मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग ५ (चांगु नारायण मंदिर)

टर्मीनेटर ·

श्वेता२४ 30/08/2024 - 15:09
मस्त लिहीले आहे. वाटेतील निसर्गचित्रे अप्रतिम. मंदिराचे फोटो व तेथील शिल्पकाम अप्रतीम आहे. शिवाय तुमचे डिटेल वर्णन..... दिल खूश हो गया.... येथे परकीय आक्रमणे झालेली दिसत नाहीत... सर्व शिल्पे अखंड आहेत. त्यामुळे त्याचे सौंदर्य ऊठून दिसते...

किल्लेदार 31/08/2024 - 22:34
नवीन माहिती बरीच मिळाली पण हिमालयाचे दर्शन अजून झाले नाही :( !!! 2016 ला गेलो तेव्हा काठमांडू भूकंपातून सावरले नव्हते. टेकू लावून ठेवलेली मंदिरे आणि अजस्त्र तुळया अंगावर येत होत्या. पण या सगळ्याहून जास्त दुःख झाले ते तिथल्या कबुत्तरांची प्रजा बघितल्यावर. पुरातन वारसे घाण करण्याचे काम हे "Flying Pests" अविरत करीत असतात.

In reply to by किल्लेदार

टर्मीनेटर 14/10/2024 - 11:27
कंजूस । श्वेता२४ । भक्ती । किल्लेदार प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ श्वेता२४
"येथे परकीय आक्रमणे झालेली दिसत नाहीत... सर्व शिल्पे अखंड आहेत. त्यामुळे त्याचे सौंदर्य ऊठून दिसते..."
परकीय आक्रमणे झालीच नाहीत असे नाही, परंतु शस्त्रधारी हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती ह्या केवळ घरातल्या देव्हाऱ्यांत आणि मंदिरांत पुजण्याच्या वस्तू नसून त्या प्रतिमांतून काय बोध घ्यायचा हे धर्माभिमानी नेपाळी लोकांना चांगलेच ठाऊक आहे! "स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे टिपावे रिपूला रणी वा मरावे... तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई सदा संकटा देव धावून येई... " सतराव्या शतकात समर्थांना ह्या पंक्ती कदाचित नेपाळी लोकांच्या पराक्रमावरूनच सुचल्या असाव्यात असे मला वाटते! चौदाव्या शतकापासूनच मुघलांनी नेपाळवर आपला अंमल प्रस्थापित करण्यासाठी अनेकदा आक्रमणे केली होती परंतु लढवय्या वृत्तीच्या धर्माभिमानी नेपाळींनी प्रत्येक वेळी प्रखर प्रतिकार करून त्यांचे मनसुबे उधळून लावले. मुघल असोत कि इंग्रज, भारतावर काहीशे वर्षे त्यांनी सत्ता गाजवली असली तरी नेपाळ त्यांना कधीच जिंकता आला नाही, इंग्रजांवर तर नेपाळचे सार्वभौमत्व मान्य करून त्याच्याशी शांतता आणि मैत्रीचे करार करण्याची पाळी आली होती. आजही ब्रिटिश आणि भारतीय सैन्यदलात नेपाळी सैनिकांची होत असलेली भरती ही त्यांच्या काटक आणि लढवय्या वृत्तीला दिलेली पोचपावतीच म्हणता येईल! आजतागायत कुठल्याही परकीय सत्तेच्या अमलाखाली किंवा वसाहतीचा भाग न बनलेला, आणि एक देश म्हणून अधिकृतरीत्या १७६८ मध्ये अस्तित्वात आलेला नेपाळ आणि शतकानुशतके परकीय सत्तांच्या अमलाखाली राहिलेला व सुमारे दीडशे वर्षे ब्रिटिश वसाहतीचा भाग राहिल्यावर १९४७ साली इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाल्यावर अधिकृतरीत्या एक देश म्हणून अस्तित्वात आलेला भारत, हा सुमारे १७९ वर्षांचा फरक समाजाला षंढत्वाकडे घेऊन जाणाऱ्या तत्वज्ञानाचा अंगीकार केल्यास काय होते हे स्पष्ट करण्यास पुरेसा आहे! @ किल्लेदार
"2016 ला गेलो तेव्हा काठमांडू भूकंपातून सावरले नव्हते. टेकू लावून ठेवलेली मंदिरे आणि अजस्त्र तुळया अंगावर येत होत्या."
अगदी... अगदी... आजही काठमांडू २०१५ च्या प्रलयकारी भूकंपातून संपुर्णपणे सावरलेले नाही! काठमांडू, पाटण आणि भक्तपुर ह्या तीनही दरबार स्क्वेअर्समध्ये अनेक ठिकाणी 'टेकू लावून ठेवलेली मंदिरे आणि अंगावर येणाऱ्या अजस्त्र तुळया' पहायला मिळतात. ह्या ठिकाणांचे पुर्वाश्रमीचे वैभव आधीच्या नेपाळ भेटीत पाहिलेले असल्याने त्यांची दुरावस्था पाहुन जीव जास्तच हळहळला!
"पण या सगळ्याहून जास्त दुःख झाले ते तिथल्या कबुत्तरांची प्रजा बघितल्यावर. पुरातन वारसे घाण करण्याचे काम हे "Flying Pests" अविरत करीत असतात."
आजही परिस्थीती तशीच्या तशीच आहे 😀 आणि त्यात टिक टॉकर्सच्या उपद्रवाचीही भर पडली आहे!

प्रचेतस 02/09/2024 - 20:54
मस्तच झालाय हा लेख. नेपाळमध्ये इतके प्राचीन मंदिर असेल असे वाटलेच नव्हते. शिलालेख ब्राह्मी लिपीत आहे. भैरव हे विष्णूचे रूप नसून शिवाचे आहे. बाकी येथील मूर्ती देखण्या आहेत. मात्र ह्या समभंग मुद्रेत असल्याने त्या पाहताना डौल कमी वाटतो. वैकुंठ विष्णू, त्रिविक्रम आणि विदारण नृसिंहाच्या शिल्पातील बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. काळ्या पाषाणात कोरलेले दहा मस्तके आणि दहा हात असलेल्या उभ्या विष्णूचे शिल्प बहुधा विष्णूचे विश्वरुप दर्शन घडवणारे असावे. वराह आणि सिंहाचे मुख असलेल्या विष्णूचे वराहवतार आणि नृसिंहावतार दाखवणारे शिल्प तर प्रथमच पाहिले. आता थामेलच्या नाईटलाईफबद्द्ल वाचण्यास उत्सुक.

