बेधुंद ( भाग ८ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 8:36 pm

अक्षाला काही सुचत नव्हतं ! दिवसभर फक्त शिवेका अन अमित चा विचार मनाला चटका लावत होते . एके रात्री नित्या च्या मोबाईल वर अमित चा फोन आला . अजूनही त्याने नित्याला काहीही सांगितलं नव्हतं . नित्या अक्षा च्या रूम वर आला .
'अक्षा , तुझ्यासाठी फोन आला होता रे, त्याला मी ५ मिनिटाने फोन करायला सांगितला आहे , राहू दे मोबाईल तुझ्याकडे' - नित्या मोबाईल अक्षाच्या बेड वर ठेवत बोलला .
कुणाचा फोन ? अक्षाने विचारले .
' मला नाही माहित , नाव नाही सांगितले त्याने '
'बर '
सगळ होस्टेल अक्षाला उदास वाटत होतं . काहीतरी कुठेतरी चुकल्यासारखं ! काय कराव काही कळत नव्हत ! कुठे जात आहे मी ? काय होन शक्य आहे का शिवेका अन माझ्यात ? का उगीच आपण अमित अन शिवेकाच्या मध्ये पडलो आहोत ? तेवढ्यात मोबाईल वाजायला लागला .
' हेल्लो कोण ? - अक्षा
'मै , अक्षय से बात कर रहा हू ?
अक्षाला कळाल होत की फोन अमितचा आहे .
' हा , अक्षय बोल राहा हु , आप कौन ? अक्षा बाल्कनीत जाऊन बोलला .
' अमित , शिवेकाने बताया ही होगा तुझे '
' तुझे ये नंबर किसने दिया ?
' कोई मुश्किल नही है , तेरे रूम तक भी पोहोच सकता हु मै ' - अमित थोड्या रागाने बोलला .
' अछ्छा , बोलो क्या बोलना है - अक्षा थोडं हसत बोलला .
' तू क्या समझता है , अपने आप को ? शिवेका सिर्फ मेरी है , उससे बात करणा छोड '- अमित आपला आवाज चढवत बोलला
' और अगर नही छोडा तो ? क्या उखाड लेगा तू ? - अक्षा ने आपला आवाज अजूनच वाढवत बोलला .
' जान ले लुंगा , तेरे कॉलेज में आके भोसडिके आके '
' अच्छा , आते समय और चार बंदे लेके आ मादरचोत , तुझे कंदा देने काम आयेंगे - अक्षाचा राग आता डोक्यात आला होता .
अक्षाचा चढता आवाज ऐकून अमित चा आवाज एकदम कमी झाला .
' क्यू बीच मे आया यार तू ? मै जान से ज्यादा प्यार करता हू उससे , उसके लिये जान दे दी थी मैने ! क्या मजाक लागता है तुझे ? अगर वो मेरी नही हुई तो जान दे दुंगा मै - अमित चा आवाज थोडासा रडका झाला .
' मै कहा पीछे पडा हू ? वो सब इतना अचानक हुआ की , मुझे कुछ पता नही चला !
' तू पिछे नही पडा , तो शिवेका मुझे क्यू बोल रही थी की तुने उसे प्रोपोज किया और उसके पिछे पडा था ?
' क्या ? उसने ऐसा बोला ? ' अक्षाच्या मनात विचाराने गोंधळ वाढवला .
' हा , सून आखरी बार बताता हु , उसका पिछा छोड दे , वरना तेरी जान ले लुंगा या अपनी जान दुंगा , लेकिन तुझे फसाउंगा जरूर - असं म्हणत त्याने फोन ठेवला .
