फसवणूक-प्रकरण १६: मुश आणि बुश

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
28 Jun 2010 - 7:15 pm

फसवणूक-प्रकरण १६: मुश आणि बुश (Mush and Bush)
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)
(या प्रकरणात इराक युद्धाची पूर्वतयारी, ९/११ चा हल्ला आणि त्यामुळे बुश-४३ यांचा मुशर्रफ लाडका कसा झाला याबद्दल माहिती आहे.)
[मूळ लेखातील इंग्रजी शब्द संख्या: १५३०० शब्द. रूपांतरित मराठी लेखाची शब्दसंख्या: ८७७०. संक्षिप्तीकरण=५७%)]

बुश-४३ यांना त्यांच्या कारभाराच्या सुरुवातीला एका वार्ताहारने पाकिस्तानच्या तेंव्हांच्या नेत्याचे नाव विचारले असता त्यांना ते आठवतही नव्हते, पण ९/११ नंतरच्या कांहीं आठवड्यातच पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिकेचा सगळ्यात जवळचा प्रादेशिक मित्र बनला व एकदा बुश-४३ यांनी मुशर्रफ यांचे वर्णन त्यांच्या 'सर्वोत्तम मित्रांपैकी एक' असे केले होते.

पाकिस्तानी वृत्तपत्रांनी त्या जोडीला "मुश आणि बुश" असे टोफणनांव दिले होते. ही एक विचित्र जोडी होती कारण एका बाजूला होते अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या ऐन काळजात दहशतवाद्यांना भिरकावणार्‍या जहालमतवाद्यांना नेस्तनाबूत करायला निघालेले बुश होते तर दुसर्‍या बाजूला होते तालीबान सरकारच्या उदयाचा शिल्पकार असलेले व दहशतवादी जिहादी सुन्नी टोळक्यांना हत्यारे, प्रशिक्षण देऊन त्यांच्याकरवी काश्मीरमध्ये रक्तपात घडवून आणणारे पाकिस्तानचे हुकुमशहा मुशर्रफ. अमेरिकेच्या दृष्टीने त्याहून चिंतेची गोष्ट अशी होती कीं पाकिस्तानी लष्कराने-व स्वतः मुशर्रफ यांनी-'प्रकल्प A/B' द्वारा कमीत कमी इराण, इराक, उत्तर कोरिया, लिबिया व सौदी अरेबिया या राष्ट्रांना छुपेपणाने अण्वस्त्रें पुरवून भावी युद्धांची बीजे पेरली होती.

CIA व परराष्ट्रमंत्रालयाल व जगातील प्रत्येक गुप्तहेरसंघटनेला काळजी असली तरी बुश-४३ बेफिकीर होते व त्यांच्यावर वरवर उमदे दिसणार्‍या पण आतून लबाड असलेल्या मुशर्रफ यांनी चांगली छाप टाकली होती. १९९८च्या अण्वस्त्रचांचणी व १९९९ चा कुदेता या घडामोडींनंतर घातलेले सगळे निर्बंध भिरकावले गेले व पाकिस्तानला ओसामा बिन लादेन व अल कायदाबरोबरच्या लढाईत अमेरिकेची साथ देण्यासाठी २६४ कोटी डॉलर्सची घसघशीत मदत देऊ करण्यात आली. अमेरिकेने इतरही तडजोडी केल्या. पाकिस्तानी आम जनतेचा, न्यायसंस्थेचा व उद्योगपतींचा भ्रमनिरास करणारी घटनादुरुस्ती मुशर्रफ यांनी करवून घेतली व त्याद्वारे आपली राष्ट्राध्यक्षपदाची मुदत पुन्हा निवडणुका न घेता पाच वर्षें वाढवून घेतली. शिवाय कधीही संसद बरखास्त करण्याचा अधिकार असल्याने पाकिस्तानमधील लोकशाहीला काळोखात नेऊन सोडले. बुश-४३ यांनी ओळख न पटलेल्या अज्ञात शत्रूशी लढतांना अशा दुरुस्त्या करणे आवश्यकच असल्याचा निर्वाळा देऊन टाकला. अमेरिकेनेहीेनव्या Patriot Act द्वारा कुणाचेही वैद्यकीय अहवाल, कर भरल्याबद्दलची माहिती, वाचनाच्या आवडी-निवडी, घराची गुप्त झडती घेण्याचा अधिकार असे अनेक व्यक्तिस्वातंत्र्यावर घावा घालणारा नवे कायदे मंजूर करविले होते.

पाकिस्तानची एक 'महत्वाचा मित्र' ही प्रतिमा दृढ करण्यासाठी बुश-४३ यांच्या सरकारातील अधिकार्‍यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रसाराबद्दल जाहीर वक्तव्ये करणे बंद केले. अरी फ्लायशर या 'व्हाईट हाऊस'च्या प्रवक्त्याने एका पत्रकारपरिषदेत मान्य केले कीं त्यांचे सरकार आता पाकिस्तान-उत्तर कोरिया संबंधांबद्दलसुद्धा फारशी कळजी करत नव्हते. ९/११ च्या अनेक वर्षें किंवा कांहींच दिवस आधी लोकांनी ज्या गोष्टी केल्या त्या आता बदलल्या होत्या कारण ९/११ च्या घटनेने सारे जगच बदलले होते व त्यामुळे अनेक राष्ट्रांच्या वागणुकीतही फरक पडला होता. पाकिस्तान उत्तर कोरिया व लिबियाबरोबरच्या संबंधांवर व पाकिस्तानच्या इतर दुष्कृत्यावर बारीक लक्ष ठेवणार्‍या जॉर्ज टेनेट यांच्या अति गोपनीय कार्यकारी समूहाबद्दलचे उल्लेखही बंद झाले. १९८१ सालासारखा आताही इतिहास नव्याने लिहू जाऊ लागला होता!

परराष्ट्रमंत्री कोलिन पॉवेल यांचे लक्ष तर्कशुद्धपणे अफगाणिस्तानवर केंद्रित झाले होते कारण त्या देशाने बिन लादेनना व अल-कायदाला आसरा दिला होता. पण उपसंरक्षणमंत्री वुल्फोवित्स व डिक चेनी यांचे प्रमुख अधिकारी स्कूटर लिबी यांचे लक्ष्य 'चांडाळचौकडी'च्या कार्यक्रमानुसार इराकवर अमेरिकेने आपणहून हल्ला करण्यावर केंद्रित होते. खरे तर हद्दपारीतल्या इराकी नॅशनल काँग्रेस या विरोधीपक्षाकडून मिळालेल्या १९,००० कागदपत्रांची छाननी करूनही त्यांना सद्दाम हुसेन पुरस्कृत नसंहारक शस्त्रास्त्रांबद्दलच्या (WMD) प्रकल्पाचा एकही संदर्भ मिळाला नव्हता, तरीही सद्दाम यांचा त्या भागावर खूप प्रभाव असल्यामुळे ते नक्कीच त्यात गुंतले असणार अशा तर्‍हेचे मुद्दे हिरीरीने मांडले जात होते व सद्दाम यांना 'टिपून' अमेरिकेचे 'अरक्षित भगदाड' (window of vulnerability) बंद करावे असा त्यांचा (दुरा)ग्रह कायम होता. या आपापसातील लठ्ठालठ्ठीमुळे पाकिस्तानकडे कुणाचेच फारसे लक्ष नव्हते.

सुरुवातीला बुश-४३ आपली पावले जरा काळजीपूर्वक टाकत होते व्या त्यांनी फक्त पॉवेल यांच्या अफगाणिस्तानवरील हल्ल्याला मान्यता दिली होती. ७ ऑक्टोबर २००१ रोजी अमेरिका व ब्रिटिश सैन्याने 'ऑपरेशन एंड्युअरिंग फ्रीडम' ही मोहीमेद्वारा अफगाणिस्तानवर 'अल कायदा'च्या प्रशिक्षणकेंद्रांना लक्ष्य करून हवाई व प्रक्षेपणास्त्रांचे हल्ल्यांचा भडिमार सुरू केला व तालीबानला कडक इशारा दिला कीं दहशतवाद्यांना आसरा दिलेले अमेरिका व ब्रिटन आता सहन करणार नाहीं. या मोहिमेचे पडसाद इस्लामाबाद येथेही उमटले कारण गुप्तहेरसंघटनेद्वारा आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानची ISI, स्वतः मुशर्रफ व ९/११ घातपातामागील दहशतवादी यांच्यात असलेले धक्कादायक दुवे उघड झाले. परदेशी गुप्तहेरसंघटनांनी असा शोध लावला कीं World Trade Center वर विमान घालणार्‍या महम्मद आट्टाच्या मॅनहॅटनमधील एका बँकेच्या खात्यात या कामगिरीसाठी संयुक्त अमिरातीतून एक लाख डॉलर्स जमाकरण्यात आले होते. पाठविणार्‍याचे नांव होते पूर्वी शिक्षा झालेला एक दहशतवादी अहमद उमर शेख उर्फ सईद शेख ज्याचे ISI शी निकटचे संबंध असल्याची पाश्चात्यांना संपूर्न माहिती होती. भारतीय तुरुंगातून कंदाहार येथील इंडियन एअरलाइन्सच्या अपहरण केलेल्या विमानातील प्रवाशांच्या जिवांच्या मोबदल्यात १९९९ साली सोडवण्यात आलेले अहमद उमर शेख आणि हरकत उल-अन्सारचे सरचिटणिस असलेले मौलाना मसूद अझर हे दोघेही तेंव्हांपासून पाकिस्तानसाठी काम करत होते. ISI चे प्रमुख ज.महमूद अहमद हेही या कटात सामील होते. सप्तेंबर २००१ मध्ये त्यांनी तालीबानचा बालेकिल्ला असलेल्या कंदाहारला ISI चे हस्तक पाठविले होते व ओसामा बिन लादेन यांना पकडून अमेरिकेच्या हाती देण्याबाबत मुल्ला ओमार यांच्याशी वाटाघाटी केल्या होत्या असे वरवर जरी भासविण्यात आले असले तरी खरे तर ते त्यांना अमेरिकेच्या आगामी स्वारीला तोंड देण्याची तयारी करण्याबद्दल व खबरदारी घेण्याबद्दल सांगायला पाठविले होते.

मुशर्रफनी युद्धभूमीवर हजर होता.मग ISI प्रमुख महमूद अहमद यांना बडतर्फ केले. वॉशिंग्टन खुष झाली. पण खरे तर या बडतर्फीने पाकिस्तानी लष्करातील अतिरेक्यांची ताकत वाढली व मुशर्रफ यांचे हात बळकट झाले. अफगाणिस्तानवर अग्निवर्षाव होत असलेल्या आणि अहमद यांना बडतर्फ करण्यात आलेल्या रात्री पकिस्तानच्या नऊ उच्चपदस्थ व सर्वात जास्त प्रभावी आणि मातब्बर अशा लष्करी अधिकार्‍यांची मुशर्रफ यांच्याबरोबर सत्तेच्या नव्या समीकरणाबद्दल एक बैठक झाली. मुशर्रफना टक्कर देऊ शकतील अशा ज.अहमद व ज.मुजफ्फर उस्मानी या दोघांचाही काटा काढण्यात आला. ८ ऑक्टोबरला मुशर्रफनी आपल्या दोन स्वामिनिष्ठ व खूप वर्षांपासून बरोबर काम केलेल्या दोन सहकार्‍यांना पदोन्नती दिली. ते दोघे होते लाहोरच्या चौथ्या तुकडीचे प्रमुख ज.मोहम्मद अज़ीज आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ मोहम्मद यूसुफ.

मुशर्रफ, अजी़ज आणि युसुफ या तिघांनीही ८०'त एकत्रपणे ज.गुल यांच्या मार्गदर्शनाखाली मुजाहिदीनना प्रशिक्षण देण्याचे व काश्मीरमध्ये छुपे युद्ध खेळण्याचे काम केले होते. आणि जन्माने काश्मिरी असलेला अजी़ज तर कारगिल युद्धात युद्धभूमीवर होता. त्यांना इस्लामाबादला आणण्याच्या प्रयत्नांना JeI[१] व JUI[१] च्या नेत्यांनी काश्मीरमधील जिहाद नरम होईल म्हणून विरोध केला होता व मुशर्रफनी त्या हट्टापुढे मान झुकवली होती. अज़ीज यांचा मुशर्रफ यांच्यावर खूपच प्रभाव होता.अज़ीजनीच तालीबान व ओसमा बिनलादेन यांच्यावर क्लिंटन यांच्या २००० सालच्या भेटीच्या अनुरोधाने बंधने आणण्याविरुद्ध मुशर्रफ यांचे मन वळविले व HuM[१] व LeT[१] सारख्या पाकिस्तानातील संघटनांच्या हालचालींविरुद्ध कारवाई करण्याच्या अमेरिकेच्या मागण्याना नकाराधिकार दिला. अज़ीज यांची तीन्ही दलांच्या प्रमुखांच्या समितीचे अध्यक्ष[२] म्हणून पदोन्नती करण्यात आली. हे पद तोपर्यंत मुशर्रफनी स्वतःकडेच ठेवले होते. युसुफना भूदलाचे उपसेनाध्यक्ष[३] म्हणून पदोन्नती मिळाली. दोघेही कुराण या मुस्लिम पवित्रग्रंथाला अनुसरून वागणारे, पाच वेळा-अगदी युद्धातही-नमाज पढणारे, व त्यांचा फावला वेळ पूर्णपणे ताब्लीगी जमात[४]च्या कामात व्यतीत करणारे होते. पाकिस्तानी जनतेला संबोधून केलेल्या भाषणात त्यांनी त्यांचा अमेरिकेशी अथवा ९/११ शी कांहींही संबंध असल्याचा इन्कार केला व लष्करात केलेले बदल करण्याचे त्यांच्या अनेक दिवसांपासून मनात होते असेही सांगितले.

पण मुशर्रफ हे नेते नव्हतेच. लष्करातील चांडाळचौकडीने त्यांना उच्चासनावर बसवले होते. पण ९/११ नंतर मात्र त्यातल्या बर्‍याच विरोधातील लोकांना काढून तरी टाकण्यात आले किंवा त्यातले कांहीं कालवश झाले व मुशर्रफ खरे सर्वेसर्वा बनले.

बुश-४३ना मुशर्रफ यांच्या उद्योगाबद्दल कळले होते कीं नाहीं हे सांगणे कठीण होते. पण त्यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्रें असल्याच्या परिणामांची मात्र माहिती होती. ११ ऑक्टोबरला टेनेट यांनी एक बातमी बुशना सादर केली कीं अल कायदा दहशतवाद्यांनी न्यूयॉर्क शहर एक दहा किलोटन शक्तीच्या अणूबाँबचा स्फोट करून बेचीराख करण्याचा कट केला आहे व तो अणूबाँब एका व्हॅनच्या मागच्या भागात घालून ती व्हॅन मॅनहॅटनच्या रस्त्यावरून धावत होती. त्याचा स्फोट जर 'टाईम्स स्क्वेअर'सारख्या गजबजलेल्या भागात झाला तर कोट्यावधी अंश तपमानात ५ लाख लोक जळून मृत्यू पावणार यात शंका नव्हती.

