बेधुंद (भाग १५ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 5:03 pm

पियाचा मेल वाचत , सुऱ्या 'डेस्कटॉपच्या' 'स्क्रीनकडे' धडधडनाऱ्या छातीने ,अन धावनाऱ्या विचाराने बघत गालातल्या गालात हसला ! का काय माहित ? पण एक वेगळाच आनंद त्याला झाला होता . पटकन त्याने 'याहू'वर 'लॉगिन' केलं , अन पिया त्याला ऑनलाईन दिसली . भावना पण किती विचित्र असतात नाही ? दोघेही अर्धा-एक तास एकमेकांना ऑनलाईन बघत होते पण कुणीच काही बोलत नव्हत . चुंबकाच्या सारख्या बाजू जश्या एकमेकांना दूर ढकलतात तशीच दोघांची खोटी मन एकमेकांना दूर ढकलत होती

सुऱ्याने तिचे फोटो 'ओपन' केले . अगोदर तिने पाठवलेल्या 'फेक 'फोटो इतपत सुंदर नव्हती , हे त्याला जाणवले - तरी पण 'हजारात एक' तरी नक्कीच होती . फोटो बघताच त्याने तिला मेसेज टाकला .

' hi , piya '
' sorrrrryyyyyyy ' पापणी लवते न लवते तोच तिचा रिप्लाय आला
'‘Don’t worry Jaan ‘
So Sorry baby, muuuhhaaa, plzzzz donnnttt leeaavee meeeee '
Na re , You look beautiful
‘Really ? ‘
‘yes , beautiful than your friends pic which you send earlier ‘

सुऱ्या सरळसरळ फेकत होता अन हे त्यालाही १०० % माहित होत .पोरांना पोरी पटवण्यासाठी खोटं बोलायची कला कदाचित जन्मजात असावी . कदाचित प्रेमविवाह असफल होण्याचे हे पण एक कारण असावं , आधीच एवढं खोटं बोलून झालेलं असतं तिला मिळवण्यासाठी ,अन मिळाल्यानंतर खोटं बोलायची गरज भासत नाही , अन खरं बोलता येत नाही !

'पियाने' पाठवलेल्या मेलचा परिणाम हा झाला कि , पियाने त्याला तिचा मोबाईल नंबर दिला अन त्याच बरोबर 'स्काईप आय. डी . पण दिला . रान आता मोकळे झाले होते . पियाने आधी तिच्या मैत्रिणीचे फोटो सुऱ्याला पाठवले होते . कारण पियाच अन तिच्या त्या मैत्रिणीचं पटत नसे ! जर कदाचित सुऱ्याने फोटोचा गैरवापर केला तर फसणार - पियाची मैत्रीण होती , पिया नाही - I am the criminal surya हे पियाचच वाक्य त्याला बऱ्याचदा खरंही वाटत असे !

अजून एक खोटं पिया बोलली होती कि तीच वय २२ वर्ष आहे , पण ती अजून १८ची पण नव्हती , हे माहित असूनही , सुऱ्या पियाच्या अधीन झाला होता . एकही दिवसही तिच्याशी न बोलता जात नव्हता . 'व्हिडीओ कॉलिंग' - स्काईपने सोप्प केल्याने - दररोज पियाशी बोलणं आता कॅफे वर सुरु झालं . तिच्या उघड्या शरीराचे कितीतरी स्क्रीन शॉट त्याने सेव्ह करून ठेवले होते . दिवसही अश्याच वेडेपणात 'ओले' जात होते .

पियाचे वडील एका मोठ्या उद्योगसमूहाचे मालक होते . तिच्या घराचे फोटो बघून अन 'व्हीडीओ कॉल' करताना
'तिच्या बेड बघून - आजच्या काळात जर राजकुमारी असेल तर ती पियाच ! अस तो कितीतरी वेळा म्हणत असे ! एकंदर हा फक्त 'टाईमपास' आहे अन कोणत्याही परिस्थितीत तिच्याशी आपलं पुढे काही होणार नाही हे त्यालाही माहित होत अन तिलाहि !

