✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'फसवणूक'-प्रकरण सहावे-ज्यूंचा कल्पनाविलास

स
सुधीर काळे यांनी
गुरुवार, 04/01/2010 - 15:39  ·  लेख
लेख

Book traversal links for 'फसवणूक'-प्रकरण सहावे-ज्यूंचा कल्पनाविलास

  • ‹ प्रकरण पाचवे: फसवणूक-पाकिस्तान, अमेरिका व अण्वस्त्रांचा गुप्त व्यापार
  • Up
  • फसवणूक-प्रकरण सातवे-पाकिस्तानी अणूबॉम्ब सार्‍या मुस्लिम जगताचा! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25567 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

उद्या जर तालीबानने अमेरिकेवर अणूबाँब टाकला तर रेगनच जबाबदार!

सुधीर काळे
गुरुवार, 04/01/2010 - 16:17 नवीन
पाचव्या व सहाव्या प्रकरणांमध्ये नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला कारण एक आठवडा घरात पाहुणे असल्यामुळे काँप्यूटरला हातही लावता आला नाहीं व त्यानंतर घर बदलले! असो. हा भाग जरा नेहमीपेक्षाही लांब आहे. शिवाय मूळ पुस्तकातही त्याचे संकलन इतके छान झालेले नाहीं. पण मी नेहमीप्रमाणे फक्त भाषांतर व संक्षिप्तीकरणच केलेले आहे! रेगन या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल मला त्यांनी सोविएत युनियनला नामशेष केल्याबद्दल व अमेरिकन लोकांची कार्टर यांच्या कारकीर्दीत नाहींशी झालेली (इराणने धरलेले त्यांचे तेहरान दूतावासातले मुत्सद्दी वगैरेमुळे) अस्मिता परत आणल्याबद्दल खूप आदर होता. पण हे पुस्तक व आणखी एक "The Fall of House of Bush" ही दोन पुस्तके वाचल्यावर तो नाहींसा झाला. रिपब्लिकन पक्षाला जे Conservatism चे ग्रहण लागले आहे ते फारच भयानक आहे व आपल्या धोरणाला यशस्वी करण्यासाठी कसलाही विधिनिषेध न बाळगता (जसे इथे रेगन यांनी केलेले आहे) हे रिपब्लिकन नेते कांहींही खरे-खोटे करायला तयार असतात. मनमानी करणार्‍या रेगन यांच्या कारकीर्दीची गाडी शेवटी "इराण-काँट्रा" या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या scandal मुळे रुळावरून उतरली. "हे सारे मला न सांगता केले गेले" असे सांगून रेगननी कानावर हात ठेवले व परिणामतः पॉइंटडेक्स्टर व नॉर्थ हे दोन मदतनिस कारगृहातही गेले. 'टॉवर कमिशन'ने रेगनना 'क्लीन चिट' दिली हे खरे पण ती अगदी ओढून-ताणून व केविलवाणी होती. वर ते "ते एक 'हँड्स-ऑफ' राष्ट्रपती होते" अशी सारवासारव (व संभावनाही) करण्यात आली होती. रेगन यांच्या निधनानंतर त्यांचे फोटो असलेल्या डॉलरच्या नोटा काढायचे घाटत होते. पण या पूर्णपणे अदूरदर्शी राष्ट्रपतींची इतकी लायकी होती असे मला तरी वाटत नाहीं. उद्या जर अमेरिकेवर तालीबानकडून अणूबाँब डागला गेला तर त्याची प्रथमिक जबाबदारी रेगन यांच्यावरच येईल. ही माझी मते 'टाईम' हे नियतकालिक व अनेक पुस्तके वाचून बनले आहे. पण ते चूक असू शकेल. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय/मराठी वाचकांकडून (विकास, चतुरंग, स्वाती२ किंवा इतर तसे सभासदांकडून) याला पुस्ती देण्याची किंवा वेगळा दृष्टिकोन मांडण्याची मी अपेक्षा करतो. हे पुस्तक वाचतांना मला कै. इंदिरा गांधी या 'वाघिणी'ची बर्‍याचदा आठवण झाली. जरी यावेळी त्यांना पाऊल मागे घ्यायला लागले असले तरी आधी लाल बहादुर शास्त्री व नंतर इंदिरा गांधी यांच्यासारखे पोलादी नेतृत्व भारताला पुन्हा कधी मिळेल असे राहून-राहून वाटले हेही खरे! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments

काय रे

शानबा५१२
गुरुवार, 04/01/2010 - 16:24 नवीन
काय रे हे!!! secret कसला भाउ......बोंबलुन तर झाल सर्व जगभर!! -हा प्रतिसाद त्या पहिल्या चित्राला.........लेख नाही वाचला......... ......हाआsssss बर वाटल खुप दीवसांनी...... *******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
  • Log in or register to post comments

खरं तर हे मत लेखकाचे आहे, माझे नाहीं.