या वार्तेची शहानिशा तरी कशी करायची? CIA ने सरकारला ताकीद दिली कीं बिन लादेन १९९२ पासून पाकिस्तानच्या मदतीने अणूबाँब मिळविण्याचा प्रयत्न करत होते. ९/११ ची माहिती मिळूनही सरकारने झोपा काढल्या होत्या, पण आता मात्र बुशनी निर्णय घेतला व मोठा नरसंहार झाल्यास वैकल्पिक सरकार चालविण्यासाठी चेनींना बरेच सनदी नोकर सोबत देऊन अज्ञात स्थळी जायला सांगितले व परमाणूबाबतच्या आणीबाणीला तोंड देण्याचे प्रशिक्षण झालेले चमू न्यूयॉर्कमध्ये कार्यरत झाले.

ही बातमी केंद्रसरकारबाहेर कुणालाच सांगण्यात आली नव्हती, न्यूयॉर्कच्या महापौरांनाही नव्हती! कारण घबराट उडाल्यास काय होईल ते सांगणे कठीण होते, विशेषत: वॉल स्ट्रीटवर! शेवटी कांहींच सापडले नाहीं! पण अल कायदाला अणूबाँब हवा असून पाकिस्तानमध्येच अरक्षित अणूबाँब्सचा काळ्या बाजारात मिळू शकणारा साठा होता व पाश्चात्य राष्ट्रांबद्दल शतृत्वाच्या भावना व अल कायदाबद्दल सहानुभूती असणार्‍या शास्त्रज्ञांची तिथे वाण नव्हती! ऑक्टोबर २००१मध्ये टेनेट गुपचुपपणे इस्लामाबादला गेले कारण दोन पाकिस्तानी शास्त्रज्ञ, सुलतान बशीरुद्दिन महमूद आणि चौदिरी अब्दुल मजीद, ९/११ पूर्वी ओसामांना भेटल्याच्या बातमीने ते चिंतित झाले होते. मुख्य म्हणजे मुशर्रफनी ही बातमी स्वतःशीच ठेवली होती. हे दोन शास्त्रज्ञ अद्यापही त्यांना खानसाहेबांच्या आणि ISI चे भूतपूर्व प्रमुख जन.अहमद यांच्या मेहेरबानीने KRL ने तहहयात दिलेल्या घरात आरामात रहात होते.

टेनेटनी आग्रह धरला कीं मुशर्रफनी कारवाई केलीच पाहिजे व शेवटी २३ ऑक्टोबर २००१ ला महमूद व मजीदना अटक करण्यात आली व ISI आणि CIA च्या संयुक्त संघाने त्यांची चौकशी केली. आदल्याच दिवशी महमूदनी अमेरिकेने त्यांच्यावर स्वारी करण्यापूर्वी तालीबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानची एक औद्योगिक देश म्हाणून चांगली प्रगती होत होती अशी निदा-ई-मिल्लत या वृत्तपत्राशी बोलताना बढाई मारली होती. आता दोघेही त्यांनी कधीही बिन लादेनची किंवा अल कायदाच्या कुठल्याही नेत्याची भेट घेतली नव्हती असे सांगून आपण त्या गांवचेच नाहीं असे दाखवत होते. पण महमूद पॉलिग्राफच्या चांचणीत वारंवार अनुत्तीर्ण झाला होता व त्यांच्या अज़ीम या मुलाने "माझ्या बाबांना बिन लादेनने अणूबाँब कसा करायचा" याची माहिती विचारली होती अशी बढाई मारल्याचे सांगितल्यावर त्याची स्मरणशक्ती शेवटी जागी झाली. मग त्यांनी त्यांच्या प्रश्नकर्त्यांपुढे कबूल केले कीं त्याने बिन लादेनची भेट घेतली होती पण त्यांच्याशी जी चर्चा झाली ती केवळ 'पुस्तकी' स्वरूपाची होती. शब्दश: पाहिल्यास ते खरेही होते कारण बिन लादेनना हवा होता अणूबाँब बनविणार तर हे दोघे त्यांचे 'परमाणू सल्लागार' बनू इच्छित होते.

पण अमेरिकनाना माहीत होते कीं महमूद व मजीद यांचे पाकिस्तानी परमाणू समुदायात भरपूर संबंध होते व KRL चे भूतपूर्व विभागीय प्रमुख व एका मोठ्या अणुभट्टी प्रकल्पाचे भूतपूर्व निर्देशक या नात्याने या संवेदनशील तंत्रज्ञानाची कुणाही वरिष्ठांना संशय न येता मोठ्या प्रमाणावर आयात कशी करायची हे महमूदना माहीत होते. परमाणूसंस्था सोडल्यापासून आणि उम्मा तमीरेनाऊ (UTN) या दानधर्मसंस्थेची स्थापना केल्यापासून त्या दोघांना अल कायदा वा तालीबानसाठी असे तंत्रज्ञान मिळवणे अधीक सोपे झाले होते.

टेनेट यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गडबडी उघडकीस आल्या. दोन ज्येष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी व मिर्झा युसुफ बेग नावाचा PAEC चे तालीबानबद्दल सहानुभूती असलेले शास्त्रज्ञही या दानधर्मसंस्थेचे सभासद होते. आणखी तपास केल्यावर महम्मद नसीम, हुमायून नियाज़ आणि आणि एका पाकिस्तानी अभियांत्रिकी कंपनीचे मालक शेख मोहमद तुफैल यासारखे आणखीही कांही पाकिस्तानी शास्त्रज्ञ अल कायदाला भेटले होते हे उघडकीस आले. यांची चौकशी चालू झाली. पण PAEC त शस्त्रास्त्रांचे तज्ञ म्हणून काम केलेले मुहम्मद मुख्तार व KRL चे शस्त्रास्त्रांच्या संरचना विभागात काम करणारे मात्र चौकशीतून सटकले. जरी अमेरिकनांच्या मते बिन लादेनला अणूबाँब बनविण्यासाठी मदत करणार्‍यात यांचा हात असण्याची शक्यता होती तरी मुशर्रफ सरकारने असा दावा केला कीं ते ब्रह्मदेश सरकारबरोबर एका संवेदनशील प्रकल्पावर काम करत असल्याने त्यांना त्यावेळी आणणे शक्य नव्हते. त्यावेळी सगळे बिन लादेन यांच्यातच इतके गढून गेले होते कीं पाकिस्तानी परमाणू शास्त्रज्ञ, तेही KRL चे, ब्रह्मदेशच्या लष्करी चांडाळचौकडीबरोबर काय करत होती हे विचारायचेही कुणाला सुचले नाहीं.

खरे तर सगळ्यात मोठा दुवा होता भूतपूर्व ISI प्रमुख हमीद गुल. पण लष्कराला दुखविणे टाळण्यासाठी, जरी ते मुला ओमारसारख्यांना भेटायला बर्‍याचदा काबूलला गेले होते तरी, त्यांना बोलावण्यात आले नाहीं[५]. अमेरिकेची पाकिस्तानच्या मदतीने अणूबाँबधारी झालेल्या दहशतवाद्यांच्या अफगाणिस्तानच्या उत्तरीय संघटनेने (Northern Alliance) जेंव्हां १३ नोव्हेंबर २००१ ला काबूल काबीज केले व तालीबानी सैन्याची पळता भुई थोडी झाली तेंव्हां अमेरिकेच्या अणूबाँबसज्ज दहशतवाद्यांपासूनच्या व पाकिस्तानी समर्थनाने रचलेल्या कटाच्या भीतीने वरची पट्टी गाठली होती. त्यावेळी पाश्चात्य गुप्तहेरसंघटनांना व वार्ताहारांना तालीबानच्या मंत्रालयाच्या व लपण्यायोग्य सुरक्षित जागा म्हणून वापरल्या जाणार्‍या वज़ीर अर्कवार खान परिसरात इमारतींत अल कायदाच्या अण्वस्त्रांसंबंधीच्या महत्वाकांक्षांबद्दलच्या माहितीचे घबाड सापडले. तालीबानी सैन्याला पळायची इतकी घाई झाली होती कीं त्यांनी सारे कागदपत्र कचर्‍याच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यात ठासून भरले व त्या पिशव्‍या तशाच टाकून ते पळाले होते. त्या इमारतीत नावाला अनाथालय चालवले जाते असे जगाला भासवले जात असले तरी तिथे लहान मुलांच्या पुस्तकांत वगैरे स्फोटके, ग्रेनेड्स, क्षेपणास्त्रे व बाँब बनवायची सूचनापत्रक यासारख्या वस्तू मिळाल्या. ही इमारत एक दहशतवाद्यांचे प्रशिक्षणकेंद्र होते.

CIA चे अधिकारी मधवर्ती काबूलमधील महमूद यांच्या UTN च्या मुख्यालयाकडे गेले. तिथे त्यांना शेकडों कागदपत्रे मिळाली-कांही अफगाणिस्तानमध्ये रस्ते बांधण्यात UTN करत असलेल्या मदतीबद्दल, पिठाच्या गिरण्या उभ्या करण्याबद्दल व शैक्षणिक मालाबद्दल होती-पण अल कायदाला असलेल्या नरसंहारक शस्त्रास्त्रांच्या (WMD) भुकेबद्दलही होती व या भुकेला खतपाणी UTN संस्था घालत होती. तिथे त्यांना एका हेलियम भरलेल्या फुग्याला अँथ्रॅक्सने भरलेला डबा टांगून ती पावडर शहरावर टाकण्याची जंगली यंत्रणा दिसली, आणखी एका खोलीत अमेरिका कशी सर्व जगातल्या मुसलमानांवर जैविक शस्त्रांचे प्रयोग योजत होती याची ’माहिती’ देणारी पत्रके (handbills) भरली होती. UTN आणि 'जैश-ए-महम्मद' या संघटनेतील संबंध दर्शविणारी कागदपत्रे होती. यावरून UTN, अल कायदा, HuA JeM सारख्या दहशतवादी संस्था व मुशर्रफ यांच्यातील संबंध उघड होते.

मग ISI आणि CIA च्या अधिकार्‍यांनी महमूद व मजीद यांना पुराव्यासकट सखोल तपासणीसाठी सामोरे गेले त्यावेळी दोघांनी अल कायदाबरोबर परमाणू, रासयनिक व जैविक शस्त्रांबद्दल पूर्ण व खुलासेवार चर्चा केल्याचे कबूल केले. बुश-४३ यांनी UTN ला बेकायदेशीर ठरवून त्या संस्थेची व महमूद, मजीद व तुफैल यांची सर्व संपत्ती गोठवून टाकली. पण मुशर्रफ व ISI करत असलेल्या 'लीलां'कडे मात्र लक्ष दिले नाहीं.

पण पाकिस्तानने महमूद व मजीदविरुद्ध कारवाई न करता त्यांनी अल कायदाला अण्वस्त्रसज्ज बनविण्याबाबत त्यांच्याविरुद्धच्या पुराव्याला कमी लेखले. "या दोन शास्त्रज्ञानी अल कायदाला अण्वस्त्रसज्ज केल्याची शक्यता शून्य आहे कारण अशा कामाला कोट्यावधी डॉलर्स व ५० वर्षे लागतात" असे मुशर्रफ यांचे PAEC तील ज्येष्ठ अधिकारी आढ्यतेने म्हणाले. पण हे दोन शास्त्रज्ञ अल कायदाला युरेनियम अतिशुद्धीकरणाचा प्रकल्प बसवून देत नव्हते तर थोडेसे अतिविघटनशील मूलद्रव्य देऊन अणूबाँब बनविणे किंवा ते मूलद्रव्य एका स्फोटकाला बांधणे हे काम करता आलेच असते व असा स्फोट एकाद्या शहराला दूषित करायला पुरेसा होता. महमूदनी ते पॉलिग्राफच्या चांचणीत वारंवार अनुत्तीर्ण व्हायला त्यांची खराब प्रकृती व उच्च रक्तदाब हीच कारणे होती अशी मखलाशी केली. मुशर्रफना हे दोघे न्यायालयात काय सांगतील याची भीती असल्याने त्यांच्यावर कुठलाही खटला चालविला नाहीं किंवा खानसाहेबांनाही चौकशीला सामोरे जाऊ दिले नाहीं[६].

२००१ साल संपले तरी बुश-४३ यांचे बिन लादेनना जिवंत अथवा मृत पकडण्याचे' लक्ष्य़ अपुरेच राहिले व अल कायदाचे हजारो लढवय्ये अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील तोराबोराच्या पर्वतांतील गुहात लपलेलेच राहिले. त्यानंतर थोड्याच दिवसांत गुलबुद्दिन हिकमतयार हा अमेरिकेचा कडवा मुजाहिदीन शत्रू व हमीद गुलचा अफगाणिस्तानमधील 'खास माणूस' तिथे प्रकट झाला व त्याने या सर्वांना पाकिस्तानात सुरक्षित ठिकाणी नेले. पण नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या शोधाला आता कुठे सुरुवात झाली होती!

अमेरिकेने अफगाणिस्तानमधील पन्नास-एक ठिकाणांहून अल कायदाने बनविलेली अनेक कागदपत्रे हस्तगत केली. ही सारी कागदपत्रें मुशर्रफ यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीरमध्ये घुसवण्यासाठी तयार केलेल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी बनविलेल्या साहित्याचाच भाग होती. काबूलमधील रहिवाशांनी CIA च्या अधिकार्‍यांना अरब वरिष्ठ रहात असलेल्या वझीर अर्कवार खान यांच्या घराकडे नेले. तिथेही घाईघाईत पळताना अल कायदाच्या हस्तकांनी खूप कागदपत्रें मिळाली त्यात अल कायदाचे नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांचे प्रमुख अबू खबाब अल-मास्री[७], [७अ] यांना लिहिलेल्या १२ जानेवारीला लिहिलेल्या पत्राचा कांहीं भागही मिळाला. तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांच्या अस्ताव्यस्त पडलेल्या वह्यांत प्लुटोनियम किंवा युरेनियम वापरून अणूबाँब बनविण्याची कृतीही सापडल्या व हे 'गावठी' बाँब चालले असते असे मत ते बनवू शकणार्‍या पाश्चात्य तज्ञांचे मत पडले. मुखपृष्ठ व पहिले पान नसलेल्या व अरबी लिपीत लिहिलेल्या एका २५-पानी पुस्तिकेत लिहिले होते "अणूबाँब हवा असलेल्यांना प्रथम युरेनियम अतिशुद्धीकरण करणारा कारखाना उभारला पाहिजे"! त्यात "super bombs," "nuclear fission" व "isotopes" यासारखे महत्वाचे शब्द विद्यार्थ्यांचे ध्यानाकर्षण करण्यासाठी ठळक शाईत निळ्या बोरूने लिहिले होते. पुस्तिकेत विविध तर्‍हेचे अणूबाँब, अणूबाँब स्फोटामागील पदार्थविज्ञान, परमाणूविषयक पदार्थांचे गुणधर्म, युरेनियम-२३५ शुद्धीकरणाचे/वितळविण्याचे (smeltइन्ग्) तपमान, तसेच गावठी अणूबाँब बनविण्याची 'झटपट' पद्धतीही दिलेली होती.

IAEA मध्ये शस्त्रास्त्रांचे निरीक्षण करणार्‍या भूतपूर्व अधिकार्‍यांनी या पत्रिकेतील super bombs बद्दलची माहिती वाचल्यावर मत दिले कीं तिथे असलेली माहिती सार्वजनिक क्षेत्रातील वाचनात मिळणार्‍या माहितीपेक्षा खूपच विस्तृत होती. जरी या कागदपत्रावरून अल कायदाचे तज्ञ प्रत्यक्ष पाकिस्तानने १९९८ साली चांचणी केलेल्या बाँबसारखा बाँब बनवायच्या किती जवळ गेले होते हे सांगणे जरी अवघड असले तरी स्फोटकांच्या तज्ञांनी अस निष्कर्ष काढला कीं अल मास्रीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना बंदुकीच्या प्रकारचा अणूबाँब बनवता आला असता. या प्रकारात बंदुकीतून अतिशुद्धीकृत युरेनियमची गोळी दुसर्‍या एका अतिशुद्धीकृत युरेनियमच्या गोळ्यात वेगाने घुसवून त्यांचे विघटन करून नरसंहार करता येतो.