सौंदाळा 13/09/2024 - 15:27
पॅगोडा शैलीतले मंदीर आणि पौराणिक कोरीव मुर्ती हे एकाच मंदीरात! फोटो छानच आले आहेत. थामेलची वाट बघत आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 14/10/2024 - 12:07
प्रचेतस । कर्नलतपस्वी । झकासराव । अथांग आकाश । गोरगावलेकर । सौंदाळा प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ प्रचेतस
"शिलालेख ब्राह्मी लिपीत आहे. भैरव हे विष्णूचे रूप नसून शिवाचे आहे. बाकी येथील मूर्ती देखण्या आहेत. मात्र ह्या समभंग मुद्रेत असल्याने त्या पाहताना डौल कमी वाटतो."
हो... लिच्छवींची व्यवहार भाषा संस्कृत होती, परंतु हा शिलालेख ब्राह्मी लिपीत का कोरला असावा ह्याची काही कल्पना नाही! शिल्पकला हा प्रचंड आवडीचा प्रकार असला तरी त्यातल्या तांत्रिक बाबी/संज्ञा विषयी अभ्यास नसल्याने कृपया "समभंग मुद्रा" म्हणजे काय हे सांगून माझ्या आणि अन्य वाचकांच्या ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती. भैरव हे विष्णूचे नसून शिवाचे रूप आहे अशी माझीही समजूत असल्याने तिथे 'हे विष्णूचे रूप असल्याचे' वाचून मी देखील बुचकळ्यात पडलो होतो, पण एकंदरीतच पौराणिक आणि अध्यात्मिक विषयांत बिलकुल गती नसल्याने 'असेल बुवा हे विष्णूचे रूप, आपल्याला काय कळतंय त्यातलं' म्हणून तसेच लिहिले होते 😀 त्यात बदल करू का? आणि हो, तुम्ही चांगु नारायण मंदिराला अवश्य भेट द्यावीत असे सुचवतो, कित्येक लहान-मोठ्या प्राचीन शिल्पांची खाण आहे तिथे, लेखात त्या सर्वच शिल्पांचा आढावा घेता आला नाही! तुमच्या मंदिर भेटी नंतरच 'त्या' सर्व शिल्पांना खरा न्याय मिळू शकेल. @ कंकाका,
"बुद्धाच्या जन्मासंबंधी प्रसिद्ध असलेली गावे पाहायला कुणी जात नाही का? लुंबिनी, कपिलवस्तू?"
पर्यटक नाही पण नेपाळ, तिबेट आणि भारतातील बौद्ध धर्मीय भाविक जातात. आता त्या ठिकाणच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी लुम्बिनी इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करण्यात आला आहे, त्याला कितपत प्रतिसाद मिळतोय ह्याची काही कल्पना नाही! @ सौंदाळा
"फोटो छानच आले आहेत."
धन्यवाद, पण खरं सांगायचं तर ह्या भागात आलेल्या आणि आगामी भागात येणाऱ्या अनेक फोटोंबद्दल मी समाधानी नाही! सहा जणांच्या आठ मोबाईल फोन्सने, कोणीही कसेही फोटो काढलेले आहेत. त्यातले काही चांगले. काही बरे तर काही वाईट म्हणता येण्यासारखेही आहेत, पण नाईलाजाने मालिकेत त्यांचा वापर करावा लागणार आहे 😀

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 16/10/2024 - 08:35
हो... लिच्छवींची व्यवहार भाषा संस्कृत होती, परंतु हा शिलालेख ब्राह्मी लिपीत का कोरला असावा ह्याची काही कल्पना नाही!
तेव्हा सगळीकडेच ब्राह्मी लिपीच प्रचलित होती. ह्याच लिपीतून बहुतांश भारतीय लिप्या उत्क्रांत झाल्या आहेत. मूर्तीशास्त्रात मुद्रांचे सर्वसामान्यप्रणे अभंग, समभंग, त्रिभंग, अतिभंग असे काही प्रकार आहेत. भंग म्हणजे एखाद्या विशिष्ट कोनातून वळलेल्या. अभंग आणि समभंग ह्या बर्‍यापैकी सारख्याच मुद्रा. म्हणजे दोन्ही बाजूंना समान असलेली मूर्ती. मूर्तीला उभा छेद दिल्यास डावी आणि उजवी बाजू समान असणे. उदा. विठ्ठल, किंवा तुमच्या लेखातील विष्णूमूर्ती. त्रिभंग म्हणजे तीन कोनात वळलेल्या मूर्ती. थोडक्यात मान, कंबर आणि पाय तीन कोनात वळलेले असणे. त्रिभंगावस्थेतील मूर्ती विलक्षण सुंदर आणि गतीमान दिसतात त्याच्या ह्या कलण्यामुळे. उदा. पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील बाह्य भिंतीवरील वायुमूर्ती a तर अतिभंग म्हणजे तीनापेक्षा जास्त कोनांत वळलेल्या मूर्ती, उदा. वेरूळमधला हा स्थौण नृसिंह a आता नेपाळला मात्र भेट द्यावीच लागेल असे दिसते.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 17/10/2024 - 11:19
सुंदर आणि सोदाहरण माहिती दिलीत! धन्यवाद. गुरुजी, आता ह्या माहितीवरून लेखातील चार शिल्पांचा प्रकार ओळखण्याच्या परीक्षेला बसतो, त्यात हा विद्यार्थी उत्तीर्ण होतो कि अनुत्तीर्ण ह्याचा निकाल द्यावा... 'पद्मपाणी लोकेश्वर' ▲ 'पद्मपाणी लोकेश्वर' - त्रिभंग उभ्या विष्णूच्या खाली शेष (अनंत) नागावर पहुडलेला दुसरा विष्णू ▲ उभ्या विष्णूच्या खाली शेष (अनंत) नागावर पहुडलेला दुसरा विष्णू - अंशतः त्रिभंग 'विष्णू विक्रांत' आणि 'त्रिविक्रम' ▲ 'विष्णू विक्रांत' किंवा 'त्रिविक्रम' - अतिभंग 'नृसिंहावतार' ▲ 'नृसिंहावतार' - अतिभंग अजुन दोन शंका: अभंग, समभंग, त्रिभंग, अतिभंग हे प्रकार एकाच कालखंडात अस्तित्वात होते कि उत्तरोत्तर प्रगत होत गेले? आणि त्यावर कोणत्या विशिष्ट शिल्पकला शैलीचा विशेष प्रभाव आहे?

