हे प्रकरण!
त्या आधी दोनच महिने-१९७४ साली-भारताने पोखरण येथे आपली पहिली अनधिकृत अण्वस्त्र चांचणी केली होती. भारताने जगातील प्रस्थापित अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडून केवळ उर्जानिर्मितीसाठी म्हणून मिळविलेले तंत्रज्ञान वापरून गुप्तपणे आपल्या पहिल्या अण्वस्त्राचा आरखडा (design) बनविला व त्याचे उत्पादनही केले. एक तर्हेने हा त्या राष्ट्रांशी केलेला मित्रद्रोहच होता.
हे पुस्तकात असेल पण याबाबत अधिक माहिती मिळाली तर बरे होईल.
सध्या मलाही याबद्दल माहिती नाहीं. मी हे पुस्तक पूर्ण वाचले आहे. पण आपण विचारलेली माहिती या पुस्तकातही नाहीं. पण जमल्यास शोधून लिहीन. पण जरा वेळ लागेल.
------------------------
सुधीर काळे
Parkinson's Laws
1. Work expands to occupy time available.
2. Bureaucrats add subordinates, not rivals.
3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!
माहितीपूर्ण लेख.
आवडला...
विषेशतः खालील वाक्य फारच आवडले...
अंगावर केवळ कानातले लाल रंगाच्या प्लॅस्टिकचे कुड्या असायच्या
कवटी
_____________________________
माझ्या कारकीर्दीला सहा वर्षं पूर्ण झाली.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार सहा वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
या विषयावर फारसे लिहिण्याची अथवा टिप्पणी करायची पात्रता नाही माझी पण तुम्ही घेत असलेली मेहनत मात्र खरंच दाद घेऊन गेली. पुढचे भाग वाचेन... टिप्पणी जमेलच असे नाही. :)
बिपिन कार्यकर्ते
येस...
उत्तम लेख.. मन लावून वाचला...
पुढचेही वाचणार..
हॉलंडच्या माहिती गोपनीय राखण्याच्या कौशल्याचे अंमळ कौतुक वाटले. ;)
तुमच्या मेहनतीला दाद देतो...
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
या प्रकरणाचे भाषांतर करताना कांहीं गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्या लिहितोय्. एक म्हणजे डॉ खान यांच्याच तोडीचे जे आपले शास्त्रज्ञ ए.पी.जे. अब्दुल कलाम आहेत त्यांना आपण राष्ट्रपती बनविले व त्यांना दुसरी टर्म मिळावी म्हणून जी सह्यांची मोहीम सुरू केली गेली होती त्यात माझ्यासारख्या राजकारणात फारसे नसलेल्यांनीही हिरीरीने भाग घेतला होता. या उलट पाकिस्तान सरकारची नीशान-ए-इम्तियाज़ ही अत्युच्च मुलकी पदवी दोन वेळा दोन वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांकडून प्राप्त झालेल्या डॉ. खान यांना लष्करशहांची (नसलेली) 'इज्जत' वाचवण्यासाठी PTV वरून त्यांची कांहींही चूक नसतांना माफी मागायला भाग पाडण्यात आले. का? कारण मुशर्रफ हा बदमाष इसम निर्दोषी दिसावा म्हणून डॉ. खान यांना बळीचा बकरा बनविले गेले. आजही तांत्रिक दृष्ट्या ते घरकैदेतच आहेत. त्यांची अतीशय मानहानी करण्यात आली.
कुठे आपण केलेला सन्मान व कुठे पाकिस्तानने आपल्या हिर्याचा केलेला कचरा (कीं कोळसा?)!
दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती अशी कीं डॉ. खान एक go-getter प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांनी आपल्याला नोकरी मिळावी म्हणून आपल्या प्राध्यापकांकडून, मित्रांकडून शिफारसपत्रांचा पाऊस पाडला. आपली बदली योग्य जागी व्हावी म्हणून (जिथे त्यांना गुप्त तंत्रज्ञान मिळेल तिथे) सहकार्यांना वारंवार पत्रे लिहिणे, ऑफीसमधल्या टायपिस्ट पोरींना चॉकलेट वगैरे देऊन खूष ठेवणे व त्यांच्याकडून एरवी मिळाल्या नसत्या अशा टॉप सीक्रेट गोष्टी मिळविणे वगैरे करतांना त्यांनी कसलाही विधिनिषेध ठेवला नाहीं.
कदाचित् फाळणीच्या वेळी झालेल्या हाल-अपेष्टांमुळे असेल पण हिंदूंवर व भारतावर त्यांना अगदी खरा-खुरा राग होता व भारताबद्दल एक तर्हेचा आकस/तिरस्कार/वैरभाव अगदी मनापासून होता.
