बेधुंद (भाग ३) - Revised !

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
21 Feb 2016 - 1:26 pm

(काल पोस्ट केलेला बेधुंद ३ हा धागा उडवला गेला आहे , जास्त वास्तवदर्शी लिहिण्याच्या नादात कदाचित जास्त ' भडक'झाला असावा …काय करणार वास्तव जास्त भडक असत ! , असो आज पुन्हा उजळणी करून पोस्ट करतोय , धन्यवाद ! )

मार्च २००६ :

नित्या ,अक्षा , सुऱ्या अन चंद्या होस्टेल च्या बाहेर आले , कधीकधी मनात खूप विचारांचं थैमान असलं कि बोलायला काही शब्द उरत नाहीत , मनाच्या तळात अंधाराशिवाय काहीच दिसत नाही ! होस्टेल च्या समोर असलेल्या 'डांबरी' रस्त्यावर ते पोहचले . कॉलेज च्या जीवनात संध्याकाळ सुद्धा अगदी सकाळ सारखीच असते , ताजीतवानी ! रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या बेंचवर काहीजण मोबाईल वर रिंगटोन वाजवत येणाजाणारी 'हिरवळ' बघत बसले होते , काही मुली लायब्ररीतून होस्टेल वर चालल्या होत्या . सुऱ्या ही हिरवळ निरखत होता . नित्या , अक्षा अन चंद्या सरळ बघत चालले होते .
'नित्या , तुझी आईटम' - सुऱ्या नित्याला खुणवत हळूच पुटपुटला .
नित्या ने हर्षला कडे बघितलं , तिच्या आवडत्या काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस तिने घातला होता . तीच गोर रूप काळ्या ड्रेस वर अजूनच खुललं होत . हर्षला ची अन नित्याची नजरा नजर झाली. तिचे डोळे दिवसभर लायब्ररीत बसल्याने दमलेले होते .दोघांच्याही ओठांवर चुमुटसही स्मित नव्हत . नित्याने खिशातून मोबाईल काढला अन तिला कॉल केला . HD च्या भीतीमुळे त्यांना सर्वांसमोर बोलन जमत नसे !
' हाय शोनू ' कूठ चालला आहेस ? हर्षला चालत चालत फोनवर बोलू लागली . इतक्या वेळेत ती नित्या पासून काही अंतरावर दूर गेली होती .
'GD '- नित्याने सरळ उत्तर दिले
'मला खूप भीती वाटत आहे नितेश , हे सगळं का आपल्याबरोबरच होतंय ? हर्षला ची भीती तिच्या आवाजातून जाणवत होती
' काही नाही रे शोनू , होईल सगळ नीट , तू जास्त विचार नको करूस - नित्या तितकाच शांत , मनात मात्र विचारांचं वादळ !
' मला नाही वाटत की काही ठीक होईल ' , तुझी एकही गोष्ट माझ्या भावाला आवडत नाही , मला बोलला कि काय तू त्या बेवड्याच्या नादी लागली आहेस ?- हर्षला शांत आवाजात त्याला बोलली
' हो काय ? मी बेवडा अन तो काय धुतलेल्या तांदळासारखा ? XXX - नित्याने थोडं हसत हर्षला ला उत्तर दिलं .
' ऐक नितेश , जास्त पिऊ नकोस - तुझे मित्र पण ना एकेके नमुने आहेत , मला खूप काळजी वाटते रे तुझी ? मला नाही ना सोडून जाणार कधी ? - हर्षला
' ना रे शोनू - जियेंगे साथ में , मरेंगे साथ में - नितेशने पायासमोर आलेला दगड बुटाने फुटबॉल सारखा मारला .
' तुला काय फिल्मी डायलॉग सुचातायेत , ऐक ना , मी होस्टेल वर पोहचलेय , कॉल कर मला , लव्ह यु । मुह्ह … पुन्हा एकदा सेकंड एअर ला जावस वाटतंय शोनू ,काल मी पूर्ण दिवसभर आपण नाशिक ला गेलो होतो ना तो दिवस आठवत बसले होते … कॉल कर मला , ठेवतेय आत्ता !
' हो, लव्ह यु … चल बाय … अन नितेश ने फोन कट केला .
पुन्हा एकदा सेकंड एअर मध्ये जावस वाटतंय शोनू …. पुन्हा एकदा सेकंड एअर मध्ये जावस वाटतंय शोनू …. हर्षला च हे वाक्य त्याच्या मनात पुन्हा पुन्हा वाजून स्पंदन करायला लागलं !