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 17/10/2024 - 18:35
▲ 'पद्मपाणी लोकेश्वर' - त्रिभंग
हे बरोबर
▲ उभ्या विष्णूच्या खाली शेष (अनंत) नागावर पहुडलेला दुसरा विष्णू - अंशतः त्रिभंग
ही मूर्ती पण समभंग म्हणता यावी. ह्या मुद्रा उभ्या मूर्तीच्या अनुषंगानेच गणल्या जातात.
▲ 'विष्णू विक्रांत' किंवा 'त्रिविक्रम' - अतिभंग
ही बहुतकरुन समभंग म्हणता यावी किंवा ही आणि ह्याच्या खालची नृसिंह मूर्ती त्रिभंग किंवा अतिभंग ह्यापैकी कोणत्याच व्याखेत बसत नाही असे म्हणता यावे. कारण ह्या मुख्य मूर्ती सरळ असून भंग पुरेसे स्पष्ट होत नाहीत. येथे दोन्ही मूर्तींच्या माना कललेल्या नाहीत.
अजुन दोन शंका: अभंग, समभंग, त्रिभंग, अतिभंग हे प्रकार एकाच कालखंडात अस्तित्वात होते कि उत्तरोत्तर प्रगत होत गेले? आणि त्यावर कोणत्या विशिष्ट शिल्पकला शैलीचा विशेष प्रभाव आहे?
एकाच कालखंडात अस्तित्वात होते असे म्हणता येईल. गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, विजयनगर अशा सर्वच राजवटींत अशा मूर्ती निर्माण होत गेल्या. चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव, चंदेल अशा विविध राजवटींत उत्तमोत्तम मूर्ती निर्माण होत गेल्या व विजयनगरच्या अस्तानंतर मूर्तीकलेला ओहोटी लागली. कोणत्याही विशिष्ट शिल्पकला शैलीचा प्रभाव आहे असे म्हणता येणार नाही मात्र उत्तरेतील मंदिरे नष्ट झालेल्या इकडील शिल्पकृतींवर चालुक्य शैलीचा प्रभाव बहुतकरुन आहे असे म्हणता यावे.

त्रांगडे

चौकस२१२ ·
त्रांगडे थांबा ,थांबा /////मी माविआ बद्दल बोलत नाहोये पण विषय तसा राजकीय आहे इमर्जन्सी नामक चित्रपटाची झलक प्रसिद्ध झाली आहे आणि त्यावरून प्रतिक्रिया येत आहे ३ ठिकाननहून १) भाजप विरोधी याला "इंदिरा गांधींना राष्टवादी आणि म्हणून "प्रोजेकट " करणारा अप्रत्यक्ष भाजप च्या राष्ट्रवादा बद्दल प्रोपोगांडा करणारा चित्रपट म्हणून नाराज किंवा केवळ कंगना रानौत त्यात आहे तेम्हणून विरोध , पण मग गोची अशी कि आपल्याच या दिवंगत नेत्यावर चित्रपट काढला जातोय तर आनंद कसा दाखवय्यांचा ? नाही दाखवलं तर पंचाईत , दाखवलं तर भाजप प्रोपोगांडा ला साथ ..

कंजूस 30/08/2024 - 07:11
इंदिरा गांधी भारतीय राजकारणात शक्तीशाली नेत्या होत्याच. त्यांच्या काळात दुसरा कुणीही नेता मोठा झाला नसता. फक्त इमर्जन्सीवरच प्रकाशझोत टाकून चित्रपट येण्याअगोदर संपूर्ण चरित्रावर एखादा भाग यायला हवा. निर्मात्याला पैसे काय दोन्ही भागांतून मिळतीलच.

देव माझा निळा निळा

Bhakti ·

In reply to by प्रचेतस

Bhakti 26/08/2024 - 14:01
बाई ग! तुम्ही तर लेखच सपेशल पाडून टाकला ;) हो तो ग्रंथानुसार सावळा ,काळाच आहे.पण चित्रात,अनेक गीतांमध्ये तो निळा दाखवतात ना.
भगवान श्रीकृष्ण रंगाने गडद आहेत, मग त्यांना चित्रात निळे का दाखवले आहे? भगवान श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या भगवान विष्णूची प्रतिमा दाखवण्यासाठी श्रीकृष्ण निळ्या रंगात दाखवला आहे. श्री कृष्ण हे भगवान विष्णूचे रूप आहे, जेथे श्री हरी विष्णू त्यांची पत्नी लक्ष्मीसह विराजमान आहेत. अशाप्रकारे, श्रीकृष्णाचा रंग गडद असूनही, त्यांना चित्रांमध्ये निळा दाखवला आहे इति quara
. पण युद्धिष्ठिर वनवासानंतर निळा झाला होता असं एका फोटोत मी पाहिलं,गोष्ट वाचली.

टर्मीनेटर 26/08/2024 - 13:38
इथे अश्विनात आठ दिशा निळ्या निळ्या झाल्या असे का म्हटलं आहे?
कदचित कविता प्रसवताना कविने दोन ऐवजी चार पैशांची भांग घेतली असावी किंवा त्याक्षणी अतिनील किरणांची (Ultraviolet Rays) वेव्हलेंथ काही कारणाने अचानक वाढल्याने कविला सगळा आसमंत निळा निळा झाल्याचे दिसले असावे 😀 😀 😀

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 26/08/2024 - 13:55
हा हा!असेल असेल! काल मी एक भयपट पाहत होते त्यात भूताची बाधा झाली की हिरोईनला सगळ जग लाल लाल दिसायचं,तसं असेल हे :)

In reply to by प्रचेतस

Bhakti 26/08/2024 - 14:10
ओह,वेरी वेरी सॉरी.,जरा गंमत.तरी मी म्हटलं ना इतकं मोठं लिहावं लागतं हे असं का ते असं का? पण बापटांची प्रतिभा पहा 'अंतरंग निळा , म्हणून हे सर्व निळे ,श्रीरंगही निळा भासत आहे ' वाहवा!!

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 26/08/2024 - 14:15
बापट सज्जन कवी हो
अच्छा! म्हणजे साक्षात बाळ गंगाधर टिळकांनी ठरवुन दिलेल्या भांगेच्या मात्रेचे उल्लंघन त्यांच्याकडुन होणे कदापि शक्य नाही, मग तुम्ही खाली दिलेले कारण/अर्थच योग्य असावा 😀

प्रचेतस 26/08/2024 - 13:49

पाऊस थांबलेला असतो, मेघ दिसेनासे झालेले असतात सर्व आकाश धूळरहित झाल्याने स्वच्छ झालेले असते त्यामुळे अश्विनात सगळे आभाळच निळे झालेले दिसते म्हणून सर्व आठ दिशा निळ्या असे म्हटलेले आहे.

