परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - १० या इथे ही लेखमाला संपवत आहे.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Jul 2010 - 8:08 pm

image006

Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ८
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ९
उपसंहार
हे लेखन आपण सर्वांनी वाचल्याबद्दल मी आपला आभारी आहे. हे वाचल्यामुळे हा विषय किती महत्वाचा व रंगतदार आहे हेही आपल्या लक्षात आले असेल.

मी हे सगळे लिहील्यावर माझ्या मनात विचार आला, कोण वाचणार आहे हे ? आणि जे वाचतील त्यांच्या मनात काय विचार येतील? त्यांना हे वाचल्यानंतर जे प्रश्न पडतील त्यांची उत्तरे मी देऊ शकेन का ? मी नाही देऊ शकलो, तर त्यांनी ती उत्तरे कुठून मिळवायची ?

मनाच्या खोलवर कप्यात मात्र मला असं वाटते आहे की युगानुयुगे जो चैतन्याचा शोध चाललेला आहे, त्याचा मी आणि तुम्ही एक छोटासा भाग आहे आणि हा शोध जोपर्यंत या विश्वात चैतन्य असलेल्या वस्तू असणार आहेत तो पर्यंत चालणार आहे, यात शंकाच नाही. माझ्या या प्रवासात जे अनुभव मला आले, त्या अनुभवांना सामोरे जाताना माझ्या मनात आणि मेंदूत बरीच उलथापालथ झाली. भौतिकवाद्यांबरोबर मी जास्त वेळ घालवला की मला त्यांचे म्हणणे पटू लागते आणि अध्यात्मावाद्यांबरोबर चर्चा केल्या तर मला त्यांचे म्हणणे पटू लागते. या सगळ्या वादांची आणि माझ्या जाणिवेची मोट बांधायची कशी हा माझ्या समोरचा अवघड प्रश्न आहे.

दोन्ही बाजूंची मते जरा बाजूला ठेवता येणे सहज शक्य आहे. भौतिकवाद्यांचे मत आहे की हे मन मेंदूचीच फलोत्पत्ती आहे. त्याच्या विरूध्द अध्यात्मवादी मनाला स्वर्गियत्व बहाल करून म्हणतात, मेंदूचा आणि मनाचा काही संबंध नाही. मला प्रामाणिकपणे वाटते की सत्य हे मधे कुठेतरी लपलेले आहे. पण कुठे आणि काय आहे ते ?

या शोधात माझे, तुमचे योगदान असायलाच पाहिजे.

सापडले तर मला खात्री आहे त्या उत्तराचा वापर करून अखिल मानवजातीला विनाशापासून निश्चितच वाचवता येईल.

मला खात्री आहे ! तुम्हाला ?.........

जयंत कुलकर्णी
भाग १० व लेखमाला संपन्न.

इतिहाससमाजविज्ञानमाहितीसंदर्भभाषांतर

प्रतिक्रिया

धनंजय's picture

8 Jul 2010 - 8:18 pm | धनंजय

चिकाटीने लेखन करत उत्तम लेखमाला पूर्ण केलीत. अभिनंदन.

श्रावण मोडक's picture

8 Jul 2010 - 8:23 pm | श्रावण मोडक

सहमत. पुन्हा एकदा लेखमाला निवांत वाचेन.

Nile's picture

8 Jul 2010 - 8:48 pm | Nile

हेच म्हणतो.

अभिनंदन आणि धन्यवाद.

-Nile

जयंत कुलकर्णी's picture

9 Jul 2010 - 11:07 am | जयंत कुलकर्णी

आभारी आहे !

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

जयंत कुलकर्णी's picture

9 Jul 2010 - 11:08 am | जयंत कुलकर्णी

जरूर वाचा. ही लेखमाला जे या विषयावर चाचपडत आहे त्यांनाही वाचायला दिलीत तर त्यांना निश्चितच थोडीफार मदत होईल.
:-)
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

मीनल's picture

9 Jul 2010 - 1:42 am | मीनल

+१
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

जयंत कुलकर्णी's picture

9 Jul 2010 - 11:05 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

जयंत कुलकर्णी's picture

9 Jul 2010 - 11:11 am | जयंत कुलकर्णी

धनंजय,
खरंय ! फारच त्रास झाला विचार करून ! :-) पण केले पूर्ण !
आपण वचल्या बद्दल धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

तिमा's picture

8 Jul 2010 - 8:36 pm | तिमा

सगळे भाग वाचले. पण ९ वा भाग समजायला जरा जड गेला.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

जयंत कुलकर्णी's picture

9 Jul 2010 - 11:00 am | जयंत कुलकर्णी

मला खात्री आहे, अजून एक दोनदा वाचलेत तर निश्चित कळेलच.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

आळश्यांचा राजा's picture

8 Jul 2010 - 9:45 pm | आळश्यांचा राजा

फार गहन विषयावरचा लेख विचारपूर्वक मराठीत आणलात याबद्दल अभिनंदन आणि आभार!

भाषांतरासोबतच आपण या विषयावर केलेले चिंतन अजून एका लेखात मांडलेत तर लेखमाला समजायला सोपी जावी.

आळश्यांचा राजा

जयंत कुलकर्णी's picture

9 Jul 2010 - 11:04 am | जयंत कुलकर्णी

मला खात्री आहे जेव्हा जेव्हा आपण या विषयावर भविष्यात वाचन कराल, तेव्हा तेव्हा हा लेख तुम्हाला आठवेल आणि मदत करेल.

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

सागर's picture

8 Jul 2010 - 9:54 pm | सागर

जयंतराव,
सुंदर लेखमाला...
एक विनंती आहे या सर्व लेखांची एकच पीडीएफ देता आली तर बघा..
मला माझ्या संग्रहात ठेवायला आवडेल

शक्य झाले तर ई-मेलने पाठवले तरी चालेन
माझा ई-पत्ता : sonerisagar@gmail.com

जयंत कुलकर्णी's picture

9 Jul 2010 - 11:02 am | जयंत कुलकर्णी

माझ्याकडे acrobat नाही. क्षमस्व !

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

सागर's picture

20 Jul 2010 - 12:08 pm | सागर

हरकत नाही जयंतराव ... मी प्रयत्न करुन बघतो..
मला येते ते कन्व्हर्ट करता. थोडा वेळ द्यावा लागेल एवढेच
करुन झाले की तुम्हालाही सांगतो, म्हणजे तुम्हाला देखील त्याचा उपयोग होऊ शकेन :)

एवढी सुंदर लेखमाला एकत्र स्वरुपात जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी एवढाच माझा उद्देश आहे.

ज्यांना कोणाला ही पीडीएफ हवी असेन त्यांनी खरडवहीत त्यांचा ई-पत्ता खरडावा किंवा मी सवडीने येथे दुवा उपलब्ध करुन देईन.

सागर's picture

8 Aug 2010 - 4:34 pm | सागर

नमस्कार जयंतराव आणि वाचक मंडळी

सर्व लेखांची एकत्रित पीडीएफ फाईल तयार केली आहे.

पुढीलपैकी कोणत्याही दुव्यावरुन ती उतरवून घेता येईल.

http://www.4shared.com/document/elQ2n-jE/Parameshwarache-Ugamsthan-Tumc....

http://www.esnips.com/web/DurmilMarathiPustake

धन्यवाद,
सागर

जयंत कुलकर्णी's picture

8 Aug 2010 - 6:47 pm | जयंत कुलकर्णी

सागर ! धन्यवाद !

शशिकांत ओक's picture

9 Jul 2010 - 10:20 pm | शशिकांत ओक

अभिनंदन!!

भौतिकवाद्यां विरूध्द या लढाईत - (खरेतर ही लढाई नाही, सामुहिकपणे विचार करायची व पुढे जायची बाब आहे. पण विज्ञानवादी - बुद्धिवादी 'लढाई' असे मानतात) रॅडीन आणि शेल्ड्रेक आता एकाकी नाहीत. गेल्या काही वर्षात तत्वज्ञानी, धर्मशास्त्र जाणणारे पंडीत, विश्वाचा अभ्यास करणारे आणि विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात असणारे काही शास्त्रज्ञ यांचाही त्यांना पाठिंबा मिळतोय. याचा सगळ्यात मोठा फायदा असा झालाय की मेंदू आणि शरीर या संबंधी नवनवीन, वेगवेगळे सिध्दांत मांडले जाऊ लागलेत.

पॅरा सायकॉलॉजीवरील काही विषयांच्या संदर्भात आपल्या या लेखमालेने खुप माहिती सांगितली.
कदाचित आपण प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा विज्ञान आणि चमत्कार व विज्ञान आणि बुद्धिवाद नामक ग्रंथ अवलोकन केले असतील तर या बाबत त्यांनी देखील असेच विचार मांडले आहेत हे लक्षात येईल.
ज्यांना त्यांचा ग्रंथ वाचायची इच्छा असेल त्यांनी लिंक पहावी
विज्ञान आणि चमत्कार [भाग १ ला ] - http://www.scribd.com/doc/10309048/-
विज्ञान आणि चमत्कार [भाग २ रा ]- http://www.scribd.com/doc/10301479/-
विज्ञान आणि बुद्धिवाद - http://www.scribd.com/doc/9891746/-

शशिकांत

वारा's picture

20 Jul 2010 - 3:01 pm | वारा

हा विषय तसा फारच गहन आहे..
मी दोन दोन वेळा प्रत्येक भाग वाचत आहे..
बुद्धीचा, मनाचा आणि शरीराचा घेतलेला धांडोळा फारच आवड्ला.

जितक्या वेळा वाचतोय तेवढ्या वेळा ईंटरेस्ट वाढतच चाललाय..

जयंत सर, हे काहीस सांगायला अवघड आहे, पण यातुन अस सांगायच आहे का? की मेंदु म्हणजे काहीतरी वस्तु आहे, आणि मन ही त्याची प्रॉपर्टी आहे.. जसे लोखंड ही वस्तु आहे, आणि मॅग्नेटीसम त्याची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे जसे चुंबकीय शक्तीमुळे लोखंड ओढले जाते पण मुळ लोखंडामधे याने काही फरक पडत नाही, ओढणे कींवा ढकलणे हे काम खरतर लोखंडामुळेच होतय पण आपण कारणीभुत लोखंडाला धरतोय. आपल्या भावनांच्या मागे आपली बुद्धीच आहे, पण आपण म्हणतो की भावनांच्या उत्पत्तीला मन कारणीभुत आहे. आणि असच काहीतरी.. :) सांगायच कस ते अजुन समजत नाही.

जयंत कुलकर्णी's picture

20 Jul 2010 - 10:53 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !

आपल्या मनात जो गोंधळ उडाला आहे तोच लेखकाच्या मनातही उडाला आहे. आपल्यात आणि त्याच्यात एकच फरक आहे तो म्हणजे लेखक या सगळ्याकडे open mind ने बघायला शिकला आहे.

या विषयावर आपले विचार शब्दात मांडणे फार अवघड आहे. मला कल्पना आहे. सांगायचे असते पण शब्द सापडत नाहीत. सापडले तरी आपल्याला जो अर्थ अभिप्रेत आहे तो ऐकणार्‍यापर्यंत पोहोचत नाही.

पण प्रयत्न जरूर करा - आपल्या मित्रांबरोबरच्या चर्चांमधून....
एक BBC ची मेंदूवर film पण आहे तीही जरूर बघा.

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

आळश्यांचा राजा's picture

21 Jul 2010 - 1:35 pm | आळश्यांचा राजा

भौतिकवाद्यांबरोबर मी जास्त वेळ घालवला की मला त्यांचे म्हणणे पटू लागते आणि अध्यात्मावाद्यांबरोबर चर्चा केल्या तर मला त्यांचे म्हणणे पटू लागते. या सगळ्या वादांची आणि माझ्या जाणिवेची मोट बांधायची कशी हा माझ्या समोरचा अवघड प्रश्न आहे.