इतर कागदपत्रांवरून असे दिसले कीं अल मास्रींनी बाहेरून मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. जून १९९९च्या एका पत्रात त्यांनी अल कायदाच्या सभासदांना शिक्षणसंस्थांत प्रवेश देववून त्यांना परमाणूक्षेत्रातील तज्ञांशी निकटचे संबंध स्थापण्यास मदत करून त्या संबंधांचा अल कायदाच्या कामाच्या पहिल्या टप्प्यात खूप फायदा करवून घेण्याबद्दल लिहिले होते. तालीबानची अफगाणिस्तानवरील पकड जेंव्हा नष्ट करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या छाप्यात कायकाय मिळाले ते तपासले तेंव्हां बुश-४३ यांच्या सरकारने जाहीरपणे अल कायदाने नरसंहाराची शस्त्रें मिळविली असल्याच्या शक्यतेबद्दल जनतेला ताकीद द्यायला सुरुवात केली. संरक्षणमंत्री रम्सफेल्ड यांनी तर ओसामा बिन लादेनना अशा शस्त्रांची प्राप्ती झाल्याची शक्यता असल्याचेही जाहीर केले. संयुक्त राष्त्रांच्या आमसभेत बोलतांना बुश-४३ यांनी सुचवले कीं दहशतवादी नरसंहाराच्या शस्त्रास्त्रें शोधत असून ती वापरून त्यांच्या तीव्र द्वषाचे रूपांतर वंशसंहारात होण्याची शक्यता आहे.

मग २००२च्या उन्हाळ्यात अल कायदाने प्रथमच स्वत:च्या प्रलयकारी विध्वंसशक्तीची कबूली दिली. ९/११ च्या प्रमुख संयोजक असल्याचा आरोप असलेल्या आणि FBI ने most-wanted दहशतवाद्यांच्या यादीत घातलेल्या खलिद शेख महंमद यांनी 'अल जझीरा' चित्रवाहिनीच्या योस्री फौदा या वार्ताहाराला कराचीत एका अज्ञात स्थळी मुलाखत दिली[८] त्यात त्यांनी सांगितले कीं ते अल कायदाचे लष्करी समितीचे प्रमुख होते व ९/११ च्या आधीच्या योजनेत दोनेक परमाणू सुविधांना लक्ष्य करण्याचे ठरत होते, पण तो बेत त्यावेळेपुरता पुढे ढकलण्यात आला होता. खलिद पुढे म्हणाले कीं अल कायदाने नेहमीची शस्त्रे परमाणू सुविधांवर वापरायची योजना आखली होती, पण अफगाणिस्तानमध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट झाले होते कीं एकादा गावठी अणूबाँब वापरायची योजनाही अल कायदाच्या विचारार्थ होती. खलिदना मार्च २००३ मध्ये ISI ने रावळपिंडीत अटक केले व त्याला अमेरिकनांच्या हवाली केले. त्यांना CIA च्या विमानात घालून ग्वांटानेमो बे येथील तुरुंगात टाकण्यात आले. बिन लादेननाही असेच पकडून अज्ञात स्थळी हलवायची योजना होती.

ओसामा बिन लादेनचा प्रवक्ता म्हणवणार्‍या सुलेमान अबू घेईथसारख्यांनीही धमक्या दिल्या. सुलेमानने एक चार भागांचा निबंध एका मुजाहिदीन वेबसाईटवर लिहिला होता व त्यात "अल कायदाला ४० लाख अमेरिकनांना मारण्याचा हक्क आहे व त्यातली २० लाख तर मुले असतील, ऐंशी लाख माणसे निर्वासित होतील तर लाखों जखमी व पांगळी होतील." या आकडेवारीवरून हा अण्वस्त्रांनी केलेला हल्ला होता यात शंका नाहीं.

अमेरिकेच्या न्यायखात्याने अल कायदाचा हालचालींचा व कारवायांचा आघाडीचा संयोजक व संघटक म्हणून वर्णन केलेला अबू झुबैदा २८ मार्च २००२ रोजी पाकिस्तानात पकडला गेल्यावर गावठी अणूबाँब्सच्या हल्ल्याची काळजी आणखी तीव्र झाली. दोन वर्षें अमेरिकेने आग्रह करूनही पेशावरला उघडपणे रहाणार्‍या अबूला पाकिस्तानच्या मदतीने पकडले नव्हते तर अमेरिकेच्या राष्ट्रीय टेहळणी कार्यालयाने त्यांच्या मोबाईल फोनवरून केलेल्या फोन्सचा मागोवा घेत फैसलाबाद येथील एका घरात पकडले. त्याच्या FBI ने केलेल्या चौकशीत त्याने मान्य केले कीं अल कायदाला 'गावठी' अणूबाँब बनविण्यात खूप रस होता व चौकशीत त्यांनी सांगितले कीं आता त्यांना असा अणूबाँब बनवायची पद्धती कळली होती.

९/११ च्या घटनेनंतर नऊ दिवसांनी दूरचित्रवाणीवरून अमेरिकन जनतेला दिलेल्या भाषणात बुश-४३ म्हणाले कीं अमेरिकेचे दहशतवादाविरुद्धचे युद्ध अल कायदा संघटनेबरोबर सुरू होते, पण तेथेच संपत नाहीं व ते प्रत्येक दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत केल्याशिवाय संपणार नाहींय्. या संदेशाबरोबर बुश यांनी जगाला जणू सांगितले कीं अमेरिका आता एका अशा मोहिमेवर आहे कीं ती शत्रूने हल्ला करण्याच्या आतच प्रतिहल्ला करेल. पहिले पाऊल होते अफगाणिस्तानचे. दुसरे पाऊल अमेरिका कुठे टाकेल यावरून पाकिस्तान व भारत यांमध्ये शांतता आहे कीं नाहीं यावर ठरणार होते. २००१ च्या हिवाळ्यात अशीही चर्चा होती कीं अमेरिकन सैन्य अल कायदाच्या जुन्या तळावर, सोमालियावर, स्वारी करेल! इथून पूर्वी अल कायदाने कारवाया केल्या होत्या व अफगाणिस्तानमधून पाकिस्तान किंवा इराणमार्गे पळून आल्यावर ते सोमालियात पुन्हा संघटित होण्याच्या योजना आखत होते. कोलिन पॉवेल यांच्या या कल्पनेत सुदान, येमेन व फिलिपाईन्सचाही समावेश होता. पण पॉवेल यांच्या कल्पनेला स्थानीय सरकारचे व लष्कराचे सहाय्य लागणार होते.

पण त्याआधीच रम्सफेल्ड, वुल्फोवित्स, आर्मिटेज व इतर नूतनसनातन्यांनी पुढची स्वारी कुठे करायची हे ठरवून टाकले होते. त्याबाबत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक जाहीरनाम्यात बुश-४३ यांनी याच मुद्द्यावर प्रचारही केला होता. या चांडाळचौकडीने व कांहीं इतर आघाडीच्या नवपुराणमतवादी[८अ] प्रतिनिधींनी १९९८ मध्ये क्लिंटन यांच्याशी सद्दामला गादीवरून खाली उतरविण्याबद्दल आग्रही प्रतिपादन केले होते व त्यातील कांहीं रम्सफेल्ड आयोगाचेही सभासद होते आणि त्यांनी इराक, इराण व उत्तर कोरिया या तीन राष्ट्रांची जगातील सर्वात घातक राष्ट्रे म्हणून जाहीर केली. बुश-४३ यांनी याच तीन राष्ट्रांना 'दुष्टचक्र'[९] असे नाव दिले होते (रेगन यांनी सोविएत संघराज्याला दुष्टसाम्राज्य[९] असे नांव दिले होते त्याची आठवण होते.)

रम्सफेल्ड, वुल्फोवित्स, आर्मिटेज, पर्ल, झाल्मय खलिलझाद, श्नायडर, बोल्टन व वूल्सी यांनी १९९८ पासून अमेरिकेला, अमेरिकन सैन्याला, मित्रांना व मित्रराष्ट्रांना सर्वात जास्त भयकारी देश म्हणून जाहीर केलेल्या या तीन देशांना ताकीत देण्यात आली. बुश-४३ म्हणाले होते कीं अमेरिकेने या देशांनी केलेल्या नरसंहारक शस्त्रास्त्रांमधील प्रगतीची दखल खूप गंभीरपणे घेतली होती व जे देश अमेरिकेच्या लष्करी शक्तीपुढे झुकणार नाहींत त्यांना लक्ष्य केले जाईल. ते पुढे म्हणाले कीं अमेरिका त्या क्षणापासून जगाची विभागणी अमेरिकेबरोबर असलेले चांगले देश व अमेरिकेविरुद्ध असलेले दुष्ट देश अशी करणार असून दुष्ट राष्ट्रांची निर्भत्सना करण्यात येईल असेही ते म्हणाले होते. पण ज्या राष्ट्राच्या शास्त्रज्ञांनी या दुष्टचक्राला ही नरसंहारक अस्त्रे बेजबाबदारपणे विकली होती व अद्यापही असली प्रलयंकारी शस्त्रास्त्रांचा त्या राष्ट्रांशी सौदे सुरूच होते त्या पाकिस्तानचा मात्र कुणीही उल्लेखही केला नाहीं

जून २००२ मध्येही बुश-४३ यांनी जेंव्हां शत्रू बलवान व्हायच्या आधीच त्याच्यावर स्वारी करण्याबाबतची अमेरिकेची राष्ट्रीय डावपेचयोजना[१०] अमेरिकन लष्करी शिक्षणाची पंढरी समजल्या जाणार्‍या 'वेस्ट पॉइंट' या लष्करी प्रबोधिकेत नव्याने बाहेर पडणार्‍या हजारो 'कॅडेट्स'ना संबोधताना जाहीर केली त्यातही पाकिस्तानचा उल्लेख केला नाहीं. २०० वर्षांच्या लष्करी प्रघातांपासून दूर जात बुश-४३ म्हणाले कीं "आता अमेरिका युद्ध शत्रूच्या भूमीवर नेऊन त्याच्या सर्व योजना उद्ध्वस्त करून सर्वात जास्त धोक्यांना ते अमेरिकेपर्यंत येण्याच्या आधीच सामोरे जाऊ इच्छिते. कारण धोका आपल्यापर्यंत येईपर्यंत वाट पाहिल्यास फार उशीर झालेला असेल". २००२ साल उजाडेपर्यंत ब्रिटिश हेरखात्यांच्या विविध संघटनांच्या खानसाहेबांबद्दलच्या चिंता इतक्या तीव्र झाल्या होत्या कीं संयुक्त गुप्तहेर संघटना समितीच्या[११] 'व्हाईटहॉल'मधील मंत्रीमंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांच्या हालचालींबद्दल चर्चा झाली. ही बैठक (forum) ब्रिटनच्या सर्व गुप्तहेर संघटना एकत्र भेटून ब्रिटनला असलेल्या मोठ्यात मोठ्या धोक्याबद्दल चर्चा करण्यासाठी भरते. मार्च २००२ मध्ये झालेल्या बैठकीत या गुप्तहेर संघटनांना खानसाहेबांबद्दल व पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रसारविरोधी कारवायांबद्दल सविस्तर मूल्यमापन करायची आज्ञा मिळाली. त्या आधी २००० साली चर्चा झाली होती त्यापेक्षा आता ही शंका जास्त स्पष्ट झाली होती व कमीत कमी एक मध्यपूर्वेतील राष्ट्राला (बहुदा लिबियाला) असे तंत्रज्ञान व साधने विकल्याची शंका त्यांना आली होती. त्याखेरीज खानसाहेबांनी मलेशियात स्वतःची खासगी उत्पादन सुविधा उभी केली होती व ती त्यांचे सहकारी ताहीर चालवत होते.

परदेशातील त्यांच्या हस्तकांकडून माहिती जमवून JIC ला कळले कीं ताहीरच्या १९९८च्या विवाहापासून खानसाहेबांनी दुबईच्या ४४ वार्‍या केल्या होत्या. ताहीरच्या लग्नातच खानसाहेबांनी आपल्या सहकार्‍यांना त्यांचा पाकिस्तानातून बाहेर पडून दुबई, दक्षिणपूर्व आशिया व आफ्रिका इथे हलायचे ठरविली होते. खानसाहेबांच्या १९७०पासून सुरू झालेल्या हालचाली आता जास्त तीव्र झाल्या होत्या. ब्रिटिश गुप्तहेरसंघटना खानसाहेबांच्या ग्रिफिनसारख्या जुन्या सहकार्‍यांच्या मागावर होतेच. जरी ग्रिफिन यांचा २००२साली खानसाहेबांबरोबरचा धंदा जवळजवळ संपुष्टात आलेला होता तरी त्यांना आपल्या मागावर लोक आहेत याची जाणीव झाली. खरे तर ताहीरना नजरेत ठेवायला हवे होते पण ग्रिफिन यांच्या मागावर लोक तैनात होते. २००२ पर्यंत ताहीर यांची SMB Computers ही कंपनी भरभराटीला आली होती. तिथे २०० लोक कामावर होते. रोजचा धंदा ताहीरचे बंधू सईद पहात तर ताहीर SMB Computers च्या छत्राखाली दडून खानसाहेबांचा अण्वस्त्रप्रसाराचा लिबिया, इराण व उत्तर कोरिया येथील धंदा बघत होता. त्याने आता एक नवीन उत्पादनकेंद्रही स्थापले होते.

ताहीरच्या नझीमाबरोबरच्या लग्नामुळे त्याला मलेशियात रुबाब होता व मलेशियाच्या भावी पंतप्रधानाच्या मुलाशी दोस्ती झाली. त्याच्या SCOMI या नावाच्या कंपनीत प्रतीकात्मक अशी २५ टक्के silent partnership सुद्धा त्याला मिळाली व तो आता मलेशियात एक नवी उत्पादन आघाडी उघडू पहात होता. ताहीरच्या मनात कांहीं कल्पना होत्या ज्या त्याला व खानसाहेबांना उपयुक्त होत्या.

खानसाहेबांना लिबिया, इराण व उत्तर कोरियाला अण्वस्त्रनिर्मितीला लागणारे घटकभाग पोचवायचे होते. दिवसेंदिवस हे घटकभाग पाश्चात्य देशातून मिळवणे अवघड होत चालले होते कारण तेथील कस्टम्सचे अधिकारी यातली कुठली सामुग्री KRL शी किंवा पाकिस्तानशी संबंधित आहे काय याची लगेच तपासणी करत. खानसाहेब बरेच घटकभाग KRL मध्येच बनवत पण ते भाग पाकिस्तानमधूनही बाहेर काढणे अवघड होऊ लागले होते. त्यामानाने मलेशिया ही नवी जागा होती. तिथे कुठलाच परमाणू कार्यक्रम सुरू नसल्यामुळे मलेशियाकडे IAEA चे लक्ष नव्हते व त्या देशात अण्वस्त्रनिर्मितीत व इतरही वापरता येतील अशा दुहेरी वापराच्या घटकभागांच्या निर्मितीविरुद्ध व निर्यातीविरुद्ध कुठलेच कायदे नव्हते. त्यामुळे खानसाहेबांना हवी असलेली लोकांच्या नजरेत नसलेली ही एक आदर्श जागा होती.