Bhakti 26/08/2024 - 14:24
https://youtu.be/8CpM-LshANI?si=dBpyyOsWVthu7opr निळासावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात तुडवूनि वन, धुंडुनी नंदनवन शोधुनि झाले अवघे त्रिभुवन एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात नील जळी यमुनेच्या साची होडि सोडिली मी देहाची गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासांत -गंगाधर महाम्बरे या गीताप्रमाणे तसेच प्रचेतस यांनाही सांगितल्याप्रमाणे कृष्ण (इतरही )निळा न म्हणता निळा सावळा असा उल्लेख यापुढे करेन :)

Bhakti 26/08/2024 - 14:44
पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥१॥ वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥२॥ पौर्णिमेचें चांदिणे क्षणक्षणा होय उणें । तैसें माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥४॥ -ज्ञानेश्वर माऊली आता मात्र काहीच कळेना खुद्द माउलींनाही विठू निळा दिसतोय!!

लेखनविषय:
अ कृष्ण निळा निळा बासुरीचा लावितो लळा.. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!! कृष्ण(विष्णू )का तो निळा आहे?

केरळ कन्याकुमारी लेखमाला : दिवस सहावा - कन्याकुमारी, वट्टकुट्टई किल्ला व सुचिंद्रम मंदिर

श्वेता२४ ·

सौंदाळा 26/08/2024 - 11:33
मस्तच. फोटो, वर्णन, खादाडी, वेळापत्रक, अंतर सर्व गोष्टी ओघवत्या भाषेत लिहिल्या आहेत. ईकडे जाण्यासाठी हे प्रवासवर्णन खूपच उपयुक्त ठरेल. पुभाप्र.

स्वातंत्र्यानंतर कन्याकुमारीच्या दक्षिणेकडील समुद्रातल्या एका खडकावर स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारले. तमिळ सर्वसामान्य जनतेला स्वामीजींबद्दल काहीच ठाऊक नव्हते. तेव्हा संपर्कसाधने तुरळक होती. ज्या काही बातम्या मिळत त्या वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी ऊर्फ रेडिओतून. तरीही बव्हंशी निरक्षर समाजाला स्वामीजींबद्दल काही ठाऊक असणे कठीणच. त्यात भाषेचा अडसर. सर्वसामान्य तमिळ जनतेच्या दृष्टीने कोणातरी सामान्य व्यक्तीचे स्मारक त्यांच्या माथी मारल्याची भावना त्यांच्यात दाटली. तमिळ संस्कृतीतले सर्वश्रेष्ठ नाव आहे तिरुवेल्लुवर. यांच्या नावाचा संवत्सर पण तिथे चालते. हे स्मारक मी जाने. २०११ मध्ये पाहिले तेव्हांचे संवत्सर होते २०४६. म्हणजे तिरुवेल्लुवर यांचे जन्मवर्ष येते सुमारे इ.स.पू. ३५ या वर्षी. तिरुवेल्लुवर हे तमिळ महाकवी, संत, मुत्सद्दी, राजनीतीज्ञ, महापंडित, विद्वान तत्त्ववेत्ते वगैरे होते. म्हणजे जे स्थान उत्तर भारतात चाणक्याचे तेच किंबहुना त्याहून सरस असे तमिळ जनतेसाठी होते. त्यांच्या नावाचा संवत्सर आहे यावरूनच तमिळ संस्कृतीतले त्यांचे स्थान ध्यानांत येते. मग तमिळ अस्मिता जागृत झाली. आणि त्यातून विवेकानंद स्मारकाशेजारीच तिरुवेल्लुवर स्मारक उभे राहिले. या स्मारकाच्या निमित्तानेच मी त्यांची माहिती समजून घेतली. त्यामुळे स्मारकाचा हुतू सिद्धीस गेला असे नक्कीच म्हणता येईल. परंतु विविध संस्कृतींच्या विविध अस्मिता असतात आणि अस्मितांमधून विविध पूर्वग्रह झालेले असू शकतात. त्यामुळे आर्य, बौद्ध, ख्रिस्ती, अशा विविध संस्कृतीतील विद्वानांची मते वेगवेगळी असूं शकतात. हे स्मारक पूर्ण झालेले आहे आणि खूपच प्रचंड असून देखणे आहे. मी २०१२ साली संपूर्ण पाहिलेले आहे. आता डागडुजीसाठी बंद असावे. ही दोन स्मारके समुद्रात आहेत तर महात्मा गांधी स्मारक मुख्य भूमीवर आहे. विवेकानंदांना न मानणारी जनता महात्मा गांधींना मात्र मानते हे पाहून गंमत वाटली. आपल्या लेखाच्या निमित्ताने माझ्या दक्षिण भारत दौर्‍यांच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

टर्मीनेटर 30/08/2024 - 11:42
विवेकानंदांना न मानणारी जनता महात्मा गांधींना मात्र मानते हे पाहून गंमत वाटली.
साक्षर असणे आणि सुशिक्षित असणे ह्यात काय फरक असतो ते अशा गोष्टींमधुन प्रकर्षाने जाणवते 😀

श्वेता२४ 26/08/2024 - 13:24
तिरुवेल्लुवर यांच्या बद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत. विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...

