बेधुंद (भाग ९ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
6 May 2016 - 1:51 am

परीक्षा जवळ आल्याने अक्षाने 'शिवेकाला' भेटायचे अन अमित चे फोन उचलायचे सोडून दिले ! तसाही काहीही फायदा नव्हता !
त्याच काळात 'MPSC' चा निकाल लागला होता . त्याच्याच जिल्ह्यातील त्याचा एक M.Tech करणारा सिनिअर - सचिन MPSC परिक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाला होता , वर्ग- २ ची 'पोस्ट' मिळाली तरी त्याचे काही वाईट वाटत नव्हते . त्याचबरोबर M.Sc चे विद्यार्थी ढिगाने पास झाले होते . काहीजण उपजिल्हाधिकारी ,काहीजण मुख्याधिकारी तर काहीजण जिल्हा पोलिस अधिक्षक !
M.Tech करणाऱ्या ११ पैकी ७ जन पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले होते .
विद्यापीठात नुसता धिंगाणा होता ! PSI ची पोस्ट जवळजवळ १५० लोकांना मिळाली होती . M. Sc .चे विद्यार्थी B.Tech च्या 'किस्स्यात' अजिबात भाग घेत नसत ! 'MPSC' ची वारी करून त्यांची आधीच वाट लागलेली असे किंवा वय वाढल्याने कदाचित दुनियादारीची समज वाढली असेल ! त्याच दिवशी 'ग्राउंडवर' भली मोठी पार्टी ठेवण्यात आली .'लाईटस ' ने पूर्ण मैदान सुशोभित करण्यात आलं होत ! 'पंचपक्वानालाही' लाजवेल अश्या पदार्थांची सोय झाली होती ! काहीही असो पण पुढच्या पिढीच्या 'साहेबांची' पार्टी होती ती !
नोटीस बोर्ड वर विद्यार्थ्यांची नावे वाचताना छाती फुलून येत असे .

'यार नित्या , ज्या लोकांबरोबर आपण सकाळी कॅन्टीनवर नाश्ता करत होतो , ग्राउंडवर बरोबर खेळत होतो , तेच आता महारष्ट्र सांभाळणार ! काहीतरी करायला पाहिजे यार आपण ' - अक्षा MPSC पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावं वाचत नित्याला बोलला .
' करू यार आपण पण काहीतरी ! अन काही नाही झालं तर 'गावाचा सरपंच तर मी नक्की होईन , PSI झालो तर हवाच गावात ! - नित्या हसत उत्तरला !
' तुझा भाऊ नाही का झाला पास ह्यावेळी ? - अक्षा
' नाही यार , मुलाखतीत होता , मुख्य परीक्षा २ वेळा पास झालाय - स्टार्स पाहिजेत लका ! - नित्या थोडा निराश होत बोलला .
' हम्म … एवढी 'सेमिस्टर' जाऊ दे , पुढच्या 'सेमिस्टर' पासून तयारी सुरु करणार आहे मी ' - अक्षा
' हम्म ' - नित्या

' फाईव्ह स्टार्स ' ग्राउंड वर गेले , सगळ विद्यापीठ मैदानावर होत ! त्या दिवशी मेसमध्ये जेवण नव्हत ! 'योग्या' सारखे काहीजण आज बऱ्याच दिवसातून मैदानावर अजून भूक लागावी म्हणून पळत होते , अस जेवण वर्षा-दोन वर्षातून फुकटच एकदाच मिळत ! निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी जिल्ह्याच्या 'कलेक्टरना ' आधीच आमंत्रण दिले होते ! निकाल लागायच्या आधीच त्यांची 'डेट' नक्की केली जायची , कारण - कोणीही असो पण विद्यार्थी आपल्याच विद्यापीठातील असणार ह्याची खात्री विद्यापीठाला होती ! साधारण विद्यापीठातील २००-२५० विद्यार्थी तरी प्रत्येक फेरीत पास होत असत . B.Tech / M.Tech ची संख्या कमी असल्याने M.Sc अन Phd करायला आलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण ९५ % पेक्षा जास्त होत . संबंध कमी असला तरी आपल्याच विद्यापीठातील असल्याने एकाप्रकाराने 'नाळ' जोडलेली असे !