जानेवारी २००५ :

हर्षलाला कॉलेज ला येयून दीड वर्ष झाली होती , अन नित्या च अन तिच प्रेम बहरू लागलं होत . अक्षा अन त्याच्या राणी च्या मदतीने ! अक्षा नित्या पेक्षा जरा जास्त फास्ट होता , त्याच्या मैत्रिणीच नाव राणी होत . जेव्हा नित्याने हर्षला ला पाहिलं तेव्हा तिच्या प्रेमात तो पाहता क्षणीच पडला , त्याची मदत अक्षा ने अन राणी न केली . HD मुळे एक मोठ गुपित होत . मोबाइल अन gtalk मुळे हर्षला अन नित्या च भागात होत . I Love You बोलून सहा महिने झाले तरी , अजून एकदाही ते दोघ एकमेकांना भेटले नव्हते . जे बोलन ह्यायच ते मोबाईल वर , मोबाईल वर त्यांनी कितीतरी रात्री प्रणय करून रंगवल्या होत्या तरी प्रतेक्षात मात्र स्पर्शही केला नव्हता . त्या दिवशी अक्षा ने अन राणी ने त्यांची भेट घडवून आणली , प्रसंग होता राणीच्या मोठ्या भावाच लग्न ! हर्षला ला तिच्या मैत्रिणीच्या भावाच्या लग्नाला जायची परवानगी मिळाली होती . अर्थातच नित्या अन अक्षा हि जाणार होते .
हर्षला एक दिवस आधीच राणी च्या घरी गेली नाशिक ला गेली होती , अक्षा चा एक मित्र नाशिक ला राहत असे , नित्या अन अक्षा त्याच्याकडे राहिले होते . उद्याच प्लान्निंग पक्क होत . अक्षाच्या मित्राची बाईक अन पूर्ण दिवस हर्षला बरोबर - लग्नाच तर कारण होत . इथं दोघांना ओळखणार कुणी नव्हत . जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही तिथच खर स्वतंत्र अन सैरचार !
सकाळी सकाळी हर्षला उठली , राणी अगोदरच उठून , आवरून तिच्या भावाच्या लग्नाच्या तयारीला लागली होती . हर्षला अंघोळ करून आरशासमोर आली , आपलं सौंदर्य आरशात बघून तिची तिलाच लाज वाटली , स्वतच सौदर्य आरशात बघन हा तिचा आवडता छंद होता . तिच्या शरीरावरची रेखीव वळण कुणालाही आकर्षित करत असत . का कुणास ठाऊक तिच्या ओठातून स्मित हास्य फुलत होत . आज इतक्या दिवसांनी ज्याला जीव लावला त्याला प्रतेक्षात भेटायची वेळ आली होती , तेवढ्यात तिचा फोन वाजला .
'हेल्लो … शोनू ' - हर्षला ने आपली मान झटकून केस आवरून उत्तर दिलं
'हेल्लो , कधी नेघातेयेस ?' नितेश ने उत्तर दिले
'अजून १ तासात पोहोचेन रेल्वे स्टेशन समोर' - हर्षला ने उत्तर दिले
'बर रेल्वे स्टेशन समोर आल्यावर समोर एक कॅफे आहे मी तिथे असेन' - नितेश
'बर , येते... ' - अन तीन फोन ठेवला
अक्षाने त्याच्या मित्राच्या 'पल्सरचा' जुगाड करून ठेवला होता . दोघाही रेल्वे स्टेशन समोर होते , कॉफी हॉउस मध्ये दोघेही गेली
' यार अक्षा , कसस होत आहे ? इतक्या दिवसांनी हर्षला ला स्पर्श करेल मी' - मला खर नाही वाटत
' एवढा 'नर्वस' कशाला होतोस? - अक्षा
' माहित नाही यार - तूझ साल्या सगळं चांगला चाललाय राणी बरोबर' - नित्या
' बर अन तिला कुठेही , कुठल्याही हॉटेल मध्ये घेऊन नको जाऊस , उगीच काही लफडा नको करूस ! - अक्षा न कॉफी चा एक सिप घेतला
