मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ -- भालाफेक

श्रीगणेशा ·

Bhakti 11/08/2024 - 07:21
छान! नीरजच्या दुसऱ्या फाऊल नंतर टेंशन आलं ;) झोपून गेले.सकाळी सिल्व्हर कन्फर्म कळालं.खरतर आधीच नदीम ९२ घ्या पुढच्या रेकॉर्ड नंतर तो या स्पर्धेत मोडणं अशक्यच होतं.पण नीरजने लागोपाठ दोन ऑलिंपिक मेडल आणत एक नवीन माईलस्टोन बनवला आहे.

लेखनविषय:
लेखनप्रकार
देशासाठी पहिलंच सुवर्णपदक व मैदानी खेळातील पहिलं पदक, दक्षिण आशियातून मैदानी खेळातील आतापर्यंतचं केवळ दुसरं podium finish आणि ९२.९७ मीटरचं नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड करून, अर्शद नदीमने पाकिस्तानसाठी काल इतिहास रचला. काहीशी अपरंपरागत धाव असूनही, अर्शद नदीमने बाहूबळाच्या जोरावर, अगदी दुसऱ्याच प्रयत्नात, कोणालाच अपेक्षित नसेल अशी, ऐतिहासीक कामगिरी केली. एवढंच नव्हे, तर अगदी शेवटच्या, सहाव्या प्रयत्नातही, अशक्य भासणारा ९० मीटरचा टप्पा परत एकदा सहज पार करून, एकाच स्पर्धेत दोन प्रयत्नात अशी कामगिरी करणारा, आतापर्यंतचा तो एकमेव खेळाडू ठरला.

पोपटवाला

बिपीन सुरेश सांगळे ·

लहानपणापासून पुणे महानगर पालिकेत समोरच्या शिवाजी पुलावर एक पोपटवाला नेहमीच बसायचा. आता माहीत नाही. तो नेहमीच लोकांचे पोपट करायचा मग देव कधी कधी त्याचा..... कान साफ करणारे,पोपट भविष्य वक्ते, फुगे विकणारे यांचे आयुष्य खरोखरच कठीण आहे. चरितार्थ कसा चालतो ते भगवंतालाच माहीत.

चौथा कोनाडा 14/08/2024 - 14:16
व्वा.. सुंदर ...काहीसं चटका लावणारं ! रस्त्यावर रोज कमाई करुन जगणार्यां विषयी सहानभुती वाटते खरंच कसे कसे जगतात लोक ! एकदा एका वडापाव स्टॉलवर वडापाव खाताना चमकदार लालतांबड्या डगल्यातले वादक गप्पा मारत होते "आयला आज पण वडापाव वर काढावा लागणार दिवस " "हां ना राव गेले दहा बारा दिवस हेच खातोय" "मला तर संडास बी झाली नाय ४-५ दिवस.. आता वडापाव बी नकू झालाय" हे ऐकताना त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बघवत नव्हते !

गवि 14/08/2024 - 17:10
उत्तम जमली आहे छोटीशी कथा. अतिशय संवेदनशील आणि आपल्या आसपासच्या जगातून सदैव काहीतरी टिपण्याची क्षमता असलेले मन आहे तुमचे. त्यातूनच असे लेखन साधते.

पोपटवाला सकाळची वेळ. नऊ वाजलेले. आकाश धुरकट रंगाचं. बरसो - ह्या ऑर्डरची वाट पहात थांबलेले ढग . पण नुसतेच . शनिवार वाड्याचा पूल गजबजलेला होता . मागे आकाशाचा हे विस्तीर्ण पट . कालच्या अती पावसाचा पूर गायब झालेला . पुलावर भविष्य सांगणारा शंकरण्णा बसलेला होता .पोपट घेऊन . गेले दोन दिवस पडण्याऱ्या पावसामुळे तो वैतागला होता. त्याला पुलावर बसता आलं नव्हतं. बरं - पुलासारखा धंदा दुसऱ्या ठिकाणी आणि कुठे नव्हता. आज पाऊस नव्हता आणि त्याच्या खिशात पैसाही ! त्याला भूक लागली होती. पोटात कावळे कोकलत होते. त्यामुळे तो गिऱ्हाईकांची चातकासारखी वाट पहात होता.

माचीवरला बुधा

श्रीगणेशा ·

प्रचेतस 14/08/2024 - 10:15
माचीवरचा बुधा हा चित्रपट बघायचा राहूनच गेला. रिलीज झाला तेव्हा जेमतेम एखाद दुसरा शो फक्त एकच आठवडाभर तोही पुण्यात होता. नंतर कुठे ओटीटी आणि युट्युबवर पण आला नाही. हे गाणं मात्र पाहिलेलं आहे. गोनिदांची कादंबरी मत्र वाचलेली आहेच आणि संग्रही देखील आहे. निव्वळ अप्रतिम.

माचीवरला बुधा ही गोनिदांची कादंबरी, त्यावर आधारित विजयदत्त यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, आणि त्या चित्रपटासाठी धनंजय धुमाळ यांनी संगीतबद्ध केलेलं एक पक्ष्यांचं संगीत.

कवितेत भेटती...

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
कवितेत भेटती डोह कधी कधी कोडे सहज न सुटणारे कधी आभासी जगतामधले अस्पर्श्य, अलख, मोहविणारे कधी लाट विप्लवी, विकराळ, फेसाळ, किनारी फुटणारी, शोषून उषेचे सर्व रंग, नि:संग निळीशी उरणारी कधी व्याधविद्ध मृगशीर्षासम मिथकांशी पाऊल अडखळते कधी चंद्रधगीच्या वणव्यातून नक्षत्र वितळणारे दिसते कधी ओळींच्या मधली जागा अस्फुट ऊर्जेने लवथवते शब्दातून अवचित ओथंबत अलगद काही हाती येते

'एका खेळियाने' आता पुस्तक स्वरूपात!

जे.पी.मॉर्गन ·

फारएन्ड 14/08/2024 - 06:08
अभिनंदन! मिपावरचे बरेच वाचले आहेत त्यामुळे इतरही चांगले असतील यात काहीच शंका नाही. भारतात जाईन तेव्हा पुस्तक घेण्यात इंटरेस्ट आहेच.

फारएन्ड 14/08/2024 - 06:08
अभिनंदन! मिपावरचे बरेच वाचले आहेत त्यामुळे इतरही चांगले असतील यात काहीच शंका नाही. भारतात जाईन तेव्हा पुस्तक घेण्यात इंटरेस्ट आहेच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपाकरांनी भरभरून प्रेम दिलेली लेखमाला 'एका खेळियाने' आता सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात उपलब्ध झाली आहे. त्याचं झालं असं की दोन एक वर्षांपूर्वी सकाळने एक स्पर्धा घेतली होती. त्यात 'एका खेळियाने'ला सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्याचेच फलित म्हणून सकाळ ने एका खेळियानेचे लेख पुस्तकरूपात प्रकाशित केले आहेत. मिपावर आधी प्रकाशित झालेले काही आणि काही नवीन अश्या तीसेक लेखांचा त्यात समावेश आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिंपिक्स सुरु झाले त्याच दिवशी, २६ जुलै ला हे पुस्तक वेगवेगळ्या ई-दुकानांमध्ये उपलब्ध झाले. पुस्तकाचे ई-बुक देखील लवकरच उपलब्ध होईल.

पूर

बिपीन सुरेश सांगळे ·

माफ करा पण कथा कळली नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ? मुख्य म्हणजे त्याला कोणीही ५०० ची नोट का देईल ? बरं दिली तर दिली, मग भिवा काय तो त्याचा नित्यनेम व्यवसाय करणार होता का ? काहीच कळलं नाही. असो. पुर आहे काळजी घ्या.

गवि 05/08/2024 - 10:30
कथा आवडली.
पण आज पाऊस थांबला होता . पूर ओसरला होता आणि गर्दीही ! ...
या शेवटच्या ओळी भारीच. चांगल्या कथेचा शेवट उत्तम होणे तुम्ही अगदी योग्य साधले.

पूर सकाळची वेळ . संततधार पाऊस . पावसाला कंटाळलेलं धुरकट आकाश. उदास ! पण खाली नदीला पूर आला होता . धरणांमधून पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात होता . मुठेला उधाण आलं होतं . पूर बघायला हे गर्दी ! शनिवारवाड्याच्या समोर कट्टयावर ओळीने बसलेली माणसं . अनेक प्रकारची . अनेक ठिकाणची . भुकेलेली . काही कामाच्या शोधातली . काही थेट भिकारी . जगाने नाकारलेली सगळी फौजच जणू .त्यांचा तो रोजचाच अड्डा . कोरोना काळापासूनचा . पावसाने हवेत गारवा आणला असला तरी त्याने पोटातली आग काही विझत नाही . तीच आग विझवण्याच्या विवंचनेत असलेली ती गरीब बिचारी माणसं . पाऊस चालूच होता . नशीब त्याने थोडा जोर कमी केला होता .

पट नीटस स्थळकाळाचा

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
निवडुंग वनांतरी फुलला पाहील मग कुणी कशाला धगधगली बघ शेकोटी धुरकट मग धुनी कशाला फड तुऱ्यावरी बघ आला गोफण मग जुनी कशाला मी याचक नच, तरी देसी राहीन मग ऋणी कशाला क्षण अगणित संभाव्यांचा शंका मग मनी कशाला पट नीटस स्थळकाळाचा त्यावर मग चुणी कशाला

केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस चौथा - मुनरो आयलँड

श्वेता२४ ·

श्वेता२४ 03/08/2024 - 07:31
प्रतिसादासाठी धन्यवाद!!आम्ही पारंपारिक पुट्टू खाल्ला. आईस्क्रीम पुट्टू असतो का हे मला माहित नाही. तुमच्याकडूनच पहिल्यांदा ऐकत आहे.

Bhakti 03/08/2024 - 21:58
सुंदर वर्णन! खारफुटीची जंगल पाहायला पाहिजे. निसर्ग झाडांनाही शिकवतो, आणि ते स्वतः बदल घडवतात,या जगावर राज्य करतात.खारफुटीची एक मोठी किनारपट्टी भारतात आहे. Pnematophores/breathing roots हवेत वाढलेल्या मुळांमार्फत पाण्यात बुडालेल्या मुळांना प्राणवायू मिळतो. viviparyम्हणजे झाडावर असतानाच बीजाचे अंकूरण होणे. Proproots मुळं दलदलीत पसरून झाडांना उभे राहायला आधार देतात.

टर्मीनेटर 04/08/2024 - 22:18
ह्या भागाचे टायमिंग माझ्या पथ्यावर पडणार आहे 👍 येत्या १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पाच दिवसीय केरळ दौऱ्यात कोल्लम आणि वर्कला ह्या दोन शहरांत माझा मुक्काम असणार आहे. गुगल मॅप्सवर बघितले तर कोल्लम पासून मुनरो आयलंड केवळ २३ किमी अंतरावर म्हणजे तसे बऱ्यापैकी जवळ असल्याचे दिसत आहे. अर्थात पर्यटन हा सदर दौऱ्याचा मूळ उद्देश नसला तरी कमी-अधिक प्रमाणात भटकंती होणे अटळ आहे, त्यामुळे हे मुनरो आयलंड बघणे सहज शक्य होईल असं वाटतंय.
आलेप्पिला आम्ही गेलो नाही ही आमची केवढी मोठी चूक होती ते माहित नाही, परंतु मुनरो आयर्लंड चा समावेश या सहलीमध्ये करणे हा माझा उत्तम निर्णय होता हे सिद्ध झाले होते.
पूर्वेचे व्हेनिस म्हणून ओळखले जाणारे अलाप्पुझा (अलेप्पी) देखील छानच आहे, तुमच्या पुढच्या केरळ भेटीत ते देखिल अवश्य बघा. तिथले पुर्ण दिवसाचे जलपर्यटन आणि निसर्गसौन्दर्य आवडले आहेच पण तिथे केवळ फोटो काढण्यापुरती नाही तर चांगली मोठी दुमजली बोट थोडा वेळ चालवायलाही मिळाल्याने मला जरा जास्तच मजा आली होती 😀 1 २ ३ ४ ५ ६ ७ आता लवकरच मुनरो आयलंड पण पाहिले कि मग ह्या दोन्ही ठिकाणांची तुलना करून माझे काय मत बनते ते कळवतो 😀 पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

श्वेता२४ 05/08/2024 - 09:18
शक्य झाले तर मुनरो आयर्लंड ला अवश्य भेट द्या. ऑगस्ट महिन्यात तिथे अष्टमोडी तलावामध्ये पारंपारिक नावांची स्पर्धा होते. जर पाहायला मिळाली तर अवश्य पहा. बाकी कोल्लमहून मुनरोला जाणार असाल तर अष्टमुडी तलावातून मुनरो आयर्लंड पर्यंत जलमार्ग आहे. जेट्टीने जाऊ शकता. गाडी जरी असली तरी गाडीही चढवता येते आणि आर्थिक दृष्ट्या देखील फायरशीर आहे. वेळही वाचतो .भविष्यात थेकडी व आलेपिला मी नक्कीच भेट देणार आहे. मुनोरो आयर्लंड व आलेपी याबद्दलची तुमची निरीक्षणे वाचायला नक्की आवडतील. आवर्जून लिहा.

In reply to by श्वेता२४

टर्मीनेटर 26/08/2024 - 15:13
ऑगस्ट महिन्यात तिथे अष्टमोडी तलावामध्ये पारंपारिक नावांची स्पर्धा होते. जर पाहायला मिळाली तर अवश्य पहा.
जुलै अखेरीस वायनाडमध्ये झालेल्या भुस्खलनात सुमारे चारशे जण म्रूत्युमुखी पडले आणि दिडशेच्यावर लोक बेपत्ता झाले! ह्या नैसर्गीक आपत्तीत बळी गेलेल्यांना श्रद्धांजली म्हणून ह्यावर्षी ऑगस्ट्मध्ये होणाऱ्या नावांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच मी कोल्लमला पोचलो तेव्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवत हवामान खात्याने पाच दिवसांसाठी त्या परीसरात ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केल्याने अष्टमुडी तलावातले आणि त्या सर्वच परीसरातले (ज्यात मुनरो आयलंडही आले) नौकानयन हवामानखात्याकडुन पुढील सुचाना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. पण गंमत म्हणजे असे असुनही मला काही गमावल्यासारखे वाटले नाही कारण ज्या मित्राकडे माझा मुक्काम होता त्याचे घर कोल्लम पासुन दहा किलोमीटर अंतरावर अष्टमुडी तलावातील अतिशय निसर्गरम्य अशा 'थेक्कुंभगम' (Thekkumbhagam) ह्या बेटावरच्या गावात आहे. चांगल्या मोठ्या घराच्या पुढे-मागे आणि आजुबाजुला मस्तपैकी बागबगीच्या आणि पससबाग संपते तिथे अष्टमुडी तलावाचा काठ! हे घरच माझ्यासाठी एक पर्यटनस्थळ होते 😀 जमल्यास त्याबद्दल एक लेख लिहिण्याचा प्रयत्न करतो. घरामागचा अष्टमुडी तलावाचा काठ... AM1 AM2 AM3

In reply to by टर्मीनेटर

श्वेता२४ 26/08/2024 - 15:25
मुनरो आयलँड बद्दलची तुमची निरीक्षणे वाचण्यासाठी मी उत्सुक होते . त्यामुळे तुम्हाला तिथे जाता आले नाही हे वाचून वाईट वाटले. परंतु तुम्ही जिथे राहिला आहात तेथील फोटो बघून तुमचा तो अनुभव अगदीच काही मिस झाला नाही असेच वाटते. जमल्यास त्याबद्दल एक लेख लिहिण्याचा प्रयत्न करतो. अगदी नक्की लिहा. ठरवून केलेल्या पर्यटनापेक्षा असे हे नैसर्गिक पर्यटन व तेथील स्थानिकात राहून मिळालेला अनुभव हा निश्चितपणे वेगळा असतो.

In reply to by श्वेता२४

टर्मीनेटर 26/08/2024 - 15:50
ठरवून केलेल्या पर्यटनापेक्षा असे हे नैसर्गिक पर्यटन व तेथील स्थानिकात राहून मिळालेला अनुभव हा निश्चितपणे वेगळा असतो.
+१००० ह्या दौऱ्याचा उद्देश पर्यटनाचा नव्हता, त्यामुळे पाळिव कुत्रा, ससे आणि असंख्य वेगवेगल्या पक्षांच्या सानिध्यात केलेले ह्या बेटावरचे तिन रात्रींचे वास्तव्य, त्रिवेंद्रम ते वर्कला आणि वर्कला ते कोल्लम हे कोस्टल रोडने समुद्राच्या साक्षीने केलेले प्रवास, दोन दिवस वर्कला आणि एक दिवस 'रान्नी' येथे झालेला एक लग्न समारंभ, पावसात भिजत बाइकवरुन केलेली निरुद्देश भटकंती, मागच्या एका प्रतिसादात उल्लेख केलेल्या ताडीत आणि शहाळ्याच्या पाण्यात भिजवलेल्या तांदुळांचे अप्पम, इडी अप्पम, मलबार परोटे आणि काही पारंपारीक खाद्यपदार्थांचा घेतलेला आस्वाद ह्या सर्व गोष्टी नेहमीच्या ठरवुन केलेल्या पर्यटनापेक्षा वेगळाच आनंद देउन गेल्या...
अगदी नक्की लिहा.
एक चित्रलेख पाडण्याचा प्रयत्न करतो 😀

श्वेता२४ 06/08/2024 - 13:11
केरळचं खरं निसर्गसौंदर्य ह्याच भागात दिसलं. हे मात्र अगदी खरं. आम्हालाही तसंच वाटलं. प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

गोरगावलेकर 06/08/2024 - 13:18
मुनरो आयलंड आवडले . माझ्या दोन्ही मुलींनी दोन वेगवेगळया वेळी येथे भेट दिली आहे त्यांच्याकडून या ठिकाणाची थोडीफार माहिती मिळाली होती पण आपल्या लेखामुळे तपशीलवार माहिती मिळाली . फोटो मस्तच . अलेप्पीला भेट दिली आहे. त्यावेळी तेही ठिकाण खूप आवडले होते . टर्मिनेटर भाऊंनी म्हटल्याप्रमाणे आमच्याही ग्रुपने एका भल्या मोठ्या दुमजली बोटीवर ( (सहा बेडरूम असलेल्या) फेरफटका मारत २४ तास व्यतीत केले होते व काहींनी बोट चालवायचा आनंदही लुटला होता .

श्वेता२४ 06/08/2024 - 14:56
प्रतिसादासाठी धन्यवाद. खरंतर मुनरो आयलंड हे आलेपीच्या मानाने खूप कमी गर्दीचे व जास्त व्यावसायिकीकरण न झालेले ठिकाण आहे. त्यामानाने आलेपी हे पूर्णतः विकसित असे व्यावसायिकीकरण झालेले ठिकाण आहे. तुलनेने आलेपीला करण्यासारखे बरेच काही आहे. उदाहरणार्थ जरी हाऊसबोटीमध्ये राहायचे नसले तरी तेथील समुद्रकिनारा देखील प्रसिद्ध आहे. तिथे कॉइर म्युझियम म्हणजेच काथ्याच्या पासून केलेल्या वस्तू चे संग्रहालय आहे. हाऊस बोट मध्ये राहणे हा स्वतःच एक वेगळा अनुभव आहे. परंतु मुनारो आयलँड येथे मात्र कॅनॉल रायडिंग शिवाय अन्य काही ऍक्टिव्हिटी नाहीत. म्हणायला जवळ कोल्लम येथे अष्टमुडी तलाव येथे सरकारमान्य दरात अनेक वॉटर ऍक्टिव्हिटी आहेत. जसे की बनाना रायडिंग, फास्ट स्कूटर रायटिंग, वॉटर जम्पिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तथापि फक्त मुनोरो आयलंड हे शांततेत फेरफटका मारण्यासाठी व ग्रामीण केरळ अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. दोन्ही ठिकाणांचा अनुभव हा वेगळा असेल असे मला वाटते.

शशक- विद्यार्थी.

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
“सुभेदार, “त्या” तिथल्या सुभेदाराने, गावातल्या एका मुलीचे अपहरण केलेय, तिचं टक्कल केलंय, नी तिच्यावर “ते” सर्व मिळून अत्याचार करताहेत.” “सुभेदार, त्यानी एका मुलाचही अपहरण केलय नी त्याच्यावरही अत्याचार सुरूय.” “सर्वाना जमा कर, किती जमलेत? १६? बंदुका घ्या, आज त्यांचा काटा काढूच, हे असले प्रकार चालणार नाहीत. चला.” “ते पन्नास आहेत, हरकत नाही, आपण प्राणपणाने लढू, जिंकू किंवा मरू, पण लढू, मारू.” “किती मेलेत?? ५०? त्या मुला मुलीची सुटका झालीय, मला हे प्रकार आपल्या देशात नकोय. मी युद्ध पुकारतोय.

अहत पेशावर , तहत तंजावूर

चौकस२१२ ·
लेखनविषय:
अहत पेशावर , तहत तंजावूर एक उत्साहपूर्वक गाणे ( हे पाठ कारेन किती अवघड आहे आणि सुरत / चाळीत गाणे ) नक्की बघा https://www.youtube.com/watch?v=OaYxZ1sDh_I या शिवाय एक मालवणी गाणे ! https://www.youtube.com/watch?v=GKGwZQ6m9lw