(बऱ्याच दिवसानंतर ... ! मलाच माहित नाही की हा भाग टाकायला एवढा उशीर का लागला ? )
धन्यवाद - एखादे पुस्तक वाचतोय/ वाचतेय असे वाटतेय अशा संदेशाबद्दल !
तरीही ' मिपा ' वर असल्याने ह्या भागाच्या आधुनिक शॉर्ट 'हिंग्लिश' ने होणाऱ्या शेवटामुळे ( अती ) शहाण्यांच्या प्रतिकियासाठी शुभेच्छा ! )
.............
नित्याशी बोलणं झाल्यावर आंधळ्या मनानं , अक्षा सरळ बसमध्ये बसला अन घरी आला ! घरी आल्याने आई खुश होती अन सहजकीचं त्याच्या आवडीचे जेवण बनवले होते . जेवण झाल्यावर तो बाहेर आला , घरी एकटाच असल्याने त्याने सरळ जुन्या कॅसेट्स काढल्या अन आपली आवडती गाणी ऐकू लागला , पहिल्यांदा त्याने 'त्याच्या आवडत्या 'आशिकी 'ची गाणी लावली , नंतर किशोर कुमार , मोहम्मद रफी , आशा भोसले , रेहमान , RHTDM ...... -
मन कुठल्याच गाण्यावर थांबेना ! गाणी एकेक तो पुढे ढकलू लागला - एकेक गाणी तो अर्ध्या - एक मिनिटासाठी ऐकू लागला अन पुन्हा बदलू लागला !
काही वेळाने ही सगळीच गाजलेली सुपरहिट मनाच्या जवळ असणारी, आवडीची गाणी त्याला ' फालतू ' वाटू लागली अन २-३ कॅसेट्स त्याने सरळ भिंतीवर आपटल्या - कदाचित त्याच्या मनाचं दुःख दूर करण्याची ताकद संगीतात नव्हती ! ' च्या मारी हे साले , कसली कसली स्वप्न दाखवतात ह्या ' मूव्हिस' मधून भोXXX ! घरी असल्याने उघड -उघड तो शिव्या देऊ शकत नव्हता , मनातल्या मनात त्याने आपला राग व्यक्त केला . मन शिवेकाला शोधत कुठेतरी अंधारात धडपडत होत ...
त्याने हेडफोन कानाला लावला अन शेवटी 'आर्ट ऑफ लिव्हिंग ' च्या 'गिटारवर' वाजणाऱ्या भजनाच्या कॅसेट्स लावल्या , आता त्याला जर बर वाटू लागले . मन काही वेळासाठी तरी कुठेतरी 'उजेड' दाखवू लागलं होत , पण काही वेळाने शिवकाचे विचार पुन्हा त्याच्या मनात पिंगा घालू लागले !
'अक्षय तू जिंदगी मे कुछ नही कर सकता ! ' - शिवकाचे हे वाक्य त्याच्या मनात वादळ भरत होतं ! काही वेळाने तो बाहेर आला अन ११ वी अन बारावीच्या 'फिजिक्स' अन 'म्यॅथ्स' ची पुस्तके शेजारच्या बारावीला असणाऱ्या राजाकडून घेतली .
जुनी पडलेली आपलीच एक वही उचलली अन वेड्यासारखे तो फिजिक्सचे 'प्रोब्लेम्स ' सोडवू लागला , २ वर्षापूर्वी अवघड वाटणारे 'प्रोब्लेम्स' त्याला आज सहज सोपे वाटू लागले ! कदाचित जीवनातील 'प्रोब्लेम्स' हि असेच असावेत , वेळेप्रमाणे सोप्पे वाटत जाणारे !
वेळेप्रमाणे काय वेडे होतो आपण त्यावेळी , एवढी सोप्पी गणितंही आपण सोडवू शकत नव्हतो ! मीही काही वर्षाने असे म्हणेल असे त्याला वाटू लागले !
कदाचित आयुष्यही असंच असावं असं त्याला वाटू लागले अन कधी एकदाची ही ३-४ वर्ष निघून जातायेत अन आपण शिवेकाला विसरतोय असं त्याला झालं !