सहमत. पण अशी मोट अस्पष्टपणे आत कुठेतरी बांधली जात असते असंही वाटत राहतं. कधीकधी वाटतं ईश्वर ही संकल्पना हे सत्य शोधण्यासाठी बनवलेले एक यान आहे. तेच यान वापरले पाहिजे असं काही नाही. महावीराला या यानाची आवश्यकता वाटली नाही. सांख्यांना वाटली नाही. बुद्धालाही वाटली नाही. नानी पालखीवालांनी शंकराचार्यांवर एक सुरेख लेख लिहिला होता, त्याची आठवण आली. ते म्हणतात, की जगातल्या सर्व काळांतल्या श्रेष्ठ वैज्ञानिकांची परिषद भरवली तर त्यात शंकराचार्य मानाच्या जागी बसतील.

दोन्ही बाजूंची मते जरा बाजूला ठेवता येणे सहज शक्य आहे. भौतिकवाद्यांचे मत आहे की हे मन मेंदूचीच फलोत्पत्ती आहे. त्याच्या विरूध्द अध्यात्मवादी मनाला स्वर्गियत्व बहाल करून म्हणतात, मेंदूचा आणि मनाचा काही संबंध नाही. मला प्रामाणिकपणे वाटते की सत्य हे मधे कुठेतरी लपलेले आहे. पण कुठे आणि काय आहे ते

भारतीय तत्त्वज्ञानातील काही महत्त्वाच्या विचारधारा (विशेषतः योग दर्शन) सांगतात मन हे जड आहे. याचा अर्थ असा होतो की extension हा त्याचा गुणधर्म आहे, अर्थात मन हे physically "पाहणे" शक्य आहे. असाच अर्थ होतो ना?

या विषयातले फार कळण्याइतके ज्ञान/ माहिती/ अनुभव नाही. पण, अध्यात्म हे अवैज्ञानिक असू शकत नाही असं नक्की वाटतं.

आळश्यांचा राजा

प्रकाश घाटपांडे's picture

25 May 2015 - 10:36 am | प्रकाश घाटपांडे

मेंदुच्या मनात या पुस्तकात लेखक सुबोध जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.
मेंदुतला माणुस या डॊ आनंद जोशी व सुबोध जावडेकरांच्या पुस्तक निर्मिती बाबत ची भुमिका स्पष्ट करणारा दिव्य मराठी तील लेख http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-subodh-jawdekar-article-abou...
मेंदुतला माणुस व मेंदुच्या मनात या दोन पुस्तकांमुळे मला विचारांची एक नवीन दृष्टी मिळाली हे मी नाकारु शकत नाही. अंधश्रद्धा निर्मुलन समितीतील माझ्या मित्रांना हे पुस्तक मी आवर्जून वाचायला सांगतो.

गामा पैलवान's picture

8 Apr 2016 - 1:13 am | गामा पैलवान

जयंतराव,

लेखमाला मस्तपैकी रंजक आणि रोचक आहे. फक्त एक त्रुटी जाणवली. ती म्हणजे हा धांडोळा घेतलाय त्यात कर्मसिद्धांतासंबंधाने काहीच चर्चा झालेली दिसंत नाही. मला वाटतं मेंदू आणि मन यांचा परस्परसंबंध उलगडण्यासाठी कर्मसिद्धांताचा उपयोग होईल.

कारण असं की पुनर्जन्मावर बरंच संशोधन चालू आहे. पुनर्जन्म होतो याची कैक उदाहरणे सापडली आहेत. त्यामुळे मन ही मेंदूपेक्षाही मूलभूत स्वरूपाची शक्ती मानायला हवी. मेंदू नष्ट झाला तरी मन नष्ट होत नाही. माझ्या मते संशोधनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी या तथ्याचे सहाय्य व्हावे.

आ.न.,
-गा.पै.