' हम्म , बर - तसं काही नाही ठरवलं XXX , तू 'एमिनेम' अन 'विज खलिफा' ची गाणी ऐकून येडा झालायस ….
' हाहाहा - तू तरी मला काही सांगू नकोस , - चल मी जातो आता ,
नित्या एकटाच बसला होता - मनात कितीतरी विचार , कशी असेल हर्षला जवळून ? जशी फोन वर बोलते तशीच बोलत असेल का ? मी हात लावल्यावर ती काही बोलेल का ? उम्या च्या रूम ला गेलो तर ती मला चुकीचं समजेल का ? एक ना लाखो विचार ! एक एक मिनिट एक एक तासासारखा वाटू लागला , काही केल्या घड्याळाचे काटे पुढे सरकत नव्हते , अजून अर्धा तास होता तिला येण्यासाठी ! कॉफीच बिल देऊन तो समोरच्या 'मेडिकल स्टोर' मध्ये आला .
मेडिकल मध्ये कोणी नाही हे बघून तो दुकानात गेला . 'सामग्री' घेऊन तो कॉफी शॉप मध्ये पुन्हा आला . अजून थोडा वेळ असल्याने ब्यागेत असलेल ' आय डेअर ' पुस्तक वाचायला सुरुवात केली अन अजून एक कॉफी मागितली .
काही वेळाने त्याचा फोन वाजला , हर्षला कॉफी शॉप च्या समोर होती . त्याच्या मनात धडधड सुरु झाली , तीच सौन्दर्य त्याला तिच्याकडे बघतच राहायला मजबूर करायला लागलं . तिने निळी जीन्स अन गुलाबी शर्ट घातला होता . त्याने पुस्तक ब्यागेत ठेवलं अन तो समोर पार्क केलेल्या 'पल्सर २२०' कडे गेला .
'एवढा उशीर ? काय मेक अप करत होतीस का ? '- त्याने हर्षला ला चिडवलं
'गप्प रे ! नव्हते करत मेक अप - मला गरज नाही मेक अप करायची हः… ' - हर्षला ने आपल्या तोंडावर रुमाल बांधत काढत उत्तर दिलं !
दोघानाही एक दुसऱ्यांना जोराशी मिठी मारावी वाटत होती . पण खर आयुष्य DDLJ सारखं नसतं
'कसायेस ? 'तिने बाईक वर बसत विचारलं
'रात्रभर झोप नाही आली मला - सारखा तुझाच विचार होता , यार तुझ्या भावाचे मित्र आपल्या कॅम्पस मध्ये नसते तर काय मज्जा आली असती ना' - नितेश बाईक सुरु करत बोलला
'गप्प रे - तू इकडून तिकडे सारखं माझ्या भावावर का जातो ? मला आज काही आठवायचं नाही' - हर्षला ने तोंडावर रुमाल बांधला
नितेश फक्त हसला
'खर सांगू का ? मलाही रात्रभर झोप नाही आली' , मी आज खूप खुश आहे
दोघांनीही निळ्या रंगांच्या जीन्स घातल्या होत्या . बाईक वर बसल्याने दोघांच्या मांड्या एकमेकांना बिलगल्या . अन मनात कितीतरी धडधड … नितेश थोडासा मागे सरकला , तिने ते समजून नितेश च्या थोडेसे जवळ आली . तिच्या छातीचा स्पर्श नितेश च्या पाठीला झाला - तशी वीज त्याच्या शरीरातून वाहू लागली . दिवस एकदम ताजातवाना , कुणीतरी मस्त संगीत वाजवत आहे अन सार जग त्यावर नाचत आहे असा त्याला भास झाला . तिने हळूच एक हात नितेश च्या कमरेवर लपेटला .
'कुठे जातोय आपण ?' तिने नितेश ला विचारले
'एक बाग आहे इथे चांगली जवळच - तू ब्रेकफास्ट केला ?' - नितेश
'हो - राणी अस कस जाऊ देईल ?' - हर्षला
'आपण जे काही 'ते ' फोन वर बोलतो ते तू राणी ला नाही ना सांगत ?' - नितेश
'नाही रे , आम्ही मुली काही तुमच्यासारखे नसतो - हर्षला ने आवाजाला थोडंस वळवत उत्तर दिले ! 'खर सांगू का नितेश , मला कळत नाही कि मी वाईट मुलगी आहे का ? बाबा 'गेल्यापासून' मला पहिल्यांदाच तुला भेटल्यापासून मी 'जगतेय' असं वाटतय रे ! मी जेव्हा तुझ्याबरोबर बोलत असते तेव्हा मी - 'मी असते' . सगळेच अस बोलत असतील का रे जे आपण फोन वर बोलतो करतो तसे ? - हर्षला ने आपलं मन मोकळ केलं
'श्या । काय त्यात , करत असतील सगळेच किंवा नसतीलहि , आपल्याला काय त्याचं ? त्याचं आयुष्य वेगळ - नितेश ने उत्तर दिले
'मला नाही ना कधी सोडून जाणार तू ? मी तुझ्याशिवाय नाही रे जगू शकत - हर्षला ने त्याच्या कमरेवरचा तिचा हात अजूनच घट्ट केला
' नाही रे शोन्या , कधीच नाही ' - नितेश ने तेवढेच घट्ट उत्तर दिले .
दोघानाही अस वाटत होत कि आज त्यांचा पुनर्जन्म झालाय ! आज ज्या तऱ्हेने नितेश हि दुनिया बघत होता तस कधीही त्याने अनुभवलं नव्हत . त्याने बाईक बागेच्या बाहेर पार्क केली अन दोघे आत गेले . दोघांचे हात एकमेकांत गुंफलेले होते , थोडीशी गर्दी होती बागेत , त्यामुळे ५-१० मिनटे ते असेच भटकत राहिले .
'आपण करतोय ते बरोबर करतोय का रे ?' - हर्षला ने त्याच्याकडे बघत विचारलं
'तुला काय वाटत ?' - नितेश
'मला माहित नाही , आय मीन… जर आईला कळाला कि मी तुझ्याबरोबर फिरतेय तर तिला काय वाटेल ?' - हर्षला
'हम्म , बघ परत जायचं असेल तर जाऊ , तसाही लग्न दुपारी ३ ला आहे , मदत कर राणी ला तिकडे ' - नितेश इकडे तिकडे बघत थोडस हसत बोलला
'जा रे , अस का बोलतोस ' - हर्षला थोडस नाराज होत बोलली .
'हे बघ हर्षला , मी तुझ्यावर प्रेम करतो , अन तुझ्याबरोबरच मला पुढंच आयुष्य घालवायचय , सारी दुनिया जरी आड आली तरी मी तुला सोडणार नाही 'त्याने तिच्याकडे बघत उत्तर दिले
अन दोघांचे डोळे एकमेकांना भिडले ! बागेच्या कोपऱ्यात त्यांना झाडाआड थोडासा आडोसा मिळाला . दोघांचे श्वास एकमेकांत वाहू लागले . नितेश ने हर्षला ला अजूनच जवळ खेचले , दोघांची शरीर एकमेकांना बिलगली . त्याने आपले ओठ तिच्या सुंदर लाल ओठांवर टेकवले , तिने तिचे ओठ सोडवले अन ती त्याला बोलली - 'इथं नको न नितेश …… ' पण नितेश ऐकायला तयार नव्हता ,एक हात तिच्या पाठीमागून तिच्या कमरेखाली फिरू लागला . हर्षला चा विरोध तिच्या प्रेमापुढे हरला , तिचे हात त्याच्या केसांतून फिरू लागले ! स्वर्ग कुठे असेल तर तो इथेच ! पाहिलं चुंबन हे कितीतरी विशिष्ट असतं ! आयुष्यभर जे काही क्षण आपण कधीच विसरत नाही त्यातील एक म्हणजे पाहिलं चुंबन ! दोघेही एकमेकांत बुडालेले होते , जस ह्या जगात त्या दोघांशिवाय कुणीच नाही !
ये XXX काय चाललाय काय इथे ? - ह्या मोठ्या आवाजाने त्यांचा एकाकीपणा दुरावला .
झटका लागावा तसा , दचकून हर्षला निलेश पासून दूर झाली , समोरचा गार्ड पाहून तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं . ती भीतीने थरथरु लागली , नितेश चीहि छाती धडधडू लागली .
त्याने हर्षला ला एक मिठी मारली अन बोलला - 'काही घाबरू नकोस शोनू , मी आहे ना …. '
तिशिच्या आसपास असलेल्या राकट चेहऱ्याच्या सिक्युरिटी गार्डकडे त्याने पहिले
'काय … कळत नाही का ? कुठले आहात तुम्ही ? पोलिस स्टेशन इथंच जवळ आहे , चला बरोबर , तिकडे आईबाप काम करून मेहनत करून तुम्हाला शिकायला पैसे पाठवतात अन तुम्ही असले धंदे करता लाज नाही का वाटत तुम्हाला ?
हर्षला आत्ता जास्तच रडू लागली , पोलिस…. भाऊ…. आई … घरचे…. नितेश … कॉलेज …. असा चक्र तिच्या डोळ्यासमोर फिरू लागलं !
क्षणाचाही विलंब न लावता नितेशने हर्षला चा हात पकडला - ' शोनू घाबरू नकोस , नीट ऐक , आत्ता तू इथून लगेच जा - अन जिथे आपण सकाळी भेटलो तिथे जा ! लगेच ,गेट तुझ्या पाठीमागेच आहे , मी येयीन तीथे ! माझी काळजी नको करू - जा लगेच' - नितेश तिच्या कानात बोलला , तिच्या डोळ्यातील भीती नितेश ने ओळखली होती !
तसं हर्षला तिथून काही ह्यायच्या आत गेट कडे निघून गेली .
नितेश ने हर्षला कडे बघितलं , ती बाहेर थांबलेल्या रिक्शात बसली अन क्षणात निघून गेली .
'काय रे ! काय करत होतास , चल पोलिसाकडे - उघड्यावर असले चाळे करणे गुन्हा आहे , माहित आहे ना - गार्ड रागाने ओरडत बोलला
नितेश ने इकडे तिकडे बघितले - 'कोण ? काय करतंय इथं ? मी एकटा काय चाळे करणार XXX , चाळे करायला पोरगी लागते पोराबरोबर … चल पोलिस कडे जायचय ना तुला ? ' - नितेश हि त्याच्याच आवाजात त्याच्यावर ओरडला !
नितेश चा 'गेम' गार्ड च्या लक्षात आला ! त्याने हर्षला ला आधीच पाठवून दिले होते ह्या एकट्याला पोलिसात नेउन तरी जाऊन काय करणांर …
' चल ऑफिस मध्ये , अन शिव्या देवू नकोस - फोडून काढेन ' - गार्ड ओरडला
' सुरुवात तु केली ... ऐक ऑफिस मध्ये नेउन तुला काय मिळणार न मला काय मिळणार ? त्याने खिशातून ५०० ची नोट काढून गार्ड च्या हातावर ठेवली .
'जाऊ का मग आता ?' - त्याने गार्ड ला विचारले
गार्ड काहीच बोलला नाही अन नितेश त्याच्या समोरून निघून गेला ! तो त्याच्याकडे बघतच राहिला !
नितेश घाईघाईने बाहेर आला अन बाईक सुरु केली . हर्षला ची काळजी त्याला सतावत होती ! १५- २० मिनिटात तो हर्षला कडे पोहचला , तेवढ्यात हर्षला चे २०-२५ मिस कॉल आले होते . हर्षला ने त्याला पहिले , अन तिच्या चेहऱ्यावरची काळजी उडून गेली , कपाळाला हात लावत ती त्याच्या बाईक वर बसली !
'काय झालं तिथे ?' - तिने भीतीने त्याला विचारलं
'काही नाही , पैसे दिले त्याला , ५०० अन आलो , ह्यांना पैशाशिवाय काही पडलं नाही ,गार्ड नसता ना तो तर तिथेच मारला असता त्याला ' त्याने रागात तिला सांगितलं
' जाऊ दे ना , चूक आपली होती , पण बऱ झालं त्याने पोलिसात नेलं नाही - हर्षला
'कसलं पोलिस । पैसे कमवायचे धंदे हे - नितेश
अन थोडा वेळ दोघेही शांत झाले
सकाळच वातावरण अन आताच वातावरण ह्यात जमीन - आकाशाचा फरक होता .आता कुणी संगीत वाजवत नव्हता अन सारी दुनिया नाचतही नव्हती .
'जाऊ दे , काळजी नको करू तू ' त्याने तिचा हात हातात घेतला . हर्षला त्याला बिलगून बसली होती .
काही वेळाने ते उम्या च्या रूम वर आले . त्याने दरवाजा उघडला अन दोघे आत आले , दरवाजा बंद करताच तिने त्याला मिठी मारली . त्याने तिला कुशीत घेतले ! क्षणातच त्याचे ओठ एकमेकांवर टेकले ! दोघांच्या श्वासांचा वेग वाढला , त्याचा हात तिच्या टी शर्ट मध्ये फिरू लागले . तिच्या गरम श्वासांची आग त्याला पेटवू लागली . त्याने तिला उचलुन सोफ्यावर टेकवले ! हर्षला चे डोळे झाकलेले होते . तिने डोळे उघडले अन नकारार्थी मान हलवली , तिचे डोळे भरलेले होते .
का ग शोनू ? काय झालं ? - त्याने हळूच तिला विचारलं
हृद्य अनोळख्या गतीने धावत होत . मनात अनोळखे विचार होते !
तिने त्याच्याकडे बघितलं अन ती काहीच बोलली नाही ! तीची काळ्या रंगांची अंतर्वस्त्रे पाहून त्याला सुखद आनंद झाला , त्याचाही आवडता रंग काळा होता . सुंदरतेची जोड असेल तर प्रणयाचा आनंद कितीतरी पतीने वाढतो .
हे काय , नित्या … मी प्रेम करते तुझ्यावर … मला तू पुअर हवाय , असा कव्हर घालून नव्हे हे क्षण मला आयुष्यभर आठवायचेत , ही काय फक्त वासना नाही , मला तूझ्याशी एकरूप ह्यायचय … - हर्षला तिचा एक डोळा झाकत बोलली . कधीकधी तिला त्याला 'नित्या ' बोलायला आवडायचे .
' हः अन , तू प्रेग्नंट झालीस तर ???? - त्याने तिला विचारले
'वेड्या । नाही होणार , … बारावीला Biology होत माझं - तिने त्याला तिच्यावर ओढले घाबरत घाबरत ते दोघ अडखळत , धडपडत प्रणयात वाहू लागली . कितीतरी चुंबनाचा वर्षाव तिच्या शरीरावर होत होता , अन तीही त्याला तेवढ्याच गतीने प्रतिसाद देत होती .
काही वेळाने दोघांचे श्वास नेहमीच्या गतीने वाहू लागले . तो हर्षला कडे बघतच होता , हर्षला ने त्याला घट्ट मिठी मारली . जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांत गुंततात तशी त्यांची मनही अजूनच एकमेकांत गुंततात !
त्याने हर्षला कडे पाहिलं , तिच्या डोळ्यात अश्रुबरोबर वात्सल्य वाहत होता . तिचा गोरा चेहरा लाल झाला होता . तिला मंदिरात ठेवून तिची पूजा करावीशी वाटली त्याला ! तिच्या चेहऱ्यावरचा असा भाव त्याने आधी कधीच बघितला नव्हता !
हर्षला रडू लागली ! त्याने त्याला अजून मिठी मारली अन बोलली - 'मला नाही ना रे सोडून जाणार कधी?'

(क्रमश)

भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
भाग २ : http://www.misalpav.com/node/34925

कथालेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Feb 2016 - 4:14 pm | प्रचेतस

क्या बात..! क्या बात..!!!

येउ द्यात पुढचा भाग.

अविनाश लोंढे.'s picture

21 Feb 2016 - 5:07 pm | अविनाश लोंढे.

धन्यवाद...

शित्रेउमेश's picture

25 Feb 2016 - 9:41 am | शित्रेउमेश

पुढचा भाग येवु दे लवकर....