डिसेंबर २००१ मध्ये ताहीरने SCOMI कंपनीपुढे एक नव्या धंद्याचा प्रस्ताव ठेवला. तो होता "पेट्रोलियम" उद्योगासाठी लागणारे अतीशय अचूक मापाचे अल्युमिनियमचे घटकभाग बनवू शकणारा अभियांत्रिकी कारखाना[१२]. युरोपियन अभियंते मलेशियाला येऊन सारी यंत्रे बसवून व सुरू करून देणार होते व Bikar Metal नावाच्या एका जर्मन कंपनीबरोबर उत्तम दर्जाचे अल्युमिनियम पुरवण्यासाठी करारही झाला होता. ताहीरनी दोन कंपन्यांशी निर्यातीसाठीही करार केले होते. मलेशियाहून निर्यातीसाठी अर्याश ट्रेडिंग कंपनी आणि ग्रिफिन यांच्या Gulf Technical Industries बरोबर दुबईला माल उतरवून घेण्यासाठी. गंमत म्हणजे ग्रिफिन यांनी आपल्याला यातले कांहींच माहीत नव्हते असे सांगितले होते!

डिसेंबर २००१ मध्ये ताहीरनी मलेशियाचे तत्कालीन उपपंतप्रधान असलेले अब्दुल्ला बडावी यांच्या कमाल अबदुल्ला या मुलाला भागीदार म्हणून घेऊन SCOMI Precision Engineering (SCOPE) ही कंपनी स्थापली. ताहीरनी पूर्वी कहूताला निर्वातीकरणासाठी लागणारे पंप पुरविणार्‍या कंपनीच्या निर्यातविभागाचे भूतपूर्व व्यवस्थापक फ्रेड टिनर यांचे सुपुत्र अर्स टिनर या स्विस तंत्रज्ञाला सल्लागार म्हणून नेमले. त्याने लागणारी सारी यंत्रसामुग्री ठिकठिकाणांहून आणून बसविली.

अर्स टिनरनी आपल्याबरोबर अल्युमिनियमच्या घटकभागांची ड्रॉइंग्जही आणली पण ते ती कुणालाही देत नसत. खरे तर ते अण्वस्त्रनिर्मितीत व इतरही वापरता येतील असे दुहेरी वापराचे घटकभाग वनवत होते पण याची कल्पना कारखान्यातील लोकांना, कमाल अब्दुल्लाला वा क्वाला लुंपूरमधील उच्चभ्रू समाजातील लोकांनाही नव्हती. मलेशियासारख्या परमाणूविज्ञानापासून दूर असलेल्या देशात उत्पादन, कारखाना चालवणारे होते स्विस अभियंते, कच्चा माल येत होता जर्मन व स्विस कंपन्यांकडून आणि पाकिस्तानी नांवांचा मागमूसही नाहीं! त्यामुळे ही सुविधा गुप्तहेरसंघटनांना अदृश्यच होती.

ताहीर या कंपनीचे अध्यक्षपद भूषवीत होते. त्यांनी अगदी वेळेवर दुबई सोडले होते. २००२च्या ऑक्टोबरमध्ये ब्रिटिश कोर्टांनी त्यांच्या इंग्लंडमधील भागीदार अबू बक्र सिद्दीकींवर निर्यातीवरील प्रतिबंध डावलून अण्वस्त्रनिर्मितीसंबंधित सामुग्री पाकिस्तानला पाठविल्याबद्दल २० महिन्यांची 'निलंबित/स्थगित' कैद व ६००० पौंड दंडाची शिक्षा दिली. पण नंतर CIA प्रमाणेच ब्रिटिश संघटनेनेही सरकारला या उद्योगगटाला नजरेखाली ठेऊन काम करू दिल्यास जास्त सविस्तर माहिती मिळेल व त्यामुळे पाकिस्तानच्या या धंद्याची पाळेमुळे खणून टाकता येतील म्हणून कांहींही थेट कारवाई न करण्याचा सल्ला दिला. हा निर्णय ब्रिटनचे पंतप्रधान ब्लेअरना सोयीचा होता कारण त्यांना पाकिस्तान व त्यांचे अण्वस्त्रप्रसाराच्या कारवायांपेक्षा इराकमधील आगामी युद्धाबाबत व युद्धनीतीबद्दल बुश-४३ यांच्याबरोबरच्या चर्चेत जास्त रस होता. या बैठकीनंतर ब्लेअरनी "आता नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीं तर जगाला असलेल्या या धमकीला आणि धोक्याला सामोरे जाऊन तिला वेळीच थोपविले पाहिजे" असे विधान केले. नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांचा नाश करणे हाच सद्दाम हुसेनला पदच्युत करण्यामागील हेतू होता. पण ब्रिटिश व अमेरिकन गुप्तहेरसंघटनांकडून "अण्वस्त्रप्रसाराचे टायफॉउड मेरी" या टोपणनावाने उल्लेखिले जाणार्‍या खानसाहेबांच्या कारवायांना "केवळ पार्श्वभूमीवरील सहभाग" असे पंतप्रधानांकडून संबोधण्यात आले. 'व्हाईट हाऊस'च्या खास कार्यकारी गटाने पाकिस्तान अण्वस्त्रनिर्मितीबद्दलचे तंत्रज्ञान इतर राष्ट्रांना विकत असल्याचे घोषित केल्यामुळे प्रकाशझोतात आलेले खानसाहेब पाच वर्षें उलटली तरी आपली कुकर्मे करतच होते! आणि त्यांच्यावरील कारवाईतील प्रत्येक विलंबामुळे पाकिस्तान नवनवे सौदे करत होता.

पाकिस्तानकडे दुर्लक्ष करून इराकवर लक्ष केंद्रित करण्याचे समर्थन करतांना ब्लेअर म्हणाले कीं "९/११ नंतर कारवाई करण्याच्या मूलतत्वांत बदल करणे आवश्यक आहे. इराण, उत्तर कोरिया, लिबिया व खानसाहेबांचा गट या समस्या आहेतच, पण सुरुवात इराकपासून करणे आवश्यक आहे". तोवर अनेक वर्षांपासून सद्दाम हुसेन यांनी नरसंहारक्षम शस्त्रास्त्रनिर्मितीच्या इराकच्या कारवायांबद्दलच्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठरावांना धुडकावले होते व IAEA च्या निरीक्षणाला सतत आडकाठी आणून त्यांना हताश केले होते. त्यामुळे इराकवर कारवाई करून सार्‍या जगाला एक तर्‍हेचा संदेश द्यायचा होता कीं त्यांना आता आंतरराष्ट्रीय जबाबदार्‍या पार पाडव्याच लागतील व त्यामुळे दहशतवाद्यांना असली शस्त्रें मिळणार नाहींत. पण पाकिस्तानकडे काणाडोळा कां याचा उल्लेखही त्यांच्या निवेदनात नव्हता!

मुख्य विक्रेत्याला मोकळे सोडून त्याच्या गिर्‍हाइकाला मारण्याचा हा न्याय अजब होता! पाकिस्तानने दहशतवादी आणि अण्वस्त्रे एकत्र आणली होती आणि परिणामतः खानसाहेबांचे सहकारी/शास्त्रज्ञ बिन लादेनना राजरोसपणे भेटत होते! आणि तरीही सद्दाम यांच्यावर नेम धरला जात होता व नरसंहारक्षम शस्त्रास्त्रें नष्ट करण्यासाठी शुभारंभ करायचा होता इराकपासून!

जुलै २००२ मध्ये इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री जॅक स्ट्रॉ म्हणाले होते कीं सद्दाम हुसेन आपल्या शेजारी राष्ट्रांना धमक्या देत नव्हत व त्यांची अण्वस्त्रनिर्मितीक्षमता लिबिया, इराण व उत्तर कोरियापेक्षा निश्चितच कमी होती. स्ट्राँच्यामतें इराकवरील चर्चा पाश्चात्य राष्ट्रांची अण्वस्त्रप्रसारविरोधाची क्षमता कमी करत होती. त्याच महिन्यात JICमध्ये[११] खानसाहेबांबद्दल पुन्हा चर्चा झाली व निष्कर्ष हा निघाला कीं पाकिस्तान केवळ युरेनियमच्या अतिशुद्धीकरणाचे तंत्रज्ञानच विकत नसून अणूबाँबच्या संरचना (व कदाचित् अणूबाँबही) विकत आहे! म्हणजे एकादी खासगी कंपनी एकाद्या गिर्‍हाइकाला युरेनियमच्या अतिशुद्धीकरणाच्या सर्व सुविधा/सोयी देण्याचे ही पहिलेच उदाहरण होते[१३]. आणि ही 'खासगी कंपनी' किंवा गिर्‍हाईक इराक नव्हते. खानसाहेबांची चांडाळचौकडी नको ती कारवाई त्याचवेळी करून जगाचे लक्ष इराककडून दुसरीकडे वेधून इराकविरोधी मोहीमेत अडचण आणणार नाहीं अशी बुश-४३ व ब्लेअर यांना आशा होती! पण ऑगस्ट २००२ मध्ये NCRI[१४] या इराणी हद्दपार गटाने वॉशिंग्टनच्या विलार्ड हॉटेलमध्ये बोलावलेल्या एका खास पत्रकार परिषदेत त्यांचे प्रवक्ते अलीरेझा जाफरजादे यांनी इराण तेहरानच्या दक्षिणेस असलेल्या वाळवंटातील अराकला एक जडजलाची[१५] व नातांझला एक युरेनियम अतिशुद्धीकरणाची अशा दोन गुप्त परमाणू सुविधा उभारत होते असे उघड केले. म्हणजे आपल्या खर्‍या लक्ष्यावरून नजर बाजूला करण्याच्या स्ट्राँच्या ताकिदीनंतर एकच महिन्यात पाकिस्तानचे आणखी एक गिर्‍हाईक जगापुढे आले.

परमाणूसुविधांची जागा इराणच्या नकाशावर जाफरजादे दाखवत असताना ते नीट पहाण्यासाठी जमलेल्या छायाचित्रकारांनी आणि वार्ताहारांनी एकच रेटारेटी केली. जगाला इराणचे बूशहर येथील आधी जर्मनीच्या मदतीने व नंतर रशियाच्या मदतीने चालणारे मुलकी अणुविद्युतकेंद्र सोडल्यास इतर कुठल्या आण्विक महत्वाकांक्षा असल्याचे जगाला माहीत नव्हते. या दोन नव्या प्रकल्पांची बातमी चिंताजनक होती पण जाफरजादेंचा इराणकडे खूप प्रगत अशी युरेनियम अतिशुद्धीकरणाची सुविधा असल्याचा आरोप जास्त विस्मयकारक होता. अशी सुविधा ते फक्त पाकिस्तानच्या मदतीनेच उभी करू शकले असणार हे अण्वस्त्राबद्दल माहिती असणार्‍या कुणालाही कळले असते.इराणचे शास्त्रज्ञ खूपच जास्त प्रगत अशा अण्वस्त्रनिर्मितीक्षम युरेनियम अतिशुद्धीकरणाच्या प्रकल्पात गुंतले असले तरी त्याने IAEA चे लक्ष त्यांच्या प्लुटोनियम प्रकल्पाभोवतीच गुरफटून ठेऊन त्यांना या प्रकल्पाचा पत्ता लागू दिला नव्हता!

८ मीटर खोल अशा तळघरात व अडीच मीटर जाडीच्या काँक्रीटच्या भिंतींनी सुरक्षित अशा दोन मोठ्या दालनांत व वाळवंट विनाश प्रकल्प या बुरख्याखाली चालविला जाणारा हा प्रकल्प आता इराणला आणखी कांहीं वर्षांत अण्वस्त्रचांचणीच्या टप्प्यापर्यंत आणणार होता. इराणचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खतामी हे स्वतः या प्रकल्पावर देखरेख करत होते तर इराणचे त्यावेळचे पंतप्रधान मुसावी रोजची कामे पहात होते. सेंट्रीफ्यूजेसचे तज्ञ होते इराणच्या त्यावेळच्या संरक्षण उद्योग संघटनेचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. मोहामेदी. या पत्रकार परिषदेनंतर सर्व वार्ताहार "पाश्चात्य राष्ट्रांना विरोध करण्याची शपथ घेतलेला इराण अणूबाँब बनविणार" असे मथळे जगभर देण्याच्या कामाला लागले.

बुश-४३ आणि ब्लेअर यांच्या दृष्टीने ही बातमी फारच अवेळी फुटली होती. इराणच्या NCRIमुळे उद्भवलेला धोका सद्दाम यांच्या धोक्यापेक्षा जास्त गंभीर असल्याबद्दल त्याच दिवशी विचारणा केली असता परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्याने ती उडवून लावली. उलट इराणच्या NCRI ची लष्करी फळी मुजाहिदीन-ए-खल्क (MEK) परराष्ट्रमंत्रालयाच्या दहशतवाद्यांच्या यादीत असून तिचे सद्दाम यांच्याशी संबंध आहेत असे सांगितले.
पाठोपाठ इंटरनेटवरील ब्लॉग्जवर जाफरजादेच्या विरोधात लेख यायला सुरुवात झाली. इराण १९७९ साली सोडल्यावर ते कसे इराकी कुर्ड व अरब मार्श जमातीच्या १९९१च्या पहिल्या आखाती युद्धानंतरच्या शिरकाणात सामील असलेल्या MEK ला जाऊन मिळाले, नरसंहारक्षम शस्त्रास्त्रें संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांपासून लपवून ठेवण्यात त्यांनी इराकी गुप्तहेरसंघटनांना कशी मदत केली, एकदा जाफरजादे आत्मघाती बाँबर बनायला कसे स्वतःहून तयार झाले होते व त्यांनी इराकमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणकेंद्रात कसे प्रशिक्षण घेतले होते वगैरे बातम्या लागलीच ब्लॉग्जवर दिसू लागल्या. लागलीच अमेरिकेत NCRI बंदी आली, पण ग्रीन कार्डधारक जाफरजादे अमेरिकेत राहिले व इराणबद्दलच्या बातम्या देण्यासाठी फॉक्स न्यूजमध्ये काम करत राहिले.

पण इराणच्या अण्वस्त्रनिर्मितीप्रकल्पाबद्दलची बातमी जाफरजादेंनी फोडायच्या आधी दहा वर्षांपासून ती पाश्चात्यांना माहीत होती पण ते ती गुप्त ठेवत होते हे जाफरजादेंना माहीत नव्हते! ती बाहेर पडल्यानंतर नरसंहारक्षम शस्त्रास्त्रसज्ज इराकवर आधीच हल्ला करायच्या युक्तिवादाच्या ठिकर्‍या उडाल्या. पाकिस्तानने इराणबरोबर अण्वस्त्रनिर्मितीबद्दलचा करार १९८७ सालापासून केला केला होता, कांहीं इराणी शास्त्रज्ञ रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे ब्रि.मोहम्मद एस्लामी यांची खानसाहेब, ताहीर व फरूक यांच्याव्बरोबरची दुबईतील एका हॉटेलमधली भेट, एस्लामींची कालबाह्य P-l सेंट्रीफ्यूजेससाठी व खानसाहेबांच्या मेबुज व लर्च या युरोपस्थित मित्रांकडूनच्या घटकभागासाठी ३० लक्ष डॉलर्स देण्याबद्दलची मान्यता यासारखी संपूर्ण माहिती CIA ला चांगली माहीत होती. त्याच वर्षीं AEOI[१६]चे संचालक रेजा अम्रोल्लाही यांनी PAECचे प्रमुख मुनीर खान यांच्याबरोबर ते दोघेही व्हिएन्नाला IAEA च्या बैठकीला गेले असतांना सहा इराणी शास्त्रज्ञांना PINSTECH[१६] येथे प्रशिक्षण देण्यासाठी करार केला. त्यानंतर लगेच एक नमुन्यादाखल सेंट्रीफ्यूज व २००० आणखी सेंट्रीफ्यूजेससाठीचे घटकभाग तेहरानला पाठविण्यात आले होते. पण त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये अद्याप युद्ध चालूच होते व ज.बेग यांनी १९९० साली अमेरिकन्सना त्यांच्या इराणबरोबरच्या या कराराबद्दल बढाई मारली असली व पुढच्याच वर्षीं तेहरानला अण्वस्त्रांची संरचना विकण्यासाठी ते पुन्हा गेले असले तरी या घटनेच्याविरुद्ध बोलायची सोयच नव्हती.