कंजूस 26/08/2024 - 13:53
फोटो आणि वर्णनातून माहिती कळेल आणि अधिकाधिक लोक केरळला स्वतः जातील. प्रवासी कंपन्यांपेक्षा अधिक गोष्टी पाहिल्या आहेत. १) तिरुवल्लूवर हा तिकडचा संतकवी. एक लाखापेक्षा अधिक श्लोक लिहिले आहेत. त्यांच्या नावाचा जिल्हा उत्तर तमिळनाडूत आहे. २) २०१०- १२ साली बोटीचे तिकीट वीस रुपये होतं. त्यात तीन बोटी क्रमाने कन्याकुमारी जेटी ते विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लूवर स्मारक अशा फिरत. तिन्ही प्रवासाचे धरून वीस रुपये. सुट्ट्या नसल्या तर एक तासात जमतं. ३)सुचिंद्रमचं वैशिष्ट्य म्हणजे फारिनरनांही आत प्रवेश आहे. आतमध्ये सारेगम वाजणारे दगडी खांब आहेत ते भाविक वाजवू शकतात. नाही जमल्यास सेवेकरी येऊन वाजवून दाखवतात. ( पद्मनाभस्वामी मंदिरात असे पाचशे खांब आहेत पण ते बंदिस्त करून टाकले आहेत). ४) नागरकोईल हे शहर त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी रस्त्यावरच आहे. नागरकोईल म्हणजे नागाचे मंदिर. ते बाजारातच आहे. तेसुद्धा पाहिले. फारसे टूरिस्ट ठिकाण नसल्याने इथले वडे इडली स्वस्त आणि चविष्ट आहेत. टपरीवर केळीच्या पानावर देतात. खाऊन झाले की आपणच आपले पान गुंडाळून डब्यात टाकायचे आणि तिथे वर्तमानपत्राचे कागद ठेवलेले असतात त्याने हात पुसायचे. साधी सोपी पद्धत.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 04/09/2024 - 07:01
सुचिंद्रमचं वैशिष्ट्य म्हणजे फारिनरनांही आत प्रवेश आहे. मनात द्वाड प्रश्न आला , - हा फॉरिनर जर खरंच धर्माने हिंदू असला तर? फॉरिनर गोराच असे नाही , श्रीलंकन सिंहली पण असू शकतो कि - किंवा समजा पूर्वेकडील राज्यातील नेपाळी / चिनी सारखे दिसणारे भारतीय हिंदू कोणि असेल तर त्याला कसे अडवणार? असो एकूण निरीक्षण असे कि - काही ( सगळ्या नसावे) हिंदू मंदिरात अहिंदूंना प्रवेश नाकारतात - मशिदीत मुस्लिम नसल्यानं प्रवेश मिळतो पण काही ठिकाणी असे बघितले कि मशिदीत काही ठरविक भागातच मिळतो - चर्च मध्ये असे कुठले बंधन दिसले नाही ( चर्च वाले आपल्या धर्माचे मार्केटिंग व्हावे म्हणून अशी बंधने ठेवत नसावीत !) - बाली तील हिंदू मंदिरात जाताना सर्वांना कमीत कमी एक लुंगी सारखे वस्त्र नेसावे लागते नुसतंय बर्मुडा मध्ये किंवा अगदी पूर्ण धोतर प्यंट असली तरी चालत नाही ( अजसे तिरुपती ला पण कपड्यांचे काहीतरी बंधन असते तसेच काहीसे )

आम्हींपण याच मार्गाने गेलो होतो. कन्याकुमारी तीन दिवस राहीलो होतो. समुद्रकिनाऱ्यावरील तामीळ नाडू सरकारचे गेस्ट रूम साठ रूपये दर दिवसाचे भाडे. वट्टकोट्टाई किल्ला अप्रतिम. कन्याकुमारी ची मुर्ती खरोखर अप्रतिम आहे. बार बार देखो वाली भटकंती आहे. सर्व फोटो काढून पुन्हा बघीतले

In reply to by कर्नलतपस्वी

श्वेता२४ 27/08/2024 - 10:34
कन्याकुमारी तीन दिवस राहीलो होतो. अगदी योग्य केलेत . कन्याकुमारी हे कमीत कमी दोन रात्री व इतिहासाची व आपल्या संस्कृतीला समजून घेण्याची आवड असेल तर तीन रात्रीचे ठिकाण आहे . खरंतर मला गर्दीची ठिकाणे आवडत नाहीत . कन्याकुमारी येथे बऱ्यापैकी गर्दी असते . गल्लीबोळ अरुंद व गर्दीने गजबजलेले आहेत . तरीही या शहरात मला एक प्रकारचा जिवंतपणा जाणवला. का कुणास ठाऊक मला कन्याकुमारी प्रचंड आवडले . तीन दिवसाचा स्थलदर्शन कार्यक्रम पुढील प्रमाणे असायला हवे असे मला वाटते- दिवस पहिला - स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल (3-4 तास) व जेवणानंतर वॅक्स म्युझियम थ्रीडी आर्ट गॅलरी एक्वेरियम (2-3 तास), दिवस दुसरा - सकाळी सूर्योदय पाहणे , विवेकानंद केंद्र येथील रामायण गॅलरी व भारत मंदिर हे म्युझियम पाहणे( येथे रामायणाबद्दल अतिशय विस्तृत माहिती मिळते. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील अनेक थोर विभूतींचे कार्य याबद्दल माहिती आहे . कमीत कमी चार ते पाच तास सोबत ठेवून जावे. तसेच इतिहासाचे आवड असणाऱ्यांना येथे जावेसे वाटेल. आम्हाला याबद्दल खूप आवड असली तरीही मुलाचा विचार करून व हाती असलेल्या केवळ दोन दिवसांचा विचार करून आम्ही तो कार्यक्रम रद्द केला. भविष्यात जेव्हा कन्याकुमारीला जाणार आहे तेव्हा केवळ एक दिवस याच साठी ठेवणार आहे.) जेवणानंतर वट्टकुट्टई किल्ला व तेथून पुढे सुचिंद्रम मंदिर पाहणे. दिवस तिसरा- त्रिवेणी संगम , भगवती अमन मंदिर, स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारून खरेदी करणे, संध्याकाळी सूर्यास्त पाहणे. अशा पद्धतीने कन्याकुमारी येथे तीन दिवसांची आरामदायी कार्यक्रम पत्रिका होऊ शकते. ज्यांना ऐतिहासिक गोष्टींमध्ये रस नाही त्यांनी विवेकानंद केंद्राचा कार्यक्रम ,तसेच ज्यांना शॉपिंग मध्ये रस नाही त्यांनी खरेदीसाठी अर्धा दिवस ठेवण्याची गरज नाही . मग कन्याकुमारी येथे संपूर्ण दोन दिवस स्थलदर्शनासाठी ठेवले तर पुरेसे होतात.

प्रचेतस 27/08/2024 - 08:37
विवेकानंद स्मारकात गवाक्षांची नक्षी चैत्यकमानींची आहे हे आवडले. वट्टकुट्टई किल्ला, त्यातले डेरेदार झाड आणि मंदिराचे मूर्तीकामाने सजलेले गोपुर एकदम सुरेख. लेखन आणि छायाचित्रे आवडली.

