बेधुंद (भाग १६ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
9 Aug 2016 - 10:45 pm

सेमिस्टर ६ (२००५ )

सुट्टीवरून पुन्हा कॉलेजला परत आल्यानंतर 'सम' सेमिस्टरची मस्ती सुरु झाली . अक्षा सोडला तर ,काही कुणाचे जास्त मार्क्स बदलले नाहीत . नेहमीप्रमाणे चंद्या , तात्या ,अश्विनी टॉप लिस्ट मध्ये , अक्षाचे मार्क्स जरा चांगलेच सुधारले होते अन पहिल्यांदाच तो टॉप ७ मध्ये आला होता , एकंदर 'फाईव्ह स्टार्स' चे ३ तारे पहिल्या १० मध्ये होते .
सुऱ्याचे दोन विषय उडाले होते , 'नेट'वर पाहिजी तितकी मस्ती केल्याने असेल कदाचित ! नित्या कसाबसा पास झाला होता ,परीक्षेच्या काळात १-२ महिने तो 'वरच्या' मेरीट लॉबीत येऊन राहत असे , चंद्या ,तात्या अन अक्षावर त्याला टॉपिक समजवून द्यायची जबाबदारी असे ! फर्स्ट सेमिस्टरच्या नितेश नोट्स चा दरारा आता 'कालबाह्य' झाल्या होता .
पुन्हा एकदा इंटरकॉलेज स्पर्धा सुरु होणार होत्या ! ह्यावेळी आपण 'युनिव्हर्सिटी' टीम मध्ये जागा पटकावयाचीच करायचीच असा निर्धार चंद्या , तात्या, अक्षा अन सुऱ्याने केला होता . नित्याने कधीच 'क्रिकेट' मध्ये अन 'बॅडमिंटन'मध्ये युनिव्हर्सिटी टीममध्ये जागा पटकावली होती . ह्यावेळी त्याची नजर 'खो-खो'च्या टीम मध्ये जागा पटकवण्यासाठी लागली होती . युनिव्हर्सिटी टीम मध्ये जागा पटकावणे ,महत्वाचे होते . सगळ्याच जणांना ते जमत नसे , जे अभ्यासात पुढे ते खेळात मागे - फाईव्ह स्टार्स त्याला अपवाद होते .
अक्षाने त्याच्या वक्तुत्व स्पर्धेची तयारी सुरु केली . तात्या , चंद्या , नित्या तिघेही 'खो --खो'ची 'प्रॅक्टिस' करत असत . ३-४ तासांच्या सरावानंतर त्यांची पार वाट लागून जाई . धड नीट चालताहि येत नसे ! तात्या खो- खो टीमचा कप्तान तर अक्षा वक्तृत्व स्पर्धेचा ! सहसा कॅप्टन ची निवड होताच असे असं साधारण गणित होत .
गेली २ वर्ष कॉलेजच्या टीम मध्ये असूनही , आपली युनिव्हर्सिटी टीममध्ये निवड झाली नाही - ह्याच दुःख होतच! युनिव्हर्सिटी झाली की , कॉलेजच्या वार्षिक 'मॅगझीन' मध्ये फोटो अन सर्टिफिकेट , शिवाय स्पर्धा परीक्षेत मुलाखतीसाठी 'स्पोर्ट्स' चे सर्टिफिकेट्स असले की वजन पडतेच !
ग्राऊंडवर नवीन 'हिरवळ' जरी असली तरी आता त्यांना त्यांच्यात काही इंटरेस्ट राहिला नव्हता . वेळेनुसार 'मस्तीची' पातळी ही उंचावत जाते किंवा खाली येते . अक्षाची GATE जावळ आली होती . तात्याची MPSC ची पूर्व परीक्षा ही जवळ आली होती त्यामुळे ही सेमिस्टर खूप महत्वाची आहे हे सगळ्यांना समजलं होत .
त्यातच 'शिवजयंती'चा उत्साह ! शिवजयंती साजरी करण्यासाठी एक मस्त प्रथा कॉलेजमध्ये होती . साधारण १०० किलोमीटर दूर असलेल्या एका गडावरून ज्योत पेटवून आणायची ! ज्योत विद्यापीठाच्या 'गेट'वर आल्यानंतर जवळ- जवळ सगळयाच वर्षाची मुले घोषणा देत - ती 'गर्ल्स हॉस्टेल' कडून पुढे यायची . .'गर्ल्स हॉस्टेलच्या' समोर ज्योत कुणी पकडायची हे आधीच ठरलेलं असायचं , अन त्यातही मुख्य करून फायनल इयरच्या 'स्टुडन्ट कौन्सिल'च्या चेअरमनला मान होता .
ज्योत तिथून पुढे मग 'बोईस हॉस्टेलच्या' TV हॉल मध्ये - महाराजांच्या फोटो समोर ती ठेवली जायची अन मग रात्री मिरवणूक !