पियाचे आई अन बाबा दोघेही 'बिसिनेस ' वाढवण्याच्या 'नादी 'लागल्याने , मुलीला जास्त वेळ देऊ शकत नव्हते . मोबाईल , टीव्ही , कॉम्पुटर , इंटरनेट , गाडी , रुपये , दिलं म्हणजे आपण पालक होण्याचे सर्व कर्तव्य पार पाडली अशा प्रकरात मोडनारे ते पालक होते .

बाहेरुन नियमबद्ध पण आतून पिया पार वाहून गेली होती ! तिच्या बाबांना फक्त तिचे मार्क्स हवे होते अन त्यातच तिच्या आईच अन तिच्या बाबांचं पटत नसे ! दोघांच्या भांडणाच्या वैफल्यात तिचं उमलनार कोवळ वय वाहून जात होत ! दोघांही तीला कडक शिस्तीत अडकवत होते .त्यामुळे तिला जास्त मैत्रिणी हि नव्हत्या . मुलगी वयात आल्याने तिच्या आई - बाबानी तिच्यावर बंधने घातली होती , कुणाला किती वेळ भेटायचं ! जितके तोकडे त्यांचे कपडे होते तितकेच तोकडे त्याचे विचार पण !

वर्गात दिवसभर काय झाले ? कोण कोण काय म्हटले ? इत्यादी बोलायला तिच्या आई - वडिलांकडे वेळ नसे ! कॉलेज संपल कि तिचा ड्राइव्हर तिला घ्यायला येत असे , तिच्या ड्रॉयव्हरला त्यांनी तिचा 'जासूस' बनवला होता ,तिच्या क्षणाक्षणाची खबर तो ठेवत असे - आपल्या आई -वडिलांचा स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त विश्वास आपल्या ड्राइव्हरवर आहे - हा विचारच पियाच्या कोवळ्या मनाला टोचत असे ! अन म्हणूनच कदाचित तिचाही स्वतःच्या आई -वडिलांवरून विश्वास उडत जात होता . सहसा दिवसभर कोणी घरी नसल्याने ती ' ऑनलाईन ' विश्वासासाठी सहारा शोधू लागली , मग 'पॉर्न वेबसाईट , अन मग सेक्स्ट ' - इंटरनेटला काही सीमा आहे का ? अशातच तिला सुऱ्या सापडला .

सोन्याचा पिंजरा ज्याला म्हणतात ना तेच हे ! कितीतरी वेळा ती सुऱ्याशी बोलताना आत्महत्या करायचा विचार दाखवून देत असे !
तिचं वय कमी असूनही , तिला कोणाच्या तरी सहाऱ्याची गरज आहे , हे सुऱ्याला पटत होते , कदाचित ह्यामुळेच तो तिच्याशी बोलत होता !

' साला - जे जे भेटतात त्यांना आत्महत्या करायचीय आजकाल ! काय चाललंय काय हे ! सुऱ्या कधीकधी स्वतःशीच बडबडत असे !

एक दिवस सुऱ्याने तिचा पासवर्ड विचारला अन त्याच्यावरून दोघांत बरंच वाजलं , कदाचित ' चाट हिस्ट्री ' डिलीट करायला वेळ न दिल्याने असावे !

त्यानंतर पिया त्याच्याशी बोलेनाशी झाली . सुऱ्या दिवसातून ३-४ वेळा ' सॉरी ' चे मेसेज तिला टाकू लागला . दिवसभर सुऱ्या नुसते स्क्रीनच्या समोर तिच्या रिप्लायची वाट बघू लागला - 'वेळ अन रुपये' वाया घालवत असे !

आठवडाभरानंतर तिचा त्याला मेसेज आला . अन पुन्हा त्यांच्या प्रेमाची गाडी धावू लागली .अन हे चक्र असेच सुरु राहीलं !
.........................

बघता बघता पाचवी सेमिस्टर संपत होती . दिवस असे भरकन उडत जात होते !

