बधुंद (भाग ७)

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
29 Apr 2016 - 5:01 pm

अक्षाला काय बोलावे हे कळेना ! त्यात शिवेकाच्या डोळ्यातील 'अश्रूत' त्याला त्याच प्रेम वाहताना दिसू लागलं . त्याने काहीच न बोलता आपला उजवा हात तिच्या खांद्यावर ठेवत तीला अजून जवळ ओढले . आत्ता वासनेला काहीही वाव नव्हता , मनात फक्त 'आत्ता पुढे काय ? ' नकळत त्याचा हात तिच्या नाजूक , मध्यम आकाराच्या स्तनांना लागला . झटका लागावा तसा त्याने हात मागे घेतला ! शिवेका ने पुन्हा त्याच्या डोळ्यात पाहिलं अन त्याचा हात तिने आपल्या छातीवर ठेवला अन त्याच्या हातावर तिने आपला हात ठेवला .अक्षा तिच्याकडे बघतच राहिला .
पुढच्या वादळाची कल्पना आता आली होती . तो आता तिच्या स्पर्शाने पेटेनासा झाला . काही दिवसापूर्वीच तिचा चुकनही स्पर्श झाला तरी त्याच्या अंगात ठिणगी उडत असे , पण आता सगळी शिवेका माझी आहे तर हा 'थंडपणा' कसला ? मनाचे विचित्र खेळ त्याला कळेनासे झाले ! एकमेकांच्या कुशीत झोपल्यानंतर शेवटचे ते विद्यापीठात पोहचले !
१-२ दिवस अक्षा कॉलेज ला गेला नव्हता ! त्याच्याकडे मोबाईल नसल्याने शिवेकाशी बोलणे ही झाले नव्हते . नित्या , तात्या , चंद्या खो -खो च्या स्पर्धेसाठी गेले होते . काय कराव हे त्याला कळत नव्हत . आज त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत होती . तिला सगळ सांगाव असाही वाटलं ! अचानक त्याने आपली 'ब्याग' भरली अन तो घरी जाण्यासाठी निघाला . घरी पोहचल्यावरही त्याला काही सुचत नव्हते . बाप दारूच्या नादी लागल्याने आधीच घरी , तणावाला उधान आलं होत . तो आपल्या वडिलांशी बोलतही नसे ! त्यात आईला हे सगळ सांगून अजून तिला का काळजीत पडायचं म्हणून त्याने काही सांगितलं नाही . आपल्या घरी झोपल्यानंतर घराच्या पत्र्याकडे बघत तो दुनियादारी समजून घेऊ लागला ! घरची परिस्तिथी ना वाईट ना चांगली ! मध्यम वर्गीय !
काही करमेनासे झाल्याने त्याने आपल्या बाईकला किक मारली अन 'STD बूथ' मध्ये गेला , २०-२५ एकेक रुपायाची नाणी घेतली अन 'कोइन बॉक्स'कडे गेला . शिवेकाला त्याने फोन केला .
' कौन ' शिवेका त्या बाजूने बोलली
'अक्षय '
' कहा है तू ? भूल गया क्या मुझे ? ' थोड्याश्या रागात शिवेका बोलली
'नही यार , घर मे कुछ प्रोब्लेम आया तो , घर आया मै ! तुझे बोला था ना ,की हम तेरे जितने अमीर नही है !
'मुझे फर्क नही पडता , मै बनावूंगी अमीर तुझे - शिवेका हसत बोलली
अक्षाला काय बोलावे हे कळत नव्हते !
'सून , मैने अमित को सब कुछ बताया अपने बारेमे '
क्या ? क्या बताया ? कहा ?
'आया था वो मिलने मुझे ! मेरे साथ 'फिझीकल' होणे लगा तो मैने उसे दूर किया , उसने ही मुझे पुछा की कोई दुसरा मिल गया है क्या ? 'कुछ बदली बदली सी लाग रही हो तुम !'
'तो ????'
'तो क्या / मैने बता दिया की मुझे तू पसंद है'
'लेकिन तूने मुझे क्यू नही बताया ? अक्षा थोडंस ओरडत बोलला
' तू क्यू चिल्ला रहा मुझपे ? तू था क्या यहा ? कैसे बताती ? एक तो इतने दिन ने कॉल किया तूने ! - शिवेकाचा आवाज थोडा रडका झाला
' सॉरी , तो वो क्या बोला ?
' कुछ नही बोला , जोरसे थप्पड मार दिया मुझे ' - शिवेका आता रडायला लागली होती .
' बेह्नचोद , साला - सून तू रो मत मै कल आता हु कोलेज'
' मुझे बहोत डर लग रहा है अक्षय '
' तू डर मत !
अन असाच पुढे सगळे २०-३० मिनिटे ते बोलत राहिले . STD वाला अक्षा कडे विचित्र नजरेने बघत होता !
' रखने से पहले बोल ना ' शिवेका
'क्या बोलू ?
' पता है ना तुझे ! i love you बोल …
' हम्म , i love you - चल रखू अब ? - अक्षा
'i love you too जान , मूह्हा '