महाराजांवर व्याख्यान द्यायला दिवसा 'ऑडिटोरिअम' मध्ये एक चांगला वक्ता बोलावलं जाई ! त्यातच ह्यावेळी कुणीतरी एक वक्ता ज्याने शिवरायांचे खरे शत्रू ब्राम्हण कसे होते हे पटवून देणारे पुस्तक लिहिले होते . भाषणात त्यांनी त्याचा काहीही उल्लेख केला नाही - त्याचे भाषण संपल्यावर सुऱ्याने त्यांना त्यांच्या पुस्तकांचा संदर्भ देत प्रश्न विचारला की - जर ब्राम्हण शत्रू होते तर मग बाजीप्रभू देशपांडे कोण होते ? सुऱ्याच्या ह्या ' बालिश' प्रश्नाचे उत्तर त्या तत्वज्ञाला देता आले नाही , त्यांनी कसेबसे आवरते घेतले !
रात्री ७ वाजल्यापासून , A हॉस्टेलचे वातावरण लाईट्सने उजळून निघाले होते . समोर DJ /साऊंड सिस्टम , मिरवणुकीसाठी ट्रॅक्टरला दिवसभर सजवले जायचे , ट्रॅक्टरवर महाराजांच्या फोटोशेजारी कोण 'मावळे' असणार हे आधीच 'शिवजयंती 'कमिटीने ठरवले असे ! असे मावळे बनण्याचाही एक वेगळाच थाट होता , कारण शिवजयंतीचा एक फोटो तरी कॉलेज मॅगझीन मध्ये नक्की असे ! फर्स्ट इयरचे बकरे जयन्तीत 'नाचवले' जायचे .
फाईव्ह स्टार्स ह्या सगळ्या पासून दूरच होत ! त्याच्या मैत्रीत 'जात -पात' असा काही उल्लेख नव्हता . सगळे सगळ्या वेगवेगळ्या जातीचे ! फक्त एका मैत्रीने ते बांधले होते .
हॉस्टेल च्या समोर सगळे जमा झाले. भगवे फेटे मुद्दामून दरवर्षीप्रमाणे 'कमिटीच्या मेम्बर 'साठी काही मोजकेच आणले होते . शक्यतो फक्त कमिटीच्या मुलांसाठी !
तिथेच सुऱ्या भगवा फेटा बांधून नाचत होता , संग्राम हा शिवजयंतीचा प्रमुख होता . त्याला एक फेटा कमी पडला म्हणून त्याने सुऱ्याचा फेटा जबरदस्तीने डोक्यावरून हिसकावून घेतला , सुऱ्या कमिटीत नव्हताच !
बस्स ! सुऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली , सुऱ्याला हे अपमानास्पद वाटले अन तिथंच तो मिरवणूकित संग्रामला भिडला .
'का बे संग्राम - तू फेटा का काढला ??? साले तुम्ही मराठा - तर , महाराज फक्त तुमचेच काय ? फक्त पोरींना बघितल्यावर - ' शिवाजी महाराज की जय 'पार बेबीच्या देठापासून ओरडता ! तेव्हाच महाराज आठवतात साले तुम्हाला? गाडीच्या मागे महाराजांचा फोटो चिटकवून अन इथं फोटोशेजारी उभा राहून, कुणी मावळा होत नाही , समजल ? - सुऱ्या आपला राग बरळत होता .
'तुम्ही , करा ना मग , '१४ एप्रिलला' जयंती अन नाचा दारू पिउन समोर , करा धिंगाणा , साले तुम्ही --- बिचारे गेले 'बाबासाहेब' तुम्हाला वर आणण्यात - काय बोलले ते 'शिका , संघटित व्हा , संघर्ष करा' , साला इथे शिकणं बाजूला राहिलं , संघटित होण्याचं तर नाव नाही , १७६० पक्ष एकाच जतीचे,--- फक्त संघर्ष करण्यात पुढे , काहीही झालं कि रास्ता रोको !!!! संग्राम ने जशास तसे उत्तर दिले .
संग्राम - वर्गणी गोळा करताना कितीचा घोटाळा केला आहे हे माहितेय , अन पिलाय तर तू पण आज , साल्या 'फेक' वर्गणीपुस्तक छापलीत तुम्ही, उगीच बोलत नाही म्हणून पाहिजे ते बरळू नको - अन जातीचं राजकारण कॉलेज संपल्यावर करायचं - इथं फक्त शिकायचं - नित्या मध्ये पडला .
' नित्या , त्या हर्षलाला पटवली म्हणजे लय 'शॉट' समजू नको स्वतःला ! - संग्रामचा मित्र अन शिवजयंती कमिटीचा संचालक 'प्रताप' मध्ये पडला .
'बेहनचोद ... तिला मध्ये आणू नको , त्या वक्त्याला तुम्हीच बोलावलं होत ना ? का दंगल करायचीय कॉलेज मध्ये ? - चंद्या मध्ये पडला !
' ओ , साहेब ...ए बामणा - तु बाजूलाच राहा ह्यातून , साला एक पक्ष चालेना महाराजांच्या नावावर म्हणून आता दुसरा काढलाय ह्यांनी , आपणच चुतिया साले - पळतोय मागे ह्यांच्या ! 'महाराष्ट्र' स्वतःच्या बापाचा असल्यासारखे बोलतात ! स्वतः AC रूममध्ये बसून दंगली भडकावयाच्या , महाराजांची औलाद असाल ना तर रस्त्यावर यायचं हातात दगड अन तलवारी घेऊन !!!' - महाराज लढायला स्वतः जात होते फक्त माईक समोर बडबडत नव्हते - जय भवानी - जय शिवाजी ! - कमिटी चा खजिनदार रितेश चंद्यावर ओरडला !