ब्रिटिश व अमेरिकन गुप्तहेरसंघटनांना नेहमीच संशय होता कीं पाकिस्तानने P-l सेंट्रीफ्यूजेसच्या विक्रीनंतर रिव्होल्यूशनरी गार्ड्सना अण्वस्त्रांची संरचनासुद्धा विकली होती. पण शेवटी १९९० साली इस्रायलच्या IDF [१७] या गुप्तहेरसंघटनेच्या 'यूनिट-८२००'ने इराणच्या बिनतारी संदेशांत घुसून त्यांच्या पाकिस्तानी सौद्याबद्दलचे बोलणे ऐकले व याबद्दलचे भांडे फोडले. १९९५ साली इस्रायलच्या गुप्तहेरसंघटनेचे प्रमुख झालेले व नंतर IDFचेही प्रमुख झालेले ज.मोशे यालोन यांनी अमेरिकनांसमोर घसा फोडून इराण-पाकिस्तान संबंधांकडे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न वाया गेला होता पण त्यांना युरोपमध्ये जास्त यश आले. एकदा जर्मनीत जर्मन परराष्ट्रमंत्री त्यांना म्हणाले होते कीं त्यांना इराणच्या अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रमाची माहिती होती आणि त्यांनी इराण अण्वस्त्रसज्ज असल्याचा स्वीकार केला होता व युरोपियन राष्ट्रांनी त्याविरुद्ध कांहीं न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. पाश्चात्य राष्ट्रांच्या मौनाने वैतागलेल्या 'मोसाद'ने मग ती बातमी मुद्दाम NCRIला फोडली व त्यांनी ती जाफरजादेंना दिली होती. त्यांना वाटले कीं ती बातमी इराणच्या त्यांच्या हस्तकाकडून मिळालेली आहे व त्यावरून त्यांनी ती बातमी सार्‍या जगापुढे १४ ऑगस्ट २००२रोजी 'विलार्ड हॉटेल'मधील पत्रकार परिषदेत फोडली.

एकदा फुटल्यावर ही बातमी वार्‍यासारखी पसरली. 'नातांझ'ची व तिथल्या बांधकामाची दोन ३०,००० स्क्वे.मी.ची चौकोनी भोके दाखविणारी चित्रे येऊ लागली. IAEA च्या एका भूतपूर्व शस्त्रास्त्र निरीक्षकाने केलेल्या हिशेबानुसार दोन्ही दालनात एकूण ५०,००० सेंट्रीफ्यूजेस बसविणे शक्य होते. युरेनियम अतिशुद्धीकरण SWU[१८] या परिमाणात मोजले जाते व प्रत्येक सेंट्रीफ्यूजच्या मालिकेमध्ये त्याच्या शुद्धीकरणात किती वृद्धी होते हे त्यावरून कळते. खानसाहेबांच्या सेंट्रीफ्यूजेसमध्ये दर वर्षी ५ SWU इतके शुद्धीकरण होत असे. म्हणजे नातांझमधील ५०,००० सेंट्रीफ्यूजेसमधून दर वर्षी १५०,००० SWU इतके शुद्धीकरण होऊन ७५ अणूबाँबना पुरेसे अतिशुद्धीकृत युरेनियम बनू शकणार होते. हे चित्र फारच भयंकर होते व इतकी सविस्तर माहिती बाहेर पाल्यावर इराणने IAEAला मान्य केले कीं त्यांनी युरेनियम अतिशुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेतला होता पण तो केवळ विद्युतनिर्मितीसाठी होता. मग IAEAचे प्रमुख महंमद एलबारादेई यांनी त्या जागेच्या निरीक्षणाची मागणी केली व इराणला ती मान्य करावीच लागली.

इराणला अण्वस्त्रनिर्मितीची साधने पाकिस्तानने दिली होती पण पाकिस्तानने इराकला संपूर्णपणे बनविलेला अणूबाँब विकायची तयारी दर्शविली होती. पण १२ सप्टेंबरला बुश-४३नी संयुक्त राष्ट्र संघटनेला संबोधताना केलेल्या २६ मिनिटांच्या भाषणात इराकमधील नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या गंभीर व वाढत्या धोक्याबद्दल बोलतांना सर्व श्रोत्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाबद्दलची पत्रके वाटली त्यात अमेरिकेने आपली आपणहून हल्ला करण्याचे धोरण जाहीर केले. "आम्ही आमच्या शत्रूला पहिला वार करू देऊ इच्छित नाहीं, अमेरिकेचे लष्कर शत्रूची नरसंहारक्षम शस्त्रास्त्रे त्यांचा आमच्याविरुद्ध वापर होण्याआधीच शोधतील व नष्ट करतील" हे धोरण त्यांनी जाहीर केले. इराकवर हल्ला होणार हे लक्षात आले होते पण अमेरिकेने सर्व नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांवर लक्ष केंद्रित करायला हवे होते व धोक्याच्या तीव्रतेनुसार त्यांचा विनाश करयला हवा होता. "आम्ही जगातील सर्वात जास्त विघातक राज्यकर्त्यांना व दहशतवाद्यांना जगातील सर्वात जास्त नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांनी आमच्या राष्ट्रावर तसेच आमच्या मित्रराष्ट्रांवर हल्ला करू देणार नाहीं" असे बुश-४३ यांनी जाहीर अतर केले पण पाकिस्तानचा अर्थातच उल्लेख केला नाहीं!

केवळ इराकवरील हल्ल्याच्या समर्थनार्थ इतर त्याहूनही मोठे धोके दडविणे भाग होते व त्यानुसार उत्तर कोरिया (पाकिस्तानच्या मदतीने) मोठ्या प्रमाणावर युरेनियमचे अतिशुद्धीकरण करत असल्याची बातमी दडपली गेली. पाकिस्तानने जरी अण्वस्त्र तंत्रज्ञानाच्या विक्रीचे धंदे थांबण्याचे वचन दिले असले तरी त्यांचे खानसाहेबांसह इतर शास्त्रज्ञ प्योंग्यांगला जातच होते व उत्तर कोरियाला अमेरिकेच्या उपग्रहांपासून लपवून हे धंदे कसे करायचे याचेही 'ज्ञान' देत होते. CIA चा उत्तर कोरियाबद्दलचा अहवाल दडपणे भाग होते. हा अहवाल आधीच "Top Secret sensitive compartmentalized information" म्हणून ठरविलेला असल्यामुळे तसे करणे सोपे होते व तसे केले गेलेही. त्यात उपपरराष्ट्रमंत्री जॉन बोल्टन या नवपुराणमतवाद्यांचा मोठा सहभाग होता! ACDAचे नॉर्म वुल्फ हे क्लिंटन यांच्या कारकीर्दीत वारंवार प्योंग्यांगला जात असत. बोल्टन यांच्या आगमनाआधी पाकिस्तानच्या उत्तर कोरियाच्या युरेनियम अतिशुद्धीकरणप्रकल्पाबद्दलची गुप्त माहिती त्यांच्या टेबलावर सातत्याने तीन वर्षें येत असे पण २००२ नंतर मात्र त्यांच्या टेबलवर माहिती अंशतःच येत असे. त्यामुळे अशा पुराव्यांवरील त्यांचा विश्वास कमी-कमी होत गेला. त्यांच्या व संपूर्न माहितीमध्ये खूपच गाळणी बसविली होती. बोल्टन, त्यांचे मदतनीस व अण्वस्त्रप्रसारबंदीच्या अधिकार्‍यांमधील संबंध शतृत्वाचे झाले होते.
बोल्टन यांची मजल अमेरिकेच्या अण्वस्त्रप्रसारबंदीच्या धोरणाच्या आड येणार्‍या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींनाही कमी लेखण्यापर्यंत गेली. त्यात IAEAचे मुस्लिम पुढारी महमद एलबारादेईसुद्धा होते. IAEA ही संघटना वाटाघाटी करून तंटे संपविण्याचे धोरण चालवीत असे. एलबारादेईंना IAEAचे संचालकपद तिसर्‍यांदा हवे होते. बुश-४३ यांच्या सरकारने त्यांचा फोन 'टॅप' करविला होता व त्यांचे संभाषण त्यांच्याच विरुद्ध वापरायचा बेतही त्यांनी केला होता[१९].

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या काँडोलिझाबाईंनी अज्ञानाचा बुरखा वापरला. बुश-४३ यांच्या टेबलावर उत्तर कोरियाबद्दलचा अहवाल पोचला त्यानंतर कांहीं आठवड्यातच त्यांनी प्रतिनिधींना लिहिलेल्या पत्रात असा सल्ला दिला कीं प्योंग्यांगने युरेनियमचे अतिशुद्धीकरण सुरू करून "Agreed Framework"मधील तरतुदींचा भंग केल्याने त्या करारान्वये मिळणारा अमेरिकेच्या मदतीचा हक्क गमावला असला तरी बुश-४३ यांचे सरकार उत्तर कोरियाला जाडसर अशुद्ध तेलाचा व परमाणू तंत्रज्ञानाचा पुरवठा चालूच ठेवील. कांहीं दिवसांनंतर अमेरिकेच्या उपग्रहांनी अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाविरुद्धच्या युद्धात वापरण्यासाठी दिलेल्या एका C-130 मालवाहू विमानाचा ते उत्तर कोरियाला जात असताना मागोवा घेतला व ते परतताना त्या विमानाने प्रक्षेपणास्त्रांचे घटकभाग उचलून पाकिस्तानला आणलेले पाहिले.

उत्तर कोरियाच्याबाबतीतले एक भूतपूर्व गुप्तहेरतज्ञ म्हणाले कीं काँडोलिझाबाई जरी बेपर्वा दिसत असल्या तरी बोल्टनसारखे अण्वस्त्रप्रसारविरोधी ज्येष्ठ तज्ञसुद्धा उत्तर कोरियाच्या योजनांबद्दल बोलायला इतके अनुत्सुक होते कीं अमेरिकेचे धोरण काय आहे हेच कळणे अवघड झाले होते. बुश-४३ व बोल्टन क्लिंटननी प्योंग्यांगशी केलेल्या समेटाच्या प्रयत्नांबद्दल अगदी क्षुद्रपणे बोलायचे. या नवपुराणमतवाद्यांना कुणाशी बोलणे करणे एक 'अनैतिक' गोष्ट वाटत असे! म्हणूनच किम जॉंग इल यांच्याबरोबर वरवर बोलणी चालू असतानासुद्धा बुश-४३ यांनी त्यांचे वर्णन ज्या देशात खूपसे लोक नरकसम दु:स्वप्नात रहातात असा एक जुलमी हुकूमशहा असे केले. लागलीच सरकारी प्रवक्त्याने "अशा मनुष्यजातीतील मळ असलेल्या व लोकांचे रक्त पिणार्‍या नेत्याला वाटाघाटीत भाग घ्यायचा अधिकार नाहीं" असे ताशेरे ओढले. परिणामतः या वाटाघाटीतून कांहींच निषन्न झाले नाहीं!

ऑक्टोबर२००२ च्या सुरुवातीला इराकवरील लष्करी मोहिमेच्या प्रस्तावाला पसंती देण्याच्या ठरावावर प्रतिनिधीगृहात मतदान होण्याआधी 'व्हाईट हाऊस'ने एक शिष्टमंडळ युरेनियम अतिशुद्धीकरणावरून प्योंग्यांगला वठणीवर आणण्यासाठी पाठविले. शिष्टमंडळाचे नेते उपपरराष्ट्रमंत्री जेम्स केली यांना अगदी स्पष्ट अशा सूचना होत्या कीं उत्तर कोरियातील युरेनियम अतिशुद्धीकरणाचा प्रकल्प आधी बंद करायला भाग पाडायचे व मगच वाटाघाटी सुरू करायच्या. पहिल्याच रात्रभर चाललेल्या बैठकीत केलींनी ज्येष्ठ उपपरराष्ट्रमंत्री कांग सुक जू यांना पाकिस्तानच्या प्योंग्यांग प्रकल्पातील सहभागाबद्दल पुरावे दाखवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले[२०]. उत्तर कोरियन्सना अमेरिकेकडे इतके पुरावे असतील अशी कल्पना नसल्यामुळे त्यांना धक्काच बसला. पण प्रतिहल्ला करत कांग म्हणाले कीं अमेरिकन्सनी उल्लेख केलेल्या शस्त्रांहून जास्त संहारक अस्त्रे उत्तर कोरियाकडे आहेत. मग वाटाघाटींचा ओघ थांबला!

पण इराकची मोहीम संपल्यावर अमेरिका कदाचित् प्योंग्यांगची मोहीम हातात घेईल या भीतीने किम यांनी कांगना दुसर्‍या दिवशी एक नवा आश्चर्यकारक प्रस्ताव घेऊन पाठविले. त्यांनी उत्तर कोरियावर स्वारी न करण्याच्या अटीवर युरेनियम अतिशुद्धीकरणाची योजना गुंडाळणे मान्य केले. हा प्रस्ताव म्हणजे उत्तर कोरियाजवळची युरेनियम अतिशुद्धीकरणाची सामुग्री पाकिस्तानने पुरविली होती याची कबूली देण्यासारखेच होते! पण या प्रस्तावावर वाटाघाटी करायला नकार देत केली वॉशिंग्टनला परतले. पण बुश-४३ यांनी प्रतिनिधीगृहात इराकवरील मोहिमेला मान्यतेचे मतदान होईपर्यंत ही बातमी पाच दिवस दडपून ठेवली. पण नंतर ही बातमी बाहेर आल्यावर आपल्याकडून मुद्दाम अपुरी माहिती देऊन चुकीच्या मोहिमेवर पसंती घेतली या भावनेने बरेच प्रतिनिधी रागावले. मग काँडोलिझाबाईंनी सद्दाम हुसेन हे "परंतु या सम हा" अशी व्यक्ती असून मुद्दाम माहिती दडवून ठेवल्याच्या आरोपाचा इन्कार केला. पण काँडोलिझाबाईंचे निवेदन झाले त्याच वेळी बुश-४३ यांनी प्योंग्यांगचा प्रस्ताव औपचारिकपणे फेटाळला. मग पुढच्याच महिन्याल किम यांनी बुश-४३ना पत्र पाठवून या वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. मग किम यांनी लांबच्या टप्प्याच्या प्रक्षेपणास्त्रांच्या चांचण्या पुन्हा सुरू करण्याची व शस्त्रास्त्रांच्या विक्रीत वाढ करण्याची घोषणा केली. २००२च्या डिसेंबरमध्ये उत्तर कोरियाने घोषणा केली कीं ते याँगब्यॉन-कुन येथील गेली आठ वर्षें बंद असलेली प्लुटोनियम अणुभट्टी पुन्हा सुरू करून वापरून झालेल्या (irradiated) इंधनाच्या ८००० कांब्यांवर पुनःप्रक्रिया करायला सुरुवात करण्याची घोषणा केली. यातून बर्‍याच अणूबाँबना पुरेसे विघटनशील मूलद्रव्य मिळणार होते. मग जानेवारी २००३ मध्ये उत्तर कोरिया अण्वस्त्रप्रसारबंदीच्या करारातून बाहेर पडला. शेवटी यातून सरकारला मिळाले काय? तर इराकवरील आतापर्यंत पत्ता न लागलेल्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांविरुद्धच्या मोहिमेला मान्यता!