सेकंड एअरनंतर एका महिन्याचं 'industrial training' अनिवार्य होत .
आत्ता मात्र मार्क्सच्या 'जातिव्यवस्थेने' 'फाईव्ह स्टार्स'ना वेगळे केले . चंद्या अन तात्या टॉपर्स लिस्ट मध्ये असल्याने त्यांना ट्रेनिंग साठी चांगली ' इन्स्टिटयूट ' मिळाली होती , अक्षाने जाणूनबुजून गावाशेजाराची कंपनी निवडली होती ! त्यात त्याला हवा तेवढा वेळ मिळणार होता अन ट्रेनिंग पूर्ण केला ह्याच ''प्रमाणपत्र मिळणार होत, शिवाय खर्चही वाचणार होता . नित्या अन सुऱ्या उत्तर प्रदेश मध्ये कुठेतरी गेले होते .
' तू जिंदगी मे कूछ कर नही सकता अक्षय ।' हे शिवेकाचे बोल अक्षाच्या कानाच्या पडद्यांना पुन्हा पुन्हा आवाज घालत होत ! अन त्याच रागात तो GATE साठी ' pitch' तयार करत होता ! फिजिक्स ,केमिस्ट्री ,मॅथ्स ११ वि १२ वि पुन्हा पुन्हा वाचून नको असलेले 'फंडे' तो नकळत ' क्लेअर' करत होता , त्यालाही माहीत नव्हतं की जे तो वाचतोय त्याचा कितपत फायदा होणार होता .
'GATE इज नॉट कप ऑफ टी ' - GATE पास झालेल्या एका सिनिअर्सच बोलणं त्याच्या हृदयात धडधडत होत ! गावातल्या इंटरनेटवर जाऊन त्याने GATE चा सगळा अभ्यास प्रिंट काढून घेतला , सेकंड एअर पर्यंत शिकलेले जवळ जवळ काहीच नव्हत सिल्याबस मध्ये !
११ वी , १२ वी तर सोडाच ! चिल्लर !
जास्त करून थर्ड एअर अन फायनल एअरचा अभ्यास होता , अजून तो ते शिकायचं होता , पण जे जे २ वर्षापर्यंत होतं , ते ते त्याने जवळ जवळ घोकल होता , - शिवेकाने त्याच्या डोक्याला 'शॉट ' दिला होता ! एका मुलीच ४-५ अक्षरांच एक वाक्य अक्षयला एवढं बदलतील हे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं !
साला जी पोरं प्रेमाला सुरुवातीला 'टाईमपास ' समजतात तीच एवढी वेडी का होतात ? कदाचित ' प्रेम ' त्यांच्याशी बदला घेत नसेल ???
शिवकाचे बोल आपल्याला एवढ सिरिअस करतील ह्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती !
तो ट्रेनिंग ला फक्त आठवड्यातून एकदा जायचा अन तिथल्या एका मित्राकडून सगळे रिपोर्ट कॉपी करून आणत असे !
'आपली शैक्षणिक पद्धत एवढी विचित्र आहे कि , जे आपल्याला 'कॉलेज 'मध्ये विषय शिकवतात ते पुस्तकी ज्ञान , अन काम करतो त्याचा ' घंटा' संबंध १०-१५ % , एवढाच ! एवढ शिकायचं इंजिनिअरिंगमध्ये अन पुढे काय तर फक्त 'एक्सेल शीट !' डिग्री फक्त दरवाजा आहे नोकरी मिळण्याचा ' - त्या कंपनीत काम करणारा एक त्याचा मित्र त्याला सांगत होता .
डोळ्याची पापणी लवते न लवते तोच , ट्रेनिंगचा १ महिना संपला अन पुन्हा सगळे कॉलेजवर आले .
----------
थर्ड एअर
थर्ड एअर पासून होस्टेल बदलत असल्याने , अन प्रत्येकाला वेगळी रूम मिळत असल्याने मन अन शरीरही थोडं मोकळं - मोकळं झालं होतं ! कधीही काहीही वाचा रूममध्ये , अन वाचताना कसेही वाचा , काहीही करा - डिस्टर्ब् करणार कोणी नव्हतं !