बस्स ! नित्या अन संग्राम मध्ये जुंपली , कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही . फायनल इयरच्या 'स्टुडन्ट कौन्सिलने' 'फाईव्ह स्टार्सना' रूमवर जायला सांगितले . त्या वर्षी शिवजयंती ची मिरवणूक निघाली नाही ! कॉलेजच्या प्रथेला तडा पडला . रेक्टर हॉस्टेल वर आले , अन सगळ्यांना लेखी नोटीस देऊन निघून गेले .

मुली त्या वर्षी बॉईज हॉस्टेल वर पुजेसाठी आल्या . हर्षलाला फोटो पुजण्याचा मान होता , तिने रागाने वरच्या लॉबीत असणाऱ्या नित्याकडे बघितले !

प्रतिमा पूजन झाल्यावर डीन हॉस्टेल वर आले - तुम्ही भारताचे भविष्य आहात अन सर्वधर्मसमभावचे लेक्चर देऊन निघून गेले .

तात्या वैतागून रम वर आला - 'एकही सेमिस्टर भांडणाशिवाय गेली नाही , वाटलं होत हि तरी सेमिस्टर नीट जाईल पण नाही !

........

एकदोन आठवडे तणावात गेले अन पुन्हा एकदा जैसे थे !

पिया अन सुऱ्या अजूनही रोज ऑनलाईन बोलत असत , पण ते एकदाही प्रत्येक्ष भेटले नव्हते , जे होत ते फोन आणि chatting ! पिया सुऱ्यात पूर्ण अडकली होती अन तसाच सुऱ्या पण पूर्ण अडकला होता . पिया शक्यतो त्यांच्या घरच्यांबद्दल बोलत असे , कसे तिला तिच्या घरी राहावं वाटत नाही , कुठेतरी पळून जावे वाटते , जीवनात काही रस नाही वगैरे वगैरे - 'सेक्स्टच' प्रमाण आता नगण्य झालं होत . आठवड्यातून एकदा , किंवा १५ दिवसातून एकदा -
सुऱ्याला अन पियाला दोघांनाही कळत होत की पुढं त्यांचं काहीच होणं शक्य नाही ! पण 'प्रेम ' नावाच्या मृगजळात ते अडकले होते . काय करावे हे दोघांनाही काळत नव्हते .
एकमेकांचे फोटो बघून दोघेही थकले होते. ७-८ महिने झाले तरी फक्त फोनचाच त्यांना आधार होता . 'फाईव्ह स्टार्स' सोडले तर कुणालाही पिया अन सुऱ्याच्या किस्स्याची खबर नव्हती .
........

नित्या अन हर्षला दोघांचही प्रेम नाशिकला लग्नाला जाऊन आल्यापासून खूप फुललं होत !

.........

सेमिस्टर संपत आली होती , अक्षाची GATE मध्ये रँक अली होती पण ऍडमिशन मिळेल एवढी नव्हती . तरीही थर्ड इयर ला असताना GATE चा स्कोर येणे हे काही कमी नव्हते ! अक्षाला अजून प्रयत्न करायची गरज आहे हे जाणवलं होत . तात्याने MPSC पूर्व परीक्षा दिली होती अन 'मेन्सला'सीलेक्ट होईल ह्याची खात्री होती .' फाईव्ह स्टार्स 'च्या सगळ्यांचीच युनिव्हर्सिटी टीम मध्ये निवड झाली होती , त्यामुळे त्यांची हवा जरा जास्तच झाली होती .

