+१
...
तंत्रज्ञान असं चोरीमारी, वाटमारी करून आणायचं असेल / आणायचं असतं ?? (तर भारतानंही अणुतंत्रज्ञानासाठी अशा प्रकारचे उद्योग केले असावेत की नसावेत ,असा प्रश्न पडतो..यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा...)
भडकमकर-जी,
(हे आपले 'खरे' नाव असावे असे समजून लिहीत आहे.)
हे लिहायला लागल्यापासून मलाही असे प्रश्न पडले आहेत. पण सध्याच्या 'झपाटलेल्या' अवस्थेत (obsessed state of mind) हे उत्खनन करायला वेळ नाहीं. पण ही लेखमालिका जरा आटोक्यात आली कीं असे उत्खनन करायचा विचार आहे!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
प्रिय अदिती,
तू प्रतिसाद लिहिलास याचे मला खूप अप्रूप व सानंद आश्चर्य वाटले. तू गेल्या लेखाला लिहिला होतास तोही वाचला होता. तुझे मनापासून आभार.
हे संक्षिप्तीकरण व भाषांतर करण्यामागे एक अशी भावना आहे कीं या पुस्तकातील माहिती प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचावी. हे पुस्तक तसे भारतात अपरिचितच आहे. मीही एरवी वाचले नसते, पण रिच बार्लोवर जो लेख मी "उत्तम कथा" मासिकाच्या दिवाळी अंकासाठी लिहिला त्याबद्दल जरा संशोधन करताना मला हे पुस्तक 'अमेझॉन'वर सापडले. मी अशी टिमकी वाजवू इच्छित नाहीं पण थोडीशी देशभक्तीची भावनाही या प्रकल्पामागे आहे.
आतपर्यंत जे वाचलं आहेस ते कांहींच नाहीं. पुढे-पुढे मुशर्रफने कसे आजचे आतंकवाद्यांचे तळ उभे केले हे वाचशील तेंव्हा तुलाही असं वाटेल कीं अशा विखारी सापाला आपण आग्र्याला बोलावलेच कशासाठी.
असो. साधारणपणे दर दोन आठवड्याला एक धडा 'पाडायचा' असे '१६ सोमवारांचे' व्रत मी घेतले आहे. बघू या हे व्रत हातून पार पडते कीं नाहीं.
आतापर्यंत ३ धडे झाले आहेत व देवसाहेबांच्या हिवाळी अंकातला मुशर्रफच्या पतनावरचा धडाही खिशात आहे. देवाच्या मनात असेल तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून ई-सकाळमध्ये ही मालिका प्रकाशित होऊ लागेल.
प्रतिसादाबद्दल पुनश्च आभार.
काका
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
काका हा भाग ही छान झाला आहे.
पुढच्या भागाची वाट पाहत आहे. :)
(याच लेखाला दिलेला आधिचा प्रतिसाद गायब कसा झाला ? :?)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
प्रिय 'मदनबाण',
मी लिहिलेला लेख जरासा एडिट करायला घेतला पण कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक पण मिपा ब्राउजर मला पुन्हा 'सबमिट'च करू देईना. सुदैवाने माझ्याकडे 'बरहा'मधील प्रत होती. मग ती पुन्हा नव्याने कॉपी-पेस्ट करून चढवली.
त्यात तुझा प्रतिसाद बहुदा गळफटला!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
आपल्या चिकाटी आणि अभ्यासाला माझा त्रिवार सलाम.
वाचतानाच थकलो....तुम्ही भाषांतर कसे करत असाल....ह्याचा नुसता विचार करून तर पार झोपलो.
तुमच्या ह्या कष्टांचे चीज व्हावे अशी मनोमन सदिच्छा व्य करतो.
लेख उत्तम झालाय..अगदी चलतचित्रासारखा.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
शत्रूला ओळखून असावे असे म्हणतात! (हल्ली बँका "know your customer" च्या नावाखाली आपल्याला छळून घेत आहेत तो भाग वेगळा!)