तसेच डॉ खान यांना प्रचंड प्रमाणावर अहंकार/दुरभिमान (ego) होता.
पाकिस्तानला अण्वस्त्र मिळवून देण्यासाठी योग्य ते निर्णय वळेवर व जराही कां-कूं न करता घेणार्या पकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांना कुत्र्याच्या मोतीने मारले एकाद्या गुन्हेगारासारखे फासावर लटकावून! त्यांचाही खान यांच्यासारखाच अपमान करण्यात आला. आणि कुणी फासावर लटकावले? तर कांहीं इतर जास्त ज्येष्ठ अधिकार्यांना डावलून भुत्तोंनी ज्यांची पदोन्नती केली त्या झियानीच. कृतघ्नतेची पराकाष्टाच पहायला मिळते या वागणुकीत!
पाकिस्तानमध्ये "लष्कर म्हणजे सब कुछ" ही दंडुकेशाही कशी चालली आहे हे वाचले कीं अंगावर शहारे येतात.
मग वाटते कीं जे लोक फाळणीच्या वेळी मोठ्या अपेक्षा ठेवून पाकिस्तानात गेले ते पस्तावत असतील काय? पै. जिन्नांच्या आत्म्यालाही "हेचि फल काय मम तपाला" असे वाटत असेल काय?
मागे आपल्या ए.आर. रहमानला ऑस्कर मिळाले तेंव्हा एका पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला व एका पाकिस्तानी उच्चपदस्थ गृहस्थाने लिहिलेला लेख मी (बहुदा) खरडफळ्यावर चढवला होता त्याची आठवण झाली. तो लेखक म्हणतो कीं नशीब आम्हा मुसलमानांचे कीं कांहीं मुस्लिमांनी पाकिस्तानात न येता भारतातच रहाण्याचा निर्णय घेतला व भारतातल्या चढाओढीच्या वातावरणामुळे त्यातल्या एकाला आज ऑस्कर मिळाले. नाहीं तर तो एकाद्या जमीनदाराच्या खासगी जलशात गाणारा एक साधारण/सुमार गायक राहिला असता.
कुणाला हा लेख वाचायचा असेल तर मी पुन्हा चढवू शकतो. तसे इथे नमूद करावे.
यातला कांहीं भाग पुढील कांहीं प्रकरणात येईलच.
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
(जगजीत-चित्रा यांनी गायलेली एक अप्रतिम गज़ल)
काळे साहेब,
तुमचा व्यासंग जबरदस्त आहे. त्याच बरोबर तुम्ही घेत असलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. एक काम करा... अश्या प्रतिक्रिया टाकण्यापेक्षा तुम्ही याची क्रमशः लेखमाला बनवा आणि ती चढवत जावा ही विनंती.
टार्गट प्रतिसादांकडे (एक तर मीच दिलाय) कृपया दुर्लक्ष करा. पण ही विनंती मनावर घ्याच. तुमचे लेख वाचायला खरच खुप छान आहेत .
कवटी
कवटी-जी,
कौतुकयुक्त शब्दांबद्दल धन्यवाद!
जर ठरल्याप्रमाणे घडले तर एका प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रात हे लेख एका मालिकेच्या रूपाने प्रसिद्ध करायचे ठरले आहे. चार प्रकरणे झाली कीं या मालिकेतील पुष्पें प्रकाशित व्हायला सुरुवात होईल. आतापर्यंत दोनच प्रकरणे हातावेगळी झाली आहेत व तिसरे प्रकरण 'ऐरणी'वर आहे!
आपला प्रतिसाद टारगट नव्हता. लिहिताना आधी "डूल" हा (पुल्लिंगी) शब्द वापरला होता कारण "कुडी" हा (स्त्रीलिंगी) शब्द कांहीं केल्या आठवेना. जेंव्हा आठवला तेंव्हा तो वापरला पण वाक्यात स्त्रीलिंगी शब्दाला योग्य शब्द वापरायचे नजरचुकीने लक्षात आले नाहीं. व्याकरणात झालेली ही चूक तुम्ही निदर्शनास आणून दिलीत व ती मी लगेच दुरुस्तही केली.
तरी माझ्याकडून कुठलाच गैरसमज नाहीं. काळजी नसावी!!
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
(जगजीत-चित्रा यांनी गायलेली एक अप्रतिम गज़ल)
व्याकरणात झालेली ही चूक तुम्ही निदर्शनास आणून दिलीत व ती मी लगेच दुरुस्तही केली.