.........

'थर्ड इयर ' नंतर अजून एक 'इंडस्ट्रियल ट्रैनिंग' करायचं होत ! सुऱ्या अन नित्याने ट्रेनिंग बंगालला घ्यायचं ठरवलं ! कारणही तसंच होत , सुऱ्याला पियाशी भेटता येणार होत तसेच नित्या अन हर्षला दोघांनाही वेळ एकत्र घालवता येणार होता ,HDच्या धाकाशिवाय ! आपला परीसर ,आपला नेहमीचा समाज सोडला की सगळे 'सांड ' बनायला रिकामे ! दुसरे कारण म्हणजे ट्रेनींगच्या सीट्स मेरिटनुसार भरल्या जायच्या ,अन पश्चिम बंगालला कोणीच जात नसे , तो शेवटचा 'प्रेफरन्स' होता , त्यामुळे सीट मिळणे शक्य होत . अक्षाने पुन्हा एकदा जवळच ट्रेनिंग घेतलं , काहीही करून त्याला IIT ची सीट मिळवायची होती. चंद्या ने दिल्ली , तर तात्या ने पुण्याला ट्रेनींग घेतलं होत .

इकडे पिया सुऱ्या भेटायला येणार म्हणून प्लॅनिंग सुरु केले . पिया खूप विचार केल्यानंतर ती ह्या निर्णयावर पोहचली कि , सुऱ्याला भेटण्यासाठी फक्त सकाळचीच वेळ भेटणार होती , ज्यावेळी तिचा ड्रायव्हर कामालाही येणार नव्हता. घरी संशय येऊ नये म्हणून महिनाभर आधीच तिच्या एका मैत्रिणीबरोबर सकाळी जॉगिंग सुरु केली . रोज सकाळी ती ६ वाजल्यापासून ते ७ वाजल्यापर्यंत जॉगिंगसाठी दररोज जात असे . पियाच्या एका मैत्रिणीला सुऱ्याबद्दल माहित होते .

ट्रेनिंगला जाण्यासाठी २ दिवस राहिले होते , अचानक हर्षलाचे ट्रेनिंग HD ने कॅन्सल केले अन तिला तिच्या गावाशेजारीच कुठल्यातरी फॅक्टरीत पाठवले . शिवका रात्रभर रडली अन नित्या रात्रभर पीत बसला . HDची सेटिंग वरपर्यंत असल्याने त्याला हे शक्य झाला , नीत्याला झक मारत पश्चिम बंगाल मध्ये जावं लागलं .

ट्रेन मधून जाताना नित्या 'दिलजले प्रकारची गाणी ऐकत होता तर सुऱ्या रोमॅंटिक ! शेवटी ते कलकत्याला पोहचले , सुऱ्याला माहित झाले की पियाला भेटणे त्याला दररोज शक्य होणार नव्हते . ट्रेनिंग सकाळी ८ वाजता सुरु होई , अन त्याला पियाला भेटून पुन्हा ३०- ४० किलोमीटर ट्रेनने परत यावे लागणार होते . पिया बरीच नाराज झाली कारण सुऱ्याची पहिली ट्रेन ८ वाजता सुरु होई . शेवटी त्यांनी दर रविवारी भेटायचे ठरवले , सुऱ्याने एक दुचाकी भाड्याने शोधली , त्याच्याच इन्स्टिटयूट च्या सिक्युरिटी गार्डची !

