अप्रतिम... या लेखमालेतील हा अध्याय देखील आवडला. :)
हिंदुस्थानाशी छुपे युद्ध खेळणार्या पाकड्यांशी आपले सरकार कठोर धोरण का स्विकारत नाही याचेच मला नेहमी आश्चर्य वाटते...
देशाचे नाव पाकिस्तान पण यांच्या सर्व कारवाया मात्र नापाकच असतात..
पाकिस्तान आपल्या नागरिकांना अतिरेकी कारवाया करुन ठार मारत आहे याचे आपल्या नेते मंडळींना काहीच कसे वाटत नाही ??? :(
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
धन्यवाद.
मी हे पुस्तक अद्याप वाचले नाही. पण "फसवणूक" प्रकल्प संपेपर्यंत नवे कांहीं वाचन होईल असे वाटत नाहीं. पण त्यानंतर नक्कीच वाचेन.
सध्या "Bringing up Bin Laden" व "Son of Hamas" ही पुस्तकेंही 'क्यू'त आहेत!
पण मीही आपल्याला "इस्रायल कसा उभा राहिला" या विषयावरचे "Exodus" वाचायला प्रोत्साहन देईन. पहिल्यांदा वाचले तेंव्हा खूप आवडले होते. अलीकडे दुसर्यांदा वाचले तेंव्हां काही ठिकाणी जरासा भ्रमनिरास झाला. कारण आज-काल अतिरेक्यांच्या हल्ल्यांनी राजकीय उद्दिष्टें साध्य करण्याची जी टूम निघाली आहे तिचा उगम इस्रायली लोकांनीच केला कीं काय असे वाटते!
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
काळे काका...जबरदस्त लेख. अगदी नेहमीप्रमाणेच.
एवढ्या सगळ्या अंतर्गत गोष्टी माहित नव्हत्या.
वरवर फक्त माहित होते की पाकिस्तान हे अमेरिकेचेच पिल्लु आहे.
काल काळे काका म्हणाले की लेख अर्धवट लिहुन झाला आहे आणि आज बघतो तर काय मिपा वर टंकला सुद्धा.
एक नंबर काम.
आपला क्रुपाभिलाषी.
धनंजय
अमेरिकेचा अर्वाचीन राजकीय इतिहास वाचल्यावर मला बर्याचदा वाटते कीं निर्णय घेणे, त्या निर्णयाला चिकटून रहाणे, त्या निर्णयावर संपूर्ण विश्वास ठेवणे व मग त्या धोरणाद्वारा यशस्वी होण्यासाठी कुठल्याही बर्या-वाईट गोष्टी (कायदेशीर-बेकायदेशीर) कसलाही विधिनिषेध न बाळगता करणे या बाबींवर रिपब्लिकन पक्षाचे नेते जास्त विश्वास ठेवतात.
मी १९६० पासून 'टाईम (TIME)' या नियतकालिकाचा नियमित वाचक आहे व तेंव्हापासून केनेडी-जॉन्सननंतर आलेल्या निक्सन यांच्या कारकीर्दीपासून मी रिपब्लिकन पक्षाची राजवट पहात आलो आहे. निक्सन, रेगन व बुश-४३ यांच्या राजवटीत हा वर मांडलेला मुद्दा जास्त प्रकर्षाने जाणवतो. त्या मानाने बुश-४१ जरासे 'डेमोक्रॅट' होते!
आणखी एक बाब प्रकर्षाने जाणवते कीं रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्राध्यक्ष कुणीही असो, त्या पक्षाची जी सनातनी (conservative) टोळी/शिलेदार मंडळी कठपुतलीच्या दोर्या खेचत असते व तीच खरी सत्ताधारी असते.
याबद्दल "The Fall of the House of Bush: The Untold Story of How a Band of True Believers Seized the Executive Branch, Started the Iraq War, and Still Imperils America's Future" या क्रेग उंगर यांच्या पुस्तकात खूपच तपशीलवार माहिती आहे. (क्रेग उंगर यांचे Fahrenheit 9/11 हे पुस्तक जास्त लोकप्रिय आहे.)
रेगनना तर "Most hands-off President" म्हटले जाते. ते केवळ त्यांचे/सनातन्यांचे धोरण ढोबळ शब्दात सांगायचे व त्याची कार्यवाही प्रत्येक शिलेदाराची जबाबदारी असायची. मग त्यांनी कांहीं ही करावे.
धोरणच्या या पद्धतीमुळे रेगन यांचे शिलेदार प्वांडेक्स्टर (की पोइनडेक्स्टर) व ऑलिव्हर नॉर्थ यांना कारावासही झाला.
याबाबत मिपावरील सभासद कांहीं जास्त प्रकाश टाकू शकतील काय?
धन्यवाद!
