✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General)

स
सुधीर काळे यांनी
Fri, 04/30/2010 - 08:16  ·  लेख
लेख

Book traversal links for फसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General)

  • ‹ फसवणूक-प्रकरण आठवे-अननसाचा केक
  • Up
  • फसवणूक-प्रकरण दहावे-"बांगड्या ल्यायलेले बदमाष!" ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24314 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

मला काहीच

II विकास II
Fri, 04/30/2010 - 08:35 नवीन
मला काहीच दिसत नाही. :( --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

लेख दिसु लागला आहे..

नेत्रेश
Fri, 04/30/2010 - 12:34 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

चुकीच्या जागी पोस्ट झाल्यामुळे काढून टाकला आहे.

सुधीर काळे
Fri, 04/30/2010 - 09:19 नवीन
चुकीच्या जागी पोस्ट झाल्यामुळे काढून टाकला आहे.
  • Log in or register to post comments

हा ही भाग

मदनबाण
Fri, 04/30/2010 - 10:54 नवीन
हा ही भाग आवडला... पाकडे शब्दांचा खेळ करण्यात माहिर आहेत हेच दर वेळेला कळुन येते. आपली परराष्ट्र निती एव्हढी दुबळी का ? हा प्रश्न शेवटी उरतोच...भारताच्या विकासाला लगाम घालण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत होत आहेच आणि चीन व अमेरिका दोघांना खुश ठेवुन पाकडे मात्र बरेच उद्योग करुन मोकळे झाले आहेत...क्षेपणास्त्र चीनी बनावटीची आणि विमाने अमेरिकन बनावटीची...म्हणजे सारी उंगलिया घी में.... अमेरिकेला तर लयं काळजी हाय पाकड्यांची अन् त्यांच्या सुबत्तेची... http://www.america.gov/st/peacesec-english/2010/March/20100324164228esnamfuak0.5523035.html आपण मात्र संवाद संवाद खेळणार !!! कोणशी ज्यांचा सगळा वेळ आपल्या देशा विरुद्ध कट कारस्थाने करण्यात जातो... http://bit.ly/bPjUGB पाकिस्तान सैन्याची हालचाल फार वेगाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे...हा एक प्रकारचा फायदाच आहे त्यांना....सैन्याची हालचाल ज्याला सुलभपणे करता येते त्याला खर्‍या युद्धात त्याचा बराच फायदा होतो हे मात्र नक्की.सध्या हिंदुस्थानी सैन्याने शेवटचा युद्ध अभ्यास कधी केला होता ते आठवतोय.. कारगिल युद्धा नंतर हिंदुस्थानच्या सैन्यदला बद्धल अशी माहिती बाहेर आली... http://news.indiamart.com/news-analysis/kargil-conflict-show-3367.html कॅप्टन कालिया सारखे शुर या देशात जन्माला येतात म्हणुन तुम्ही आणि मी सुखाने सामान्य जिवन जगतो... पाकिस्तानने त्यांचा युद्ध अभ्यास सुर केला आहे,, म्हणे जो आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा युद्ध अभ्यास असेल... http://www.nytimes.com/2010/04/11/world/asia/11pstan.html जाता जाता :--- तुम्ही गाफिल राहिला तर शत्रुला दोष देऊन काय उपयोग !!! मदनबाण..... Life is God's novel. Let him write it. ISAAC BASHEVIS SINGER पाकिस्तानी मुत्सद्देगिरीची पुन्हा सरशी :--- http://bit.ly/9ekroS
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणेच वाचनीय लेख

सातबारा
Fri, 04/30/2010 - 10:53 नवीन
श्री. सुधीर काळेजी, आपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात होतो, आधाशासारखा वाचून काढला. मला वाटते लोकशाही + देशाचा मोठा आकार (जसे भारत, अमेरिका ) हे काँम्बिनेशन त्या त्या देशासाठी प्रॉब्लेम ठरत असावेत. आपल्या देशाला चीन सारखी एकपक्षीय लोकशाही आणि मुशर्रफ सारखा धूर्त नेता मिळाल्यास भारत महासत्ता होईल अन्यथा काही खरे नाही. ( मी तर गमतीने म्हणायचो - देश का नेता कैसा हो ? मुशर्रफ जैसा हो ) असो. आपला बार्लो वरील लेख कसा वाचायला मिळेल ? (टीप ६ ) आपल्या सूचनेप्रमाणे आपणास व्यनि करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मी येथे अजून नवखा असल्याने जरा चाचपडतो आहे. --------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments

खालील दुव्यावर हा लेख वाचायला मिळेल

सुधीर काळे
Fri, 04/30/2010 - 18:08 नवीन
सातबारा-जी, http://www.misalpav.com/node/10046 या दुव्यावर हा लेख वाचायला मिळेल. सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

रेगनना कसलाच विधिनिषेध नव्हता?