जेव्हा कलेक्टरने भाषण द्यायला सुरुवात केली तेव्हा ह्या पोरी , लफडी नगण्य वाटू लागलं . एवढी कॉलेज ची परीक्षा संपली की तात्या अन चंद्यासारखे लायब्ररीत पडून राहायचा निर्णय अक्षाने अन नित्याने घेतला . सत्कार करताना कालपर्यंत नावाने बोलावणारे 'प्रोफेसर्स' आज त्याच विद्यार्थ्यांचा उल्लेख नावापुढे ' साहेब ' लावून करत होते ! सगळच विचित्र वाटत होत ! वेळ खरंच कुणाला किती बदलवते नाही !

मैदानावर जेवण करून झाल्यावर अक्षा अन तात्या आपल्याच जिल्ह्यातील 'वर्ग २ ' मध्ये निवड झालेल्या सचिनसर ला भेटायला गेला . आपआपल्या गाव वाल्यांशी संबंध आपोआपच जवळचे होते , काय माहित का ?

कायम लायब्ररीत असल्याने , अन भविष्याची काळजी लागल्याने सचिन कधी कॉलेज च्या किस्स्यात पडत नव्हता ! तसेही M.Tech चे कुणीही असल्या फालतू गोष्टीत लक्ष घालत नसत . वर्ग १ ची अपेक्षा असलेल्या सचिन आला वर्ग -२ समाधान मानव लागलं होत .

'या बसा ! फाईव्ह स्टार्स पैकी २ चमकते तारे ' - सचिन हसत त्यांना बोलला .
' काय सर , काहीपण …. थोडंस हसत अक्षा अन तात्या बेड वर बसले .
सचिन सर खाली गादिवर बसले होते . त्याच्या बरोबर फायनल एअरचा एकजण बसला होता . अभ्यास कसा करायचा ? ह्याचे मार्गदर्शन घेण्यासाठी बरेच विद्यार्थी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या रूम वर येत असत . जे पास नाही झाले ते बरेचसे रूम मधून बाहेर निघत नसत ! काहीजण 'खेळाडूवृतीन्ने' पार्टी त पण येत असत ! आपलेही स्टार्स पुढच्या वेळी चमकतील ही अपेक्षा घेऊन !

' गाववाले आहेत हे माझे , दोघे पण पहिल्याच 'अट्टेम्प्ट ' मध्ये MPSC क्लिअर होणार आहेत ! सचिन फायनल एअरच्या 'त्या' विद्यार्थ्याकडे बघत बोलला !
सचिन सर चा एवढा विश्वास बघून , अक्षाला लाजल्यासारख झाल ! काय अपेक्षा आहेत आपल्याकडून अन काय करतोय आपण? पण तात्याला विश्वास होता .
'हा अक्षय वक्तृत्व स्पर्धेत सिलेक्ट झाला होता अन हा सुशील खो खो मध्ये ! ' खरंच तारे आहेत पण 'ब्ल्याकहोल' लागू नये म्हणजे झालं ! सचिन ने त्या फायनल एअर च्या विद्यार्थ्याला हसत सांगायला सुरुवात केली . तो हि गुपचूप ऐकत होता .
' चालू घडामोडी साठी एक वही करा , त्यात त्या वहीचे खेळ , राजकारण , व्यवसाय इत्यादी भाग पाडा . दररोज 'न्यूजपेपर' च पाहिलं पान अन शेवटचं पान नक्की वाचा ! 'इडीटोरीअल' पेज नक्की वाचा , शक्यतो ' मटा ' वाचा ! बाकीच्या 'न्यूजपेपरला' जास्त महत्व देऊ नका ! त्या बातम्यांच्या नोट्स काढा ! ५ वी ते १० वी , इतिहास , भूगोल अन 'सामान्य -विज्ञान' सेकंड एअर होण्याआधी सगळ वाचून काढा ! अन त्याच्या नोट्स काढून ठेवा ! हि झाली पूर्वतयारी अन मगच मुख्य पुस्तक वाचायला घ्या ! मैदानात उतरन्याआधी तलवारीना धार लावून घ्या आधी ! एकदा युद्धात पडलं की पुन्हा कोणीतरी 'तानाजी ' सारखे दोर कापून आले , हे लक्षात घ्या ! करो या मरो ! अन अस नसेल तर मग पडूच नका ह्या युद्धात ! तसही डिग्री मिळाली की सगळ्यांना नोकरी मिळतेच की , आपल्या कॉलेज मध्ये ! - सचिन आपले अनुभव सांगत होता . 'ग्रुप बनवा, दिवसभर जे काही वाचलं ते जेव्हा जास्त झोप येते साधारण रात्री ९ ते ११ ' चर्चा करा ! पण सकाळी ' शार्प ' ८ वाजता लायब्ररीमध्ये गेलं पाहिजे ! अन सगळ्यात महत्वाचे - अगोदर कॉलेज मध्ये तुमचा ' GP' ७.५ पेक्षा जास्त पाहिजेच ! फर्स्ट क्लास पाहिजेच ! नाहीतर काही उपयोग नाही ! उगीच MPSC करतोय अन कॉलेज मध्ये नापास होतोय ह्याला काही अर्थ नाही !