ज.मुशर्रफ यांनी प्योंग्यांग प्रकल्पात पाकिस्तानचा हात असल्याचा इन्कार करत न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले कीं अण्वस्त्रांच्या क्षेत्रात उत्तर कोरियाबरोबर पाकिस्तानचे कुठल्याही तर्‍हेचे सहकार्य नाहीं. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉवेल यांनी जाहीरपणे मुशर्रफ यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत पुढे ताकीद दिली कीं पाकिस्तान व उत्तर कोरियामधील संपर्क अनुचित, अयोग्य व गंभीर परिणाम देणारा ठरेल व मुशर्रफना हे माहीत आहे. पूर्वीच्या झिया-शूल्त्झ यांच्यातील १९८०च्या दशकातील मूर्खपणाच्या संबंधांची ही पुनरावृत्तीहोत होती. त्यावेळीही झिया अशा आरोपांचा इन्कार करीत व CIA कडे ते खोटे बोलत असल्याचा पुरेपूर पुरावा असूनही शूल्त्झ त्यांचे बोलणे औपचारिक सोयीसाठी मान्य करत[२१].

१९८०च्या दशकातली आणखी एक अर्धवट राहिलेली रिचर्ड बार्लोंची बाब पुन्हा पुढे आली. १९९७ साली तीन inspector generals नी पूर्ण केलेल्या चौकश्यांभोवतीचे वादंगानंतर (यात परराष्ट्रमंत्रालयाचे inspector general शेरमन फंक यांनी पूर्णपणे बार्लोंची बाजू घेतली होती व पेंटॅगॉनच्या deputy inspector generalवर सत्याचा विपर्याच केल्याचा आरोप केला होता) बार्लोंनी आणखी एका उच्चस्तरीय चौकशीत विजय मिळविला होता. ही चौकशी प्रतित्निधीगृहाचा महालेखा विभाग असलेल्या 'शासकीय जबाबदारी कार्यालया'ने केली होती व बार्लोंनी सिनेटची लष्कर समिती, खास गुप्तहेरसंघटना समिती व शासकीय जबाबदारी कार्यालय यांना पटवून दिले कीं पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेबद्दलचा पुरावा लपवून ठेवण्याचा कट पेंटॅगॉनने केला होता. त्यानुसार 'शासकीय जबाबदारी कार्यालया'ने बार्लोंना त्यांच्या नोकरीबद्दल, लग्न मोडायला कारणीभूत झाल्याबद्दल व व्यावसायिक अब्रूनुकसानीबद्दल नुकसानभरपाई देण्याचा निर्णय दिला.

याबद्दल क्लिंटनना सांगण्यात आले व त्यांनी याबाबतचा ठराव सिनेटने पास केला कीं ते ताबडतोब सही करतील. पण सिनेटमेध्ये अनेक समर्थक असूनही कांहीं कार्यपद्धतीतील अडचणींमुळे हे बिल सिनेटला पास करता येणे शक्य नव्हते.

मग बार्लोंच्या नुकसानभरपाईचा दावा Court of Federal Claims कडे पाठविण्यात आला. आता या निर्णयाला अनेक वर्षें लागतील.
पण पुरावे जमा करणे गोपनियतेच्या अटींमुळे अवघड होते व बार्लोंच्या आधीच्या तीन साहेबांनी जरी शपथेवर दिलेली affidavits सुद्धा गोपनियतेच्याच मुद्द्यावर कोर्टापुढे आणता आली नाहींत व शेवटी जून २००२ मध्ये "पुराव्याअभावी" बार्लो केस हरले.

उरले-सुरले पैसे वापरून बार्लोंनी एक जुना ट्रेलर विकत घेतला व ते 'मोंटाना' नावाच्या एका दूरच्या राज्यात त्या ट्रेलरमधे राहू लागले. आज त्यांचा बाहेरील जगाशी संपर्क आहे त्यांच्या एका उसनवारीने घेतलेल्या संगणकाद्वारा. सोबतीला त्यांचे कुत्रे आहेत. बार्लोंची केस जवळून अभ्यासलेल्या रॉबर्ट गालुच्चीना याचे फार दुःख झाले व त्यांना खूप दोषीही वाटले. त्यांनी आणि बार्लोंनी पाकिस्तानबद्दल सत्यकथनाचा प्रयत्न केला होता. त्यापैकी बार्लोंची सर्वनाश झाला पण गालुच्ची कसेबसे वाचले होते.

वॉशिंग्टनमध्ये बुश-४३ यांच्या मनात इराकशिवाय दुसरे कांहींही नव्हते. जानेवारी २००३ सालच्या त्यांच्या State of the Union च्या भाषणात बुश-४३ म्हणाले होती कीं इराकचे हुकुमशहा सद्दाम हुसेननी अद्याप शस्त्रास्त्रे खाली ठेवलेली नाहींत, उलट ते अमेरिकेला फसवू पहात आहेत. त्यांनी सद्दामना धमकी दिली कीं वाटाघाटीचे प्रयत्न सुरू असले तरी जर त्यांनी शस्त्रे खाली ठेवली नाहींत तर अमेरिकन लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने अमेरिका व तिची मित्रराष्ट्रें सद्दामना निःशस्त्र करतीलच.

बुश-४३ यांनी इराकी धोक्याचा अतीशय महत्वाचा पुरावा सादर केला. भ्रितिश गुप्तहेरसंघटनेचा हवाला देऊन ते म्हणाले कीं सद्दाम हुसेनच्या हस्तकांनी नायजर या देशात अणूबाँबला लागणार्‍या विघटनशील मूलद्रव्यानिर्मितीसाठी कच्चामाल म्हणून यलोकेक विकत घेतला होता. या जॉन बोल्टन यांच्या कार्यालयात उगम पावलेल्या या बातमीचा प्रतिध्वनी सार्‍या जगात घुमला. दुर्दैवाने ती बातमी खोटी होती. अमेरिकेच्या 'गाबोन' या राष्ट्रातील राजदूत विल्सन उपराष्ट्राध्यक्ष चेनींच्या विनंतीनुसार नायजरला गेले होते व तिथून नुकतेच परतले होते. त्यांनी अगदी याच्या उलट अहवाल दिला. ते म्हणाले कीं ब्रिटनच्या MI6मध्ये उद्धृत केलेले सर्व कागदपत्र खोटे दस्तऐवज होते व त्यावर ज्यांच्या सह्या होत्या ते त्यावेळी त्या कार्यालयात कामही करत नव्हते.

हा अहवाल दिलेला असूनही बुश-४३ तेच आरोप करत होते यावरून ते खोटे बोलत असावेत असाच तर्क विल्सननी केला.विल्सननी मग जाहीर केले कीं बुश-४३ यांचे भाषण जाणूनबुजून प्रतिनिधीगृहाला व जनतेला फसविण्याचा प्रयत्न आहे. याला मरीन जनरल कार्लटन फुलफोर्ड यांनीही अनुमोदन दिले. विल्सननी 'वॉशिंग्टन पोस्ट'च्या स्तंभात सविस्तरपणे खरा वृत्तांत लिहिल्यावर त्यांच्या पत्नी वॅलरी प्लाम या CIA च्या हस्तक असल्याची गुप्त बातमी नवपुराणमतवादी स्तंभलेखकांकडून मुद्दाम उघडकीस आणली गेली. या स्तंभलेखकाला ही माहिती डिक चेनींच्या ज्येष्ठ सहकार्‍याकडून मिळाली असल्याची अफवा होती. अशा तर्‍हेने वॅलरी प्लामना आपल्या पतीच्या विरुद्ध असल्याचे दर्शविण्यात आले होते. बार्लोंनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीक्षमतेबद्दल खोटे बोलणार्‍या ज्येष्ठ पेंटॅगॉन अधिकार्‍यांबद्दलचा पुरावा उघडकीस आणल्यावर नवराबायकोत बखेडा निर्माण करण्याची अशीच चाल त्यांच्यात व त्यांच्या पत्नी सिंडी यांच्याबाबतीतही खेळण्यात आलेली होती व विल्सन-प्लाम यांच्या बाबतीतही पेंटॅगॉनमधीलच लोकांचा हात होता[२२].

पण बुश-४३ यांच्या State of the Union च्या भाषणात पाकिस्तानचा मात्र कुठेच उल्लेख नव्हता. पण एका बाजूला एलबारादेईंच्याविरुद्ध घाणेरड्या खेळी करणारे बुश-४३ जाहीर भाषणात मात्र म्हणाले होते कीं अमेरिका IAEA ला तिच्या इराकमधील अण्वस्त्रांसंबंधीचे साहित्य शोधण्यात व त्यावर नियंत्रण करण्यात पूर्णपणे समर्थन देत होती. अण्वस्त्रनिर्मितीच्या, प्रक्षेपणास्त्रांच्या व नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला प्रतिबंध करणार्‍या जागतिक करारांना मजबूती बनविण्याच्या कामात अमेरिका जगातील इतर राष्ट्रांबरोबरही कार्यरत होती. इराणमधील सरकारही बदलायची वेळ आली होती पण आधी इराकच्या हुकुमशहाला पदच्युत करणे जरूरीचे झाले होते. इतर राष्ट्रांप्रमाणे इराणच्या जनतेलाही आपले सरकार निवडण्याचा व आपले भविष्य ठरविण्याचा हक्क आहे व अमेरिका त्यांच्या स्वातंत्र्यात रहायच्या आशाआकांक्षांचे समर्थन करते असेही ते म्हणाले होते. उत्तर कोरियाचा पुसटसा उल्लेख करत ते म्हणाले होते कीं अण्वस्त्रनिर्मितीच्या महत्वाकांक्षा सोडल्यानंतरच त्या सरकारला जगाचा सन्मान मिळेल व त्यांच्या जनतेची प्रगती होईल.

५ फेब्रूवारी २००३ रोजी त्यांच्या हातात एक छोटीशी कुपी देऊन पॉवेलना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत पाठविण्यात आले. तिथे ती कुपी दाखवत ते म्हणाले होते कीं त्यांच्या हातात निर्विवाद व ज्याचा नकार करणे अशक्य होते पुरावा होता कीं इराक संयुक्त राष्ट्र संघाच्या शस्त्रास्त्र तपसणीकारांना फसवत होता व अशी शस्त्रास्त्रे बनवत होता-रासायनिकही-कीं ज्याच्या एका चिमूटभर उपयोगाने अख्ख्या शहराची जनता मारून टाकता येईल. पॉवेलनी इराक व अल कायदा यांच्यातील दुवे उघडकीस आणले व सांगितले कीं सद्दाम यांनी दहशतवाद्यांना ईशान्य इराकमध्ये आश्रयस्थान व तर्‍हेतर्‍हेच्या विषांबद्दल संकलित माहिती उपलब्ध करून दिली होती. या असंभव युतीबद्दल पुरावा कुठलाच नव्हता, पाकिस्तानी शास्त्रज्ञांच्या अल कायदाच्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रप्रकल्पातील सहभागाचा अल मास्रींच्या कागदपत्रात आढळलेल्या पुराव्याचा व इराकला केलेल्या १५० कोटी डॉलर्सच्या इरकला केलेल्या निर्यातीचाही उल्लेख नव्हता. या निर्यातीमुळेच सद्दाम यांचा शस्त्रास्त्रांचा प्रकल्प व्यवहार्य झाला होता.

हे सर्व चालू असताना वरवर दिसणार्‍या पृष्ठभागाखाली दोन नरसंहारक्षम शस्त्रास्त्रप्रकल्प खदखदत होते: एक होता उत्तर कोरिया व दुसरा इराण. खतामी या इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणने यझ्द या शहराजवळच्या युरेनियम खाणीतून खनिज काढायला व विजेसाठी युरेनियम शुद्धीकरणाला सुरुवात केली होती अशी घोषणाही केली होती.

'व्हाईट हाऊस'चे प्रवक्ते अरी फ्लायशर यांनी नातांज व अरक येथील सुविधा इराणच्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रे व प्रक्षेपणास्त्रें मिळविण्याच्या थेट खटपटींनी अमेरिकेने व्यक्त केलेली भीती खरी ठरविली आहे हे मान्य केले. एलबारादेईंचे क्षेत्रतपासाचे प्रयत्न चालू असताना दोन ज्येष्ठ अमेरिकन अधिकारी संयुक्त राष्ट्र संघातील इराणी अधिकार्‍यांना जिनीव्हा येथे भेटले. त्यातले एक होते बुश-४३ सरकारातील उच्चतम पदावरील मुस्लिम झालमय खालिझाद. हे नवपुराणमतवादी होते व इराणमधील सरकार बदलण्याच्या पक्षातले होते व त्यांचा अण्वस्त्रप्रसारबंदीवर विश्वास नव्हता. जन्माने पश्तून असलेले खालिजाद उत्तर अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ इथे जन्मलेले होते व वुल्फोवित्सबरोबर शिकले होते. पूर्वी त्यांनी कट्टर कम्युनिस्टविरोधक ब्रेझेन्स्कींच्याबरोबर काम केले होते रशियाबरोबरच्या अफगाणिस्तानयुद्धाला पाठिंबा दिला होता व ते अफगाणिस्तानच्या इराणबरोबरच्या वैराला पाठिंबा देत असत. त्यांनी इराण्यांना सांगितले कीं एक तर अण्वस्त्रनिर्मितीबाबतची पावले मागे घ्या किंवा सर्वनाशाला तयार व्हा. म्हणजे इराणच्याबाबतीत दोन मार्गाने प्रयत्न चालू होते. एक होता व्हिएन्नाहून चालविला जाणारा IAEA चा जुना कार्यक्रम तर दुसरा मार्ग होता ज्यांना वाटाघाटींचा कंटाळा आला होता अशांचा.

फेब्रूवारी २००३मध्ये शेवटी एलबारादेईंना नातांझमध्ये प्रवेश मिळाला. जाफारजादे यांनी त्यांना कुठली सुविधा त्यांनी पहावी याबद्दल टिप्स दिल्या. इराण्यांनी त्यांना नातांझची २००३ जूनला सुरू होऊ घातलेली अतिशुद्धीकरणाची 'नमुना सुविधा' (pilot plant) दाखविली. त्यांनी एकूण १००० मधील १००-एक सेंट्रीफ्यूजेसची केसिंग्ज तिथे उभारलेली पाहिली. ५००,००० सेंट्रीफ्यूजेसची सुविधा २००५ मध्ये सुरू व्हायचे होते. IAEA चे निरीक्षक ही सारी प्रगती पाहून थक्क झाले.