पण तरीही होस्टेल बदल्याने आता जरा आपण सिनिअर झालो आहोत , हे खरंच भासत होतं !
खरच २ वर्ष गेली अशीच उडत ! काही कळालं नाही ! आता फक्त शेवटची २ वर्ष हातात ! अक्षा विचार करत रूम मध्ये आला !
A होस्टेल' थर्ड एअर साठी होत, B होस्टेल मध्ये आधीच फायनल एअर राहत होतं ! A आणि B हॉस्टेल ३ मजल्यांच , ग्राउंड फ्लोरवर M.tech 'नावाला 'करणारे पण MPSC साठी वर्षोनोवर्ष ' घासणारे ' सिनिअर्स राहत होते ,शेजारीच रेक्टर ऑफिस होतं अन त्याच्याच शेजारी सामूहिक फोन होता .
पहिला अन दुसरा मजला थर्ड एअरच्या पोरांना होता ! जास्त मार्क्स असणारे वरच्या मजल्यावर , कमी असणारे मध्ये , मार्क्स नुसार रूम्सची विभागणी सुरु झाली , चांद्या , तात्या अन अक्षा एका लॉबी मध्ये वर आले , नित्या अन सुऱ्या खाली गेले ! मैत्रीमध्ये असं वेगळं जाण बर नसलं तरी , नवीन मित्र हे आयुष्यभर नव्या जागेनुसार येतच असतात !
नित्याने आपल्या दादागिरीच्या जोरावर त्याच्या 'फ्लोर वरती' रस्त्याच्या शेजारी 'हिरवळ ' दिसणारी चांगली रूम शोधली होती , खासकरून त्याच्या हर्षलाला बघण्यासाठी ! बघता बघता नवीन हॉस्टेल वर सगळे सेट झाले !
दिवस भर्रकन उडत जात होते . थर्ड एअर पासून जवळ जवळ सगळेच सिरिअस झाले होते , नवीन आलेल्या जुनिअर्स अन नव्या पोरींमध्ये आता जास्त काही रस नव्हता . कदाचित करियर नावाचं भयाण टेन्शन मागे लागलं असावं !
पण ' इंटरनेट ' अन 'याहू चाट ' ने सगळ्यांना वेड करून सोडलं होतं . कॉलेजच्या कॉम्पुटर 'ल्याब' मध्ये इंटरनेट 'फ्री' होतं , रात्री १० वाजेपर्यंत कुणीही ते वापरू शकत होत , शक्यतो थर्ड अन फायनल एअरची मुलेच असत ल्याब मध्ये ! रॅगिंग मुळे फर्स्ट अन सेकंड येणार कुणी नसे !
सुऱ्या कायम 'याहू ' वर चाट करत पडीक होता ! वेगळ्या वेगळ्या ग्रुप वर टाईमपास करत असे , पोरींना शोधतं ! कदाचित खऱ्या आयुष्यात ज्यांना पोरी पटत नाहीत अशीच सुऱ्या सारखी मुलं 'नेटवर ' पाखरं ' शोधत असावीत !
'any hot girl for hot chat ? असा मेसेज त्याने एका हॉट ग्रुप वर टाईप केला !
hi - अन त्याला एक रिप्लाय आला .
अन मग तो दररोज न चुकता त्या ' hi ' रिप्लाय आलेल्याशी चाट करत होता ! पहिल्याच दिवशी 'सेक्स चाट ' केल्याने , त्याची लव्ह स्टोरी उलट्या प्रवाहाने वाहू लागली होती ! ७- ८ दिवस बोलून झाल्यावर , त्याचा तिला पहिला प्रश्न - ' व्हाट्स युअर रिअल नेम ? ' असा होता !
१०-१५ दिवस कोणत्या तरी 'पिया' नावाच्या पोरीशी तो चाट करत होता , ती खरंच पोरगी आहे की पोरगा हे त्याला माहीत नव्हतं ! अन त्याचा जास्त फरक हि त्याला पडणार नव्हता ! कल्पनाशक्तीची शक्ती भयाण असते !