सचिनन काही वेगळ सांगितलं नव्हत . MPSC करणारे सगळेच हेच करत होते !

तात्या अन अक्षा ऐकत होते ! चंद्या ची धाव 'UPSC' पर्यंत असल्याने 'MPSC' च्या अनुभवांचा काही फायदा होणार नव्हता ! नित्याचा भाऊच 'MPSC'ची तयारी करत असल्याने त्याला कुणाकडून मार्गदर्शनाची गरज नव्हती ! सुऱ्या सेमिस्टरच्या परीक्षेचा अभ्यास करत बसला होता .

' सर , congrats ! 'लाल दिव्याची ' गाडी मिळवली आयष्यात तुम्ही ? - अक्षा सचिन सरला बोलला
' हाहा . अस नाही रे , खरी परीक्षा तर आता सुरु होणार आहे ! कसंय ना , समुद्राच्या लाटेच्या प्रवाहाच्या दिशेने पोहायला सगळ्यांनाच जमते , पण त्याच लाटेच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी खरा कस लागतो ! ' सिस्टमच्या विरोधात लढून कितीतरी जन हरले अन 'स्पर्धापरीक्षा मंडळ ' काढून बसले आहेत ! पण मी हे क्षेत्र निवडलं कारण - जेव्हा मी माझ्या गावात साईकलवरून शाळेला जात होतो , तेव्हा रस्त्यावर राहणारी गरीब लोकं बघून तेव्हाच ठरवलं होत की ह्यांच्यासाठी काहीतरी करीन ! - सचिन नेहमीसारखाच शांत राहत बोलला . यशाचा माज बिलकुल दिसत नव्हता !
'हम्म ' - अक्षा अन तात्या सुन्न होऊन ऐकत होती .
' हे 'फाईव्ह स्टार्स ; काय आहे ? पाहिलं करिअर घडावा अन मग पाहिजे ती पोरगी मागे लागेल ! - सचिन ने मूळ विषयाला हात घातला . हे भांडण , लफडी काय ठेवलय ह्यात ? प्रेम करायचं खर वय २५ आहे अस मला वाटत ! तुमच्या त्या 'अश्विनी'पण सांगा हे ,गावाकडंचीच असली तरी मी बोललो तर तिला वाईट वाटेल ,! अन अक्षा तू त्या शिवेका चा नाद सोड ! सचिन बोलतच होता !
अक्षा आता बधिर झाला होता ,'हे शिवेकाच प्रकरण सचिन सर ला कस कळल ?'
सचिनचे ऐकून अक्षा अन तात्या च्या अंगात एक वीज धावत होती . आपण पण असंच काहीतरी करणार !
दोघेही सचिनला' हो ला हो म्हणत आपल्या होस्टेल वर निघाले .