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
"निर्णय घेणे, त्या निर्णयाला चिकटून रहाणे, त्या निर्णयावर संपूर्ण विश्वास ठेवणे व मग त्या धोरणाद्वारा यशस्वी होण्यासाठी कुठल्याही बर्या-वाईट गोष्टी (कायदेशीर-बेकायदेशीर) कसलाही विधिनिषेध न बाळगता करणे या बाबींवर रिपब्लिकन पक्षाचे नेते जास्त विश्वास ठेवतात"
खरं तर हे एकंदरच अमेरिकन नेत्यांचे वैशिष्ठ्य म्हटले पाहिजे. डेमोक्रॅट्स् थोडेसे सौम्य असल्याचे फक्त भासवतात, असे वाटते.
लेखमाला प्रचंड वाचनीय होते आहे. तसेच यात शॉक व्हॅल्यूही भरपूर आहे.
आपण म्हणताय् तसे थोडे-फार आहे पण डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जरा तरी तडजोड करतात, पण रिपब्लिकन पक्षाचे नेते दुराग्रही व अजीबात तडजोड न करणारे असतात असे मला माझ्या वाचनावरून तरी वाटते.
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
हा एवढा लेख वाचायलाच इतका वेळ लागतो. असे अख्खे पुस्तक ज्याने लिहिले आणि काकांनी ते अनुवादित केले........दोघांची मेहेनत सॉल्लिड आहे. बर्याच गोष्टी पडद्याआड असतात त्या अशा पुस्तकरुपाने बाहेर येतात. लेखकाने काय मेहेनत घेतली आहे.....किती कागदपत्रांचा अभ्यास केला असेल त्याने काय माहित. अर्थात अशी पुस्तके लिहुन पाकिस्तानला मिळणारी मदत कमी होईल का ह्याची शंकाच वाटते.
महा-१२ म्हणजे महाराष्ट्र १२ म्हणजेच पुणे अस म्हणायच असेल. असो.
नेहमी प्रमाणेच अतीशय वाचनीय आणि संग्रहणिय लेख आवडला.
आपण आम्च्या साठी घेत असलेल्या मेहनतीला सलाम पु.ले.शु.
एक विनंती लेखा पुर्वी किंवा नंतर आधिच्या लेखांचे दुवे जमल्यास द्या वाचकांना १,२,३,४ असे भाग सलग वाचायचे असतिल तर सोप्प होईल.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
अरेच्चा! पुण्याचा असूनही अगदी 'ट्यूबलाईट'च झाली माझी!
"एक विनंती लेखा पुर्वी किंवा नंतर आधिच्या लेखांचे दुवे जमल्यास द्या" चांगली सूचना आहे. असे कांहींतरी लागेल असे मलाही वाटत होते, पण तुमचा हा सल्ला वाचल्यावर हा विचार आता स्फटिकीकृत (crystallize-हाहाहा) झाला!
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
जगाचं माहीत नाहीं, पण पकिस्तानात मात्र कायम फारच 'मनोरंजक' गोष्टी होत असतात! लुटपुटीची लोकशाही, लष्कर व त्या सर्वांचे 'बाप' ISI यामुळे तिकडे गंमत-जंमत चालूच असते!
पुढे माझ्या लि़खाणात बेनझीरच्या पहिल्या 'इनिंग'ची सुरस व चमत्कारिक कहाणी येईलच. वाचण्यासारखी आहे ती माहिती.
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
एकूणच हे लक्षात येतंय की पाकिस्तानी नेते हे कमालीचे मुत्सद्दी आहेत. भले लढाईत त्यांनी हिंदुस्थानकडून मार खाल्ला असेल,पण वाटाघाटी आणि तहाच्या टेबलावर ते आपल्यापेक्षा निश्चितच सरस आहेत. अमेरिकेसारख्या धुर्त,कावेबाज आणि सर्वशक्तिमान देशाला झुकवणं ही पाकींची कामगिरी नक्कीच दूर्लक्षित करण्यासारखी नाहीये. आपले नेते कधी सुधारणार कुणास ठाऊक?
खरंच सांगतो वाचता वाचता थकलो. काळेसाहेब, आपली खरंच कमाल आहे.हे असले विषय इंग्रजीमधून वाचणं,त्यानंतर त्याचे भाषांतर करणं वगैरे म्हटलं तर कुणाच्याही विद्वत्तेची,जिद्दीची आणि चिकाटीची कसोटीच आहे. आपण त्या कसोटीवर खरे उतरला आहात. अभिनंदन.
पुलेशु.