अन शिवेका ने फोन ठेवला , एवढे एकत्र येयुनही त्यांनी अजुन चुंबन ही घेतलं नव्हत . फोन वरच हे पाहिलं चुंबन अक्षाला बर वाटल .'i love you too जान , मूह्हा ' हा आवाज किती तरी वेळा डोक्यात भिनभिनत होता . पण का कुणास ठाऊक , आत्ता शिवेकाच्या गुलाबी ओठांची ओढ कमी झाली होती किंवा नव्हतीच मुळी ! प्रणय कदाचित मेंदूत असावा , कोणी कस दिसत ह्याच्याशी प्रणयाचा काहीही संबंध नसावा . परी सारखी सुंदर शिवेका बरोबर असताना त्याला तिचं चुंबन ही घेऊ वाटत नव्हत !
दुसऱ्या दिवशीच तो कॉलेज ला परत जायला निघाला ! बस मध्ये बसल्यावर आई , वडील डोळ्यासमोरून फिरू लागले ! खासकरून आई , त्याला तिला सगळ्या जगाची सुखं द्यायची होती ! त्याचं लहानपण ते आतापर्यंत चा प्रवास त्याच्या डोळ्यासमोरून भिरभिरू लागला होता !
कॉलेज मध्ये संध्याकाळी पोहचल्यावर तो सरळ कॉलेजच्या सभागृहात गेला . वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी , निवड सुरु होती . ' हे डोला रे … देवदास मधील गाण्यावर शिवेका अन तिची मैत्रीण नाचत होत्या ! निवड करण्यासाठी कमिटीचे सर बसले होते अन निवड बघायला बाकीचे काही विद्यार्थी बसले होते . शिवेकाने अक्षाला आत येताना पहिले अन ती पाहतच राहिली . कसाबसा तिने 'डान्स' संपवला अन ती अक्षाकडे बघत बाहेर आली . अक्षाने समजून घेतलं अन तो हि बाहेर आला , डोळ्यांच्या खुणा जास्त बोलक्या असतात ! संध्याकाळचे ६-७ वाजले असतील , स्नेहसंमेलन म्हटलं की कॉलेज कस फुलून जात ! वेगवेगळ्या स्पर्धा , नाटकं , नाचगाणी ह्याच्या सरावाने कॉलेजही नाचत होत ! सभागृहाच्या बाहेर काही मुल / मुली तयारी करत होत्या .