' काहीही म्हण अक्षा , पण त्या 'अमरीश सर ' पेक्षा 'क्यालीबर' सचिन सर मध्ये होते , साला 'रिजर्व्हेशन ' मुळे अमरीश सर उपजिल्हाधिकारी - क्लास १ झाले अन सचिनसर क्लास २ झाले ' - तात्या थोडंस नाराज होत बोलला .
' खरंय तुझं , पण सचिनसरचे वडील 'इंजिनिअर' आहेत अन अमरीश सरचे वडील साधे शेतकरी आहेत ! ' फरक आहे ना यार ! खूप गरिबीतून आलेत अमरीशसर , ह्या MPSC साठी त्यांच्या वडिलांनी होती नव्हती तेवढी शेती विकली होती म्हणे ! घरात अठराविश्व दारिद्र्य ! अन त्यातून पुढ यायचं म्हणजे XXX दम लागतो लेका , उगीच तुम्ही रिजर्व्हेशन ' च्या नावाने का जळता काय माहित ! एवढा दम आहे तर त्या अमरीशसर सारखं गरिबीत राहून परीक्षा पास होऊन दाखवा ! 'फायनान्सिअल सिक्युरिटी ' नावाचा काही प्रकार असतो साल्या ! अक्षा आपल मत मांडत होता .
' हाहा , तू पण साला ' रिजर्व्हेशन ' घेतो म्हणून असं बोलतो का ? - तात्या हसत बोलला !
' कदाचित अस असेल ही , पण जर मी रिजर्व्हेशन ' घेतलं अन नोकरीला लागलो तर मी तरी पुन्हा माझ्या मुलांना रिजर्व्हेशन ' घेऊ देणार नाही ! - अक्षा बोलला .
' च्या मारी एवढ लॉजिक जर शिवेकाच्या प्रकरणावर वापरलं असत तर एवढा राडा नसता झाला - तात्या हसत बोलला !
' हाहा , झालं यार ते ! - अक्षा ही हसत बोलला !

शेवटची सेकंड सेमिस्टर ची परीक्षा संपली . स्पर्धा परिक्षेच उत्तेजन हे प्रणयासारखं होत , करण्याआधी खूप सारे 'प्लान' केलेले , अस करू , तसं करू ! पण जेव्हा वेळ आली तेव्हा कळलंच नाही की कधी एकदम शांत झालं !

अक्षाला परीक्षा खूपच अवघड गेल्या होत्या ! त्यात अश्विनीच्या नेहमीच्या रडण्याने 'फाईव्ह स्टार्स ' ना अस्वस्थ करून सोडलं होत ! अमीरला काहीही करून धडा शिकवायचाच होता ! अमीरच्या ड्रग्सने अन दारूने सगळ्या कॉलेजला सतावून सोडलं होत . सिगारेटचे तुकडे पाण्याच्या टाकीत सापडत होते , कधीही रात्री - अपरात्री तो उघडा होस्टेल मध्ये फिरत असे ! एवढी थंडी असूनही ' साला ये पाणीके टंकी मे हिटर किसने डाला है ? पाणी इतना गरम कैसे है ? अस ओरडून एकटाच होस्टेल वरून फिरत असे !

त्यातच त्याने student council च्या चेअरमनशी भांडण करून त्याला शिव्या दिल्या होत्या ! त्याच्या बापाच्या सत्तेचा माज त्याच्या कणाकणात दिसत होता . अन त्यात जर कोणी अमीरला काही करू शकत असेल तर ते फक्त 'फाईव्ह स्टार्स' ! - हे student council ला माहित होत !
अमीर मुळे ' फाईव्ह स्टार्स ' अन student council जवळ आली होती !
अश्विनी च्या अश्रु खातर अमीरशी बदला घेणे तर अनिवार्य होत ! Five Stars break bones not hearts ! त्यातच student council च्या चेअरमन ला शिव्या देण म्हणजे पूर्ण सिनिअर जातीचा अपमान होता ! त्याच्यासाठी सुऱ्या अन अमीर च्या दुश्मनी चा फायदा उचलायचा student council ने ठरवला ! जर काही 'अक्शन' झाली तर फाईव्ह स्टार्स वर होईल , पण हा गेम समजण्याइतकं डोकं फाईव्ह स्टार्स ना नव्हत कदाचित त्यावेळी !

