्ता करा हिशोब, एक धामण मारून आपण आपलीच किती वाट लावतो आहे. आत्ताच्या "फुकट आणि मस्त" च्या जमान्यात, उंदराचा बिमोड करायला धामणीसारखा दुसरा उपाय मानवजातीकडे नाही. उंदीर आत्ता फक्त खेडेगावापुरते मर्यादित राहिले नाही, जसे whatsapp घराघरात पोहचले तसे उंदीर पण आपल्या घराघरात पोहचले आहेत, आणि आपले नुकसान करत आहेत त्यामुळे, धामण आत्ता फक्त फक्त शेतकऱ्यांचा मित्र राहिला नसून सगळ्या मानव जातीचा मित्र बनला आहे. "धामण पाळा आणि प्लेग टाळा"काही वर्षाने तुम्हाला अशी स्लोगन दिसू शकते.
भारत सोडायच्या महिनाभर आधी एका फोटोग्राफर (overdrive magazine चा ) मित्राचा फोन आला, त्याला सापाबद्दल मदत पाहिजे होती. हा नेहमी सारखा कॉल नाही, हे मला समजले, पण ओळख बघून मी मदतीला होकार दिला.
त्याच्या धनकवडीच्या स्टुडीओ मध्ये पोहचलो, तर तिकडे एक मोठी फेमस मॉडेल (फेमिनाची) आमची वाट बघत होती. कामाचा अंदाज मला एक नव्हता, पण थोड्या वेळातच मित्राच्या हातात धामणीची पिशवी बघून प्रकार ध्यानात आला. थोडक्यात म्हणजे ती मॉडेल अंगावर धामण सोडणार होती आणि माझा मित्र फोटो काढणार होता. (जास्त विचार करू नका, मिलिंद- मधू सारखा फालतू प्रकार इकडे नव्हता.)
माझे काम म्हणजे त्या धामणीला शांत ठेवायचे. आत्ता पर्यंत अनेक विषारी-बिनविषारी साप पकडले होते, हाताळले होते, पण हा प्रकारच नवा होता. बिनविषारी साप असला तरी ती धामण ५-६ फुटी होती. तीने जर मॉडेलच्या तोंडावर चावा घेतला तर त्या मॉडेल चे "करियर" त्याच सापाच्या बिळातच घुसले असते याची मला कल्पना होती. नंतर चे पाच तास माझ्या आयुष्यातील सगळ्यात जास्त टेन्शनमधले तास होते, त्यावरून मी इंजिनीरिंग ची App-Mech ची पण परीक्षा दहा वेळा ओवाळून टाकीन. त्या फोटोशूट च्या लाईटमध्ये धामणीला त्या मॉडेलच्या अंगावर शांत ठेवणे म्हणजे माझ्या आत्ता पर्यंतच्या अनुभवाची कसोटी होती.
पण ती धामण आणि मॉडेल खूप खंबीर आणि प्रोफेशनल असल्यामुळे त्यांनी माझ्या कष्टाला न्याय दिला, दोघांनी पण एकमेकीना सहन करत फोटोशूट पूर्ण केले.
धामण कशी स्मार्ट लुक्स देते आहे बघा !
कसोटीचा क्षण !
मॉडेल आणि धामणीचा आत्मविश्वास !
धामण आणि मॉडेल च्या मधली केमिस्ट्री !
पुढच्या भागात बिनविषारी साप आणि विषारी साप यांच्या रूपातला गोंधळ, आणि पुढचा भाग पुण्यामधून :)
सगळे फोटो गौरव ठोंबरे कडून घेतले आहेत आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने बदलण्यात आले नाही.
In reply to मागील सर्व भागही .... by सुधीर कांदळकर
In reply to मागील सर्व भागही .... by सुधीर कांदळकर
In reply to स्वच्छ मनाने बघाल तर दिसेल by जॅक डनियल्स
In reply to जे. डी. थोडे धामणीचे पिव्वर by llपुण्याचे पेशवेll
In reply to मागील सर्व भागही .... by सुधीर कांदळकर
In reply to हे हे हे मला एकही फोटु दिसत by पियुशा
In reply to हे हे हे मला एकही फोटु दिसत by पियुशा
In reply to अरे मित्रा, मला पण फोटु दिसत by Dhananjay Borgaonkar
In reply to आत्ता गुगल मधून टाकले आहेत by जॅक डनियल्स
In reply to मस्त लेखन आणि फोटो. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to लेख, धामण, फोटो आणि मॉडेल by दिपक.कुवेत
In reply to आपल्या ताज महालाला आमची वीट - by सुबोध खरे
In reply to लेख वाचला by प्रसाद गोडबोले
असं काहीतरी एक्जॉटीक पेट ( पाळीव प्राणी ह्या अर्थाने ) ठेवायचे आहे=)) =)) =))
In reply to लेख वाचला by प्रसाद गोडबोले
In reply to मला ही फ्रेडा पिंटो वाटते आहे by स्पंदना
In reply to मला ही फ्रेडा पिंटो वाटते आहे by स्पंदना
In reply to धामण कशी स्मार्ट लुक्स देते आहे बघा ! by अर्धवटराव
In reply to जी तुमच्याकडे बघत नाहीये ती by टवाळ कार्टा
In reply to नाग हा माणसाचा शत्रु नाही का? by damn
In reply to तुमचा एक लेख वाचाय मिळाला आणि by अमितदादा
In reply to अतिशय वाचनीय लेखमालिका. सही! by साळू
In reply to संपूर्ण लेखमालिका वाचली!! by जव्हेरगंज
In reply to धन्यवाद् ! आत्ता जमले तसे by जॅक डनियल्स
कंप्लिट आडवी!! साष्टांग!