हल्ली इथे सुद्धा भरपूर गर्दी मिळेल. कन्याकुमारी नागरकोईल जाताना एक मायलादी गाव आडबाजूला आहे. हे शिल्पकारांचे गाव. पिढ्यानपिढ्या शिल्पकला हाच उद्योग. शुचिंद्रम मंदिर यांच्याच पुर्वजानी बांधले असे मार्गदर्शकने सांगीतल .

Male and female rocks Before the rocks are chiselled into idols, prayers are offered. There is no temple in TN and Kerala which does not have atheist one sculpture from this village. https://www.onmanorama.com/travel/outside-kerala/2018/07/04/myladi-tamil-nadu-sculpting-town.amp.html वट्टकोट्टाई मधले ते एकटे झाड आता बरेच मोठे झालेले दिसतेय. माझ्याकडेही त्याचा फोटो आहे.

श्वेता२४ 28/08/2024 - 07:43
याबद्दल काही माहिती नव्हती. रोचक माहिती दिलीत. हो. तुम्ही गेला त्यावेळी किल्ल्यातील ते झाड अगदी लहान असेल नाही? आता छान मोठे डेरेदार झाले आहे आणि तसेच त्याच्या फांद्या पसरट व उंचीला कमी असल्यामुळे माझा मुलगा तर कित्येक वेळ त्या झाडाच्या वरतीच खेळत राहिला.

टर्मीनेटर 30/08/2024 - 11:37
हा भागही आवडला! किल्ला आणि सुचिंद्रम मंदिर मस्त आहेत, हे दोन्ही आधी पाहिले नसल्याने जास्ती आवडले. वॅक्स म्युझीयम मधले पुतळे मात्र अगदिच सुमार दर्जाचे वाटले. मत्सालयाच्या फोटोंमध्ये तिसऱ्या फोटोतला फ्लॉवर हॉर्न मासा पाहुन थोडा भाउक झालो.तिनेक वर्षांपुर्वी घराचे रंगकाम सुरु असताना पेंटरने फिश टँक तात्पुरती हलवताना एअर पंपचे सकाळी बंद केलेले बटण पुन्हा सुरु न केल्याने मी चार-सव्वा चार वर्षे दिड इंचापासुन जवळजवळ नऊ इंच लांब आणि असेच 'हेड' येइपर्यंत वाढवलेला ह्या जातीचा माझा मासा दिवसभर पुरेसा ऑक्सीजन न मिळाल्याने तडफडुन मेला होता. तेव्हापासुन कितीही आवड असली तरी मासे पाळणे बंद केले आहे! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

किल्लेदार 31/08/2024 - 22:40
हा किल्ला बघता आला नव्हता पण साधारण अशाच बांधणीचा आणखी एक किल्ला उत्तर केरळमध्ये आहे. फोर्ट बेकल.

श्वेता२४ 02/09/2024 - 15:21
@किल्लेदार, हो. बेकल किल्यावरुन दिसणारे दृश्यही नयनरम्य आहे. माझ्या बकेटलिस्टमध्ये आहे. @झकासराव, प्रतिसादासाठी धन्यवाद.

श्वेता२४ 05/09/2024 - 11:09
हे पाहायचं राहून गेलं की हो. याची माहिती वाचली होती. पण मंदीरातील वेगवेगळ्या देवतांचे दर्शन घेण्याच्या नादात डोक्यातून गेलं हे. योग नसतो तो असा. भविष्यात कधीतरी कन्याकुमारीला परत जाणार मी. तेव्हा ईथे दर्शन घेणार नक्की. बरं झालं लक्षात आणून दिलं.

चौथा कोनाडा 06/09/2024 - 13:01
व्वा सुंदरच ! वर्णन आणि प्रचि पाहून डोळे तृप्त जाहले ! अनेक तपशिल दिल्याबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद ! ते खुपच उपयोगी आहेत !

नठ्यारा 22/09/2024 - 23:05
श्वेता२४, सगळे भाग वाचून काढले. तुमची वर्णन करायची हातोटी आवडली. रोजनिशी ठेवीत होता काय, असा विचार मनांत आला. जेवणाखाण्याचे प्रचि काढणं फारंच पद्धतशीरपणाचं लक्षण आहे. मी असतो तर सरळ तुटून पडलो असतो. फोटोबिटो नंतर बघू. पुढच्या वेळेस जमलं तर मेनूकार्डाचाही फोटो टाका. आपला नम्र, -नाठाळ नठ्या अवांतर : मत्स्यालयातील तिसऱ्या प्रचित डोक्यावर मोठ्ठा गोल असलेला मासा बेलुगाच्या आकाराचा आहे. या आकारावरून बेलुगा नामे सामानवाहू विमान निर्माण केलेले आहे. अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Airbus_Beluga बेलुगा व्हेल : https://en.wikipedia.org/wiki/Beluga_whale

श्वेता२४ 25/09/2024 - 10:28
विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद रोजनिशी ठेवीत होता काय, असा विचार मनांत आला. मिसळपाव वरती केरळ मध्ये सर्व ठिकाणांची एकत्रित माहिती असलेली मला सापडले नव्हती. सगळ्यांना माहिती मिळावी या हेतूने या सर्व सहलीची लेखमाला लिहायची हे ठरवले होते. त्यामुळे प्रवासा दरम्यान ज्या गोष्टी नंतर विसरल्या जातील असे वाटले. त्याबाबतची माहिती मी व्हाट्सअप वरती बोलून टंकलेखन केले जाते(voice typing) त्या पद्धतीने लिहून ठेवली होती. त्यामुळे नंतर या सर्व माहितीचे संकलन करणे सोपे गेले. बेलुगा माशाच्या अवांतर माहिती बद्दल धन्यवाद!!

"मी, शिल्पकार माझ्या जीवनाचा !!"

भम्पक ·

चौथा कोनाडा 30/08/2024 - 11:49
छान कविता ! विवेकवादी रचना, आवडली रचना !
मान्यता जगात उदंड जाहल्या त्या प्रती जगणारे अमाप ... मी तर अव्यक्ताचा चाहता जी माझी कृती तीच परिणती !
या ओळी विशेष आवडल्या ! ही कविता बर्‍याच संदर्भात भाष्य करते ! जो विचाराने परिपक्व असतो त्याला कुठल्या बाह्य उपदेशाची गरज नसते किंवा वारंवार देवाची आळवणी करण्याची गरज नसते. पण आजुबाजूचे लोकं नावं ठेवतात... हा देवाचे करत नाही .. याला पुण्य कसं मिळणार ? अस्सल्या साचल्या विचारसरणीला फाट्यावर मारणारी रचना खरंच छान आहे !