गैरसमज होतोय काळेसाहेब.... व्याकरणातली चुक दाखवायचा हेतू नव्हता... (खरे म्हणजे तुम्ही सांगितल्या नंतर त्यात चुक होती हे लक्षात आले... आधी कळालेच नव्हते... ;))
अंगावर केवळ कानातले लाल रंगाच्या प्लॅस्टिकचे कुड्या असायच्या.
यादृष्टीने टार्गट म्हणालो... (आंबट म्हणायलाही हरकत नव्हती)
तरी माझ्याकडून कुठलाच गैरसमज नाहीं. काळजी नसावी!!
धन्यवाद!
कवटी
_____________________________
माझ्या कारकीर्दीला सहा वर्षं पूर्ण झाली.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार सहा वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
मी कलामसाहेब व डॉ. खान यांची तूलना केली नव्हती तर भारतीय व पाकिस्तानी राज्यकर्त्यांची. एका देशात एका श्रेष्ठ शास्त्रज्ञाच्या कामगिरीचे अत्युच्च स्तरावर कौतुक झाले तर दुसर्या देशात दुसर्या एका श्रेष्ठ शास्त्रज्ञाचा अति नीच स्तरावर अपमान करण्यात आला.
नंतर जरा शोधून मी एक लिंक इथे देईन म्हणजे कळेल कीं डॉ. खान यांच्यावर अशी माफी मागण्यासाठी जबरदस्ती कशी केली गेली.
डॉ. खान यांना माफी मागायला लावल्याची घटना झाल्यावर पाकिस्तानी लोक त्याच्या निषेधात रस्त्यावरही आले, पण लष्करी बडग्यापुढे तो विषय थांबला!
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
(जगजीत-चित्रा यांनी गायलेली एक अप्रतिम गज़ल)
'पुनेरी'साहेबांच्या प्रतिसादातला प्रश्नः
"त्या आधी दोनच महिने-१९७४ साली-भारताने पोखरण येथे आपली पहिली अनधिकृत अण्वस्त्र चांचणी केली होती. भारताने जगातील प्रस्थापित अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडून केवळ उर्जानिर्मितीसाठी म्हणून मिळविलेले तंत्रज्ञान वापरून गुप्तपणे आपल्या पहिल्या अण्वस्त्राचा आरखडा (design) बनविला व त्याचे उत्पादनही केले. एक तर्हेने हा त्या राष्ट्रांशी केलेला मित्रद्रोहच होता." हे वाक्य उद्गृत करून पुनेरी साहेब विचारतातः
"हे पुस्तकात असेल पण याबाबत अधिक माहिती मिळाली तर बरे होईल."
इथे मला तीन प्रश्न दिसतातः
१) "अनधिकृत" (unauthosized) हा शब्द कां वापरला आहे?
२) आपल्याला वीजनिर्मितीसाठी दिलेले तंत्रज्ञान आपण इतरत्र वापरता कामा नये अशी अट आपल्या या तंत्रज्ञानाबद्दलच्या करारात होती कां?
३) आपण जो बाँब बनवला त्यात वीजनिर्मितीसाठी दिलेल्या तंत्रज्ञानाचा आपण वापर केला होता का?
यापैकी कुठल्या प्रश्नाबद्दल पुनेरीसाहेब विचारताहेत हे कळले तर बरे होईल. या पुस्तकाच्या शेवटी अनेक "Notes" आहेत त्यात जाऊन पहाता येईल. कदाचित उत्तर मिळेलही!
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
(जगजीत-चित्रा यांनी गायलेली एक अप्रतिम गज़ल)
या विधानासंदर्भात वरील तीन प्रश्न तर उभे रहातातच पण मोठा प्रश्न म्हणजे आपली अण्वस्त्रचाचणी कितपत इंडीजिनीअस होती. जर पुस्तकातले वाक्य खरे असेल तर पाकिस्तान आणि भारतात फरक काय रहातो? अश्या शंका होत्या.
धन्यवाद, पुनेरीसाहेब!
माझ्या मते unauthorised म्हणजे गुपचुप केलेला. कारण दोन्ही लेखक या पुस्तकात असे कुठेही म्हणत नाहींत कीं आपल्या कुणा शास्त्रज्ञाने ड्रॉइंग्ज वगैरे चोरली. फक्त इतकंच म्हणतात कीं ते तंत्रज्ञान आपल्याला वीजनिर्मितीसाठी दिलेलं होतं ते आपण बाँब बनविण्यासाठी वापरलं! पण तसा रीअॅक्टर तर अमेरिकेने पाकिस्तानलाही दिला होता (Karachi Nuclear Power Plant-KANUPP).