पण ठरलेल्या वेळेप्रमाणे ती ही 'ओनलाईन' येत असल्याने शक्यता जरा जास्त वाढली होती ! सर्वसामान्य - साधारण प्रेम हे डोळ्यातून सुरू होऊन 'प्राणयापर्यंत ' जातं , पण ह्या आभासी दुनियेत ते वासनेने सुरू झालं होत ! त्याची एकेक रात्र 'पीया' शी नको त्या गप्पा करण्यात अन 'online sex ' करण्यात जात होती . काही दिवसांनी तेच तेच बोलणे कंटाळवाणे वाटू लागले अन तिने तिचे काही फोटो सुऱ्याला मेल वर पाठवले !
तिच्या कपड्यावरून ती 'श्रीमंत 'घराण्यातली दिसत होती , अजूनही त्याला माहीत नव्हते की खरंच आपण जिच्याशी बोलतोय ती पोरगीच आहे का ? पण त्याचा 'दिवस ' रात्रीची वाट बघण्यात निघून जात असे , आत्ता ते 'जी मेल (gmail ) वर बोलू लागले होते , त्याने ह्या आभासी 'पीया ' चा विषय कुणालाच सांगितला नव्हता !
अक्षा ,नित्या अन चंद्या आपापल्या करिअर च्या मागे लागले होते !
सुऱ्या अन पीया आता प्रेमाच्या गोष्टी करू लागले होते ! एके दिवशी सुऱ्या ने तिला तिचा मोबाईल नंबर मागितला अन तिने तो द्यायला नकार दिला , २-३ महिने असेच दररोज न चुकता जात होते . पिया चे वडील खूप श्रीमंत होते पण तिला तिच्या घरात राहणे आवडत नसे , कायम तीचे अन तिच्या वडिलांचे भांडण होत असे , एखाद्या राजकुमारी सारखी तिची रूम होती . 'बंगाली' असल्याने घर जास्त कडक होत , उमलणाऱ्या तिच्या वयाला कदाचित घरातली बंधन आवडत नसत . दोघेही स्क्रीन वर I love you टाईप करून वेडे झाले होते .
'पॉर्न वेबसाईट' वरच्या सगळ्याच कॅटेगरी मधून त्यांचा ' रोल प्ले ' करून झाला होता ! खरंच तारुण्य एवढं 'बेधुंद' असतं का ?
पुन्हा एकदा मोबाईल नंबर वरून त्यांच्यात वाजलं !, ती सुऱ्याला तिचा नंबर द्यायला तयार नव्हती !
सुऱ्याला आता तिचा आवाज ऐकायचा होता ,तिने पाठवलेले फोटो तिचेच की अजून कुणाचे की तीचेच हे कळायला मार्ग नव्हता ! सुऱ्याने त्याचे फोटो तिला पाठवले होते , २-३ दिवसाआड त्यांच्यात भांडण होत होते , पिया का त्याच्यात गुंतली होती हे तिलाही माहित नव्हते , कदाचित खऱ्या आयष्यात कोणी पोरगा तिच्या मागे लागावा एवढीही ती सुंदर नव्हती म्हणून...... कदाचित ..... ?
त्यांच्यात भांडण अन प्रेम फुलत होतं ! का काय माहीत पण पीयाला ही सुऱ्या आपला वाटत होता . कसे शक्य आहेत हे असले मनाचे खेळ ?
एक दिवशी सुऱ्या तिच्याशी खूप भांडला , अन पुन्हा तिच्याशी 'चाट' करणार नाही असं तिला बोलला ! रात्रभर तो झोपला नाही , प्रेम कितीही टाईमपास म्हणून करा , भावना थोड्या जरी खऱ्या असल्या कि 'वाट' लागणार हे नक्की !
दुसऱ्या दिवशी सकाळी - सकाळी तो नेट कॅफे मध्ये गेला अन आपला मेल बॉक्स उघडला , २ वाजून ४३ मिनिटाने पियाने नवीन ' शॉर्ट इंग्लिश भाषेत' टाईप केलेला मेल तो वाचू लागला ...
