जयंतराव
ही लेखमालिका अतिशय सोप्या भाषेत लिहित असल्यामुळे अत्यंत उत्कंठावर्धक व वाचनीय झाली आहे. प्रत्येक भागाची आम्ही वाट पहात आहोत.
उद्या आपला स्वभाव बदलायच्या गोळ्या मिळायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको.
'स्वभावाला औषध नाही ही ' म्हण मग कालबाह्य ठरेल. तसेच अतिरेकी वा वाईट वृत्तीचे लोक यामुळे बदलता आले तर किती चांगले होईल.
मेंदूतल्या रसायनशास्त्राच्या विवेचनावरुन अशी शंका आहे की पूर्वी 'तुम्ही जे खाता त्याप्रमाणे तुमचा स्वभाव बनतो' असे जे म्हणायचे त्यांत तथ्य आहे की काय?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
आपल्या मेंदूत आपल्या आजीसाठी एक खास केंद्र असल्याचाही संशय आहे.
मला तर वाटते प्रत्येक आप्तेष्ठांसाठी असावेत.
तो माणूस आपल्यातून गेला तरी ते केंद्र चालूच रहात असेल.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
तो विचारतो “जर मेंदूतले छोटेसे बदल आपल्यात एवढे बदल घडवतात तर आपल्या व्यक्तिमत्वातील बदलांवर आपल्या मेंदूचा ताबा नसतो असे म्हणण्याचे धाडस आपण कसे करणार ? या सगळ्या अभ्यासातून हे सिध्द होण्याच्या मार्गावर आहे की आपण आपल्या मेंदूचीच एक फलोत्पत्ती आहोत.”
हाच प्रश्न आम्हालाही पडतो. श्रद्धा किंवा अश्रद्धा यामुळे मेंदुत बदल होतात कि मेंदुतील बदलामुळे श्रद्धा किंवा अश्रद्धा निर्माण होतात?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
फारच छान
आपल्या
हाच प्रश्न