' कहा था तू ? तुझे मेरी कुछः फिक्र है या नही ? जैसे वापस आये है , आज मिल रहे है - शिवेकाला त्याचा हात पकडावा वाटत होता पण इथं सगळे ओळखणारे होते ! तिने आपल्या भवनांना बांध घातला .
' काम था यार ,
' 'i love you ' - शिवेका हळूच अक्षाला बोलली , कुणाला ऐकू जाणार नाही अस ! तिच्या डोळ्यात का कसला पण निरागस भाव होता .
' हम्म '
आजूबाजूने त्याने नित्या अन सुऱ्याला जाताना पहिले . त्यांनी फक्त बघितलं पण काही बोलले नाहीत .
' चल , बाहर जाते है , यहा कुछ अजीब लग रहा है - अक्षा
आजूबाजूचे सगळे डोळे फाडून अक्षा कडे बघत होते , पाहिलं म्हणजे, एवढी सुंदर पोरगी अक्षा ला पटली कशी अन दुसर म्हणजे शिवेकाचा एक बॉयफ्रेंड आहे हे सगळ्या कॉलेज ला माहित होत मग अक्षा हिच्या फंद्यात कसा काय पडला ?
ते दोघेही बाहेर गेले .शिवेकाने बोलायला सुरुवात केली . ३-४ दिवस तुंबलेल्या मनातील विचारांचा बांध फुटला होता . दोघामध्ये बऱ्यापैकी अंतर होत . ट्रेनमध्ये जशे ते दोघे बसले होते तसे नव्हते . अंतर असूनही दोघांची मने एकमेकांना घट्ट बिलगली होती .
अमित तिला दररोज फोन करत असे ! त्याने तिला धमकावायला सुरुवात केली होती . शिवेका 'इंजिनीअरिंग' करत होती तर अमित पुण्यात कसलातरी 'डिप्लोमा' करत होता .त्याचा अहंकार इथेच दुखावला गेला होता . कधी - कधी वाटत प्रेम हे काहीही नाही ! जसं बायकोला जास्त पगार मिळत असला कि नवऱ्याचा अहंकार दुखावतो , अगदी तसच डिग्री अन डिप्लोमा च्या फरकाने अमित शिवेकावर जळत होता , त्याला इंजिनीअरिंग ला प्रवेश मिळाला नव्हता . शिवेकाने अक्षयला सांगितले की तो दररोज फोन करतो , रडतो , ओरडतो , धमक्या देतो !
शिवेकाच हे सगळ ऐकून त्याला आता अंदाज आला होता कि अमित काहीतरी करेल ! २-३ तास ते तसच शून्यात बोलत होते , विचार करत बसेल होते ? काय करावे काही कळत नव्हते ! येणाजाणारी मुल / मुली त्यांच्याकडे बघत पुढे जात होत्या . रात्रीचे १० वाजले होते , स्नेहसंमेलन असल्याने रत्री १० पर्यंतचा वेळ मुलीना दिला होता नाहीतर नेहमी मुलींचं होस्टेल ७ वाजताच बंद होत असे !
अक्षा तिला सोडायला तिच्या होस्टेल पर्यंत गेला ! खूप इच्छा असतानाही दोघांना मिठी मारणे सोडा पण एकमेकांचा हातही पकडता येत नव्हता ! अन तसे केले असते तर शिवेका चारित्र्य नसलेली पोरगी तर अक्षा 'सेकंडहान्ड' वर मजा मारणारा अशी ओळख कॉलेजमध्ये झाली असती ! दुनियेला प्रेम समजत नाही !
तिला सोडून अक्षा एकटाच रूम वर आला . त्याचा रूम पार्टनर बाहेर गेला होता ! नित्या त्याच्या रूममध्ये आला .
' काय रे लXX , काय चाललंय तुझ त्या शिवेकाबरोबर ? '
' काही नाही रे !
' काय काही नाही बे ? सांगायचं नसेल तर नको सांगूस , मी काही एडXX नाही ' - नित्या
' नाही रे ' अक्षा हसायचा प्रयन्त करत नित्याला बोलला
' Congratulations , तुझी क्रिकेटच्या टीममध्ये निवड झाली फर्स्ट एअरलाच, इतिहास बनवला राव तू , फर्स्ट एअरलाच !
'थ्यांक्स … पण विषय नको बदलूस ! जरा जपून राहा त्या विषकन्येपासून , मुव्हीस बघायला येतोस का TV हॉल मध्ये ?
हो चल , मलाही खूप बोअर होत आहे - अक्षा

