बेधुंद - भाग १

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
5 Feb 2016 - 10:44 pm

(ह्या कथेतील सर्व पात्र नाव बदल्यामुळे काल्पनिक आहेत ! २००६ मध्ये कधीतरी … ह्याचे किती भाग होतील हे आत्ता मलाही माहित नाही ! )

आयुष्य हे कधीकधी 'वेड' करणार असतं . दुपारी खूप झोपायचा प्रयत्न करूनही त्याला झोप आली नाही . डोळे फक्त झाकलेले पण मनात लाखो विचारांचं वादळ ! 'चक्रीवादळात' अडकल्या प्रमाणे त्याचे मन कितीतरी वेळा अगणित विचारांमध्ये भिरभिरत होतं अन एखाद्या विवश 'पाचोटाला' जस वाऱ फिरवून कुठेही फेकून देत अगदी तसं त्याच मन कुठल्यातरी विचारात अडकल अन घड्याळाच्या गजराच्या आवाजाबरोबर जाग झालं . डोळे उघडताच 'हर्षला' चे बोलके काळेभोर डोळे त्याला सतावू लागले . ठरल्याप्रमाणे त्याने आज तीला भेटायचे वचन दिले होते . त्याने बेड वर पडलेला टॉवेल उचलला अन बाहेर बाल्कनीत आला .
आयुष्याची महत्वाची चार वर्ष वाळू जशी हातातून निसटून जाते तशी त्याच्या हातातून निसटून गेली होती ! पुन्हा न कधी परत येण्यासाठी ! शेवटच्या वर्षाच्या , शेवटच्या सेमिस्टर ची शेवटची परीक्षा संपली होती . निकाला ची पर्वा नव्हती त्याला ! पर्वा होती ती हर्षला ची ! तीन वर्षाचं प्रेमप्रकरण , जीवाला जीव देणाऱ्या मित्रापासून दूर जाण्याच मनात काहूर …. त्याने आपले तोंड , हात ,पाय धुतले , काहीतरी चुकल्यासारखा तो स्वतला आरशात बघत होता . ५-१० मिनटे झाल्यानंतर तो भानावर आला अन आपल्या रूम नंबर २०२ कडे गेला . रूम मध्ये एक टेबल , एक खुर्ची , एक बेड , कोपऱ्यात क्रिकेटची एक bat , badminton चे एक racket अन २ dumbels पडलेले होते . टेबल वर विद्यापीठात त्याला मिळालेले ५-१० स्मृतिचिन्ह ठेवलेले होते . Campus Interview होऊन ५० पैकी २८ जणांना नोकरी लागली होती .त्यात तो नव्हता . आयष्य हे चित्रपटासारख नसत ! कॉलेज मध्ये कितीही मस्ती केली तरी ' हैप्पी एंडिंग ' ! भिंतीवर त्यांची नजर गेली , जिवाभावाच्या ५ मित्रांचा फोटो , मागच्या वर्षी ट्रेनिंग ला दिल्ली मध्ये गेल्यावर काढलेला फोटो !
अक्षा , सुऱ्या , तात्या , चंद्या अन तो ! अक्षाला IIT मध्ये M.Tech साठी GATE पास करून admission जवळ जवळ मिळाल होत , सुध्या त्याच्यासारखाच होस्टेलवर होता , तात्या MPSC ची मुख्य परीक्षा पास झाला होता अन पुण्याला मुलाखतीची तयारी करण्यासाठी ' चाणक्य मंडळ ' पुणे मध्ये गेला होता , चंद्या Indian Agricultural Reserch Institite , Delhi मध्ये मास्टर्स करण्यासाठी परीक्षेच्या तयारी साठी गेला होता . UPSC करण्याचा त्याच्या स्वप्नांची पहिली पायरी , अन इथं तो एकटा फोटोकडे बघत ! काय असेल माझं भविष्य ? खेळात आपण batch मध्ये पहिला , पण स्पोर्ट्स च्या ह्या trophies घेऊन कुठ कुठ जाऊ ?
टेबल वरचा 'नोकिया ११०० 'वाजायला लागला , 'शोनू 'नाव मोबाईलवर झळकायला लागलं ! 'हमे तो अपनोने लुटा , गैरो में कहा दम था ' ची ringtone वाजायला लागली . त्याने फोन उचलला

'हा शोनू , बोल ' धडधडनाऱ्या ह्र्यद्याने त्याने उत्तर दिलं
'शोनू नको ना बोलू , मला कसस होत ' हर्षला पलीकडून बोलली
'बर …. ' तो आपल्या कसदार छातीकडे खाली बघत बोलला
' येतोयेस ना , भेटायला ? उद्या मी घरी जाणार आहे '
'हो …. १५ मिनिट येतोच … आवरतोय , तो आपला एक हात केसांवरून फिरवत बोलला
' ये लवकर ' तिने फोन कट केला