परीक्षेनंतरही आठवडाभर अमीर होस्टेललाच राहणार होता ! काटा काढायची हीच वेळ आहे हे student council ने ठरवलं ! परीक्षेनंतर त्यांनी फाईव्ह स्टार्स ना होस्टेल मध्ये राहायला सांगितलं !
पण लफड्यात पडायचं नाही म्हणून किंवा भविष्याची काळजी असल्याने , चंद्या अन तात्या लगेच घरी निघून गेले !
नित्या , अक्षा अन सुऱ्या थांबले , तिकडे अमीरच्या फसवणूकीने वेडी झालेली अश्विनी पण थांबली होती , अन नाही थांबणार तर ती खरी मराठी मुलगी कसली ? अमीर अश्विनीला दुसऱ्या समोर खुलेआम खुले शिव्या देत असे ! सुऱ्या ला ते सहन होत नव्हत ! परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी त्याने अमीरला फटकावयाचे ठरवेले ! student council बरोबर अगोदरच प्लान ठरला होता .
ठरल्याप्रमाणे नित्या , सुऱ्या , अक्षा अन अश्विनी लायब्ररीत संध्याकाळी ७ वाजता एकानंतर एक गेले . अन प्रवेशद्वारात असणाऱ्या हजेरी पुस्तकात आपली नाव लिहिली अन सह्या केल्या ! लायब्ररीत आल्याचा हा पुरावा होता !
सुऱ्या अन नित्या पुस्तके लायब्ररीत ठेवून एका तासाने बाहेर पडले ! सुट्टी लागल्याने खूप कमी विद्यार्थी लायब्ररीत होते . जे होते ते MPSC करत होते, तेच होते फक्त !
आधीच त्यांना माहित झाले होते की , अमीर 'मुव्ही ' बघायला गेला होता . त्याला ९:३० वाजता गाठणे नक्की होते !
नित्या अन सुऱ्या थेटर च्या बाहेर वाट बघत बसले होते , जसा अमीर थेटरच्या बाहेर आला तसा नित्याने अश्विनी च्या मोबाईल वर फोन केला !
काहीही असो पण तात्याने आपली ' पल्सर २२०' ची चावी अक्षाकडे ठेवली होती . फोन आला तसा अश्विनी अन अक्षा बाईक वर निघाले ! अक्षा तिथे पोहचतोय तोच नित्या अन सुऱ्या अमीरला एका निर्जन रस्त्यावर मारत होते , अमीर तिकडे सिगरेट ओढण्यासाठी गेला होता !

सुऱ्याने अमीर ला पकडले होते अन नित्या त्याला मारत होता .
'अशे , ये तू … बघतेस काय ? ' - सुऱ्या अश्विनी ला पाहून ओरडला !
अश्विनीचा सुंदर चेहरा आज रागाने लालबुंद झाला होता . अमीर ने दिलेल्या आयुष्यभर एकत्र राहण्याच्या खोट्या शपथांची याद तिला सतावत होती . जीवापाड प्रेम करून आपण कुणाच्या हातातील खेळण होन ह्याने तिच्या स्त्रीत्वाला डचवलं होत ! 'ह्याच्या प्रक्टिकल परीक्षेचं सगळ साब्मिशेन मी करून दिल , ह्याच्या engineering drawing अन machine drawing च्या सगळ्या शीट्स मी रात्रभर ह्याच्या प्रेमात जागवून पूर्ण करून दिल्या ! अन ह्याने मला एक 'वेश्या' समजलं , ह्याच दुख कदाचित फक्त अश्विनीच समजत असेल !
बाईकवर अक्षाच्या मागे बसलेली आश्विनि खाली उतरली ! जीन्स अन ट्योप मध्ये चालताना ती एखाद्या हिरोइन पेक्षा कमी दिसत नव्हती !
' अशे , बघतेस काय , दे कानाखाली वाजवून ह्याच्या - नित्या ने अमीर ला मागून पकडलं होत , अमीर झटपटत होता , नित्या तसाच अश्विनी कडे बघत ओरडला !
अमीरला मारताना कोणी बघत नाही ह्याकडे रस्त्यावर अक्षाच लक्ष होत !
' कुत्ते , तुझे बस लडकी से एक ही चीझ चाहिये ना ! ! क्या है क्या तेरे पास ये …. ' , अश्विनी त्याच्या प्यांट कडे बघत बोलली !कुत्ते ! ? 'क्या समझ क्या रखा है तुने एक लडकी की इज्जत को ! क्या लगा की तू ऐसेही मुझे और मेरी जैसी और लाडकियो को फसायेगा ? ! घायाळ सिहीन आज ओरडत होती ! अश्विनी च्या तोंडातून निघालेले शब्द सगळ्यांनाच नवीन होते ! अश्विनी साक्षात कालीच रूप भासत होती !
' मार ना तू अशे ! बोलतेस काय , दे कानाखाली ह्या लxxx - अक्षा ओरडला !

अश्विनी रागाने पुढे आली , दोन सन सन आमिरच्या कानाखाली तिने जाळ काढला ! रागाने वेड्या झालेल्या अश्विनीने अमीर च्या दोन्ही पायाच्या मध्ये जोराने तिचा घुडगा मारला ! जीवाच्या आकांताने ओरडून अमीर खाली पडला ! नित्याने अमीरला सोडले !
'आज के बाद किसी लडकी के कपडे उतरणे से पहले ये याद रख , जिंदगीभर ! - अश्विनी ओरडली !
जसा आमिरच्या ओरडण्याचा आवाज झाला तसे काही लोक आवाजाच्या दिशेने येऊ लागले !

'अशे चल बस ! ' अक्षाने बाईक ला किक मारली !
अश्विनी लगेचच येऊन अक्षा च्या मागे बसली .

नित्या अन सुऱ्या ने ठरल्याप्रमाणे आधीच चिंटूभाई ची जीप बाजूला उभा केली होती ! पापणी लावते न लावते तोच सगळे फरार झाले !

'सालो , सबके सब मरेंगे ! - मागून अमीर ओरडत होता !
लोकं पळत येयीपर्यंत चारही जन पसार झाले होते ! अमीर सोडून कुणीच त्यांना पाहिलं नव्हत !
चारही जन १० मिनिटात १० वाज्यायाच्या आत लायब्ररीत पोहचले ! ठरल्या प्रमाणे एकमेकामागून एक लायब्ररीत गेले ! आधीच एन्ट्री केल्याने पुन्हा करायची गरज नव्हती !
चारही जन पुढच्या ३० मिनिटासाठी आपापली पुस्तकं उघडून त्यातील इंग्रजी अक्षराकडे बघत राहिली! पण डोळ्यासमोर वेगळच चित्र होत !
नित्या , अक्षा अन सुऱ्या ने दूर बसलेल्या अश्विनी कडे बघितलं ! २-३ महिन्यात पहिल्यांदाच तिचा चेहरा हसत होता , एवढा खुलला होता , एक प्रकारचं समाधान होत तिच्या चेहऱ्यावर ! १०:३० वाजले अन लायब्ररी बंद झाली ! सगळे इतर विद्यार्थ्याप्रमाणे रजिस्टर मध्ये सहया करून 'फ़ाइव्ह स्टार्स ' लायब्ररीच्या बाहेर पडले !

(क्रमश: )

बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777
बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798
बेधुंद - भाग ६ : http://www.misalpav.com/node/35832
बेधुंद - भाग ७ : http://www.misalpav.com/node/35859
बेधुंद - भाग ८ : http://www.misalpav.com/node/35885#new
'

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

6 May 2016 - 10:04 am | एस

वाचतोय.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 May 2016 - 3:08 pm | घाशीराम कोतवाल १.२

मस्त सुसाट सुटली आहे कथा सलग ९ भाग वाचले भट्टी छान जमली आहे लिहित रहा

अविनाश लोंढे.'s picture

9 May 2016 - 11:25 pm | अविनाश लोंढे.

धन्यवाद