पाकिस्तानने आपल्याशी हे जे उगीचच वैर मांडले आहे ते नसते तर आपण (दोघेही) कुठल्याकुठे पोचलो असतो असेही विचार मनात येतात!
पण भुत्तो हे कितीही भारतद्वेष्टे असले तरी त्यांचे अनेक गुण या पहिल्या दोन प्रकरणात दिसून येतात!
त्यांच्या एकविचारी स्वभावाशिवाय (single-mindedness) पाकिस्तानचा अणुबाँब आजपर्यंतही बनला नसता. त्यांच्यात गुणवत्ता जोखण्याची जबरदस्त पात्रता होती. ती नसती तर डॉ. खान यांचे पत्र कचर्याच्या टोपलीत फेकले गेले असते व भुत्तोंनी खानना जी "लिफ्ट" दिली ती दिली नसती तर मुनीर यांच्या दादागिरीत ते कुठे तरी कारकुनी करत राहिले असते व कांहींही साध्य न करता सेवानिवृत्त झाले असते.
पण ज्याच्यावर उपकार केले त्या झियाने त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला! म्हणजे रक्तलांछित खांदेपलटाची पद्धती आजही चालूच आहे. (खाली दिलेला फोटो पहा!) यानेच पुढे त्यांना कैदेत टाकले व खोट्या आरोपाखाली दोषी ठरवून मारून टाकले. अशा शत्रूशी आपली गाठ आहे, पण दुर्दैवाने आपण आजही पृथ्वीराज चौहानांचाच कित्ता गिरवतो आहोत.
पाकिस्तानात ISI ही सर्वशक्तिशाली संघटना असावी असे मला वाटते. लष्करही त्यांना आटोक्यात ठेवू शकत नाहींत असे मानायला जागा आहे. व या दोघांच्या हातात सत्ता असताना त्यांच्या कुठल्याही विधानांवर वा आश्वासनांवर विश्वास ठेवणे मूर्खपणाचेच ठरेल.
पुढे मुशर्रफ यांच्या राष्ट्रपती होण्याच्या आधीच्या कारकीर्दीबद्दल माहिती येईलच. त्यात या माणसाने कशा लष्कर-ए-तोयबासारख्या संघटना उभ्या केल्या तेही येईल. पण आपल्याशी बोलतांना मात्र तो निर्लज्जपणे "ते अतिरेकी नसून स्वातंत्र्यसैनिक आहेत" असे मानभावीपणे म्हणायचा. मग आज 'स्वात'मध्ये जो पाकिस्तानी लष्कराचा धिंगाणा चालू आहे तो तिथल्या स्वातंत्र्यसैनिकांना मारण्यासाठी आहे असे समजायचे कां?
म्हणूनच कृष्णासाहेब कशासाठी पुन्हा चर्चासत्र सुरू करताहेत व नव्या 'पृथ्वीराज'च्या भूमिकेत का जात आहेत ते कळत नाहीं! जुना अनुभव पुरेसा नाहीं कां?
(भुत्तो व झिया)
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
काका, मी मुळ पुस्तक मिळवुन वाचल असत की नाही ही शंका आहेच.
पण तुम्ही ज्या जिद्धीने आणि चिकाटीने हे भाषांतर करुन आम्हा सर्वांसमोर आणताय त्याबद्दल Hats off To You.
पुढील भागाची आवर्जुन वाट पहातोय.
घेऊन हि लेखमाला लिहित आहात त्याबद्दल साष्टांग नमस्कार, हि लेखमाला सध्या उप्लब्ध भाषांतरित साहित्यामधील मैलाचा दगड ठरणार यात शंका नाही. या लेखमालेचे सुंदर असे पुस्तक व्हावे अशी मनापासून इच्छा.जेणेकरून या क्षेत्रातील अभ्यासकांना आणि प्रसंगी धोरणकर्त्यांना सुद्धा मार्गदर्शक ठरेल.
"योजकस्तत्र दुर्लभः" असे एक संस्कृत सुभाषित आहे. म्हणजे 'मॅनेजर' जातीची माणसं दुर्मिळ/दुर्लभ असतात.