एलबारादेईंनी बरोबर ट्रेव्हर एड्वर्ड्स या ब्रिटिश धातुशास्त्रज्ञाला आणले होते.हाही १९७०च्या दशकात 'युरेंको'त काम करत असे. त्याचवेळी खानसाहेबही तिथे काम करत असत. त्यांनी सारी ड्रॉइंग्ज वगैरे पाहून सांगितले कीं इराणची सर्व सेंट्रीफ्यूजेस खानसाहेबांनी १९७५ साली चोरलेल्या CNOR च्या ड्रॉइंग्जवर आधारित होती. आता इराण्यांनी हे मोठे पाऊल कसे टाकले हे एड्वर्ड्सना समजले. सेंट्रीफ्यूजेसचा प्रत्येक तपशील, अगदी मिलीमीटरपर्यंत, घटकभागांचीही तंतोतंत तीच मोजमापे व तेच tolerances, सार्‍या कशा त्यांनी कॅपेनहर्स्ट व अल्मेलोला पाहिलेल्या सेंट्रीफ्यूजेसच्या प्रतिकृती होत्या!

मार्च २००३ च्या सुरुवातीला सारे जग इराकवर केल्या जाणार्‍या बाँबवर्षावांची वाट पहात असताना एका पॅलेस्टेनियन माणसाने एक निरोप देण्यासाठी MI6शी लंडनमध्ये वॉक्सॉल क्रॉस येथे संपर्क साधला. लिबियाच्या मुआम्मार गद्दाफींना त्यांच्या देशाच्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांबद्दल चर्चा करायची होती. हा निरोप अतर्क्यच होता कारण गद्दाफी आपल्या मुलाला-'सैफ अल-इस्लाम'ला-आपला खास दूत म्हणून पाठविणार होते. इराकवरील स्वारीची अमेरिकेची व तिच्या मित्रराष्ट्रांची तयारी पाहून व लिबियाचाही नंबर लागेल या भीतीने गद्दाफी त्यांच्या माहितीच्या प्रत्येक अरब नेत्याला फोन करत होते. सैफ गद्दाफींनी युद्धाच्या भीतीने, किंवा अमेरिकन दबावाने किंवा blackmailमुळे (blackmailला मराठीत चपखल प्रतिशब्द आहे काय?) त्यांना तिथे पाठविले होते याचा इन्कार केला. पण अनेक वर्षें सैतान, शत्रू समजल्या जाणार्‍या माणसांपुढे हा ३५ वर्षांचा तरुण त्या दिवशी बसला होता. १९७९ पासून सरकारपुरस्कृत दहशतवादाबद्दल दोषी धरले गेलेले, बर्लिनमधील डिस्कोवर बाँबहल्ला केल्याबद्दल दोषी समजले गेलेले, रेगन यांची हत्त्या करण्याच्या योजनांचे जनक, नंतर PanAm-१०३ विमान बाँबहल्ल्याने पाडण्याचा आरोप असलेले गद्दाफी त्यानंतर दोन संशयी लोकांना अमेरिकेकडे सुपूर्द करायला तयार झाल्याने व नंतर ब्लेअर व गद्दाफींच्या दरम्यान पत्रव्यवहारही झाला होता व त्यातून त्या दिवशीची ही बैठक शक्य झाली होती.

सैफ 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये शिकले होते व त्यांना मुस्लिम व ख्रिश्चन जगात सहजतेने ये-जा करण्याची संवय होती. त्यांनी इस्लामी राष्ट्रांत ओलीस धरलेल्या अनेक युरोपियन लोकांची त्यांच्या धर्मादाय प्रतिष्ठानातर्फे सुटका करविली होती. जेरुसलेम येथे इस्रायलशी केलेल्या वाटाघाटींतही त्यांनी आपल्या पित्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांचा आपल्या वडिलांच्या अण्वस्त्रांबद्दलच्या व्यवहारातही बराच सहभाग होता हे मात्र ब्रिटिशांना फारसे माहीत नव्हते. एकदा सैफ सूटकेसेस भरून रोख पैसे घेऊन युरेनियम अतिशुद्धीकरणाचे तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी इस्लामाबादलाही आले होते.

मध्यपूर्वेतील देशांच्या नेत्यांचे हृदयपरिवर्तन करून त्या देशांना सुधारण्याच्या प्रकल्पात पुढाकार घेऊन अमेरिका व इंग्लंडबरोबर काम करण्याची गद्दाफींची इच्छा होती हा निरोप सैफनी दिला. पण MI6 ने त्यांना सर्वप्रथम नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांबद्दल बोलायला सांगितले. सैफ त्याबद्दल स्पष्ट बोलत नव्हता. कारण विडिलांच्या मनात काय आहे व त्याबद्दल ते किती सांगू इच्छितात हे सैफना माहीत नव्हते. कर्नल गद्दाफींशी बोलणे होईपर्यंत ब्रिटिश सरकार कांहींही ठाम सांगू इच्छित नव्हते.

तीन दिवसांनंतर २० मार्च रोजी इराकविरुद्धची मोहीम सुरू झाली, इराकवर बाँबवर्षाव सुरू झाला व नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांचा शोधही सुरू झाला. त्यासाठी इंग्लंडहून ब्रिटिश अधिकारी नॉर्थोल्ट येथील विमानतळावरून लिबियाकडे निघाले. गद्दाफींनी त्यांचे त्रिपोलीत खास उभारलेल्या एका तंबूत स्वागत केले. नंतर ब्रिटिश लोकांना मुसाकुसा या लिबियाच्या गुप्तहेरसंघटनेच्या प्रमुखाबरोबर चर्चा करण्यास सांगण्यात आले. मुसाकुसा लंडनमध्ये सर्वांना कडक व तडजोड न करणारे मुत्सद्दी म्हणून माहीत होते. लिबियाच्या दूतावासाचे प्रमुख असताना त्यांना लिबियातून पळालेल्या लोकांचा खून करण्याबद्दल उघडपणे बोलल्याबद्दल हाकलून दिले गेले होते. फ्रान्समध्येही फ्रेंच पोलीस दहशतवादी कारवायांबद्दल त्यांच्याशी बोलू इच्छित होते.

ब्रिटिश गटाने मुसाकुसांच्या बरोबर वाटाघाटींना सुरुवात केली. त्यांनी मुसाकुसांना सांगितले कीं ब्रिटनशी कुठलाही राजनैतिक करार होण्यापूर्वी सर्वात आधी ते लिबियातल्या सर्व परमाणूकेद्रांच्या जागा पाहू इच्छित होते व त्यांच्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांशी निगडित सर्व शास्त्रज्ञांशी बोलू इच्छित होते. पण मुसाकुसांकडून कांहींही सविस्तर माहिती काढणे फारच अवघड प्रक्रिया होती व गद्दाफीही कांहींही माहिती द्यायला तयार नव्हते. मग ब्रिटिश गट परत आला व त्यांनी 'डाउनिंग स्ट्रीट'ला माहिती दिली कीं लिबियाला काय हवे आहे व त्याबदल्यात तो काय आपल्याला द्यायला तयार आहे याबद्दल सारे निर्णय झाले नसावेत असे ब्रिटिश गटाला वाटले.

इराकच्या आघाडीवर घडामोडी इतक्या झपाट्याने होत होत्या कीं लिबिया प्रकरणात इंग्लंडने घेतलेला पुढाकार अमेरिकेलाही मान्य होता. फक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना प्रत्येक टप्प्यावर माहिती देत रहायचेही ठरले. एप्रिलमध्ये जेंव्हां मित्रराष्ट्रांचे सैन्य Revolutionary Guard ना हुसकावून लावण्यासाठी बगदादच्या वेशीवर आल्या त्यावेळी MI6 चा लिबियासंबंधीच्या गटाचा एक ज्येष्ठ अधिकारी टेनेटना माहिती द्यायला वॉशिंग्टनला गेला. त्यांच्या बरोबर सर रिचर्ड डियरलव्ह MI6 चे प्रमुखही होते व त्यांनी सुचविले कीं लिबियनांना व अमेरिकनांना एकत्र आणून थेट वाटाघाटी करण्याची हीच वेळ बरोबर होती. सर रिचर्डनी मुसाकुसाची भेट CIA चे एक ज्येष्ठ अधिकारी व मॉस्कोचे CIA चे स्टेशनप्रमुख भूतपूर्व स्टीफन काप यांच्याबरोबर जिनीव्हा येथे योजली. पण मुसाकुसा रिक्तहस्तानेच आले. थोडक्यात हा करार गद्दाफींच्या स्वसंरक्षणासाठी जास्त व पाश्चात्य राष्ट्रांशी मैत्री करण्यासाठी कमी असाच होता हे उघड होत होते.

अमेरिकेच्या व ब्रिटिश गुप्तहेरसंघटनांना दिसले कीं KRL चीनबरोबर आणखीच करार करत होता. एका सरकार-ते-सरकार कंत्राटात चीनची M-ll अण्वस्त्रवहनक्षम लांब पल्ल्याची प्रक्षेपणास्त्रें इस्लामाबादला पुरविण्यात आली तर इस्लामाबादने अण्वस्त्रासंबंधींचे खरेदीव्यवहार करण्यासाठी एक डमी कंपनी म्हाणून 'चांगवांग सिन्याँग कॉर्पोरेशन' या उत्तर कोरियन कंपनीबरोबरचे आपले दृढ संबंध चालूच ठेवले. अमेरिकेच्या उपग्रहांनी पाकिस्तानचा ध्वज असलेले एक जहाज प्योंग्यांग बंदरात लागत असतांना व १० 'स्कड' प्रक्षेपणास्त्रें उतरवताना पाहिले होते तर ३ एप्रिल २००३ ला एका जर्मन गुप्तहेरसंघटनेने सुएझच्या कालव्यात एक मालवाहू जहाज अल्युमिनियमचे नळ उत्तर कोरियाला जाताना अडविले होते व त्यातल्या नळाबद्दलचा तांत्रिक तपशील असे होते कीं ते नळ सेंट्रीफ्यूजेसच्या केसिंग्जसाठी पाठविले जात होते हे उघड होते. पॉवेलनी मुशर्रफना फोन करून एक राजनैतिक तोडगा सुचवला कीं KRL व चांगवांग सिन्याँग कॉर्पोरेशनना खासगी कंपन्या म्हणून समजायचे म्हण्जे सरकारचा संबंध त्यात येणार नाहीं. रेगन यांच्या काळातही अर्शद परवेझच्या अटकेच्या केसमध्ये असलाच तोडगा सुचविला गेला होता कीं तो सौदा अर्शदचा वैयक्तिक सौदा होता. आता पॉवेलही तेच करत होते आणि पाकिस्तान अर्थातच त्या तोडग्याला राजी होते.

खानसाहेबांना सामुग्री पुरविणार्‍यांच्या लक्षात आले होते कीं त्यांना वेढले जात होते. ग्रिफिन इस्लामाबादला जायला निघाले होते पण त्यांना सांगण्यात आले कीं त्यांनी खानसाहेबांना भेटू नये. कदाचित् खानसाहेब ग्रिफिन यांचे सुरक्षित ठेवू इच्छित होते.

ते त्यांच्या दुबईतील कंपनीच्या कांहीं कामासाठी तिथे गेलेले असताना त्यांच्या फ्रान्समधील घरावर छापा घालण्यात आला. त्यांची पत्नी अ‍ॅना घरी एकटी होती. त्यांनी तिला सांगितले कीं तिला अटक करण्यात येत असून घराची झडती घेण्याची परवानगी देणारे वॉरंट तिला दाखविण्यात आले.
झडती ९ तास चालली. त्यांचे सगळे सेलफोन्स, फाइलोफ़ॅक्स, खानसाहेबांच्या बरोबर काम करत असल्याने वेळोवेळी मिळालेल्या भेटी (ताहीरच्या लग्नात मिळालेली चिरूट ठेवण्याची पेटी, "इस्लामिक बाँब" हे खानसाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकाची त्यांना सहीसह दिलेली प्रत वगैरे), दोन संगणक ग्रिफिन यांचे व एक अ‍ॅनाचा असे तिन्ही संगणक, आणि सर्व CDs जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे असलेली ९/११च्या घटना मुखपृष्ठावर असलेले टाईम नियतकालिकाची प्रतही त्यांनी नेली. त्यांच्या अ‍ॅनाबरोबरच्या सर्व संभाषणाबद्दल ते टांचणेही करत होते.

ग्रिफिन दोन दिवसांनंतर फ्रान्सला परत आले. त्यांना नीस[२३] विमानतळावर अटक करण्यात आली. अटक कशाबद्दल केली गेली या प्रश्नाला थेट उत्तर दिले गेले नाहीं. आत गेल्यावर त्यांचीच वाट पहात बसलेल्या एका ब्रिटिश अधिकार्‍याकडे त्यांना नेण्यात आले. पण कांहीं क्षाणांसाठी सर्व लोक खोलीबाहेर गेलेले असतांना ग्रिफिनना त्याच्या वॉरंटकडे नजर टाकता आली व कळले कीं ब्रिटिश सरकारच्या कस्टम्स व एक्साईज खात्यातर्फे ते अटकवॉरंट काढण्यात आले होते.

बर्‍याच तासांनंतर ग्रिफिनना सोडण्यात आले. मग त्यांनी मार्सेय[२३] (Marseilles) येथील ब्रिटिश उपराजदूताशी (consul) संपर्क साधला. तीन महिने उलटल्यावरही त्यांनी ग्रिफिनना त्यांच्या घरावार छापा कां टाकला गेला, पत्नीला हैराण कां केले गेले वगैरेबद्दल कांहींच कळले नव्हते. त्यांची भेट घेतली असता उपराजदूतांनी त्यांना सांगितले कीं त्या त्यांच्याशी याबबत कांहींही चर्चा करू शकत नाहींत व जास्त कांहीं सांगूही शकत नाहींत.

फिनलंडचे IAEA चे निरीक्षक ओली हाइनोनेन इराणच्या अण्वस्त्रनिर्मितीप्रकल्पाचा १९९० च्या दशकापासून मागोवा घेत होते व २००३ च्या उन्हाळ्याच्या सुमारास त्यांची खात्री पटली कीं याला पाकिस्तानच जबाबदार आहे व त्यात चीनची किरकोळ मदत झालेली आहे. ट्रेव्हर एडवर्ड्सना इराणच्या सेंट्रीफ्यूजेसमध्ये आणि खानसाहेबांनी मिळविलेल्या सेंट्रीफ्यूजेसमध्ये कमालीचे साम्य आढळले होते तसेच नातांझमध्ये त्यांना अतिशुद्धीकृत युरेनियमच्या दालनात मिळालेली युरेनियमच्या भुकटीची शुद्धता तिथे उभारलेल्या सेंट्रीफ्यूजेसच्या मालिकेच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त होती व हाइनोनेनना ती भुकटी इतरत्र पकडलेल्या पाकिस्तानी भुकटीसारखीच वाटली.

पण २००३च्या मार्चमध्ये IAEA निरीक्षक पुन्हा इराणला आले तरी इराण्यांनी तोंड उघडले नव्हते. यावेळी निरीक्षाकांनी तेहरानजवळील 'कलये इलेक्ट्रिक कंपनी'ला भेट दिली कारण इराण्यांनी नातांझ उभे करण्यापूर्वी सेंट्रीफ्यूजेसची तिथे चांचणी केल्याचे कबूल केले होते. पण निरीक्षकांना तिथल्या एका कार्यशालेच्या इमारतीत 'ते एक गुदाम आहे व त्याची किल्ली हरवली आहे' असे सांगून तिथे न्यायला नकार दिला. पुढच्या वेळी ते आले तर तिथल्या परिसरात खूपच बदल केले गेलेले होते असे त्यांना दिसले. बहुदा तिथे पाकिस्तानहून आणलेले अतिशुद्धीकृत युरेनियम साठविले होते अशी हाइनोनेन यांची धारणा झाली.

