हर्षला ने त्याचा हात झटकला , आपले डोळ्यावर आलेले केस बाजूला करत ती बोलली - 'नको ना नितेश , प्लीज ….
जसा हर्षला ने त्याचा हात झटकला , तस नितेशच मनही त्याला झटके देऊ लागले , अन त्या झटक्याने त्याला २ महिन्यापूर्वीची त्याची आयुष्याला कलाटणी देणारी घटनेत अडकवले . अन तो काही क्षणासाठी स्तब्ध झाला .
साधारण दोन महिन्यापूर्वी :
जवळपास एक वर्ष 'चोरून' सुरु असलेल 'त्याच अन हर्षला'च प्रेम प्रकरण आता 'जगजाहीर' झालं होत . काही गोष्टी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी लपत नाहीत ! विशेषत 'नैसर्गिक गोष्ठी' - अन प्रेम पण एक 'नैसर्गिक गोष्ठ' आहे .प्रत्येक प्रेमात एक नायक अन एक खलनायक असतो ! खलनायक जर दुसरा असेल तर फारसा फरक नाही पडत पण जर तो 'तिच्या' घरातला असेल तर मात्र 'ना घर का … ना घाट का '!
'हर्षला' चा मोठा भाऊ 'हर्षलला'ह्याच कॉलेज मधून पास आउट होऊन जवळजवळ ३ वर्ष झाली होती . तरीही त्याचे काही १-२ मित्र MPSC करण्यासाठी 'कॅम्पस' मध्ये होती . कारण हा 'कॅम्पस' MPSC करण्यासाठी पूरक होता . आजही महाराष्ट्रातील ५० टक्के पेक्षा जास्त प्रशासकीय अधिकारी ह्याच विद्यापीठातले निघतील ! MPSC म्हणजे 'वारी' किंवा 'वनवास' अशी साधारण इथल्या विद्यार्थ्यांची 'व्याख्या' होती ! काही जणांना 'विठ्ठल' पहिल्या वारीत पावतो तर काही जणांना तो कधी पावेल हे 'वारकऱ्याला' माहित नसते ! झालं तर 'सोन्न' नाहीतर 'दगड' अशीही दुसरी व्याख्या इथं MPSC ची होती . ठराविक वेळाने येणाऱ्या 'MPSC घोटाळ्याच्या' बातम्यांना इथली पोर भाव जरी देत नसली तरी थोडीशी 'डिस्टर्ब' तरी नक्की होत असत. काहीही झालं अन कितीही 'घासली' तरी 'माथ्यावर स्टार्स' नसतील तर काही होणे शक्य नाही अशी बऱ्याच विद्यार्थ्यांची मानसिकता झाली होती .
हर्षल अधून मधून विद्यापीठात येत असे , त्याच्या बहिणीला भेटायला अन त्याच्या मित्रांना हि भेटायला ! हे ही समजले होते कि 'तिसऱ्या' प्रयत्नात तो मुख्य परीक्षा पास झाला होता , फक्त एक मुलाखत अन PSI ! PSI क्लास ३ चे पद - पण समाजात सन्मान (किंवा भीती) अन 'पैसा' (मग तो काळा असो वा पांढरा ) बरोबर येणार होता . हर्षल देशमुख चा टोपण नाव HD अस होत . सगळे त्याला HD म्हणायचे , नितेश जेव्हा प्रथम वर्षाला होता तेव्हा HD Passout झाला होता , पण त्याच्या दादागिरीचे किस्से ऐकूनही सर्वांची 'फाटत' असे . कुणी सहसा त्याच्याबरोबर बोलायचं नाही . ५ फुट १० इंच उंची अन वजन जवळजवळ ८५ किलो , तरीही स्पोर्ट्स मध्ये तो फिट होता ! असाही एक किस्सा होता कि HD जेव्हा first year ला होता तेव्हा त्याचे final year च्या एका मुलाशी भांडण झाले होते अन HD ने त्या final year च्या senior ला मैदानावर सगळ्यासमोर लोळवलं होत . ह्या विद्यापीठात अशी घटना म्हणजे दुर्मिळ असे . अन नितेश च दुर्दव्य हे होत की हर्षला HD ची बहिण होती .
त्या दिवशी नितेश खूप घाबरलेला अन बरोबरच रागावलेला होता . मैदानावरून सरळ तो रूम मध्ये आला . 'तात्या' library मध्ये अभ्यास करत होता. 'अक्ष्या , सुऱ्या अन चंद्या' तिघे जण चंद्या च्या रूम मध्ये 'तीन पत्ती' खेळत बसले होते . तेवढ्यात नितेश जरासा चिडलेला अन रागात रूम मध्ये आला . त्याचा 'टी शर्ट' मानेवर थोडासा चूरघळलेला होता . नितेश कब्बडी खेळत असल्याने कुणाचे लक्ष गेले नाही .