नित्या अन हर्षला ह्यांचे धागे जुळले होते . HDच्या धाकामुळे दोघांना कॉलेजमध्ये भेटणे जमत नव्हते . पण फोनमुळे त्याच 'सुरु' होत . अक्षा आता GATE शिवाय दुसरं काही बघत नव्हता . शिवकाच्या धक्क्यातून तो एकदम शांत झाला होता . हे प्रेम , सेक्स , सगळं क्षणिक आहे असं त्याला जाणवलं होत , तरीही सेकंड इयरची 'राणी' GATE मुळे त्याची मैत्रीण झाली होती .
'खरं प्रेम करायचं वय २५ आहे ,सगळं सेट झाल्यावर - त्या आधी सगळी ' बालिश ' प्रेम प्रकरण ! चायनीज मोबाईल सारखी ! किती दिवस चालेल ह्याची काही खात्री नाही ' - शिवकाच्या प्रकरणानंतर त्याचा एक मित्रासारखा ' मामा ' हे त्याला नेहमी सांगत होता अन ते त्याला आता पटलं होत . त्यामुळे त्याने राणीला आधीच सांगितलं होत की प्रेम अन भावनांत गुंतायचं नाही !

चंद्या अन तात्या दोघेंहि MPSC , UPSC करण्याच्या मागे लागले होते . MPSC करणाऱ्यासाठी एवढं काही खास नाही , पण जे UPSC करत होते त्यांचा कॅम्पस मध्ये एक वेगळाच थाट होता, हा अन UPSC करणारा टॉपर्स लिस्ट मध्ये असेल तरच ! अक्षा लायब्ररीमध्ये जात नव्हता , रूम मधेच तो अभ्यास करत असे .

सगळं कस अनोळखी वाटत होत . नित्या अन हर्षला प्रेमात अजून रंग भरत होते अन सुऱ्या इंटरनेट वर पडीक होता , अक्षा अन राणी GATE च्या अभ्यासाच्या निम्मिताने भेटत असत !

आज बऱ्याच दिवसाने ' फाईव्ह स्टार्स ' एकत्र GD वर गेले होते ,आपापल्या व्यापाने आता पहिल्या २ वर्षा सारखं वातावरण नव्हतं ! का काय माहित पण अचानक अक्षाची 'दारू अन सिगारेट' सुटली . 'व्यसनांचा विळखा' सुटायला खरंच कसल्यातरी मोठ्या झटक्याची आवश्यकता असते , शिवकाने तो त्याला दिला होता .

पाचही जण मस्त नेहमीच्या जागी बसले . मागच्या २ वर्षाचे किस्से डोळ्यसमोरून भर्रकन सरकत होते . नित्याने 'व्हिस्की' ऑर्डर केली , काही वेळाने चिंटूभाई बाटली घेऊन भेटायला आला .
' और क्या हाल है , नितेशभाई - बहोत दिनो के बाद ? ' चिंटूभाई आपली पंजाबी दाढी कुरवाळत बोलला !
'सब , बढिया , क्या करे , लगभग सबकी सेटिंग हो गयी है अब - और लडकियोंको पिनेवाले बॉयफ्रेण्ड पसंद नही ! नित्या थोडंसं हसत बोलला !
'चलो - आज मेरे तरफ से एक बॉटल फ्री - क्या अक्षय भाई - सही है ना ? - चिंटूभाई अक्षा कडे बघत बोलले !
' नही यार ..... छोड दी मैने - अक्षय हसत बोलला !
' अच्छा , और एक बात नितेश भाई - वो HD सर से जरा बच के रेहाना - १५ दिन पहिले आया था यहा- तुम्हारे बारे मे पूछ रहा था - मेरे लिये तुम भी दोस्त और वो भी दोस्त !
' अरे वो क्या उखडेगा बXXXX ? नित्या त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बोलला .
ठीक है - चलो भाई - सगळ्यांना हाय , हॅलो करत चिंटूभाई निघून गेला .

सुऱ्याने बाटली उघडली अन पेग बनवायला सुरुवात केली .जाणून बुजून त्याने अक्षासाठी पण पेग बनवला . मित्रांना दुसऱ्याने वाईट झालेले चालते , पण चांगले झालेले चालत नाही , मैत्रीचा एक नियम असावा .
चंद्या , नित्या , सुऱ्या तिघांने ग्लास उचलले !