अक्षाच डोकं आता ठणकायला लागलं होत . अस का सांगितलं शिवेकाने ? काय शिवेका काही खेळ खेळतेय माझ्याशी ? त्याला आता अमितपेक्षा शिवेकाचा राग यायला लागला होता . एकतर तो शिवेका च्या मागे लागला नव्हता अन दुसर म्हणजे त्याने तिला प्रोपोजही केलं नव्हत !
त्याने शिवेका ला फोन केला .
'शिवेका , तुने ऐसा क्यू बोला की मै तेरे पिच्छे पडा हू ? और मैने तुम्हे प्रोपोज किया था ? - अक्षा रागाने ओरडत बोलला .
' एक तरफ से वो कॉल करता है , दुसरी तरफ से तुम कॉल करते हो ? मेरा सर दर्द कर रहा है ! मुझे तुम दोनो भी नही चाहिये ! 'लिव्ह मी अलोन ' अन तिने फोन ठेवला . अक्षाचे डोके फिरायला सुरुवात झाली होती . शिवेका नक्कीच त्याच्याबरोबर काही गेम करत होती .
त्याने रागाने रूम मध्ये आला . नित्या तिथे होता . त्याने सगळ ऐकल होतं !
'हाहा , भोसडीच्या मला बोलला काही नाही मग हे काय ? तरी मला वाटलेच होते तुझ त्या शिवेकाबरोबर काहीतरी आहे - नित्या जोरजोराने हसू लागला !'
अक्षा ने सगळा इतिहास अन अमित बद्दल सांगितल्यावर तो शांत झाला !
'पण तुला त्या दोघांच्या मध्ये झक मारायला कुणी सांगितली होती ? कुणाच्या मध्यात 'किडे' करायची गरज काय होती तुला ? थोडा वेळ दोघंही शांत झाले ! काही वेळाने पुन्हा नित्या बोलला - ' तू घाबरू नकोस , मी आहे तुझ्याबरोबर , काहीही झालं तरी ! तो तुला इकडे मारायला आला तर परत नाही जाणार , पण मला वाटते त्या पोरीशी तू जरा दूर राहा , गेम करतेय ती सरळ सरळ ! '
तेवढ्यात पुन्हा एकदा मोबाईल वाजला . अक्षा ने तो उचलला . नित्या ने त्याला खुणावले कि मोबाईल लोउडस्पीकर वर ठेवायला सांगितले , अन अक्षा ने तो केला .
' तुने उसको फिर से कॉल करके क्या बताया ? अब ना तो वो मेरा कॉल ले रही है , ना ही वो मेरे मेसेजेस का रिप्लाय दे रही है ! सून अक्षय , सब कुछ हुआ है हमारे बीच , साथ मे सोये है हम कितनी बार ! तू उसे समझा कर मेरे पास वापीस लेके आ , मै उसके सिवा जी नही सकता - आता अमित रडत होता .
' ठीक है , चल रख तू ' - अन अक्षाने फोन कट केला .
'अक्षा , जाम चालू पोरगी आहे ती , तुम्हा दोघाबरोबर गेम करतेय ! उद्या भेट तिला अन सगळ सांग , क्लिअर कर राडा - त्या अमितने जर जीव द्यायचा प्रयत्न जरी केला ना तर उगीच फसशील ! - असं म्हणत नित्या त्याच्या रूम मधून निघून गेला .
अक्षा बेड वर पडला . मनात कितीतरी विचार घोंघावत होते अन त्याच्या मनाला छिन्नविच्छिन करत होते .