'का बे काय झाल ? एवढा का चिडलाय' ? सुऱ्या ने तीन पत्ती खेळता खेळता मान वर करून नितेश ला विचरले
'राडा होणार आहे भावा ! अन ह्यावेळी असा तसा राडा नाही तर एकऐकांची अशी फाडणार आहे कि साला पुन्हा शिवता आली नाही पाहिजे ! नित्या ने रागाच्या भरात आपला सदरा काढून बेड वर आपटला . ' आज GD वर जाऊ , आज पिण्याचा मूड आहे ! नित्या बोलला
'जाऊ कि' - चंद्या अन अक्ष्या एकदम त्याला बोलले .
'अबे XXX , पण झालं काय'? सुऱ्या ने नित्या ला विचारले
'HDया शी भिडलो मी आज , बाल्कनी मध्ये …. नित्या ने केसांवरून हात फिरवून थोडेशे निराशेने उत्तर दिले !
'काय '?????? - सुऱ्या चे तोंड एक- दोन मिनिटासाठी उघडे राहिले अन चंद्या अन अक्ष्यानी हातातील पत्ते फेकून दिले , त्यांच्या धडधडणाऱ्या छातीचा आवाजही ते आत्ता ऐकू शकत होते . कारण आत्ता आपल्या सगळ्यांची 'वाट' लागणार आहे हे त्यांना कळलं होत . कारण नित्या ला HD मारणार अन आपण मध्ये पडणार अन पडल्यावर धुलाई सगळ्यांची !
'आईला … काय याड लागलाय का तुला ? अबे पंगा घे पण 'यचड्या' शी ? …. सुऱ्या ने हातातील पत्ते फेकत जवळ जवळ तो ओरडला !
'सुऱ्या … हे होणारच होत आज ना उद्या … अक्ष्या थोडसं शांत राहण्याचा प्रयत्न करत बोलला .
'XXX होणार होतं हे ? तुझ काय साल्या तू जाशील IIT त अन चंद्या आपला क्लास topper जाईल दिल्ली ला … इथं मी अन नित्या 'उपटतो' एकमेकांची अन त्यात हे 'लफड' ! - सुऱ्याचा तोंडावरचा ताबा भीतीमुळे सुटला होता !
'अबे XXX … एवढा का विस्कटलाय ? - नित्या राजे वर ओरडला .
अन दोन मिनटे रूम मध्ये शांतता पसरली . तीन पत्ती चे पत्ते जमिनीवर होते ! अक्ष्या छताकडे बघत कोणत्यातरी विचारात बुडला . सुऱ्या रूम मधून इकडून तिकडे फेऱ्या मारू लागला ! नित्या ने क्रिकेट चा बॉल हातात घेतला अन भिंतीवर मारून झेलू लागला . चंद्या शांत पणे नित्या कडे बघत होता !
'पण झाल काय ? चंद्या ने नित्या ला विचारले अन रूम मधली शांतता भंग केली .
'मी मैदानावरून परत येत होतो ! ' हेचड्या' न अन त्याच्या दोन-तीन मित्रांनी मला बाल्कनीत घेरलं ! साल्या ने हर्षला ला ही काल कानफाडीत वाजवली ! तिने मला दिलेले सगळे 'ग्रीटींग्स कार्ड्स' त्याच्या हातात आले आहेत ! अन आमचे private letters पण ! माझी रूम त्याने मागच्या आठवड्यात फोडली होती ! कपाटातील तिचे ग्रीटींग्स अन आमचे love letters त्याने चोरले ! माझा शर्ट पकडून मला बोलला कि पुन्हा जर का हर्षला ला बोलला किंवा भेटला तर XXX तुकडे करेन ! पण मी काय घाबरर्ण्यातला नाही , मी हि त्याचा शर्ट पकडला ! मध्ये रेक्टर आले म्हणून आज तो वाचला - नित्याने आपल मन मोकळं केलं !
'काय ? तो वाचला ? - सुऱ्या अन राजे कुस्सीत पणे नाकारार्दर्शक मान हलवत हसला
मग काय ? - नित्या
'एवढी फाटते तर तू नको मध्ये पडूस' - नित्या सुऱ्या वर ओरडला
'पण तुझी रूम मागच्या आठवड्यात त्याने फोडली तर मग तू आम्हाला का नाही सांगितले' - अक्ष्या ने आपली मान छताकडे ठेवताच नित्या ला विचारले
'अन , सांगितले जरी असते तर काय उपटले असते तू ? - नित्या ने अक्ष्या कडे न बघता उत्तर दिले . अक्ष्या ने फक्त मान हलवली .