काव्यरस
न करीशी व्यर्थ चिंता तू ठाऊक मज सामर्थ्य माझे ! कुणाशी कसे वदावे कसे वागावे काय केल्याने काय होईल.... हि चिंता तयास ज्याने क्रमिला पथ दुहेरी माझा पथ सुर्यप्रकाशाहूनही स्वच्च्छ कण भारही किंतु तयात नाही ! नकोत सला-मशवरा मजला ठाऊक मज मार्गक्रमण माझे ! मान्यता जगात उदंड जाहल्या त्या प्रती जगणारे अमाप ... मी तर अव्यक्ताचा चाहता जी माझी कृती तीच परिणती ! का कशाचीही बाळगावी मी भीती ठाऊक मज अंतिम ध्येय माझे !!

शोनार बांगला... भाग ४ - बरीषाल बांगलादेश

समर्पक ·

फाळणीनंतर देखील दंगली थांबल्या नाहीत. गरीब श्रीमंत यांमधील आर्थिक आणि सांपत्तिक दरीमुळे इथे साम्यवादी चळवळ फोफावली आणि कांही हिंसक संघटनांनी याचा गैरफायदा घेऊन दंगली घडवून आणल्या. आतां फक्त हिंदूमुस्लिमच एकमेकांना मारत नव्हते तर हिंदू हिंदूंना वगैरे विविध गट एकमेकांना मारूं लागले होते. वंगचित्रे मध्ये पुल देखील हे सगळें पाहून विषण्ण झालेले आढळतात.

टर्मीनेटर 26/08/2024 - 14:24
मालिका वाचतोय... बरीच नविन माहिती मिळत आहे! ह्या लेखाच्या निमित्ताने प्रतिसादातुन लिंक मिळालेला जयंत कुलकर्णी साहेबांचा वाचनातुन निसटलेला माहितीपुर्ण लेखही वाचायला मिळाला 👍

road

अवघड काळात निर्णय कसा घ्यावा?

शाम भागवत ·

छान ! शेवटच्या वाक्यात तुम्हाला पुर्ण कथेचे सार सांगायला जमले आहे बुवा ! माजी मुख्यमंत्र्यांचे तुम्ही एवढे मोठे चाहते आहात हे मला आजच कळाले. तळटीप : वरील प्रतिसाद हा विनोदासाठी केलेली वाक्यरचना आहे याची कृपया नोंद घ्यावी.

In reply to by प्रचेतस

हल्लीच्या लेखकांचे रामायण, महाभारत वाचून असेच म्हणावे लागेल. संवाद जरी काल्पनिक असला तरी त्यात तथ्य आहे. लेख आगोदर वाचला होता आणी पटला सुद्धा. रडगाणे गाण्यापेक्षा रणगाड्याचा उपयोग करून परिस्थिती वर मात करणेच उचित. तररी कृष्ण कर्ण संवाद वाचून एक जाहीरात आठवली..... "तेरी कमीज से मेरी कमीज जादा मैली क्यों है..."

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 23/08/2024 - 17:40
महाभारताचे वास्तव दर्शन नामक पुस्तक तुम्हाला व प्रचेतस ह्यांना आवडेल असे वाटते. (वाचलेही असेल) अनंत दामोदर आठवले हे लेखक आहेत. महाभारतावर आधारीत ज्या काही कथा कादंबऱ्या आहेत त्यावर सडकून टीका केली आहे. मला लेखक आक्रस्ताळी वाटला पण करमणूक झाली.

In reply to by कॉमी

महाभारताचे वास्तव दर्शन
पुस्तकाची पीडीएफ इन्टरनेट वर मिळाली, वरवर चाळत असताना पुस्तक आवडले असल्याने हार्डकॉपी विकत घेऊन वाचेन ! सुंदर पुस्तक सुचवल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद :)

श्रीगणेशा 23/08/2024 - 01:26
संवाद आवडला! तो खरोखर घडला असेल किंवा नाही, काहीच फरक पडत नाही. तो लिहिला आणि वाचला गेला, हे महत्त्वाचं.

कंजूस 23/08/2024 - 12:32
पौराणिक कथा माहीत असतात त्या एक दोन वाक्यांत सांगून कोण कसा बरोबर किंवा चुकिचा वागला सांगण्याचा प्रयत्न आहे. तसं काही घडलं का नाही गौण आहे. लेखाचा मुद्दा काय तर अवघड समयी कसे वागावे किंवा निर्णय घ्यावा. याबाबतीत काही उदाहरणे आपल्याला काही उद्योगपतींच्या चरित्रांतून मिळतील. म्हणजे काय अडचणी आल्या आणि त्यांनी कसा मार्ग काढला. शेट लालचंद हिराचंद, किर्लोस्कर, धिरूभाई अंबानी, टाटा , घनश्याम बिर्ला इत्यादी. काही प्रसिद्ध लोकांचीही उदाहरणे आहेत. शरद बाविस्कर, वि.द.घाटे, प्र. के. अत्रे इत्यादी.

कृष्ण व कर्ण यांना वेगळे संवाद देउन अजून काही कथा निर्माण होउ शकतात. बर्‍याचदा बोधकथा लिहिणार्याला अगोदर काय बोध द्यायचा आहे हे माहित असते त्यानुसार तो कथा पाडतो. त्यामुळे एक तत्वक्रीडा म्हणून याकडे पाहता येईल

Bhakti 24/08/2024 - 13:41
असे पौराणिक, ऐतिहासिक कथांसंबंधी स्वैर लेखन करतांना लेखकाने तिथे 'याचा ... ग्रंथाशी कोणताही संबंध नाही,विचार पूर्णपणे लेखकाचे आहेत ' हे नमूद करणं खुप महत्वाचे आहे.ज्ञानाचा प्रसार व्हावा,अज्ञानाचा नाही! आताच उठो द्रौपदी' ही पुष्यमित्र उपाध्याय यांची प्रसिद्ध कविता मला अटलबिहारी वाजपेयी लिखित म्हणून कायप्पावर मिळाली आहे... हम्म!

लेखनप्रकार
कोरोना काळात एका इंग्रजी लेखाचे हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे. ते मी मायबोलीवर टाकले होते. पण मिसळपाववर टाकले नव्हते. ते आज लक्षात आल्याने इथे चिकटवत आहे. महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले - "माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?" "मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आले नाही. याच्या उलट, मी कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असल्याचे कळल्यावर, परशुरामांनी मला शाप दिला. म्हणे "त्यांनी मला जे काही शिकवलं, ते मला आयत्या वेळेला आठवणार नाही." "एकदा एका गायीला चुकून माझा बाण लागला.