''अचानक त्याच्या दरवाज्यावर ठकठक ऐकायला आली . त्याने दरवाजा उघडला अन ३-४ पोलीस ऑफिसर्स त्याच्या दरवाजासमोर होते . त्यांनी त्याच्या कॉलरला पकडत बाहेर काढले . अमित ने स्वतःला फाशी लावली होती . खाली आला तेव्हा सगळ फर्स्ट जमा झाले होते . शिवेका रडून पोलिसांना सांगत होती की - 'इसकी कारण मेरे अमित ने जान दे दि !' अचानक त्याला होस्टेलच्या समोर त्याची आई रडताना दिसत होती . अक्षाला काय करावे काही कळत नव्हते . तो अस्वस्थ झाला होता . अंगावर पूर्ण घाम आला होता , काहीतरी बोलायचे होते पण बोलू शकत नव्हता . समोर त्याला लटकलेला अमितही दिसत होता ''
त्याने डोळे उघडले , अन त्याचा जीव भांड्यात पडला ! स्वप्न आहे तर हे ! तरीही तो खूप घाबरून गेला होता . पुन्हा झोपायचा प्रयत्न केला पण झोप येत नव्हती त्याला !

असाच एक आठवडा गेला . शिवेकाला भेटायची त्याला इछ्छा बिलकुल नव्हती . अमित अन शिवेका चे फोन सुरूच होते . शिवेका कोड्यावर कोडी घालत होती , अन अमित एकसारखा फोन करून रडत होता . शिवेका पण रडत होती - ' अगर मैने उसे छोडा तो वो जान दे देगा ! मैने गलती कि तुमसे प्यार करके ! आणी इकडे अमित - ' अगर तुने शिवेकाको नही समझाया तो मै सच में जान दुंगा ' ह्या दोन्ही वाक्याने त्याला वेडे करून सोडले होते . 'क्लास' मध्ये एकमेकांना बघितल्यावर हि शिवेका चे डोळे अक्षय वरून हटत नसत ! अक्षाच्या प्रेमाची झालर फाटत आली होती ! शिवेकाला बघून आपलेपणा होता पण त्या आपलेपणात एक दुरावा पण होता !
होस्टेल वर करमेनासे झाले होते . सेकंड सेमिस्टर ची परीक्षा एका महिन्यावर आली होती . चंद्या अन तात्या टोपर लिस्ट मध्ये असल्याने दोघेही लायब्ररीत दिवस रात्र होते . सुऱ्याला maths २ अन Machine Drawing ची काळजी अन मागच्या विषयांचा तणाव असल्याने तोही लायब्ररी मध्ये होता .
अक्षा नित्या च्या रूम वर गेला , शुक्रवार असल्याने नवीन मुव्ही रिलीज झाला होता ! दोघेही What a Girl want बघायला गेले . मुव्ही चांगला असूनही ते मधेच अर्धा सोडून बाहेर पडले . कधीकधी मन चलबिचल असलं की काही पचनी पडत नाही . कदाचित अक्षाच्या जीवनात सुरु असलेल्या खऱ्या 'मुव्ही' ची जास्त काळजी लागली होती !
'काय करायचं ?' ह्याचा विचार करत तसेच ते फिरत राहिले . संध्याकाळ ७ वाजले तेव्हा सरळ जी. डी . वर गेले . २ बिअर ऑर्डर केल्या , अन रस्त्यावरून येणाऱ्या ट्रक्स बघत बसले ! , दाढी , मिश्या वाढवलेला , तगडा पंजाबी धाब्याचा मालक चिंटूभाई जवळ आला .
'क्या नितेशभाई क्या हाल है - दाढी कुरवाळत तो बोलला .
' सब ठीक चिंटूभाई , कैसा है धंदा पाणी ?