सुधीर काळे
गुरुवार, 04/01/2010 - 16:36 नवीन
खरं तर हे मत लेखकाचे आहे, माझे नाहीं. आणि तुम्ही म्हणता तितका हा गुप्त व्यापार खूप लोकांना माहीत नाहीं. मी खरं तर अमेरिकेबद्दल खूप वाचतो, पण हे पुस्तक वाचेपर्यंत मलाही हा गुप्त व्यापार माहीत नव्हता. असो. लेख जरूर वाचा. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

थक्क झालो !

ज्ञानेश...
गुरुवार, 04/01/2010 - 18:06 नवीन
#:S आंतरराष्ट्रीय राजकारणाचे इतके सूक्ष्मातिसूक्ष्म पदर उलगडून दाखवणार्‍या लेखनाबद्द्ल श्री. काळे यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. एरवी आपण किती सहज, उथळपणे असल्या चर्चा करतो- अमेरिकेने अमके केले पाहिजे, भारताने तमके केले पाहिजे वगैरे... :) इंदिराबाई खरोखर कहूतावर हल्ला करण्याच्या तयारीत होत्या, हे वाचून धक्का बसला. त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला. मात्र शेवटी हे घडू शकले नाही, याची खंत वाटते. हे घडले असते, तर आज दक्षिण आशिआचा इतिहास काही वेगळा दिसला असता! काळेसाहेब, तुमच्या मेहनतीला दाद देतो ! सलाम !! =D>
  • Log in or register to post comments

मजकूर लेव्ही व स्कॉट-क्लार्क यांचा आहे.....

सुधीर काळे
Sat, 04/03/2010 - 07:31 नवीन
ज्ञानेश-जी, मूळ मजकूर एड्रियन लेव्ही व कॅथरीन स्कॉट-क्लार्क यांचा आहे, मी फक्त संक्षिप्तीकरण व भाषांतर करतोय्. माझी मेहनत जरूर आहे, पण तिला 'ढोर मेहनत'च म्हणावे लागेल. पण हे पुस्तक मला आवडले, आपला जन्मजात शत्रू असलेल्या पाकिस्तानने कसे हुशारीने फासे टाकले, राजकारणात सज्जनपणापेक्षा धूर्तपणा कसा महत्वाचा आहे व तो दुर्दैवाने कसा आपल्या नेत्यांत (इंदिराजी सोडून) नाहीं हे वाचल्यावर मला या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करावे असे वाटले. सर्व मंत्र्यांना व सर्व IAS अधिकार्‍यांना, कमीत कमी परराष्ट्र खात्याच्या मंत्री, उपमंत्री, परराष्ट्र खात्याच्या Minister of State व परराष्ट्रखात्यातल्या अधिकार्‍याना या पुस्तकाचे वाचन सक्तीचे करावे या विचारापर्यंत मी आलोय्. पण आमच्यासारख्याचे कोण ऐकतो म्हणा? पण एक कर्तव्य म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र लिहून मी अशी आग्रहाची सूचना केली आहे हे मात्र खरे. प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. ५००+ लोक हे भाषांतर वाचत आहेत व आपल्यासारखे 'दर्दी' वाचक या लिखाणाचे कौतुक करत आहेत यातच मला सर्व पावले! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

वाचता वाचता थकलो....

प्रमोद देव
Sat, 04/03/2010 - 08:35 नवीन
काळेसाहेब,पुन्हा एकदा तुमच्या चिकाटीला,जिद्दीला आणि मेहेनतीला सलाम. खरं तर हे सगळं वाचून आपल्या राजकारण्यांच्या नादानपणाचा खूप राग येतो...आणि म्हणे कौटिल्य ह्या देशात होऊन गेला...माझ्या मते पाकिस्तानी नेतेच त्याचे खरेखुरे वारसदार शोभतात. आता ह्या इतिहासावरूनही आमचे विद्यमान नेते काही शिकतील अशी आशा करणेही व्यर्थ आहे...कारण देशप्रेमाचे धगधगते स्फुल्लिंग वाटावे ...असा एकही राजकारणी/नेता दूर्दैवाने नजरेसमोर येत नाही. :( आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय ....अशी आपली गत आहे. आपण फक्त वाचायचे आणि उसासे सोडायचे.
  • Log in or register to post comments

या राखेतूनच आपला देश फिनिक्स पक्षासारखा नक्की पुन्हा जिवंत होईल!

सुधीर काळे
Sat, 04/03/2010 - 08:40 नवीन
या राखेतूनच आपला देश एकाद्या फिनिक्स पक्षासारखा पुन्हा जिवंत होऊन जुने वैभव प्राप्त करेल अशी आशाही करू या! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments

लष्करी अधिकारी देश अधिक चांगला चालवतात काय?