डॉ. खान यांच्या योजकत्वाची कर्तबगारी पाहिली तर कौतुक वाटते. जरी ते धातुशास्त्रातले डॉक्टरेट असले तरी ते एक भाषांतरकार म्हणून नोकरी करीत होते, त्यांना सेंट्रीफ्यूजेसच्या इतक्या बारकाया माहीत असण्याचे कारण नव्हते. पण त्यांनी एक तर सगळ्या गोष्टी नीट पाहून घेतल्या, चोरल्या, कुठल्याही गोष्टीचा विधिनिषेध ठेवला नाहीं, ज्या येत नव्हत्या त्यांच्या साठी चांगली माणसं नेमली व सर्व विभाग त्यांनी एकदम सुरू केले. अगदी चांचणीचे बोगदेही खणून ठेवले. त्यामुळेच त्यांनी ७ वर्षांचे लक्ष्य पूर्ण केले.
आपला शत्रू असला तरी या माणसाची कर्तबगारी अफाट होती. आज हा बदनाम केला गेलेला शास्त्रज्ञ नजरकैदेत आहे. पाकिस्तान हे राष्ट्र किती कृतघ्न आहे!!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
आज हा बदनाम केला गेलेला शास्त्रज्ञ नजरकैदेत आहे. पाकिस्तान हे राष्ट्र किती कृतघ्न आहे!!
डॉ खान आज जे नजरकैदेत आहेत ते त्यांनी पाकिस्तानसाठी बाँब बनवला म्हणून नव्हे तर, गुप्त माहिती त्यांनी इतर देशांना (विशेषतः उत्तर कोरिया) विकली जे अमेरिकेला आवडले नाही म्हणून. यात पाकिस्तानच्या कृतघ्नपणाचा संबंध नाही, असे वाटते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
या पुस्तकाच्या भाषांतरात नंतर येईलच, पण यापुढच्याच भागात येत आहे कीं झियाला हा बाँब फक्त पाकिस्तानसाठीच नव्हे तर सर्व "उम्मा"साठी असावा असेच वाटत होते. उम्मा (ummah) म्हणजे आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावरील व मोरोक्कोच्या दक्षिणेकडील मॉरिटॅनियापासून पाकिस्तानपर्यंतचे मुस्लिम जग.
शिवाय सर्व ठिकाणी डॉ. खान पाकिस्तानच्या स्पेशल विमानाने गेले ते काय सरकारची आज्ञा असल्याशिवाय?.
अफगाणिस्तानमधून रशियाला हकलल्यानंतर अमेरिकेचे "गरज सरो, वैद्य मरो" झाले. त्यांनी पाकिस्तानला मदत देणेही बंद केले. फुकट खायच्या संवयींमुळे पाकिस्तानचे दिवाळे वाजायला आले. अशा वेळी लष्करशहांच्या आज्ञेनुसार खान परमाणूविद्या विकायला बाहेर पडले. पण अमेरिकेच्या Blue-eyed Boy ला (मुशर्रफला) वाचवण्यासाठी डॉ. खान यांचा 'बकरा' बनविण्यात आला तेही त्यांच्या मुलींच्याबाबत त्यांना ISI तर्फे धमक्या देऊन. त्यासाठी आर्मिटाज नावाचा अमेरिकेच्या परराष्ट्राखात्यातील एक 'मुत्सद्दी' इस्लामाबादला 'रंगीत तालमीं'साठी तळ ठोकून बसला होता. (याच आर्मिटाजच्या धमक्यांचा उल्लेख मुशर्रफच्या In the line of fire मध्येही आहे.) http://tinyurl.com/ybwvk7j या दुव्यावरही थोडे-फार समजेल. खान आयत्या वेळेला खरं सांगतील म्हणून त्यांचे live भाषण जनतेला थेट ऐकवले गेले नाहीं तर त्यात थोडा phase difference ही ठेवला होता!
शिवाय या पुस्तकात चिनी शास्त्रज्ञांचा हवाला देऊन खान म्हणतात की हे राज्यकर्ते गरज आहे तोवर तुम्हाला डोक्यावर घेतील व गरज संपली कीं नको त्या 'नाजुक' जागेवर लाथ मारतील!