' बस आप की क्रिपा ' अन हसत तो निघून गेला . पंजाबी लोकांना धंदा कसा करायचा हे नेमक माहित ! प्रत्येक 'ब्याच' चा एकेक महत्वाचा विद्यार्थी हाताशी धरून ठेवला होता . कधीकधी एकाधी बिअरही तो ऑफर करायचा . रात्री विद्यापीठातील मुलांना सोडायला तो त्याची जीप फुकटात द्यायचा .
नितेशाचा फोन वाजला . पुन्हा अमित ! अक्षाने तो फोन घेतला आणि बोलण्यासाठी बाहेर आला .
' यार , तू बीच मे क्यू आया हमारे ? '
' अरे मै कहा बीच मे आया ! जब शिवेका मेरे 'क्लोज' आयी , तो मुझे पता नही था की उसकी जिंदगी मे तू है , अगर पता होता तो मै उसे हात भी नही लागता , और हमने अभीतक कीस भी नही किया '
' मुझे समझ नही आ रहा है की वो कैसी लडकी है ! मुझे बताती है की तू उसके पीछे पडा था ! '
' देख अमित मै उसके पिछे नही पडा था और अगर तुझे ऐसा लागता है तो तू ऐसे समझ , मुझे कुछ फर्क नही पडता !'
आता अमित खरंच रडायला लागला होता , हुंदके देत तो बोलला ' तू उसको फोन कर , और उसको समझा , तू उससे ब्रेक - अप कर ' उसके बगेर मै जान दे दुंगा
' अरे . ब्रेक - अप करणे से पहले कुछः तो होणा चाहिये ना बीच मे !'- अक्षा त्याला बोलला .' देख अमित तू चिंता मत कर और जान देणे का खयाल छोड दे , वो बस तेरी है ! ' काय करतोय , काय बोलतोय ह्याची कल्पना अक्षाला बिलकुल नव्हती .
अक्षा ने फोन ठेवला !
' काय झालं ? - नित्या
' पुन्हा त्या अमितचा xxरोना यार , काय करू यार ? ' अक्षा डोकं खाजवत बोलला .
' काय करू म्हणजे काय ? शिवेका ला सरळ सांगून दे , तू प्रेम करतोय का तिच्यावर ?
' माहित नाही , आधी वाटलं होत ती चांगली पोरगी आहे , पण आता वाटतंय ती गेम खेळतेय ! अक्षा बिअर चा ग्लास उचलत बोलला !
'वाटतंय काय लxx , गेम च खेळतेय ती ! ज्या पोराबरोबर ती ३-४ वर्ष आहे , ज्याला ती लहानपणापासून ओळखते अन त्याला तुझ्यासाठी फसवलं , उद्या तुला ती फसवणार नाही ह्याची काय ग्यारंटी ? '
अक्षा विचार करू लागला ! नित्या जे काही बोलत आहे ते पण खोटे नाही आहे ! ' अन त्या अमितचा पण विचार कर ! उद्या जर का त्याने आत्महत्या केली तर तुझ्या गोट्या कपाळात येतील ! ' नित्याने बोलायला सुरुवात केली . शेजारून चिंटूभाई जात होता .
' चिंटूभाई , एक बताओ , एक 'सिच्युएशन' है , एक लडका एक लडकी से बचपन से प्यार करता है , उस लडकी के लिये एक बार उसने अपनी जान देणे की कोशिश की ! फिर वो लडकी उसे हा बोली ! ३-४ सालसे उनका अफ़ेअर है , और अचानक एक दुसरा लडका बीच मे आता है , और वो लडकी उस दुसरे लडके से प्यार करती है , ऐसे हालत मे अगर वो पहले लडकेने खुदख़ुशी की तो जेल कौन जायेगा ? - नित्या चिंटूभाईला हसत बोलला .
' १०० % , वो दुसरा लडका ' - चिंटूभाई ने हसत उत्तर दिले .
'हाहाहा ' नित्या जोरजोराने हसायला लागला !