दर रविवारी तो , सकाळी ५:३० वाजता निघत असे ! अनोळख्या राज्यात तो भटकत होता , ठरलेल्या ठिकाणी त्याने शेवटीचे पियाला बघितले , काही मुली फोटो पेक्षा खऱ्याच जास्त सुंदर दिसतात.पिया त्यातली होती . खूप दिवसंतराची त्यांची प्रतीक्षा संपली होती . सुऱ्याला बघताच ती त्याच्या मागे बाईकवर येऊन बसली अन तीने त्याला घट्ट मिठी मारली दोघे काहीही बोलत नव्हते , दोघांची शरीरे एकमेकांना बोलत होती .
खूप दिवसंतराची ओढ एकमेकांना अजूनच जवळ ओढत होती . पियाने हळूच त्याच्या कमरेला डीचालव अन हसत एक वीज त्याच्या शरीरातून वाहू लागली . काही वेळाने सुऱ्याने आपला एक हात मागे नेला अन पियाने त्याचा हात हातात घेतला . खूप वेळ ते तसेच बाइकवर भट्कत होते , काही वेळाने शहराच्या थोडे बाहेर गेल्यानंतर त्यांनी एका शेतात त्यांनी गाडी उभा केली .
दोघेही मस्तीत तिथेच एकमेकाचे चुंबन घेऊ लागले . पियाचा गरम श्वास त्याच्या ओठांना स्पर्शून जात होता . त्याने तिच्या ट्रॅक पॅण्टवरून हात फिरवला अन अजूनच तिला जवळ ओढले . पिया त्याच्या गालाचे , ओठांचे , छातीचे चुंबन घेऊ लागली .
सकाळ असल्याने त्या रस्त्यावर काहीच वर्दळ नव्हती . रस्ता तास आडोशालाच होता . थोडेशे दूर जाऊन त्यांचा प्रणयाचा खेळ सुरु झाला . उघड्यावरच त्यांचा प्रणय सगळ्या आसमंत वाहू लागला .
काही वेळाने ते दोघेही एकमेकांना बिलगले . सुऱ्याला हे सगळं स्वप्नवत वाटत होत . काही वेळाने ते दोघेही रस्त्यावरून चालू लागले . बिनधास्त ! कुणाची भीती नाही , दोघेही मस्त हसत , खेळत बागडत होते .
त्याने तिला उचलून घेतले अन तिने त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले .
'पिया , तुमसे खूबसूरत लडकी मैने आजतक नहीं देखी - सुऱ्या आता मनापासून बोलत होता .
'अच्छा ' - सच में , मेरे से ज्यादा खूबसूरत तो वो मेरी दोस्त है जिसके पिक्स मैने तुम्हे सेंड किये थे 'कदाचित, मुली मुलांपेक्षा जास्त हूशार असतात
' ना रे ,जान , मेरे लिये तो बस तुम हो - सच्ची !
' हाहा , अच्छा - ' .......' शायद मै तुम्हारे होनेवाली बीवीसे ज्यादा खूबसूरत लगू ! अन पियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले - अपना तो जिंदगी में कुछ नही हो सकता सुर्या - लेकिन मुझे तुम प्लिज , प्लिज मत भुलाना ! क्या याही होता हैं पहले प्यार का सबके साथ ? बस तुम मेरे ख्वाबो मे आना मत बंद कराना - हम मिले या ना मिले बस तुम मेरी यादों को मिलना , जब तुम्हे ये रोशनी छुये , जब तुम्हे ये हवा छुये - समझो की वो मुझे छुकर ही आई है - तुम्हे छुने '!
'अरे तुम तो शायर हो पिया - जान लो लोगी तुम मेरी - सुऱ्याने तीला खाली उतरवले .
पहले ही बोला था मैने क्रिमिनल हू मै ..... असं म्हणत ती आपले ओले डोळे पुसत त्याच्यापासून दूर पळाली !!!

(क्रमश :)

बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777
बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798
बेधुंद - भाग ६ : http://www.misalpav.com/node/35832
बेधुंद - भाग ७ : http://www.misalpav.com/node/35859
बेधुंद - भाग ८ : http://www.misalpav.com/node/35885#new
बेधुंद - भाग ९ : http://www.misalpav.com/node/35937
'बेधुंद - भाग १० :http://www.misalpav.com/node/36003
बेधुंद- भाग ११ : http://www.misalpav.com/node/36353
बेधुंद - भाग १२ : http://www.misalpav.com/node/36354
बेधुंद - भाग १३ : http://www.misalpav.com/node/36355
बेधुंद - भाग १४ : http://www.misalpav.com/node/36884
बेधुंद - भाग १५ : http://www.misalpav.com/node/36913

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुखी's picture

10 Aug 2016 - 7:04 pm | सुखी

झकास..

अविनाश लोंढे.'s picture

23 Aug 2016 - 8:30 pm | अविनाश लोंढे.

धन्यवाद...

स्मिता चौगुले's picture

24 Aug 2016 - 10:01 am | स्मिता चौगुले

पुभाप्र

अविनाश लोंढे.'s picture

28 Aug 2016 - 10:25 pm | अविनाश लोंढे.

धन्यवाद....

प्रसन्न३००१'s picture

24 Aug 2016 - 10:13 am | प्रसन्न३००१

च्यामारी, मला वाटलं पुढला भाग टाकलाय.. रीप्लाय्स पण ३ च आहेत.

पुढचा भाग लवकर येऊद्या