दर शनिवारी थर्ड एअर च्या TV रूम मध्ये मुव्हीस भाड्याने आणल्या जायच्या , त्यासाठी वेगळे पैसे सगळ्याकडून जमा केले जायचे . हॉलीवूडचे नविन ३-४ मुव्हीस अन रात्री बारा एक वाजले की पोर्न CD लावल्या जात असत ! काहीजण ते बघायला थांबत तर काहीजण रूम वर निघून जात असत ! सामुहिकरित्या पोर्न बघताना सुरुवातीला अवघडून यायचं पण नंतर सवय झाली होती . जीवनात काहीही करायचे असेल तर भीती पहिल्यांदा वाटते , नंतर काही विशेष वाटत नाही .पोर्न बघत असताना काही मुल विचित्र टोमणे मारत असत अन बाकीचे त्यावर सगळे हसत असत ! त्यात हॉट अन कुणाशीच अफ़ेअर नसलेल्या मुलींची नावही घेण्यात येत असत .कारण अफ़ेअर असेल्या मुलीचं नाव घेतलं की राडा होणार हे नक्की ! पण फक्त विनोद करण्याच्या नजरेने त्यांचे हे टोमणे असत !
नित्या अन अक्षा ही TV हॉल मध्ये होते पोर्न सुरु होते , अन काही वेळाने एक थर्ड एअरचा पोरगा ओरडला
' कम ऑन शिवेका , कम ऑन ! आह !
सगळे हसायला लागले . शिवेकाची अशी बेइज्जती अक्षाला सहन झाली नाही ! कधीही स्वतः हून भांडण न ओढवून घेणारा अक्षा अचानक ओरडला !
'कोण आहे बे ? हॉल मध्ये अंधार असल्याने नेमकं कोण बोललं आहे हे कळाल नव्हता .
' का रे XXX , बहिण आहे काय तुझी ती ? एवढी का जळलीय तुझी ? - एक आवाज अजून आला .
अक्षाने उठून 'लाईट' लावली . थर्ड एअर मधल्या पंकजने शिवेकाला प्रोपोज केले होते , तिने नाही बोलल्याने कदाचित तो असे - तसे आवाज काढत असावा .
' पोरींची नाव घेऊ नकोस , एवढीच मस्ती आहे ना तर xxx पाय घालीन ' - अक्षाचा राग अनावर झाला होता अन तो पंकज च्या दिशेने निघाला .
'ती बहिण असू नसो त्याची ' झXX तुला बहिण नाही का ? - नित्या मध्ये पडला . काहीही असो, राडा कोणही करो मग तो सुऱ्या असो किंवा अक्षा नित्या मध्ये पडायचा ! मनगटात जोर त्याच्याच जास्त होता ! ' जास्त आग झाली असेल तर हातात पकड अन बघ ना , दुसऱ्या पोरींना बदनाम कशाला करतोस ? कदाचित नित्याने अक्षाच्या डोळ्यात शिवेकाबद्दलच प्रेम जाणाल होत .
'तुमचं लई झालाय र ! ' साले फर्स्ट एअर , अंड्यातून बाहेर नाही आला तुम्ही लागला चढायला आमच्यावर ! अस म्हणत पंकज नित्याच्या अन अक्षाच्या अंगावर मारण्यासाठी आला .
लगेच कुणीतरी TV बंद केला अन काहीजण मध्ये सोडवायला पडले . अक्षा अन पंकज एकमेकांना शिव्या देत होते . सगळे TV हॉल च्या बाहेर गेले . नित्याने अक्षाला बाहेर आणले . पंकजला थर्ड एअर च्या पोरांनी बाहेर नेला .
'काय बे , शिवेका तुझी कोण लागत नाही तर एवढा 'शाहरुख ' का झाला होतास ? तुमच्या लफड्यात मारणार मला तुम्ही , सुऱ्या झाला की तू अन तू झाला की सुऱ्या ! एवढा दम आहे का xxx ? - नित्या रागाने अक्षावर ओरडत बोलला .
'काही नाही रे , माहित नाही मला काय झालाय ते' , पागल झालोय मी ! - अक्षा
' XX तूच तर म्हणत होतास , पोरींच्या फंद्यात पडू नये , पोरींचा गुढग्यात नसतो तर घोट्यात असतो - अन काय झालं तुला ?
'लफडा झाला यार नित्या …! आत्ता नाही सांगत पण नंतर सांगेन !
'झक मार xxx ' अन दोघेही आपापल्या रूम मध्ये गेले !

दुसऱ्या दिवशी शिवेका अन अक्षय भेटले ,
'तेरे दोस्त मुझे बिलकुल पसंद नही , इनके साथ रहेगा तो कुछ नाही कर पायेगा तू जिंदगी मे , वो तेरा दोस्त नित्या 'कैसा' लडका है ? कितना झगडा करता है वो ! तू दूर रेह उससे ! शिवेका त्याला बोलली .
मित्रासाठी स्वतःची पर्वा न करणारा नित्या अन गुलाबी शिवेका !!! कसं समजावू शिवेका ला ?

(क्रमश :)

बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777
बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798
बेधुंद - भाग ६ : http://www.misalpav.com/node/35832

'

कथाविरंगुळा