रात्री ११ वाजता ते परत विद्यापीठात आले . अक्षाने शिवेकाला फोन केला.
' देख शिवेका , हमारा आगे कुछः नही हो सकता , तू उस अमित के साथ ही ठीक है '
' और कुछः ? ' - शिवेका बोलली !
'कुछःनही ! ' - अक्षा
अन शिवेकाने फोन ठेवला .
दुसऱ्या दिवशी अश्विनी सुऱ्या अन अक्षाला भेटली .
' अक्षा काय समजतोस काय तू स्वतःला ? ती शिवेका सकाळपासून रडतेय ! काय बोललास तू तिला ? जीव द्यायचा म्हणतेय ती ? तुझ्यामुळे तीच अमित बरोबर पण बिघडलंय ? तुम्ही काय पोरींना टायमपास समझता ? - अश्विनी रागाने बोलली .
' तूच विचार तिला ? हे सगळे बहुतेक असेच ! तो तुझा अमीर तुला डबल - क्रोस करतोय अन शिवेका मला ? '
' काय? - अक्षा तू शिवेकाबरोबर ! - सुऱ्याला आधी माहित नसल्याने तो जरा रागाला गेला .
' साल्या , दोस्त म्हणतोस अन एवढा लपवलं ? - सुऱ्या
' बर झालं , तू तिच्या चक्कर मध्ये नाही पडला ! - अक्षा बोलला !
' एक मिनिट , तू अमीर बद्दल काय बोलत होतास , डबल क्रोस ? ' - अश्विनीने मधेच रागात विचारले
' हो , तू सोडून २-३ गर्लफ्रेंड आहेत त्याच्या ? - अक्षा
अश्विनी शांत बसली . खरंच सुऱ्या ??? तिचे डोळे भरले गेले !
' हो ! - सुऱ्या बोलला !
अश्विनी काहीही न बोलता निघून गेली ! काहीही असो मी अमीर ला सोडणार नाही ! साला काय समजलं काय ह्याने आपल्या पोरींना ! सुऱ्या तावात होस्टेल वर आला , अन सरळ अमीर च्या रूम वर गेला . अमीर व्हिस्की पीत पुस्तक वाचत होता .
'सून, तुने ऐसा क्यू किया अश्विनी के साथ ? , अगर इतनी गर्मी हे तो 'धन्देवाली' के पास क्यू नही जाता साले ? , आज तक तुझे कुछ नही बोला मै , लेकिन तू उसके साथ खेलणा बंद कर ' - सुऱ्या रागात बोलला .
' और नही किया तो ? कौन लागता है तू उसका ? सच्ची मे भाई तो नही ! क्या फर्क पडता है , कभी तू 'ऐश' कर कभी मै करुंगा ! - अमीर निर्लजासारखा बरळत होता .
' कमीने , कुछ तो शर्म कर साले ! - अक्षा रागाने बोलला .
' ये तू बोल रहा है साले मुझे ! और तू शिवेका के साथ क्या कर रहा है ? , वो अमित जानता है मुझे , मैने ही उसको नित्या का नंबर दिया था - अमीर हसत बोलला . और सून सुऱ्या , जो करना है कर ! मुझे हात भी लागाया ना तो नही तुझे कॉलेज से निकाला तो बाप का नाम नही लगाउंगा , चल जा अब ! बहन के भाई !
' XXX , सुऱ्या त्याला मारण्यासाठी निघाला !
' नाही सुऱ्या , परीक्षा होऊ दे , सोडायचं तर ह्याला पण नाही !

(क्रमश :)

बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777
बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798
बेधुंद - भाग ६ : http://www.misalpav.com/node/35832
बेधुंद - भाग ७ : http://www.misalpav.com/node/35859
'

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुरवंट's picture

1 May 2016 - 8:41 pm | सुरवंट

खूप सूंदर
कृपया याचे पुस्तक काढा

अविनाश लोंढे.'s picture

6 May 2016 - 1:53 am | अविनाश लोंढे.

नक्कीच पुस्तक काढू :)

सुखी's picture

2 May 2016 - 3:35 pm | सुखी

मस्त लिहीत आहात.... College, First year, Hostel डोळ्यासमोर उभे राहात आहे...
पुभाप्र.

---सुखी

बापू नारू's picture

4 May 2016 - 4:53 pm | बापू नारू

हा पण भाग छान ,लवकर पुढचा पण भाग येऊ द्या...

अविनाश लोंढे.'s picture

6 May 2016 - 1:55 am | अविनाश लोंढे.

धन्यवाद … सुखी अन सागर