Hey Surya ,
Damm scared of mailing u.... love u surya .... Promise me u wont leave me even if i doooooo big mistakes even if i shout at u wont leave me ....U knw i want to say sumthng since past sooo many days par couldnt tell u...sooo jst mailing u ...... Im a big liar surya ...i lied u manythngs i dont knw how to accept my mistake.... im ready to do anythng for removing my mistakes...........Plz dnt hurt urself after all dis bcoz im d criminal n i seriously would be in pain if u hurt ureself .
1. My name is Aagni nt piya..my frst lie pata ahi wat made me lie u on dis
2. real me im attaching my photo wid me .....
PS : plz plz plzz plzz plzzz plzzz plzzzz donot leave me ...... plzzz plzzz ...... i beg u Surya ............... plzzzzzzzz............. :( :( :( :(
im ver very srry for wat i hav done ........ i trust u completely...... Surya aaje se aise nahi hoga .... baby i love u im very srry plz if u can mujhe maaf karnaa............... ill be waiting for u rply.....
I LOVE U .....................................donot leave meeeeeeeeeeee plzzzzzzzzzzzzzzzzzzz
I knw difficult to trust me pan plzz trust me ......... i love u soo i said u all d truth .. im nt hiding anythngg frm u knw promiceee....
N D MOST IMP OF ALLL IM READY TO DO ANYTHNG TO GET U BACK................... PLZ SURYA KNW UR ANGER ....... MAYBE IM READY FOR ALL D PUNISHMENTS.. ANY U GIVE JST DONT STOP TALKING WID ME ... BCOZ CANT LIVE IF U DOOO DAT.. PLZZ SURYA .... I TYPED DIS MAIL A LONG AGO BAS HIMAT NAHI HO RAHI THI KE I SEND U ... NW CNT LIE U ANY MOREE....... III LOVEEE U SURYA IM SRRY ... MY BABY PLZZZZ..............
I love u surya .. i really dooo......
U knw i didt wont to hurt u.. by saying d truth pan didnt hav d courage to face u... after dis im saying d truth bcoz i nw feel for u..n i dnt wat u to come to knw all dis by any other means...
One more last request wont be able to face u or chat after dis plz plz plzz my request to rply dis i knw bahut gussa hoge tum yeh padhe kare pan i wont u to trust me ....... i dnt wont to break d trust when u come to knw frm oders i knw im liar.... pan i cnt stay widout u...... i wont to u to mail mee.. keep ur promice plzzzz plzzz plzzz dnt leave mee
i said dis lie in begining uske baad i trust u completely i havnt lied anythng to u n i promice i wont lie ever ....N yes one more thing i get more scared den u when u ask about our future ... bcoz mujhe nai pata wat is going to happen in my future i wont u only ..bt i dnt knw will i get u ........ when u say ki im der for u .......... i feel all my probs r solved pan when u i tension asking me d same ques i get lost .. i dnt knw wat to ans ... n when i rply .. ke im der n ill be der.. its actually im consoling my self ....
I LOVE U .. ILL BE WAITING FOR U MAIL RPLY .... I WONT BE ABLE TO HAV D COURAGE TO RPLY UR CHAT UNTIL I READ UR MAIL
(क्रमश : )
बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777
बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798
बेधुंद - भाग ६ : http://www.misalpav.com/node/35832
बेधुंद - भाग ७ : http://www.misalpav.com/node/35859
बेधुंद - भाग ८ : http://www.misalpav.com/node/35885#new
बेधुंद - भाग ९ : http://www.misalpav.com/node/35937
'बेधुंद - भाग १० :http://www.misalpav.com/node/36003
बेधुंद भाग ११ : http://www.misalpav.com/node/36353
बेधुंद भाग १२ : http://www.misalpav.com/node/36354
बेधुंद भाग १३ : http://www.misalpav.com/node/36355
प्रतिक्रिया
6 Aug 2016 - 5:25 pm | गौतमी
वाचतेय...
9 Aug 2016 - 10:48 pm | अविनाश लोंढे.
;)