सुधीर काळे
Sun, 04/04/2010 - 09:28 नवीन
माझ्या १८व्या वर्षांपासून चार लष्करी अधिकारी पाकिस्तानात सर्वेसर्वा या नात्याने मी पाहिले व त्यांच्याबद्दल मी बरेच वाचलेही. अयूब खान (सुमारे १९५८ ते १९६७), याह्याखान त्यांच्यापाठोपाठ बांगलादेशाच्या निर्मितीपर्यंत, झिया-उल-हक (सुमारे १९७९ ते १९८८ मध्ये त्यांच्याच विमानाच्या स्फोटात त्यांचा मृत्यू होईपर्यंत) व अगदी अलीकडे मुशर्रफ (सुमारे १९९९ ते २००७ पर्यंत)! त्यात याह्याखानांचा अपवाद सोडला तर इतर तिघांच्या कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत तरी पाकिस्तानने आपले ईप्सित यशस्वीपणे साध्य केले असे वाटते. झियांच्या काळात पाकिस्तानने अमेरिकेच्या अनेक तर्‍हेच्या सैन्य करारात स्वत:ला बांधले असतांनासुद्धा चीनच्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रवेशाच्या बाबतीत मदत केली. इतकी कीं जॉर्ज H W बुश (जे त्यावेळी अमेरिकेचे संयुक्त राष्ट्र संघटनेत राजदूत होते) यांना पाकिस्तानला "तैवानला नका रे घालवू" अशा मिनत्या कराव्या लागल्या होत्या! पुढे "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" या तत्वातून चीन-पाकिस्तान मैत्री बहरली व या मैत्रीतून पाकिस्तानला अण्वस्त्रे बनविण्यात चीनचे खूप मोलाचे सहाय्य झाले. अयूबच्या काळात पाकिस्तानने SEATO सारख्या सैनिककरारांत पाकिस्तानला जोडले व तेंव्हापासून आजपर्यंत अमेरिकेच्या सहाय्यावर त्यांचा देश झकास चालला आहे. (मान-अपमान मानण्यावर आहे!) मुशर्रफच्या काळात "सरशी तिकडे पारशी" या नात्याने पाकिस्तानने अजीबात भीडमुर्वत न ठेवता तालीबानला वार्‍यावर सोडले. (हेही लक्षात ठेवले पाहिजे कीं तालीबान राजवटीला राजनैतिक मान्यता देणारे पाकिस्तान हे पहिले राष्ट्र होते.) आपल्या 'In the Line of Fire' या पुस्तकात मुशर्रफने आपले 'तत्वज्ञान' फारच छानपणे मांडले आहे. "After 9/11, the ground realities had changed" असे सांगून त्याने त्याच्या 'कोलांटीउडी'चे समर्थन केले आहे. (हे पुस्तक खरंच वाचण्यासारखे आहे, अगदी fiction म्हणूनसुद्धा!) याविरुद्ध आपले राजकीय नेतृत्व आपल्या हितसंबंधांचा पाठपुरावा इतका चांगला व परिणामकारक रीत्या करू शकलेले नाहीं! आपण सुरू केलेल्या व त्याबाबत खूप टिमकी वाजवलेल्या Non-aligned Movement चा परिणाम आपल्याला कुणी सच्चा मित्र नसण्यातच झाला आहे असेच माझे मत झाले आहे. माझ्या वाचनावरून मला असे वाटते कीं "राजकारणात कुणीच कायम मित्र वा कायम शत्रू नसतात. कायम असतात ते राष्ट्राचे हितसंबंध" हे तत्व पाकिस्तानी लष्करी अधिकारी जास्त यशस्वीपणे राबविताना दिसतात. आपले नेते असे देशाच्या हितसंबंधांचा निर्लज्जपणे पाठपुरावा करताना यशस्वी झालेले दिसत नाहींत. "Politics is the last refuge of the scoundrel" असे म्हणतात व राजकीय नेते scoundrel नसावेत पण धूर्तच असावेच लागतात. आपले नेते "धुतल्या तांदळासारखे स्वच्छ" नसले तरी राजकारणात भलतेच अपरिपक्व, 'भोळे सांब' वाटतात. असे कां होते? लष्करातील उच्चाधिकार्‍यांना व्यवस्थापनशास्त्राचे (Managementचे) खास व चांगल्या प्रतीचे शिक्षण दिले जाते काय? त्यामुळे लष्करी अधिकारी सत्तेवर असतांना त्यांचा देश अधिक चांगला चालवतात काय? पाकिस्तानच्या व भारताच्या लष्करी अधिकार्‍यांच्या प्रशिक्षणात खूप साम्य असणार (कारण दोन्ही अभ्यासक्रम ब्रिटिश पद्धतीवर अवलंबून असलेले असणार). मग आपल्या लष्करी अधिकार्‍यांना आपण जास्त चांगले कां वापरत नाहीं? कृष्णासाहेबांच्याऐवजी त्यांना परराष्ट्र-धोरण चालवायला कां देत नाहीं? लांच-लुचपत या बाबतीत दोन्ही बाजूला काळे-गोरे दाखविण्यासारखे कांहीं नाहीं. दोन्ही तर्‍हेची सरकारें दोन्ही हातांनी पैसे ओरपतच असतात! याबाबतही आपली मते तपासून पहा व प्रतिसाद द्या! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments

काळे साहेब

Dipankar
Sun, 04/04/2010 - 09:40 नवीन
काळे साहेब फार छान भाषान्तर आहे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सुधीर काळे
Mon, 04/05/2010 - 08:09 नवीन
दीपंकर-जी, धन्यवाद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा