Skip to main content

|| उत्कीर्ण विनायक ||

Published on गुरुवार, 12/09/2024 प्रकाशित मुखपृष्ठ
"काय नाव आहे म्हणे?" मी उत्सुकतेने विचारल. तो : उत्कीर्ण ! "काय? उत्कीर्ण? हे असलं कसलं म्हणे नाव? उत्तीर्ण वै ऐकलंय.. पण हे उत्कीर्ण वेगळंच काही तरी दिसतंय!" तो : "अरे, उत्कीर्ण म्हणजे खोदून किंवा कोरून तयार केलली कलाकृती" कोरलेलं .. अर्थात उत्कीर्ण Praf001a अच्छा असं आहे तर! माझ्या वाचण्या ऐकण्यात हा शब्द आला नव्हता.

श्री गणेश लेखमाला २०२४ - आली गौराई अंगणी

Published on गुरुवार, 12/09/2024 प्रकाशित मुखपृष्ठ
आली गौराई अंगणी.. “गऊ, त्या झाडाच्या जवळ नको गं जाऊ सारखी. सोड एकटं त्याला थोडा वेळ.” आई खिडकीतून बघत ओरडली. “झाडांशीही बोलावं. कळतं त्यांना सगळं. पुस्तकात आहे आमच्या. आईला काही कळत नाही, हो नं?” नवीनच लावलेल्या प्राजक्ताच्या रोपट्यापाशी गऊचं हितगुज चालूच होतं. तोवर आई तिथे पोहोचलीच. तिला लेकीची झाडांवरची माया आणि हट्टी स्वभाव दोन्ही चांगलंच माहीत होतं. “अगं हो, पण तुझ्या बोलण्याकडे लक्ष देण्यासाठी त्याला थोडं स्थिर तर होऊ दे इथे. आपली माती सोडून आलंय ते इकडे. भांबावलं असेल.. आणि असंही.. एकदा झाड लावलं की थोडा वेळ काळजी घ्यावी.

टणटणीची फुले..

Published on बुधवार, 11/09/2024 प्रकाशित मुखपृष्ठ
... लहानपणी या फुलांचा आम्ही बराच वापर करत असू. त्याच्या हिरव्या टणक बियांचा वापर वर्गात मित्रांना मारण्यासाठी होत असे, तर त्याची टोके चोखून त्यातील साखर खाण्याची मजा वेगळीच असे. तसेच त्या बिया काळ्या झाल्यावर गोड लागत ते वेगळेच. अर्थात आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतलाच असेल.. टणटणीची फुले ! बरेच दिवस त्या फुलांची छायाचित्रे काढायचे मनात होते. काल गाडीने परत येताना रेसकोर्सच्या मागे ही फुले दिसली. त्यांचे रंग पाहताना मला राजस्थानी रंगीबेरंगी कपड्यांची आठवण झाली. लहानपणी शाळेत शिकलेल्या विवीध रंगसंगती आठवल्या. काही फुले घरी आणली आणि त्याचे फोटो काढले.

हृदयाची गोष्ट...

लेखक भम्पक
Published on बुधवार, 11/09/2024 प्रकाशित मुखपृष्ठ
अगदी खरे सांगतोय ..अस्वस्थ ..भयंकर अस्वस्थ होतो मी आणि आहे सुद्धा .पण तरीही तुम्ही मला वेडा का म्हणाल ? त्या नैराश्याने माझ्या संवेदना अजूनच तीक्ष्ण केल्या आहेत. म्हणजे नष्ट तर नाहीच पण बोथट हि नाहीच नाही.अन वरकडी म्हणजे माझी श्रवण क्षमता तर भलतीच तीव्र झालीये म्हणजे मी पृथ्वीवरचे तर सोडा अन स्वर्गातलेही सोडा ..आपण एकदम नरकातल्या सुद्धा गोष्टी ऐकू शकतो. आता मला सांगा कि मी वेडा कसा ? आता मी जी काही सगळी हकीकत तुम्हाला शांतपणे अन अगदी तपशिलाने सांगणार आहे ती जरा ऐका. आता ती कल्पना माझ्या या डोक्यात कशी जन्मली ते सांगणे अगदी अशक्य आहे.

श्रीगणेश लेखमाला २०२४ - चारोळ्या - रंग मनाचे.. काही गडद, काही फिक्के

Published on बुधवार, 11/09/2024 प्रकाशित मुखपृष्ठ
चारोळ्या - रंग मनाचे.. काही गडद, काही फिक्के गणपती बाप्पा मोरया. मिपाकरांना मिपा वर्धापन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संस्थापकांना नम्र अभिवादन. 1 डिस्क्लेमर - हे मुक्तक आहे. वडाची साल पिंपळाला लावू नये. निरीक्षण, अनुभूती यातून सुचलेले लिखाण आहे. संदर्भ, चूक-बरोबर शोधू नये.

श्री गणेश लेखमाला २०२४ -ब्रह्मघोटाळा

Published on मंगळवार, 10/09/2024 प्रकाशित मुखपृष्ठ
उपनिषदे म्हणजे भारतातील अनेक ऋषिमुनींच्या सखोल चिंतनाचा परिपाक आहे. विविध प्रकारच्या तत्त्वज्ञानांचे हे भांडार आहे. 'उपनिषद' या शब्दाचा अर्थ 'गुरूंजवळ बसून मिळवलेली विद्या' असा होतो. उप-नि-सद असा विग्रह केला, तर जवळ जाणे, रहस्य उलगडणे असाही एक अर्थ निघू शकतो. या विश्वाचे कार्य चालवणाऱ्या शक्तीच्या जवळ जाऊन तिचे रहस्य उलगडण्याचा मार्ग म्हणजे उपनिषद. उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात, म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असे म्हणतात. उपनिषदे ही वेदांचे अंतिम अंग आहे, म्हणून त्यांना 'वेदान्त' असेही म्हणतात. ज्ञानाची उच्चतम परिसीमा म्हणजे उपनिषदे.

श्री गणेश लेखमाला २०२४ - फार, फार, फार वर्षांपूर्वीच्या गणेशोत्सवातली गोष्ट

लेखक आजी
Published on सोमवार, 09/09/2024 प्रकाशित मुखपृष्ठ
फार, फार, फार वर्षांपूर्वीच्या गणेशोत्सवातली गोष्ट फार, फार, फार, फार, फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. फार शब्द फार वेळा वापरला, नाही का हो? त्याला कारण आहे. कारण ही खरंच फाssssर जुनी अगदी प्राचीन कथा आहे. माझीच. मी प्राचीन आहे हे माझ्याच तोंडाने कबूल करणं एक स्त्री म्हणून मला शोभत नाही. पण आता माझं म्हातारपण 'छुपाए न छुपाया जाय' ह्या कॅटेगरीत आलंय. मी आज ७५ वर्षांची आहे आणि ही गोष्ट आहे माझ्या लग्नानंतर लगेच घडलेली. लग्नात मी होते चोविशी उलटलेली. म्हणजे ५० वर्षं झाली आहेत या हकिकतीला. तर आमचं नवं नवं लग्न झालेलं होतं. घरात आम्ही दोघंच.

श्री गणेश लेखमाला २०२४ - नाचणी - सुपर फूड

लेखक Bhakti
Published on रवीवार, 08/09/2024 प्रकाशित मुखपृष्ठ
नाचणी, नागली याला फिंगर मिलेट, रागी याही नावांनी ओळखतात. शास्त्रीय नाव – एल्युसिन कोराकाना (Eleusine coracana) आहे. E. caracana subsp. Africana आफ्रिकाना यापासून उत्क्रांत झाली आहे. ही गवतासारखी दिसणारी एक तृणधान्य वनस्पती आहे. ३०००-५००० वर्षांपूर्वी पश्चिम युगांडा आणि इथियोपिया या अफ्रिकन देशांत नाचणीचे उत्पादन सुरू झाले. भारतामध्ये इ.स.पू. ३००च्या आसपास पश्चिम घाटापर्यंत पसरले. नाचणीचे बी / दाणे मोहरीसारखेच बारीक पण करड्या रंगांचे तपकिरी असते. त्यामुळे याची मळणी खूप आव्हानात्मक आहे. यातील गोदावरी, बी-११, पीईएस-११० इंडाफ८, दापोली-१, व्ही एल-१४९, निमगरवा, गरवा या जाती पिकवल्या जातात.

संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)

Published on रवीवार, 08/09/2024 प्रकाशित मुखपृष्ठ
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे : योगश्चित्तवृत्तिनिरोध: ('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे). अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध: ( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय) आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.