आपल्या पिळदार शरीराकडे बघत त्याने तिने गिफ्ट दिलेला 'टी शर्ट' घातला , सहा फुट उंची , ७४ किलोच वजन , अगदी बॉलीवूड होरोला टक्कर देईल असं त्याच व्यक्तिमत्व ! जीन्स pant घालताना हर्षलाच्या भावा बरोबर झालेल्या भांडणात लागलेल्या गुढग्यावरच्या जखमेवर त्याचं लक्ष गेलं ! त्याचे डोळे अचानक पाण्याने भरले , मनातील विचाराचं पाझर डोळ्यातून होऊ लागलं ! त्याची रूम तिसऱ्या मजल्यावर होती , हळूहळू पायऱ्या कापत तो दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या 'सुऱ्या ' च्या रूम कडे गेला अन दरवाजा वाजवला . सुऱ्या ने दरवाजा उघडला , लुकडा सुकडा , ५ फुट ५ इंच , त्याने बनियन अन कमरेला टोवेल लपेटला होता , टेबल वरती MPSC च्या पुस्तकांचा ढीग लागला होता , त्यातील एक तो वाचत होता .

'का र , कुठ चाललाय? सुध्या न विचारलं
'हर्षला ला शेवटच भेटायला '
' झक मार XXX , एवढं झालं तरी तुझी मस्ती काय जात नाही - सुध्या ने निराशेचा सूर लावला
'XXX … ६ वाजता जाऊ वाडीत गणपतीच्या मंदिराकड …आज एकदम एकत वाटत आहे यार …. तो सुध्या ला थोड्या रागातच बोलला
' बर … जा झक मार … सुध्या नेही त्याला तेवढ्याच रागात उत्तर दिले

तो तिथून खाली आला अन मुलींच्या वसतिगृहाकडे चालू लागला . चालताना ह्याच रस्त्यावर 'हर्षला 'बरोबर केलीली मस्ती अन मित्राबारोबाराचे कधीही न पुसणारे क्षण एखाद्या मुव्ही च्या flashback scene प्रमाणे डोळ्यासमोरून सरकू लागले . सहजच त्याची नजर कॉलेजच्या इमारती कडे गेली , ह्या वर्षीच्या gathering मध्ये त्याने बनवलेला 'लोगो ' इमारतीवर चमकत होता . बघता - बघता तो मुलींच्या वसतीगृहासमोर आला , एरवी त्याला बघितला कि 'हर्षला…… ' असा आवाज करून त्याला चिडवणारा 'मुलींचा आवाज' आज एकदम शांत होता , बहुतेक कुणी नसावं होस्टेल मध्ये अन ज्या असतील त्यांना आता ओरडणे म्हणजे ' जले पे नमक ' अस असेल . मुलींच्या वासातीगृहाशेजारील असलेल्या 'बालोद्यानात' तो गेला . आज उद्यानातील फुललेली 'फुलं' त्याच्याकडे बघून हसत होती .

त्याची नजर समोर बसलेल्या त्याच्या 'परीकडे ', सुंदर हर्षला कडे गेली , तिचे काळेभोर मोठे डोळे , सरळ नाक , लाल 'लाली' लावल्याने अजूनच लाल झालेले तिचे सुंदर ओठ, आज वारा तिच्या केसांशी त्याने खेळायचे 'खेळ'खेळत होता . तिची prefect 'फिगर' ! 'हर्षला' ने त्याच्याकडे पहिले , पाहताच तिचे डोळे थोडेसे भरले , तो सरळ काहीही न बोलता तिच्या शेजारी जाऊन बसला. आज जवळ असूनही जीवघेणा दुरावा होता , एखाद्यावर जीव ओवाळून टाकावा , स्वता पेक्षाही जास्त प्रेम कराव …. जीवघेण्या क्लुत्या करून तिला आपलंसं करण अन तिच आपल्या आयुष्यातून निघून जाण ,कायमच … हो कायमच । ह्या सारख दुसंर दुख: कोणत असेल तर फक्त नरकातच !!!

त्याने केविलवाण्या अन साशंक नजरेने तिच्याकडे बघितलं , त्याच्या डोळ्यातील कितीतरी वेदना त्याच्या मनाला सतावत होत्या ! तिने आपले वाऱ्यावर उडणारे color केलेले केस सावरत त्याच्याकडे बघितले . नकळत त्याचा हात तिच्या गोऱ्या , नाजूक बोटांवर गेला अन विजेचा झटका लागावा तसा तीने तो हात तिने झिडकारला …!!!!!

(to be continue ………. )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ह्या कथेतील सर्व पात्र नाव बदल्यामुळे काल्पनिक आहेत !

म्हणजे सत्य कथा आहे.

पु ले शु

एक एकटा एकटाच's picture

6 Feb 2016 - 3:52 am | एक एकटा एकटाच

सुरुवात चांगली आहे

अविनाश लोंढे.'s picture

6 Feb 2016 - 1:09 pm | अविनाश लोंढे.

धन्यवाद...