सुधीर काळे
Sat, 05/01/2010 - 23:14 नवीन
परवेझ, रॉबर्ट पेकसारख्या खटल्यात रेगनच्या सहकार्‍यांनी केलेल्या लांड्यालबाड्या पहाता त्यांना कसलाच विधिनिषेध नव्हता हे लक्षात येते. पण डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर्स व रेप्रेझेंटेटिव्हमंडळी इतकी नक्काम कशी हे कळत नाहीं! विरोधी पक्षाचे काम असते सरकारला लाइनीत ठेवणे. हे काम ते करूच शकत नव्हते असेच या प्रकरणातील व आधीच्या प्रकरणांतील केसेसवरून लक्षात येते. (लक्ग्लेनसारखाअंतराळवीर-हे असे अक्षरांचे भजे कां होते? नीलकातना विनंती) अंतराळवीर जॉन ग्लेनसारखा 'हीरो' सिनेटर असूनही असा कसा परिणामकारकतेत शून्य निघाला? सोलार्त्झसुद्धा घटनादुरुस्ती करण्यापलीकडे कांहींच कसे कांहीं करू शकले नाहींत? सिनेटच्या कमिट्यांकडे खूप अधिकार असतात. त्यांनी मनात आणले असते तर ते बार्लोला subpaena करू शकले असते (जसे पूर्वी निक्सनविरोधी चौकशीत खूप वेळा झाले, अगदी त्यांच्या टेप्सही 'expletives deleted' अवस्थेत subpaena करून मागविल्या गेल्या होत्या.) अफगाणिस्तानच्या तहाच्या बाबतीत झियांनी केलेल्या वक्तव्यावरून तर त्यांचा धूर्तपणा, दूरदर्शीपण (व निर्लज्जपणा) दिसून येतो. "देशाच्या हितसंबंधांच्याप्र्क्षा दुसरे कांहींही महत्वाचे नाही" या निकषाप्रमाणे ते वागले. माझ्या मते देशाच्या नेत्यात हे गुण हवेतच! त्यांनी रेगननाही बजावले कीं "गेली आठ वर्षे वर्षें तुम्ही सगळ्यांना खोटे सांगत आलात, मग मला उपदेश कां देताय्?" हे त्यांच वाक्य वाचल्यावर तर मला "जय हो" म्हणावेसे वाटले! वर "चांगल्या कामांसाठी खोटं बोलायला धर्माचीही अडकाठी नाहीं" हे सांगून मोकळे! शिवाय "हा बाँब सार्‍या मुस्लिम जगताचा" असे पहिल्यापासून म्हणणार्‍या झियांनी अण्वस्त्र तंत्रज्ञान मुस्लिम राष्ट्रांना विकायचा व (विकायचपैसेअमेरिकेची-हे असे अक्षरांचे भजे कां होते? नीलकातना विनंती) अमेरिकेची मदत बंद झाल्यावर त्यातून पैसे मिळवायचे हीही दूरदर्शी योजना आखली होती. धूर्तपणात मुशर्रफही कमी नव्हते! '९/११'नंतर त्यांनी सफाईने तालीबान सरकारला (वर-वर पहाता) वार्‍यावर सोडले व आतून जुने धंदे चालूच ठेवले होते! सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments

झियांचे १० वर्षें सहय्यक असलेले ज. खालिद महमूद आरिफ यांचे पुस्तक

सुधीर काळे
गुरुवार, 05/06/2010 - 19:01 नवीन
"दहा वर्षें ज. आरिफ यांनी झियांचे सेनाध्यक्ष (Chief of Army Staff) व कहूता प्रकल्पाचे उपाध्य़क्ष अशा दोन्ही जबाबदार्‍या पार पाडल्या. आता सेवानिवृत्त झालेले आरिफ ती दहा वषें पाकिस्तानातले सर्वात दुसर्‍या क्रमांकाचे बलवान नागरिक होते." पहा प्रकरण ३ "मृत्यूच्या दरीत". आरिफ यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. दोन्ही 'out of print' असून दोन्हीही वाचनीय असावीत. एक आहे "Working with Zia:Pakistan's Power Politics 1977-to1988" व दुसरे आहे "Khaki Shadows: Pakistan 1947-1997". पहिले पुस्तक मला फ्लॉरीडा स्टेट युनिव्हर्सिटीत काम करणार्‍या माझ्या बहिणीच्या युनिव्हर्सिटीच्या पुस्तकालयात मिळाले. त्यात Epilogue मधील हे वाक्य मला खूप पटले. ते म्हणतात, "Politics in Pakistan is based on genes and means. Dynastic connections override efficiency." पाकिस्तानमधील लष्कराच्या राजकारणातील सततच्या दादागिरीचे मूळ या अपयशात आहे असे त्यांचे मत असावे असे Prologue आणि Epilogue वाचल्यावर वाटले. आपल्या देशातही (केंद्रीय व राज्यस्तरांवर) घराणेशाही फोफावत आहे. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" या न्यायाने आपण पाकिस्तानातील अपयशाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे व आपल्या देशात लोकशाहीचा पराजय होऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे. पुस्तक अद्याप पूर्ण वाचायचे आहे. जर मला ते आवडले (आवडेल असे वाटते) तर त्या पुस्तकाचा परिचय 'मिपा'करांना करून देण्याचा विचार आहे. सुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे धाकट्या बहिणीकडे! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9; प्रकरण दुसरे: http://tinyurl.com/2cptlvo
  • Log in or register to post comments

कांहीं कारणाने दोनदा Post झाल्यामुळे काढून टाकली आहे.

सुधीर काळे
गुरुवार, 05/06/2010 - 19:04 नवीन
कांहीं कारणाने वरील टीप दोनदा Post झाल्यामुळे काढून टाकली आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा