बेधुंद (भाग ११)

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
11 Jun 2016 - 12:46 am

(बऱ्याच दिवसाने वेळ मिळाल्याने सलग तीन भाग टाकतोय …! कदाचित तारा उडण्याची शक्यता आहे ! )

नित्याचे दिवस हर्षलाची स्वप्न बघत सरत होते , नित्या अजूनच हर्षलासाठी वेडा झाला होता ! कधीकधी एकटाच बाल्कनीत बसून शून्यात बघत असे ! भांडखोर , मस्तीखोर नित्या शांत शांत वागायला लागला होता , कधीकधी तो तिला बघण्यासाठी 'लायब्ररीत' ही जाऊ लागला . काय असत हे प्रेम ? अजून एकदाही तो हर्षलाला बोलला नव्हता पण तरीही त्याला ती आपली वाटू लागली होती . 'विषय' हर्षलाचा अवघड असल्याने कुणी तिच्यावरून त्याला साधं 'चिडवायाची' पण हिम्मत करत नसत !
आलेले नवीन फर्स्ट एअर सगळ्यातच उत्तम होत , 'फाईव्ह स्टार्स' च्या ब्याच पेक्षा एकदम उलट . ५-६ मुलांनी फर्स्ट एअर पासूनच UPSC ची तयारी सुरु केली होती . सगळ्यांचे ग्रेड एकदम चांगले होते . स्पोर्ट्स मधेही फर्स्ट एअर एकदम पुढे ! सर्वगुणसंपन्न !
नित्या हर्षलाकडे कधी कधी कॉलेज मध्ये सामोरासमोर झाली की फक्त बघत असे, थोडासा घाबरत असे , बायोडाटा मागण वेगळ अन सरळ बोलन वेगळ , ह्यातला फरक साधारण थिअरी अन प्रक्टिकल मध्ये असतो अगदी तसाच होता !
HD ची बहिण असल्याने कुणी सहसा तिच्यावर 'लाईन' मारत नसत . हर्षला पण नित्या कडे बघत असे , पण त्याला काडीचाही भाव देत नसे , कधीकधी त्याच्याकडे बघून फक्त मैत्रिणीबरोबर हसून पुढे जात असे !
अश्विनी अन फाईव्ह स्टार्स अधूनमधून ग्रुप मधल्या कुणाचाही वाढदिवस असला कि साजरे करायला अन पार्टी साठी भेटत असत . तात्या अन चंद्या लायब्ररीत जास्त वेळ असत . शिवेका अन अक्षा एकमेकाकडे आता बघतही नसत . प्रेम हि भावना इतकी क्षणिक असते का ? की आजूबाजूच्या बदलानुसार ती बदलत असते ! एकेकाळी जीवाहून आपली वाटणारी शिवेका आता त्याला परकी वाटत होती .

खूप प्रयन्त करून शेवटी नित्याने तिला बोलायचे ठरवले . हर्षलालाही खबर लागली होती की नित्या तिच्या मागे आहे ! न भेटताच त्याने तिला फोन करायचे ठरवले .
अक्षा अन नित्या दोघेही वाडीत फिरायला गेले होते . वाडी विद्यापीठातल एक 'शॉपिंग सेंटर' होत . कॉलेजच सगळ साहित्य तिकडे मिळत असे ! 'बॉईज होस्टेल' पासून १००- २०० मीटर अंतरावर 'गर्ल्स होस्टेल' होते . गर्ल्स होस्टेल च्या अगदी समोर विद्यापीठाच्या कुलगुरूचा बंगला होता . त्याच्याच शेजारी Phd करणाऱ्या International Students साठी होस्टेल होते .
मुलींच्या सुरक्षेसाठी कदाचित विद्यापीठाने जागेची अशी निवड केली असावी . तिथून पुढे १०० मीटर अंतरावर ' वाडी ' होती . साधारण संध्याकाळी ६ वाजता सगळे मुलं - मुली वाडीत भटकायला जात असत ! तिथूनच थोडस पुढे एक ' गणपती 'च मंदिर होत . गणपती मंदिरापासून 'सूर्यास्त' एकदम मस्त दिसायचा ! एक दोन जोडपी सहसा आडोसा बघून तिथे हातात हात घालून 'सूर्यास्त' बघात आपापली कामं करत बसली होती ,७ वाजता गर्ल्स होस्टेल बंद ह्यायचं म्हणून ६ ची वेळ योग्य असे .
प्रत्येक ब्याच मध्ये कितीतरी ग्रुप ! सहसा सगळे ग्रुप नुसार वाडीत फिरायला येत असत .
त्या दिवशी वाडीत फिरताना हर्षलाला फोन करायचा का नाही - ह्याचा विचार करत अक्षा अन नित्या फिरत होते . काय माहित का पण मनात कसलातरी अंधार होता दोघांच्या !

'अरे सामोरामोर बोल रे , फोन करून 'प्रोपोज' केलं एक तर पोरी समजतात की हे प्रकरण सेरिअस नाही किंवा तुझ्यात दम नाही , सरळ बोलू शकत नसशील तर साथ काय देणार आयुष्यभर …… घंटा ? - अक्षा आपले 'प्रेम' ह्या विषयातील होते नव्हते तेवढे ज्ञान पाझरत होता .अन एक सांगू का -पोरींना जरा 'डेरिंग' मुल आवडतात ! त्या संज्याला बघ कसली 'फटाका' आईटम आहे त्याची ! अन तो कसला काळा , कुरूप अन जाड ! आयला सगळी बाकीची पोर मेली होती काय ?

नित्या गुपचूप ऐकत होता , तेवढ्यात blue जीन्स अन black Top घातलेली हर्षला अन तिची मैत्रीण त्यांना समोर दिसली .

३-४ महिने झाले तरी अजून त्याने 'हर्षलाशी' एक शब्द पण बोलला नव्हता .काय का माहित पण त्याला हर्षला समोर दिसली कि 'कसस' होत असे ! एक प्रकारची अनामिक भीती वाटत असे !

' नित्या , आज तरी तिला बोल , जे ह्यायचय ते होऊ दे , बघू पुढे -अक्षा त्याला खुणवत बोलला .
'नित्या चा हात थरथरायला लागला होता . ' काय बोलू यार ? ' छाती तर तिला बघतच धडधडत असे !

'हर्षला..... ' - तेवढ्यात अक्षाने हर्षलाला हाक मारली , दुसऱ्याच्या 'लाईन'ला बोलताना काहीच हिम्मत लागत नसावी , कारण तिला गमवण्याची किंवा ती काय म्हणेल ह्याची भीती शुन्य असते .
हर्षला थोडीशी बावरली ! तीने नित्याकडे बघितले अन ती थांबली .
'काय ? सर - ' ती अक्षाकडे बघत बोलली .
' ह्या नित्याला तुझ्याशी काही बोलायचं आहे ' - अक्षा नित्याकडे बघत बोलला .
' काय यार अक्षा, वाट लावतोयस तू माझी ! - नित्या अक्षाकडे बघत बोलला , त्याच्या डोळ्यात कसलीतरी चमकत भीती होतीम कदाचित हर्षला नाही म्हणेल ह्याची ! कधीही मारामारी करण्यासाठी तयार असलेला नित्या हर्षला समोर आली आल्याने मेल्यागत झाला होता !

हर्षला ने नित्याच्या डोळ्यात सरळ बघितले .

' काही नाही , तुला 'बर्थ डे ' विश करायचा होता - काहीतरी बोलायचे म्हणून नित्या बोलला .
' माझा बर्थ डे ह्या महिन्यात नाही तो तर १७ मार्च ला असतो " - हर्षला थोडंस हसत अन आश्चर्याने बोलली

अशी ट्रिक वापरून मुलीचा खरा बर्थ डे कळतो , हे त्याला अक्षाने आधी कधीतरी सांगितले होते , अन तो कळाला ही ! ' ह्या अक्षाचे काही 'फ़ोर्मुले' कसे काय बरोबर लागतात काय माहित ?' नित्या मनाशीच बोलत होता .

' तू बायोडाटात लिहिलं होत ना कि १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी म्हणून ! - नित्या हळूच हसत बोलला , त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तो जे बोलतोय ह्याला साथ देत नव्हते !

' अच्छा , बर बोला काय बोलायचंय ते ? - हर्षला सरळ बोलली , कदाचित तीही वाट बघत असावी !
' काही नाही , हर्षला , हे बघ मला काय झालाय तेच माहित नाही , सारखी तू अन तूच डोळ्यासमोर दिसतेस ! माझ प्रेम आहे तुझ्यावर, मला आवडतेस तू ! तू पहिलीच मुलगी आहेस जिला बघितल्यावर मला अस होतंय !- नित्याचा हात आता अजूनच जास्त थरथरायला लागला होता .जे सगळे मनात आहे ते त्याने भडाभड मांडले ! पुढून काय उत्तर येयील ह्य विचाराने त्याला 'वेडे' करून सोडले , पण आपण शेवटी बोललो ह्याचही एक समाधान होते .

' बर , अजून काय ? हर्षला मोठ्याने हसली …. 'तसही किती रुपयांचं 'चालेंज ' लावलं आहे मित्रांबरोबर- मला प्रोपोज करण्यासाठी ? - हर्षला तेवढीच शांत अन गंभीर होत बोलली .
' चालेंज ,कसलं चालेंज ! - नित्या गोंधळात पडला .
' तुम्ही मुलं लावता ना 'चालेंज' , मुलींना प्रोपोज करायला ! '
' नाही हर्षला , तू पहिलीच मुलगी आहे जी समोर आली तरी माझी 'वाट' आपोआपच लागते , दिवसरात्र तूच डोळ्यासमोर असते ! - होत नव्हत ते सगळ बळ एकटावत नित्या बोलला .

अक्षा अन हर्षला ची मैत्रीण बाजूला उभे राहून ऐकत होते .
थोडा वेळ हर्षला थांबली !

' बर , हे अस किती जणींना बोलला आहेस आतापर्यंत? - हर्षला थोडीशी रागावून बोलली ,ती 'सर ' वरून आत्ता 'अरेतुरे' करायला लागली .
' नाही रे ! कुणीच नाही ! तूच पहिली आहेस ! नित्याची छाती धडधडत होती .
' बर , झालं का ? जाऊ का आता मी '? अन एक लक्षात ठेव , मला असलं काही करायचं नाही ! हे असले धंदे करण्यासाठी नाही घेतले मी 'अडमिशन' कॉलेज मध्ये ! अन पुन्हा मला बिलकुल बोलायचं / भेटायचं नाही , फोन करायचा नाही !

अन ती सरळ तावाने निघून गेली !
' एवढी फाटते का रे तुझी त्या पोरीसमोर ? च्या मारी भांडणात तर किती उड्तोस ! - हर्षला गेल्यानंतर अक्षाने निराशेचा सूर लावला .

नित्या च डोकं सुन्न झालं ! तो तिथेच खाली बसला !
' यार अक्षा , खरच प्रेम आहे यार माझ तिच्यावर , इतक्या लवकर नको होत तीला प्रोपोज करायला ! डोकं नकारदर्शी हलवत तो स्वताशी बोलला .
' काही नाही रे , लवकर बोललास ते बऱ झालं , तसाही तिला HD च दडपण असणारच ना , काहीही म्हण पण वाट लागायला सुरुवात होणार आहे आपली आत्ता ! - अक्षा

दोन मिनीट नित्या तसाच भरलेल्या डोळ्यांनी खाली बसला , अक्षा काय बोलतोय ह्याच्याकडे त्याच काही लक्ष नव्हत ! काय झालं काय माहित अन तो ताडकन उठून उभा राहिला . चल परत होस्टेलवर . 'झक मारली अन तिला इतक्या लवकर प्रपोज केलं यार , आपण काय सलमान आहोत काय साला पोरी पटायला ?

अक्षा शांत झाला . काय बोलाव हे त्याला कळत नव्हत !
तो तसाच सरळ होस्टेल वर गेला . आपल्या रूम चा दरवाजा बंद करून बसला ! त्याच रात्री तो ३०-४० किलोमीटर असणाऱ्या जवळच्या मोठ्या मंदिरात गेला . पत्याला कदाचित मंदिर अन देव ह्यांची जास्त गरज वाटू लागली होती . एक रात्र मंदिरात बसून दुसऱ्या दिवशी सकाळी आपोआपाच तो परत होस्टेलवर आला . त्याने मंदिरात रडला की काय केले हे 'देवालाच' माहित !

त्यानंतर जेव्हा जेव्हा हर्षला अन नित्या सामोरा समोर येत असत तेव्हा दोघे फक्त एकमेकांकडे बघण्याशिवाय काही करत नसत ! हर्षला त्याच्याकडे बघायचं हि टाळत असे ! परीक्षेच्या वेळी हर्षलाचा सीट नंबर नित्याच्याच रूम मध्ये येत असे ! परीक्षेचे हे दिवस नित्यासाठी आनंदाचे होते , पाहिजे तितका वेळ तो बेधडकपणे हर्षलाला बघू शकत होता . नित्या चा नंबर मागच्या बाकावर तर हर्षला त्याच्या पुढे ! प्रत्येक प्रश्नाच उत्तर लिहून झालं की तो तिच्याकडे नक्की बघत असे ! तिच्याकडे बघणे हाच त्याच्यासाठी परीक्षेच्या अवघड प्रश्न पत्रिकेतील 'हसणार' उत्तर असे !

त्याला आता राहवत नव्हत , रात्रभर तो एकटा राहायला लागला होता ! मित्रांसाठी त्याला आता जास्त वेळ नव्हता किंवा मन लागत नव्हते ! बाकीचे 'फाईव्ह स्टार्स' मधले त्याच्याकडे बघून काहीही न बोलता जात होते , सगळे सांगून दमले होते !
कितीतरी वेळा त्याने तिला कॉल करायचा प्रयत्न केला पण 'डायल ' हे बटन दबत नव्हता . काय करावं काही कळत नव्हत !
शेवटी त्याने न राहवून मोबाईल वर मेसेज लिहिला .

'harshala , nitesh here , all i want to say is i jst cnt frget u , i relly luv u ! coz of u i am gting crzy! wen i c u it fels lke i m alive agin, not sure y i m writing tis msg too..! at last sorry - dont want to dstrb u ' - नोकिया मध्ये मेसेज लिहायचं शब्दांच लिमिट असल्याने त्याने कसाबसा मेसेज टाईप केला !

'पाठवू की नको' - हा विचार लाखवेळा अंधारात एकटाच होस्टेलवर फिरत होता - का आपण आपली इज्जत कमी करतोय एवढ तिच्या माग लागून ! पण प्रेमात हृद्य कधी मेंदूचं ऐकत का ? - तिचा काहीतरी रिप्लाय येयील म्हणून तो वाट बघत बसला पण झालं काहीच नाही , रात्रभर त्याला झोप आली नाही .

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्याला फोन आला ! HD च्या M.Tech करणाऱ्या एका पहिलवान मित्राचा होता तो कॉल !
' नित्या , भेटायचय तुला , बागेत ये ' पलीकडून रागावलेला आवाज ऐकू येत होता .
' पण का सर ! ' नित्या बराच घाबरला - एक तर तो पहिलवान अन नित्यापेक्षा दुप्पट दांडगा अन त्यात कशामुळे बोलावलं आहे हे त्याला माहित होताच !
'हर्षलाला भेटायचय तुला ! १५ मिनिटात बागेत ये ! - अन त्याने फोन ठेवला .

नित्याला आत्ता पुढे काय होईल ह्याची बिलकुल कल्पना नव्हती ! HD ने काही सांगितले का ? की 'हर्षला हो म्हणेल ? शक्यता O % ! आज त्याला कुणालाच काही सांगाव वाटत नव्हत , ना अक्षाला ना सुऱ्याला !
त्याने कपडे घातले अन थरथरत्या मनाने तो निघाला ! मनात विचारांच्या थवा उडत होता ! झपाझप पावले टाकत तो बागेत पोहचला ! समोर HD चा मित्र अन हर्षला बसले होते !

' काय आहे हे ? - हर्षलाने त्याला बघताच रागाने आपला मोबाईल नित्याला दाखवला .
नित्याकडे आत्ता कोणतेच शब्द नव्हते . त्याचं मन आतून तुटलं होत .

' हे बघ नितेश , आपण इथं शिकायला आलोय , हे असले लफडे करायला नाही , कळाल ना , मी आता माझ्या पद्धतीने सांगतोय ! विषय थांबव इथच! अजून हर्षला ने किंवा मी HD ला सांगितलं नाही ! पुन्हा जर का तू चुकूनही एखादा मेसेज केला तर मग पुढे HDया त्याचा पद्धतीने सांगेल, ! - HD च्या मित्राने आपला राग आवरत बोलायला सुरुवात केली .
' मी तर ह्याला आधीच सांगितलं होत की मला फोन /मेसेज करू नको म्हणून ? कळत नाही का तुला - हर्षलाचा गोरा चेहरा रागाने लाल झाला होता !
' हे बघ , मला काही प्रोब्लेम्स नकोत पुढे ! तू ह्याला धमकी समज किंवा तुझा मोठा भाऊ समजावतोय असं समज - पण इथून पुढे बिलकुल नाही ! गप्प राहायचं काय ? - HD चा मित्र बोलत होता . ' मागच्या वर्षी तुम्ही काय पराक्रम केले हे अजूनही कुणी विसरले नाही , पण विसरू नकोस की तू पंगा कुणाशी घेतोय ह्यावेळी ! चड्डीत राहा रे !

नित्या निशब्द झाला ! त्याच्या डोळ्यातून का कुणास ठाऊक पहिल्यांदा पाणी आले !
' चल जा ! अन हर्षला अन HD चा मित्र रागाने बाहेर आले .

बाग 'गर्ल्स होस्टेल' च्या जवळच असल्याने अश्विनीने त्यांना पाहिलं होत . तिने सुऱ्याला लगेचच फोन केला .

' सुऱ्या , तो नित्या काय करतोय हर्षला बरोबर बागेत , तिने तिच्या भावाला फोन केला ना तर काय होईल माहितेय ना तुम्हाला ? तुम्हाला सांगितलेले कळत नाही का रे ? - अश्विनी रागात बोलली .

अश्विनी चा फोन येताच सुऱ्या तसाच सरळ बागेत आला . नित्या तिथे अजूनही बेंचवर आपलं डोकं खाली करून बसला होता . आजूबाजूने काहीजन जात होते पण नित्याला काय झाले हे विचारायची हिम्मत कोणाची होत नव्हती !

' काय ,डोक्यावर पडलास काय येड XX ? कळत नाही का तुला काय करतोय ते ? - एवढा अपमान अन तो पण एका पोरीसाठी ! त्या XXX अक्षाला काही काम नाही ! कोण होतास तू नित्या , ' वाघ ' होतास तू 'वाघ ' अन आता 'कुत्रा' झालास त्या पोरीसाठी ! सुऱ्या नित्यावर ओरडला .

' एक दिवस हर्षला इथंच माझ्याबरोबर बसेल ! नित्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसत बोलला .

(क्रमश :)
बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777
बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798
बेधुंद - भाग ६ : http://www.misalpav.com/node/35832
बेधुंद - भाग ७ : http://www.misalpav.com/node/35859
बेधुंद - भाग ८ : http://www.misalpav.com/node/35885#new
बेधुंद - भाग ९ : http://www.misalpav.com/node/35937
'बेधुंद - भाग १० :http://www.misalpav.com/node/36003

कथाविरंगुळा