' ओये ... अक्षा .. काय झाले ? उचल ना XXX - बस का हीच का दोस्ती 'शोले 'ची ? - सुऱ्या
' नाही रे , मन नाही करत आता - अक्षा .
' शिवकाने 'देवदास' बना दिया था , राणी अब 'हरिशचंद्र' बना रही है ! - नित्या हसत सुऱ्याकडे बघत बोलला अन टाळी देऊन हसू लागला !
' नाही बे XXX , राणी फक्त मैत्रीण आहे -, दमलोय यार ह्या प्रेम शब्दापासून ! फालतुगिरी नुसती ! कितीवेळा जरी म्हटलं ना - 'एकमेकांशिवाय नाही राहू शकत ! मरून जाईन एकमेकांशिवाय ! अन अजून काय काय चुXXXX - पण मी जगतोय ना अजून , शिवका जिवंतच आहे ना ? अक्षा निराशेने बोलला .
'अबे वो तेरा प्यार नही था साले , शिवका के साथ , वासना से भरा गंदा नाच था ! - चंद्या मधेच हसत बोलला .

अन सगळेच हसायला लागले

मानो तो जिंदगी , न मानो तो कुछ भी नही , और मैने तो माना था ! वासना नसून आपलं प्रेम होत हे पटवण्यासाठी अक्षाचा हा प्रयन्त !
' अबे , जाऊ दे ना , आपला 'रूल' माहितेय ना , पिण्यासाठी कोणी कुणाला फोर्स करणार नाही , अन तसाही मी एकटाच न पिणारा होतो ग्रुप मध्ये - तात्या ने हसत विषय बदलला !

'चिअर्स ..... '

जसं जसं अल्कोहोल पोटात जाऊ लागलं तसतस सुऱ्यान आपलं झाकलेलं मन उघडायला सुरुवात केली .
इतक्या दिवसाचं एकटेपनाणे तोललेले पियाच्या किस्स्याच ओझं त्याने हलकं करायला सुरुवात केली . पिया अन त्याचा 'ऑनलाईन प्रेम / सेक्स 'किस्सा सगळ्यांना सांगायला सुरुवात केली .

ऑनलाईन प्रेम प्रकरण ऐकून नित्या ने जोरजोराने हसायला सुरुवात केली . अन मागोमाग तात्या, चंद्या अन अक्षा पण जोराने हसू लागले .

' सुऱ्या XXX , जाम लागणारे तुझी ह्यात - नित्या
' तुझी काय कमी लागतेय त्या हर्षलामुळे ? - सुऱ्या
'अक्षा गालातल्या गालात हसला -
' तू काय हसतोय लXX - तात्या अक्षाकडे हसत बोलला .

आबे साल्या .. आम्ही पटवल्या तरी - तुझ्यासारखं नाही - ' हाथ ही मेरा साथी ' ,नाही का नित्या ... अक्षा नीत्याकडे बघत जोराने हसत तात्याला बोलला .