याच लेखातील टिपेत मी म्हटल्याप्रमाणे डच गुप्तहेरखाते अगदीच फालतू असावे किंवा त्यांनी पाकिस्तानच्या "लीलां"कडे मुद्दाम दुर्लक्ष केले असावे असे वाटण्यास जागा आहे.
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
काळेकाका,
"योजकस्तत्र दुर्लभः" असे एक संस्कृत सुभाषित आहे. म्हणजे 'मॅनेजर' जातीची माणसं दुर्मिळ/दुर्लभ असतात.
योजक म्हणजे मॅनेजर नाही. योजक म्हणजे प्लॅनर. मॅनेजरला व्यवस्थापक हा प्रतिशब्द आहे. मॅनेजर पैशाला पन्नास मिळतात.
बाकी भाषांतराविषयी नंतर. आपण बरीच मेहनत घेताहात. उपक्रमावर राधिकाताईंनी भाषांतराविषयी खूप छान लिहिले आहे नुकतेच. ते वाचावे, ही विनंती.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
मिसळभोक्ता-जी,
१) <<उपक्रमावर राधिकाताईंनी भाषांतराविषयी खूप छान लिहिले आहे नुकतेच>> कुठे आहे? मी पाहिले नाहीय् पण पहायची इच्छा आहे.
२) मी संस्कृत भाषेचा "पंडित" नाहीं. पण पूर्ण श्लोक असा आहे:
अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् | अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ||
कुठलंच अक्षर असं नाहीं कीं ज्याचा मंत्र बनू शकत नाहीं, कठलीच मुळी अशी नाहीं कीं ज्याचे औषध बनू शकत नाहीं, कुठलाच पुरुष (किंवा बाई) अयोग्य नसते. कमी असते योजकाची. म्हणजे सुविद्य माणूस कुठल्याही अक्षराचा मंत्र बनवू शकतो, चांगला वैद्य कुठल्याही मुळीचं औषध बनवू शकतो, तसाच 'योजक' कुठल्याही व्यक्तीला उपयुक्त बनवू शकतो.
माझ्या मतें इथे योजकाचा अर्थ मॅनेजर असाच असावा. किंवा कोऑर्डिनेटर. प्लॅनर? अर्थाच्या दृष्टीने प्लॅनर बरोबर फिट होत नाहीं असे मला वाटते. पण ते असू द्या! मुख्य मुद्दा हा कीं खान हे चांगले 'योजक' होते!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
धन्यवाद, अक्षय!
मला स्वतःलाच जाणवतंय् कीं माझे प्रस्तावनेचे भाषांतर (जे मी पुन्हा लिहिणार आहे) व दुसर्या प्रकरणाचे भाषांतर यात खूप फरक दिसतो. इंग्रजीत clauses चा सुळसुळाट असतो. तो मराठीत तसाच ठेवल्यास भाषा बोजड होते. ते माझ्या लक्षात येत असतानाच मला मिपावरील एका मित्रांनी ते माझ्या लक्षात आणून दिले. त्यानंतर माझ्या भाषांतराची प्रत (quality) सुधारली आहे असे मला जाणवत आहे.
असो. बघू या 'सकाळ'च्या वाचकांच्या काय प्रतिक्रिया येतात ते.
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
काका!
तुमच्या चिकाटीला व परिश्रमांना सलाम!
आता हा अनुवाद तुंम्ही पुस्तकरुपात कसा प्रकाशित होईल यासाठी प्रयत्न करायलाच हवेत.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
प्रो आणि ऍन्टी, असे दोन गट प्रत्येक क्षेत्रात, जागातील काही मोठ्या भांडवलदारांच्या गटाने गेली काही वर्षे पोसलेले आहेत. असे "मेकिंग ऑफ ए प्रेसिडेंट" हे पुस्तक वाचताना उमजले. ते प्रत्यक्षात ईराण मध्ये राहून अनुभवले व आता त्याचा बोलबाला फार मोठा झाला आहे. ह्या दोन गटांचा वापर करून तो भांडवलदार गट जगात कोठेही केव्हांही जानमालाची हानी घडवून आणीत आहे व खूप मोठी मालमत्ता म्हणजे जगावरचे सरवार्थाने नियंत्रण मीळवण्यात यशस्वी होत आहे. कदाचीत हा दुवा उपयोगी ठरेल.