आपला परमाणूबाँब शुद्धीकृत युरेनियमवर आधारित होता कीं प्लुटोनियमवर हे मला माहीत नाहीं व त्याचा पुस्तकात कुठेही उल्लेख नाहीं. कदाचित् श्री आनंद घारे याचे उत्तर देऊ शकतील. मीही स्वतः चौकशी करेन.
वाचक इतके बारकाईने हे वाचताहेत याचा आनंद खूप आहे.
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
(जगजीत-चित्रा यांनी गायलेली एक अप्रतिम गज़ल)
हा लेख इंग्रजीत लिहिलेला आहे व माझाही नाहीं. पण वाचनीय आहे व अपवाद करण्यास योग्य आहे!
============जय हो!============
(This is an editorial in a Pakistani newspaper called Daily times: Written by Nadeem Ul Haque, a well known Pakistani writer:)
Many of us watched the Oscars with a lump in our throats when AR Rehman was given a standing ovation by the American movie establishment. Rehman, a Muslim from a country we don’t consider friendly to Muslims, was eulogised by the Hollywood establishment, traditionally controlled by those of the Jewish persuasion. Rehman’s obvious talent overwhelmed them all. Jai ho!
There he stood, saying simple but powerful words: “I had a choice between love and hate. I chose love!” A simple Muslim of simple origins made us all proud with his talent. Jai ho!
What would he have been had he been in Pakistan ?
He converted from Hinduism to Islam in 1989. Here, such a conversion would have put him in grave danger; quite possibly, some zealot might even have snuffed out his talent. Yet in his acceptance speech at the Oscars, at one point he said “Allah-o Akbar!” Jai AR Rehman!
For many years we have comforted ourselves by saying that Muslims have no opportunities in India and that Pakistan was made to give Muslims opportunities. Indeed, Pakistan has given some a lot of opportunities to get rich. There are numerous stories of excess wealth gained through government-dispense d licenses and plots, misuse of power, and other abuses of public office. Wealth has been created and the new class of rich shows off its Porsches, Range Rovers and other expensive toys. Their lifestyles could even dwarf some of the well-heeled rich and famous in India and the West. While we laud wealth and power, talent has no place in Pakistan .
The rest of us run around serving these princes. Talented musicians like AR Rehman play at the pleasure of this class. They play at their parties and the expensive weddings of their children; they play and the aristocracy hardly notices them. They do not even stay quiet during performances, pay no attention to the artists or give them the feeling of stardom. Because the stars are the aristocrats who managed to make their money through corruption and manipulation. Jai power!
In Pakistan , this would have been the fate of AR Rehman. He would have been a mere court musician. No Oscars, no recognition. Many a talented Pakistani musician has been forgotten. They leave behind some good music, of which we buy pirated versions. None is honoured. There are no Nur Jehan avenues or airports. No Nusrat Fateh Ali Khan squares, universities or buildings. No concerts; no awards and certainly no major movies that could get them to the Oscars.
We are all aware of how Bollywood is full of Indian Muslims. And they are widely respected in India . Darwin ’s ideas seem to be at work: Indian Muslims are flowering under competition and showcasing major talent. Jai ho!
Darwin is right here too. We in Pakistan face no competition. Our path to success is rapid gain through actions such as raiding the exchequer, befriending the powerful, influence-peddling or power-brokering.
Lives of privilege — where the taxpayer picks up the tab for everything: from umrahs to polo, from mujras to free air travel, and from plots to stocks — have led to generational deterioration. Hard work is looked down upon and he who competes internationally is only a kammi kamin. Ministers, the well-connected and the powerful, are not supposed to dirty their hands or even consort with kammis like AR Rehman and Nusrat Fateh Ali Khan.
Why? The answer is simple. Our leaders wanted to save themselves the hard work of competition. They wanted and got easy rents — handouts from the government. The army, the bureaucracy, the landed and the licensed industrialist all got it easily. They took no risks, they did not innovate, and they developed no products. They competed against no one for their ill-gotten gains, nor was there any accountability. Kids now see that the path to success is rents and influence, and that hard work and talent does not pay. After all, what did we do to Dr Abdus Salam? So why work hard?
We do produce talent, for no country of 200 million can be devoid of talent. Hashim Khan and his family, Imran Khan and his cousins, several cricketers and hockey players, the wrestler Bashir, and, of course, Abdus Salam. Now thankfully a few younger people like Mohsin Hamid and Daniyal Moinuddin are beginning to blaze some sort of trail. Will our musicians and artists have the opportunity to vie for the Oscars? No, for our elites are too busy destroying institutions, and talent cannot emerge without institutions.