एलबारादेई यांच्या संमतीने हाइनोनेननी KRL, PAEC व मुशर्रफ यांच्या Strategic Plans Divisionला पत्र लिहून त्यांच्या ज्येष्ठ प्रतिनिधींना व्हिएन्नाला यायला सांगितले. यामुळे मुशर्रफ चांगलेच अडचणीत आले. त्यांना ते IAEAसारख्या संघटनेला शरण गेल्याचे पाकिस्तानी जनतेला दाखवायचे नव्हते आणि स्वतःची पाश्चात्यांबरोबरची (दिखाऊ) एकनिष्ठाही शाबूत ठेवायची होती. मग त्यांनी परमाणूबद्दल कांहींही माहिती नसलेला पण संदिग्ध व मोघम बोलू शकणारा एक मुत्सद्दी 'खानसाहेबांबद्दलचे प्रश्न वर्ज्य' या तत्वावर पाठविला. या चौकशीतून कांहींच निष्पन्न झाले नाहीं. पण तेहेरानमध्ये इराण्यांनी कांहीं माहिती दिली उदा. हाइनोनेनना मिळालेली अतिशुद्ध भुकटी इराणमध्ये बनविली नसून त्यांनी वापरलेली साधनसामुग्री विकत घेतली होती त्याबरोबर आलेली होती. पन त्यांनी ती कुठून विकत घेतली होती हे सांगण्याचे नाकारले.

दरम्यान इराण पळवाट शोधत होता. त्यांनी स्विस वकिलातीमार्फत अमेरिकेला निरोप पाठविला कीं ते त्यांच्या परमाणू कार्यक्रमाबद्दल चर्चा करायला तयार झाले होते. या निरोपाला इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेईसह इराणमधील सर्व प्रमुख राजनैतिक पक्षांचा पाठिंबा होता. इराणच्या सुरक्षेबद्दलच्या अडचणींकडे अमेरिकेने लक्ष द्यावे, त्यांच्याविरुद्धचे आर्थिक निर्बंध उठवावेत, राजनैतिक संबंध सर्वसामान्य करावेत व त्याला जगाच्या आर्थिक रचनेत एकरूप करावे व त्याच्या बदल्यात इराण हमासला व इस्लामिक जिहादला समर्थन देणे बंद करायला आणि हिजबुल्लाचे राजनैतिक, लष्करी व कल्याणकारी आघाडी असे त्यावेळचे प्रायोजकत्व बदलून त्या संघटनेला केवळ राजनैतिक संघटना बनवायला तयार झाला होता. पॉवेल व आर्मिटेज यांना या अटी खूप योग्य वाटल्या होत्या व १९७९च्या वैरापासून दूर जाऊन वाटाघाटी करण्याच्या बाजूने समर्थन दिले. शिवाय शिया बहुसंख्य असलेल्या इराणचा सद्दामनंतरच्या इराकमध्ये शांती प्रस्थापनेतही मदत होणार होती. पण रम्सफेल्ड-चेनी-बोल्टन या चांडाळचौकडीने अडथळा आणला. त्यांनी इराणने अटक केलेल्या अल कायदाच्या ज्येष्ठ हस्तकांबद्दल माहिती मागितली. अमेरिकेने मुत्सद्दी पाठवला तोही आधी त्यांना धमकी देणारा खालीजाद!

इराणचा प्रस्ताव पाठविल्याबद्दल 'व्हाईट हाऊस'कडून परराष्ट्रमंत्रालयाला स्विस वकिलातीची खरडपट्टी काढायला सांगितले गेले होते. पेंटॅगॉनची नजर आधीच इराकपलीकडे आणि त्या पलीकडील 'दुष्टचक्रा'कडे लागली होती. त्यांनी या दुष्ट अण्वस्त्रसज्ज राष्ट्राला सर्व उपाय योजून-त्यांच्या विरोधकांना सहाय्य आणि मुजाहिदीन-ए-खल्कची मदत या दोन्ही उपायांसह-अस्थिर करायचा निश्चय केला होता.

जाफरजादेंनी नातांझ येथील अण्वस्त्रयोजना जगापुढे जाहीर केल्यावेळी ज्या गटाला खूप जाहीरपणे दोष देण्यात आला होता ती MEKच होती. ती जाहीर घोषणा अवेळी व चुकीच्या जागी झाली होती कारण ती अमेरिकेच्या इराकवरील हल्ल्याच्या योजनेला बाधक बनली होती. पण आता ती संघटना अमेरिकन सरकारला आवडू लागली होती कारण आता चांडाळचौकडीची नजर इराणवर होती!

पण बुश-४३ सरकारने खराब वागणूक देताना आपपरभाव न ठेवता सार्‍यांना एकाच मापदंडाने वागविले. इराणीच नव्हे तर ब्रिटिशसुद्धा. कारण पाकिस्तानच्या चोरून चाललेल्या अण्वस्त्रप्रकल्पाला जरूर ती उपाययोजना करून ते आळा घालू शकतील अशी मूर्खासारखी समजून त्यांनी करून घेतली होती.
-------------------------------------------------------
[१] JeI: Jamaat-e-Islami, JUI: Jamiat Ulema Islam, HuM: Harkat ul Mujahideen, LeT: Lashkar-e-Taiba
[२] Chairman of Joint Chiefs of Staff Committee
[३] Vice chief of army staff
[४] Society for spreading faith
[५] मुशर्रफ यांच्या घडणीत व प्रगतीत गुल यांचा Mentor या नात्याने खूपच मोठा वाटा होता.
[६] अशा घटनांवरून अमेरिका चौकशीचे नाटकच करत होती कीं काय असे वाटते. अब्जावधी डॉलर्स पाकिस्तानात ओतणार्‍या अमेरिकेला अशी बिचकत-बिचकत चौकशी करण्याचे कारणच नव्हते!
[७] हे जुलै २००८ साली अमेरिकेच्या 'द्रोणाचार्यां'नी (Drone) केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानात मारले गेले. Drone विमानांना मी गमतीने द्रोणाचार्य म्हणतो!
[७अ] दहशतवाद्यांत अबू हे नाव भलतेच लोकप्रिय दिसते! अरबी भाषेत या नावाला कांहीं खास अर्थ आहे काय?
[८] या वार्ताहाराला त्याचे डोळे बांधून या ठिकाणी आणले गेले होते.
[८अ] या लोकांसाठी "Neoconservatives" हा नवा शब्द वापरला जातो!
[९] ’Axis of Evi” and ’Evil Empir’
[१०] Pre-emptive strike
[११] Joint Intelliegence Committee (JIC)
[१२] Precision-Engineering plant, but obviously not for petroleum but nuclear black market!
[१३] इथे 'खासगी कंपनी' हा शब्द अनवधानाने वापरला असावा, कारण असले खानसाहेब सर्व 'उद्योग' सरकारी कृपाछत्राखालीच करत होते व खास विमानांसारखी सरकारी साधनेही वापरत होते.
[१४] National Council of Resistance of Iran
[१५] Heavy water
[१६] Atomic Energy Organization of Iran आणि Pakistan Institute of Nuclear Science and Technology
[१७] Israel Defense Forces
[18] Separative Work Units
[१९] बुश-४३ आपल्या स्वार्थासाठी कांहींही करायला मागेपुढे पहात नसत!
[२०] "दहशतवादाविरोधी युद्धातला सच्चा मित्र" पाकिस्तानकडे स्पष्टीकरण मागायची सोय नव्हती, म्हणून उत्तर कोरियाला स्पष्टीकरण विचारण्याचा काय उपयोग?
[२१] या सर्व घटनांवरून पाकिस्तानने अमेरिकेची नेहमीची असहायता बरोबर ओळखली होती व ते प्रत्येक बाबीत त्याचा पुरेपूर फायदा घेत होते!
[२२] य़ाबद्दल कांहीं माहिती http://en.wikipedia.org/wiki/Plame_affair या दुव्यावर वाचता येईल.
[२३] Nice आणि Marseilles या गांवांचा फ्रेंच उच्चार 'नीस' व 'मार्सेय' असा केला जातो.

राजकारणभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

१५३०० शब्दसंख्या असलेले हे प्रकरण कदाचित या पुस्तकातले सर्वात मोठे प्रकरण आहे! त्यामुळे त्याचे संक्षिप्तीकरणही लांबलचक आहे (८७७० शब्द).
तरी आहिस्ते कदम, सरकार!!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/234ku9g (प्रकरण नववे)

आम्हाघरीधन's picture

28 Jun 2010 - 7:38 pm | आम्हाघरीधन

बाबा रे..........किती अफाट मेहनत ही......... दोन कुजक्या लोकांच्या चर्चेसाठी...

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

II विकास II's picture

28 Jun 2010 - 7:48 pm | II विकास II

वर वर चाळले.
वेळ मिळाला की पुर्ण वाचेन.

आम्हाघरीधन-जी,
ते दोन कुजके लोक आपले शत्रू आहेत. त्यांना नीट ओळखायला लागेल तितकी मेहनत कमीच आहे.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/234ku9g (प्रकरण नववे)

विजुभाऊ's picture

29 Jun 2010 - 10:45 am | विजुभाऊ

अमेरिका सगळे माहीत असूनही हे असे का करीत असते ह ईक कोडेच आहे

सुधीर काळे's picture

30 Jun 2010 - 2:38 pm | सुधीर काळे

प्रिय विजूभाऊ,
मला खूपदा वाटते कीं एकादा गरीब बिचारा असहाय माणुस कांहीं चूक करतो व दुष्ट माणूस त्याला पकडून Blackmail करू लागतो. मग त्या कचाट्यातून सुटका करून घ्यायची असल्यास "कर तुला हवे ते, मी आता तुला दाद देणार नाहीं!" असे सांगून आल्या परिणामाला तोंड द्यायची तयारी करण्याखेरीज कांहीं उपाय नसतो.
अमेरिका गरीबही नाहीय्, बिचारीही नाहींय् व असहायही नाहीं हे खरे, पण त्याच कचाट्यात सापडली आहे असे मला वाटते!
आता पाकिस्तान अमेरिकेला सरळ सांगतो कीं तुम्ही पैसे दिले नाहींत तर आम्ही तालीबानशी लढू शकत नाहीं. न कां लढेनात? जणू कांहीं तालीबान पाकिस्तानच्या छाताडावर नाचतच नाहींय्! दरमहा लाहोर, पेशावर, पिंडी, इस्लामाबाद व कराची सगळीकडे त्यांचा हैदोस चालू आहे, तर चालू द्या! अमेरिकेला काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी यात कां पडावे?
खरं तर अमेरिकेचा पैसा siphon off करता येतो म्हणून वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांना हे हवं आहे. अमेरिकेची मदत घेऊन तिच्या बाजूने लुटपुटीचे लढायचे व पैसा 'करायचा'! लढायला आहेतच शिपुरडे! या धेडांना काय होतंय?
(खरंच Blackmail ला मराठीत प्रतिशब्द आहे कां? शब्दकोषातही सापडला नाहीं म्हणून सगळ्याना विनंती)
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/234ku9g (प्रकरण नववे)

संताजी धनाजी's picture

5 Jul 2010 - 9:47 am | संताजी धनाजी

वाचतो आहे. पुढील लेख कधी येणार?

- संताजी धनाजी

सुधीर काळे's picture

5 Jul 2010 - 5:39 pm | सुधीर काळे

१७वे प्रकरण लिहून पूर्ण झाले आहे. पण वाचक अद्याप १६वे प्रकरण वाचतच आहेत. म्हणून थांबलो आहे. एक-दोन दिवसात चढवेन म्हणतोय्!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

Dhananjay Borgaonkar's picture

5 Jul 2010 - 6:06 pm | Dhananjay Borgaonkar

अमेरीकेला आत अजुन किती पुरावे हवे आहेत पाकड्यांच्या विरुद्ध.
आत एवढ्यातच टाईम्स स्क्वेअर मधे बाँम्ब प्लांट करणारा फैझल शेहजाद याने कबुल केल की जो पर्यंत अमेरीका अफगाणिस्तानले हल्ले थांबवत नाही तो पर्यंत आम्ही असेच बाँम्बस्फोट करु.
एवढे असुन सुद्धा परवाच अजुन एक बातमी वाचली की अजुन एफ-१६ विमान पा़कड्यांना देण्यात येणार म्हणुन..
काय चालु आहे हे त्यांनाच ठाऊक.
ओबामा म्हणालाय की २०१२ पर्यंत सर्व अमेरीकी फौजा आम्ही माघारी बोलवू.
बोलाची कढी आणि बोलाचाच भात.

आपल्या व अमेरिकेच्या लोकशाहीत फारसा फरक नसावा! दोन्हीकडे कुणीच कुठल्याच विषयावर ठाम निर्णय घेत नाहीं. नुसती टाळाटाळ! प्रश्न जरा कुठे 'अवघड जागेचं दुखणं' वाटला कीं आपल्याप्रमाणेच एकादी कमिटी नेमतात किंवा कमिशन. कीं मग आनंदी-आनंद!
रिपब्लिकन पक्षाचं तोंड पूर्वेकडं तर डेमोक्रॅटिक पक्षाचं पश्चिमेकडं! सगळाच खेळखंडोबा.
मी नेहमी म्हणतो कीं भारताची जी प्रगती झालीय् आणि होतेय् ती आपल्या सरकारमुळे नसून असले दळभद्री सरकार असूनही (in spite of) झाली आहे व ती भारतीय जनतेच्या सर्जनशीलतेमुळे (creativity). अमेरिकेची परिस्थितीही तशीच आहे. अमेरिका केवळ अमेरिकन लोकांच्या सर्जनशीलतेमुळे प्रगती करू शकली आहे आपल्यासारखेच दळभद्री सरकार असूनही.
याउलट पाकिस्तानी सरकार धूर्त असून आपल्या लोकशाही (वाईट) प्रथांचा पुरेपूर फायदा करून घेत आहे.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

Dhananjay Borgaonkar's picture

5 Jul 2010 - 9:31 pm | Dhananjay Borgaonkar

काका,
खरं सांगायच तर पाक हे अमेरीकेसाठी अवघड जागेच दुखण होऊन बसल आहे. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही.
अमेरीकेला चांगलच ठाऊक आहे की चीन पाकडयांना मदत करायला एका पायवर तयार आहे.त्यामुळे अमेरीका सरळ सरळ पाकड्याच्या वाकड्यात सध्या तरी जाईल अस वाटत नाही.
ओबामामधे सुधा अजिबात दम नाही.फक्त तोडाची हवा आहे.
अमेरीका स्वतः दिवाळ्खोरीच्या उंबरठ्यावर उभी असताना देखील पाकड्यांना मदत करण चालु आहे याचच खुप आश्चर्य वाटत आहे.

सुधीर काळे's picture

5 Jul 2010 - 9:48 pm | सुधीर काळे

मला तसं वाटत नाहीं. चीन बाकी वाटेल ती मदत करायची तयारी दाखवेल, पण 'दामाजीपंतां'चे काय? अमेरिकेने नुसती 'पैसे बंद'ची धमकी दिली तरी पाकिस्तान शेपूट मागच्या पायात घालून येईल त्यांच्याकडे.
पाकिस्तानला पैसे खर्च कसे करायचे एवढे कळले आहे, पण कमवायचे कसे ते माहीत नाहीं. (अगदी 'आधुनिक अभिमन्यू'च म्हणायला पाहिजे!)
अमेरिकेला आपल्या शक्तीचा अंदाज तरी नाहींय् किंवा खरंच 'पोकळ वासा' अशी परिस्थिती आहे. स्वत: कर्जबाजारी असताना कुठनं दुसर्‍यांना मदत करू धजतात कोण जाणे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)