http://video.google.com/videoplay?docid=7065205277695921912#
तुमचा आगळा प्रतिसाद खूप आवडला पण दुर्दैवाने नीट समजला नाहीं. "मेकिंग ऑफ द प्रेसिडेंट १९६०" हे केनेडींच्या निवडणुकीवरील व "सेलिंग ऑफ द प्रेसिडेंट १९६८" हे निक्सन यांच्या निवडणुकीवरील अशी दोन्ही पुस्तके मी वाचली आहेत. पण त्यात तुम्ही लिहिलेला संदर्भ वाचल्याचे आठवत नाही. तुम्ही व्हीडियोचा जो दुवा दिला आहे तो पहायला खूप वेळ लागेल. त्याचे Text असल्यास जरूर पाठवावे.
पण तुम्ही म्हणता ते खरेच आहे. भांडवलदार आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी दोन विरोधी गटांना झुंजवतात. आफ्रिकेतील सुदान, अंगोलासारख्या खूप राष्ट्रात सध्या हे पहायला मिळतेच.
आपण किती साली इराणला होता? आपल्याशी फोनवर बोलायला आवडेल. तरी आपल्यालाही तशी इच्छा असल्यास आपला फोन नं. कळवावा. मी जरूर फोन करेन.
आपल्या आगळ्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!
सुधीर
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
चार-पाच दिवसापूर्वी 'बीबीसी'वर मी मार्क झीगल (Mark Siegel) कृत "भुत्तो" या चित्रपटावरील कार्यक्रमाचा शेवट पाहिला (म्हणजे मी तिथे पोचेपर्यंत कार्यक्रम संपत आला होता).
त्यात मार्क म्हणतो कीं जुल्फिकारला तर फासावरच लटाकाविले. तो सगळा रचलेला बनावच होता पण बेनझीरच्या मृत्यूनंतर ज्या 'तत्परते'ने सगळे पुरावे नष्ट केले गेले त्यामुळे त्यांना या मृत्यूतही सरकारचाच हात दिसतो वगैरे.
भुत्तो कुटुंब केनेडी कुटुंबासारखेच दुर्दैवी आहे व नेहमी प्रकाशझोतात आहे. दोन्ही कुटुंबांची कहाणी दर्दनाक आहे.
कुणी तो चित्रपट पाहिला आहे कां? डीव्हीडी मिळते का? असल्यास कळवावे.
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
प्रतिक्रिया
सलाम ... पुढचा भाग?
हेच म्हणतो
सलाम
ही लेखमालिका जरा आटोक्यात आली कीं असे उत्खनन करेन
मनापासून आभार!
काका हा
त्यात तुझा प्रतिसाद बहुदा गळफटला!
खुप ओघवति
खुप ओघवति
त्रिवार वंदन!
छान
१ नंबर...
शत्रूला ओळखून असावे असे म्हणतात!
काका, मी
काका तुम्ही जे कष्ट
आपला शत्रू असला तरी या माणसाची कर्तबगारी अफाट होती
कृतघ्नता
चुकून दोनदा प्रकाशन झाल्यामुळे रद्द
त्यांनी पाकिस्तानच्या "लीलां"कडे मुद्दाम दुर्लक्ष केले असावे
योजक
राधिकाताईंनी भाषांतराविषयी खूप छान लिहिले आहे नुकतेच?
वाचत आहे आणि अनुवादासंदर्भात उपयुक्त दुवा
Removed due duplication
धन्यवाद, अक्षय!
काका!
प्रो आणि ऍन्टी,
तुमचा आगळा प्रतिसाद खूप आवडला!
हा लेखही आवडला
मार्क झीगलकृत "भुत्तो" हा चित्रपट