अन सगळेच जोर-जोराने हसू लागले .काही वेळाने हसून आपोपच शांत झाले

' आपलं बरंय रे - एकटा जीव सदाशिव - लग्न झाल्यावर तर सगळ होणारच ना - घाई कशाला - चंद्या चकणा खात अन ग्लास उचलत बोलला .
' बरोबर आहे यार तुझं , ह्या प्रेमात काही ठेवलं नाही - अक्षा 'पेप्सी' पीत बोलला .
' पण सुऱ्या , तुझं भारीये रे , आधी म्हणत होतास डायरेक्ट कलेक्टर पटवायची , तू तर बिसिनेस मॅनच्याच पोरीला पटवलं , तेरावा इथेच करणार की बंगालमध्ये ? - तात्या हसत बोलला .
' तिच्या बापाची पोहोच लांब आहे रे , तूच तर बोलला ना ,कमिशनर तिच्या बापाचा मित्र आहे , अन कायद्याने अजून अडल्ट नाहीये ती , ' सायबर क्राईम ' ऐकलं आहे ना !- दांडा घातला ना - मग कळेल . नित्या अल्कोहोल मध्ये डुबत बडबडत होता .
' बरोबर आहे रे , अजून १८ पण नाही ती १७ आहे , पण यार जीव अडकलाय तिच्यात - सुऱ्या पीत पीत बोलला . काय करणार यार - मन नाही लागत तिच्याशिवाय ! अन पुढच्याच महिन्यात होणारेय ती १८ - अन आपण काय एवढे नीच आहोत काय तिचा फायदा घ्यायला ?'
' अडकू दे - मरणार आहेस ह्यात , सोड नाद तिचा, - आयला , तुम्हाला सांगून काही फायदा नाही अन एक सांगू का सुऱ्या एक काम कर अजून एक महिना तिच्याशी बोलू नकोस , जर ह्या महिन्यात ती तुला विसरली नाही तर बघू मग ! पण दूर राहा , डिप्रेशन मध्ये वाटते पोरगी , जर काही केले ना तिने आपल्या जीवाचे मग गेलास तू !

हो ना यार ! म्हणून तर तिच्याशी बोलतोय ,हे प्रेम पण ना कितीही टाईमपास म्हणून करा - जीव अडकला कि अडकला ! बोलणं नाही थांबवू शकत पण बाकी फालतुगिरी नाही करणार ती महिनाभर ... सुऱ्या गंभीर चेहऱ्याने बोलला

- अबे वो तेरा प्यार नही है पिया के साथ ,वासना से भरा गंदा वेबकॅम है - चंद्या हसत बोलला .

अन पुढची ४-५ मिनिटे सुऱ्या अन अक्षा सोडून बाकीचे सगळेच जोराने पोट धरून हसू लागले .

'पण नित्या तुझा काय सिन आहे हर्षला बरोबर ?' सुऱ्याने विषय बदलला .

'चाललं आहे यार , बोलतेय , लाईन देतेय , i love you बोलून झालं , मोबाईलवरच 'किस ' करतोय , एकंदर काय तर तुझ्यात अन माझ्यात जास्त फरक नाही ! साला साधं भेटू पण शकत नाही , बोलू पण शकत नाही - जाम घाबरतेय ती तिच्या भावाला , आत्ता ऐकलं ना तो चिंटूभाई काय बोलला ते HDया बद्दल ? - नित्या

तो तिचा एक क्लासमेट पण तिच्या मागे लागलाय असं ऐकलंय , अन तो HD च्या मित्राचा भाऊ आहे - UPSC करतोय - हुशार पण आहे - तुझा पत्ता बहुतेक कट होणार असं दिसतंय - चंद्या हसत बोलला
.
' नाही बे , असं नाही होणार - नित्या थोडा रागाने बोलला .

थोडा वेळ जरा शांतता झाली .

अबे सुऱ्या तुला डीनने मागच्या आठवड्यात केबिन मध्ये बोलावले होते ना ? 'अटेन्डन्स' कमी आहे म्हणून ? काय झाले ? - नित्याने विषय बदलला - आपली लागणार हे कळलं की लगेच विषय बदलण्यात नित्या पक्का मास्टर आहे !

दिवसभर 'सायबर कॅफे' मध्ये पडून राहिल्यावर काय होणारेय दुसरं ? आयला मला वाटलं पोराने MPSC जरा सिरियस घेतली आहे . You Tube वर लेक्चरर्स करत असेल - अक्षा मधेच बोलला .
' अक्षा तू सोड , साल्या ह्या सेमिस्टर पासून बराच सज्जन झालायेस तू ' - सुऱ्याने अक्षाकडे बघून उत्तर दिले - ' काही नाही रे , त्यांना सांगितले खो -खो च्या प्रॅक्टिस ला गेलो होतो ' अन नीत्याकडे बघत त्याने आपलं बोलणं संपवलं .
' मग ? ' नित्या ग्लास उचलत बोलला .
' मग काय यार , आपला 'बाटलीवाला ' ऐकल तर खरं ! ते बोलले कि, खोखोचा अन ' अटेन्डन्स ' चा काय संबंध ? खो खो तर क्लास नंतर असतो ना ? - डीन च्या चष्म्याची भिंग एवढी मोठी होती कि , ग्लासच्या बाटलीचे बूड कापून त्यांनी चष्मा बनवला आहे असं लॉजिक एकदा सुऱ्याने लावलं अन तेव्हापासून डीनच नामकरण 'बाटलीवाला' अस झालं !