These few talented people struggle against huge odds, with little recognition at home. But most of our younger generation is lost. Rich kids are given to pleasure and privilege, and the poor are turning to religion out of desperation.
We should be grateful that some Muslims remained in India and learned to compete. These Muslims are going to compete internationally and give us something to be proud of while our elites in Pakistan , who shun excellence and hard work, maintain their privilege and extravagance.
So thank you, AR Rehman. Jai Indian Muslims!
Nadeem Ul Haque is former Vice Chancellor of PIDE.
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
सदर लेखाचा मूळ लेखमालेशी संबंध काय ते समजले नाही. त्यातूनही, प्रस्तुत लेखात, Paakistan bashing पेक्षाही भारतात असलेल्या धर्मनिरपेक्ष राजकीय प्रणालीचा गौरव अधिक आहे, असे दिसते (जीच अनेकांना डाचत असते! ;) ).
असो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
माझ्या ६ फेब्रूवारीच्या प्रतिसादात खालील वाक्य होते.
तो लेखक म्हणतो कीं नशीब आम्हा मुसलमानांचे कीं कांहीं मुस्लिमांनी पाकिस्तानात न येता भारतातच रहाण्याचा निर्णय घेतला व भारतातल्या चढाओढीच्या वातावरणामुळे त्यातल्या एकाला आज ऑस्कर मिळाले. नाहीं तर तो एकाद्या जमीनदाराच्या खासगी जलशात गाणारा एक साधारण/सुमार गायक राहिला असता.
भारताचा याहून मोठा गौरव तो काय? मला फार अभिमान वाटला होता हे वाचून.
खरे तर भारतातील सर्वांगीण प्रगती ही आपल्या लोकशाहीचा व सुरुवातीच्या काळात कूळकायद्यासारखे जे अनेक क्रांतिकारी कायदे करण्यात आले व ज्यातून आपला आजचा भारताची मोठी शक्ती असलेला मध्यमवर्ग निर्माण झाला त्याचा गौरव आहे.
स्वातंत्र्याच्या सुरुवातीस धर्मनिरपेक्ष राजकीय प्रणाली सुंदरच होती, पण नंतर तिचा आधी काँग्रेसकडून व आता बहुतेक सर्वच पक्षांकडून सत्यानाश करण्यात आलेला आहे.
मी "पाकिस्तान बॅशिंग" कधीच करत नाहीं. "पाकिस्तानी सरकार बॅशिंग" करतो. पाकिस्तानी जनता तर आपल्याहून भयंकर परिस्थितीत आहे. अशा एकाद्या लेखाने ते उघड होते.
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
अनुवाद उत्तम झाला आहे. बरीच नवीन माहितीही मिळाली. प्रचंड मेहनत जाणवते.
पुनेरीसाहेबांचा प्रश्न मलाही पडला आहे. उत्तर तांत्रिक असेल तर ह्या लेखाचे काम संपल्यावर आरामात शोधून दिले तरी चालेल
वृत्तपत्रातील लेखमालिकेच्या योजनेसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन.
मात्र इथेसुद्धा येऊ दे पुढील भाग!
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
ऋषिकेश-जी,
पहिला "नैवेद्य" नेहमीच "श्री मिपाभगवंताला" असतो!
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
प्रतिक्रिया
जमलेय....
सध्या मलाही याबद्दल माहिती नाहीं
धन्यवाद
छान!
या विषयावर
+१
बिकांशी
+३
येस... उत्तम
उत्तम
हुश्श !
डॉ खान यांची स्वभाववैशिष्ट्ये
धन्यवाद
प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रात मालिका म्हणून प्रसिद्ध करायचे घाटतेय्
व्याकरणात
वाचनीय
भारतीय व पाकिस्तानी राज्यकर्त्यांची तूलना
'पुनेरी'साहेबांच्या प्रतिसादातले प्रश्न
धन्यवाद काळेसाहेब....
परमाणूबाँब शुद्धीकृत युरेनियमवर आधारित होता कीं प्लुटोनियमवर
इंग्रजीत आहे व माझा नाहीं. पण वाचनीय!
संबंध कळला नाही..
माझ्या ६ फेब्रूवारीच्या प्रतिसादाच्या संदर्भात लिहिले
वाचतोय
उत्तम
पहिला नैवेद्य श्री. मिपाभगवंताला!
खुप छान
वाचतोय
पुढचे प्रकरण अर्धे झालेय्.....