'बघू काय होईल ते , काहीही करून हे मिटवायला पाहिजे यार ! चंद्या शांत पणे बोलला
अन पुन्हा एकदा रूम मध्ये शांतता !
'तात्या कुठाय ? 'नित्या ने विचारले
'तो लायब्ररी मध्ये' - चंद्या बोलला - 'चल बस तीन पत्ती खेळू ' चंद्या ने मूड बदलण्याचा प्रयत्न केला .
'नाही यार , आज मूड नाही '- नित्या बोलला
'च्या मारी त्या हर्षला ने तुला फार मागून पुढून XXX आहे , प्रेम कराव तर ह्या अक्ष्या सारखा - ह्याची 'आईटम' जेव्हा ह्याला बोलली कि तू आयुष्यात काहीही करू शकणार नाहीस , अन तिला ब्रेंकअप करायचय , तेव्हा कसा देवदास झाला होता हा - 'दिवसरात्र ; बार मध्ये अन ढाब्या वर नव्हता तर लायब्ररी मध्ये पडून होता ! चार महिने साला दाढी हि केली नव्हती याने ! तेव्हाच केली जेव्हा GATE चा रिझल्ट आला ! प्रेमात पडलं तर पडावं अक्ष्या सारखं अन तू साला - हर्षला … हर्षला…. हर्षला - सुऱ्या ने ज्ञान पाझरल !
'सुऱ्या तू माझी आत्ता मारू नकोस' - अक्ष्या ने मध्येच सुऱ्या च वाक्य तोडलं .
पुन्हा एकदा शांतता ! बाहेर थोडासा गारवा असूनही मनात कसलीतरी आग होती सर्वांच्या !
हो ते खरेय सुऱ्या , पण तुमचा काय ? चंद्या ने मधेच सुऱ्याला विचारले .
'आम्हाला तर MSc च्या पोरींमध्ये रस आहे , आपल्या क्लास मधल्या अन जुनिओर्स मध्ये काहीही इंटरेस्ट नाही . 'बडी सोच रखो यार ' , एखादी MPSC पास झालेली पोरगी पटवणे म्हणजे carrier set , direct नवरा एखाद्या कलेक्टर चा ! सुऱ्या हसत हसत बोलला
अन चंद्या अन सुऱ्या हसायला लागले ! अक्ष्या फक्त गालातल्या गालात हसला ! नित्या मात्र शांत होता ! काहीही झाले तरी चंद्या थोडासा मूड बदलण्यात यशस्वी झाला .
संध्या काळचे सहा वाजले होते ! वातावरन अगदी मस्त होत ! होस्टेल वर पोरांचा आवाज येत होता ! कुठे गाणी सुरु होती ! परीक्षा महिन्यावर आल्याने जवळ जवळ अर्ध होस्टेल लायब्ररी मध्ये घासत होत . चोघहि GD - गुरुनानक ढाबा वर जायला तयार झाले ! गुरुनानक ढाबा पंजाबी ढाबा होता ! विद्यापीठापासून ४ किलोमीटर अंतरावर !
'पण नित्या - तिचा भाऊ MPSC मुख्य परीक्षा पास झालाय असं ऐकलय यार' ! सुऱ्याने भीती व्यक्त केली
'हम्म … ' चंद्या ने मान हलवली
'किस्सा … वाढवू नको नित्या , जिथं आहे तिथच थांब' - अक्ष्या नित्याला बोलला
' आत्ता जे होईल ते होईल - आर नाहीतर पार - जगलो तर हर्षला सोबत नाहीतर मरण परवडल , जर त्याने माझं carrier बरबाद केल तर त्याच carrier मी बरबाद करेन ! नित्या आपले दोन्ही हात केसांवरून फिरवत , थोडंस वर बघत बोलला
(क्रमश :)
प्रतिक्रिया
15 Feb 2016 - 9:05 pm | एक एकटा एकटाच
पुढला भाग लवकर टाका
18 Feb 2016 - 3:44 pm | अविनाश लोंढे.
धन्यवाद.....
18 Feb 2016 - 3:50 pm | कपिलमुनी
भाषा , स्पीड छान !
18 Feb 2016 - 7:07 pm | अविनाश लोंढे.
धन्यवाद....
http://www.misalpav.com/node/34768
18 Feb 2016 - 5:20 pm | आनन्दा
मस्त
18 Feb 2016 - 7:07 pm | अविनाश लोंढे.
धन्यवाद....
भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
10 Aug 2016 - 12:02 am | विप्लव
अॅग्रीकॉस चे दिवस आठवले. मस्त कथा