' मग रे " जाम कडक आहेत आपले डीन - आय मीन आपले' बाटलीवाले ' - तात्या

' जाम वैतागलो मी - बोललॊ सरळ कि गोट्या दुखत होत्या प्रॅक्टिस मुळे !

हाहाहा --पाचही जण आत्ता जोरजोराने पोट धरून हसू लागले .

'खरंय यार ... दुखतात खऱ्या .... आम्ही पण खेळतो खो -खो..... पण अबे असं कोण बोलत का डीनला , मैत्रीत ठीकेय पण ..... ? चंद्या मधेच जोरजोराने हसू आवरत बोलला हसत बोलला .
मग काय बोलले ते ? हाहाहा

काय बोलणार - बोलती बंद बाटलीवाल्याची - ' बर जा तू बाळा - असे बोलले' ,आयला ह्यांना ट्रॉफ्या पाहिजेत फक्त ! सुऱ्या रागाने बोलला . सुऱ्या हसत नव्हता

त्यांच्या हसण्याने सगळा GD खणखणूंन गेला होता . बाथरूमला जाण्यासाठी नित्या हसत हसत उठला , सगळेजण अजूनही हसत होते !

परत येताना नित्याने पहिले अन तो स्तब्ध झाला . ३-४ टेबल सोडून त्याच्याच कॉलेज मधले एक कडक प्रोफेसर - ' 'कदम सर' 'त्याला दिसले . कदम सरांनी फुल्ल 'टल्ली' असलेल्या नित्याकडे बघितले . प्रॅक्टिकल मधे आपली 'वाट' लागली आहे हे त्याला कळले . पण एकटा 'बळीचा बकरा' बनेल तो नित्या कसला ?
फसलो तर सगळ्यांनाच घेऊन फसेन असं त्याने मनाशी ठरवलं अन प्रसंग समजून तो आपल्या टेबल जवळ येऊन कदम सरांकडे बघत , त्यांना आवाज येईल एवढ्या जोरजोराने ओरडत बोलला .

' अबे सुऱ्या चल उठ - असं कोण बोलत का आपल्या डीनला ? - अक्षा साल्या - जागा दे मला ? चंद्या, तात्या UPSC / MPSC करायचं सोडून काय पीत बसलाय इथे ? ' सगळ्यांची नावे कदम सरांना ऐकू गेल्याचे समाधान झाल्यावर नित्या जोरजोराने हसत खाली बसला .

अबे XXX , एवढं काय ओरडतोय , बहिरे नाही झोलो आम्ही - तात्या जरा रागाने बोलला
काही नाही रे , ते कदम सर शेजारी बसलेत , त्यांनी मला बघितले , त्यांचा गैरसमज होऊ नये की मी एकटाच पीतोय म्हनूण तुमची नावं घेतली ..... आत्ता निवांत आहे मी - डावा डोळा झाकत हसत नित्या तात्याला बोलला .

(क्रमश: )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुखी's picture

8 Aug 2016 - 5:46 pm | सुखी

मस्त... येउ द्या अजुन :)

अविनाश लोंढे.'s picture

9 Aug 2016 - 2:36 pm | अविनाश लोंढे.

धन्यवाद ...

विप्लव's picture

9 Aug 2016 - 3:08 pm | विप्लव

मस्त पुभाप्र

अविनाश लोंढे.'s picture

10 Aug 2016 - 10:50 am | अविनाश लोंढे.

धन्यवाद

आनन्दा's picture

10 Aug 2016 - 10:52 am | आनन्दा

वाचत आहे