प्रमोद-जी,
(१) अमेरिकेसारख्या धुर्त,कावेबाज आणि सर्वशक्तिमान देशाला झुकवणं ही पाकींची कामगिरी नक्कीच दूर्लक्षित करण्यासारखी नाहीये: माझ्या आधीच्या लेखांच्या खाली दिलेल्या भाषांतराच्याबाहेरील दोन-तीन शेर्यांत मी लिहिले होते कीं आपण Non-Aligned प्रणाली पत्करली, परिणामत: आपल्याला कुणीच दोस्त राहिला नाहीं. तर पाकिस्तानने अमेरिका व चीन या दोन शत्रूंशी एकाचवेळी व उघड-उघड मैत्री केली (झियाचे वाक्य वाचलेच असेल कीं १९६५च्या व १९७१च्या युद्धांत पाकिस्तानला गरज असताना अमेरिकेने मदत केली नाहीं त्यामुळे पाकिस्तान अमेरिकेवर निर्भर राहू शकत नाहीं. झियांनी घोषणा केली कीं पाकिस्तान मुस्लिम व तटस्थराष्ट्रांबरोबर व जुना अन् विश्वासू मित्र चीनबरोबर राजनैतिक, नैतिक व साधनसामुग्रीविषयक मदतीचा वेगळाच करार करेल.) म्हणजे भिकारी, दिवाळखोर राष्ट्र असूनही 'दाखवायची' मस्ती व दिमाख पहा!
(२) खरंच सांगतो वाचता वाचता थकलो
तुम्ही एकटे नाहीं, जसजसे लेख प्रसिद्ध होत आहेत तसतशी वाचने व प्रतिसादही कमी होताहेत.
पण विषयच असा आहे कीं ज्यांना त्यात रस असेल तेच वाचतील. पण या लि़खाणावर मला कांहीं निरोप 'व्यनि'वरही आले आहेत. दुरुस्त्याही सुचविल्या आहेत. माझ्या 'सकाळ'च्या प्रकाशनात आपणा सर्वांची मदत होत आहे म्हणून मी खुष व आभारी आहे.
'सकाळ'मध्ये ८ लेख पाठविल्यावर प्रकाशन सुरू होईल. कारण दर १० दिवसांनी एक अशा तर्हेने ते मालिका प्रकाशित करणार आहेत. म्हणून मी आणखी चार लेख पाठविल्यावर सुरू करा असे सांगितले आहे कारण एका प्रकरणाला १४-१५ दिवस लागतात!
पण सुरू होईल तेंव्हाच खरे. There is always a big gap between the cup and the lip.
असो. आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभार.
सुधीर काळे
(प्रस्तावना)८२६ वाचने/२४प्रतिसाद
(प्र.१) १३१७ वाचने/२९ प्रतिसाद
(प्र.२) ९३९ वाचने/२९ प्रतिसाद
(प्र.३) ६०८ वाचने/१० प्रतिसाद
(प्र.४) ३८८ वाचने/१३ प्रतिसाद (आतापर्यंत)
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
माझ्या रिपब्लिकन वि. डेमोक्रॅटिक पक्षाबद्दलच्या निरीक्षणाबद्दल मला चतुरंग, विकास ('plain म्हणजे उभ्या-आडव्या रेघांशिवाय'वाले) सौ. स्वाती (इंडियाना) सारख्या व इतरही माझ्याशी अद्याप परिचय न झालेल्या पण बरीच वर्षें अमेरिकेत वास्तव्य असलेल्या सभासदांकडून inputs हव्या आहेत. कृपया द्याव्यात.
'चिंचोके' (peanuts) ला अधीक चांगला शब्द सुचत असेल तर हवा आहे.
तसेच ||विकास|| कडून चुकादुरुस्तीच्या व इतरही कॉमेंट्स हव्या आहेत.
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
खरंच 'कवड्या' हा छान पर्याय वाटतोय्! जरा थांबतो व आणखी कुठला याहून जास्त 'फिट' शब्द न मिळाल्यास वापरण्याबाबत विचार करेन.
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
प्रतिक्रिया
अप्रतिम...
फसवणूक
अतिरेकी कारवायांचा उगम इस्रायली लोकांनीच केला कीं काय?
काळे
याबाबत मिपावरील सभासद कांहीं जास्त प्रकाश टाकू शकतील काय?
खरं तर
रिपब्लिकन पक्षाचे नेते दुराग्रही व अजीबात तडजोड न करणारे?
काळेसाहेब,
कसली जब्बरदस्त मेहेनत आहे.....
काका...
'आम्ही महा-१२ चे'चा अर्थ कळला नाहीं!
आहो काका
तुमचा हा सल्ला वाचल्यावर हा विचार आता स्फटिकीकृत झाला!
जगात काय काय घडत असतं !!!
पकिस्तानात मात्र कायम फारच 'मनोरंजक' गोष्टी होत असतात!
मुत्सदी पाकिस्तानी.
पाकिस्तानने अमेरिका व चीन या दोन शत्रूंशी उघड-उघड मैत्री केली!
सभासदांकडून inputs हव्या आहेत
कवड्या
कवड्या हा छान पर्याय वाटतोय्!