फलाफल

Bhakti ·

वामन देशमुख 21/08/2024 - 11:36
व्वा ! फोटू पाहून तोंपासु! तुमच्या रेसिपीज वरचेवर अधिकाधिक चांगल्या होत चालल्या आहेत. ;-) अजून येत द्या - खुबा रोटी बाबा गणूस वगैरे . --- हे वाचुन हे आठवले - सानिकास्वप्निल यांचे फलाफल सँडविच https://www.misalpav.com/node/17856 गणपा यांचे फलाफील - शवर्मा https://www.misalpav.com/node/23035

In reply to by वामन देशमुख

विजुभाऊ 05/09/2024 - 10:35
अजून येत द्या - खुबा रोटी बाबा गणूस वगैरे .
ऑ .... वामनराव ते खुबा रोटी नाय ओ.. ते "खुबूस " असे आहे "खुबा" याचा अर्थ वेगळा होतो. ( लहानपणी डॉक्टर खुब्यावर इंजेक्षन द्यायचे तो अवयव)

In reply to by विजुभाऊ

वामन देशमुख 10/09/2024 - 23:23
मला खोबा रोटी असं म्हणायचं होतं. (कॉन्टेक्स्ट् वेगळा आहे याची जाणीव आहे.) बाकी खुबूस / खुबस / खबुस / पीटा ब्रेड ची आठवण करून दिल्याबद्धल आभार.

कंजूस 21/08/2024 - 13:10
फेलाफेल किंवा काय उच्चार असेल तो म्हणजे चणाडाळवडे. टर्मिनेटर यांची इजिप्त ट्रिप यावरच धावत होती. मिश्र डाळ वडेही चांगले लागतात. चांगले केले आहेत.

In reply to by कंजूस

Bhakti 21/08/2024 - 13:42
खरचं ,बाराही भागांची खाद्यसंस्कृती पाहिली,सँडविच आणि फलाफेलच जास्त दिसले ;) हा पदार्थ इजिप्तचाच म्हणून ओळखला जातो.

In reply to by Bhakti

चौकस२१२ 27/08/2024 - 05:56
याला पूर्ण मेडिटेरियन चव पाहिजे असेल तर जर उपलब्ध असेल तर यात कोथिंबिरी ऐवजी पार्सली घालावी , आणि त्याबरोबर " ताहिनी " तीळा पासून बनवलेले किंवा "ताझिकि : हि ग्रीक पद्धतीची काकडीची आंबट कोशिंबीर

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 30/08/2024 - 11:46
टर्मिनेटर यांची इजिप्त ट्रिप यावरच धावत होती.
अगदी अगदी... त्या सोळा दिवसांत फलाफेल सँडवीच हाच तर माझ्या रोजच्या आहारतला प्रमुख घटक बनला होता 😀 @ भक्ति रेसीपी आवडली.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 21/08/2024 - 13:32
हो का,काल पनीर मसाला होता, अप्रतिम भाजी झाली होती.ही खूप आधीची रेसिपी आहे.आज कोबीची भाजी आहे :-)

फलाफल. बरोबर लसण्या दही देतात. खायला चांगले लागते. अमरिकन थालीपीठ (पिझ्झा) अजीबात खात नाही तेव्हांहेच खात असे. बाकी डाळवडा, परदेशात जाऊन नाव बदलले आहे. दक्षिणी डाळीचे जास्त आवडतात. हल्ली कमी खातो नाहीतर कवळीच हातात यायची. पाककृतीबद्दल काय बोलणार, खुद्द पाकपदम्श्री नी स्वतःच केली आहे म्हणल्यावर मस्तच असणार. डोळ्यांना आवडली.

अ काहीतरी चुरचुरीत खायची इच्छा होती.खुप दिवस अख्खे हिरवे मूग वापरून रेसिपी झाली नव्हती. रात्री दीड वाटी हिरवे मूग ,एक वाटी हरभरा डाळ,अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धा चमचा मेथ्या एकत्र भिजवलेल्या.सकाळी जिरे, आलं तुकडा,दोन मिरच्या टाकून मिक्सरमधून भिजलेल्या डाळी जाडसर वाटून घेतल्या. आता कांदा आणि कोथिंबीर

पावसातील उद्योग

जयंत कुलकर्णी ·
...परवा बाहेर धोधो पाऊस कोसळत होता.. पुण्यातील तुंबलेल्या रस्त्यांमुळे बाहेर जाण्याचा प्रश्र्नच नव्हता. काही दिवसांपूर्वी मॅक्रोसाठी उभा केलेला सेट-अप तसाच ठेवला होता. फुलांचे फोटो काढून कंटाळा आला होता. तेवढ्यात नातवाच्या खेळण्यातील काही गाड्या हाती लागल्या. त्याचे फोटो काढायचे ठरवले, पण नुसते फोटो काढायचे नव्हते तर काहीतरी वेगळे... म्हणजे गाड्या खऱ्यातर वाटल्या पाहिजेत पण लोकेशनवर उभ्या आहेत असेही वाटले पाहिजे. माझ्याकडे असलेली मासिके चाळली पण योग्य अशी बॅकग्राऊंड काही सापडली नाही. तेवढ्यात मला मी काढलेले फोटो आथवले. एक होता गोकाकला काढलेला आणि दुसरा होता गुजरातमध्ये काढलेला.

पावसाळी भटकंती २०२४

कंजूस ·
पावसाळी भटकंती २०२४ ऑगस्टच्या दोन आठवड्यात भिवपुरी आणि नेरळ माथेरान भटकलो. त्याची क्षणचित्रे आणि चित्रपट. फोटो १.
.माथेरानमध्ये कुठेही भटकायचं .

फोटो २.
.. पावसाळ्यात सर्व गर्दी शार्लोट लेक कडेच जाते. दस्तुरीपासून पाच किमी.

एखाद्या पर्यटनस्थळी जाण्यापूर्वी पर्यटनस्थळी जाण्या-येण्याच्या सोयी-सुविधा या अ त्यंत आवश्यक असतात त्याची माहिती आवश्यक असते आपलं लेखन ती माहिती अद्यावत आणि तपशीलवार पुरवते. पर्यटनस्थळी साध्या साध्या पण काही सुविधा अ त्यावश्यक असतात. छायाचित्र पुरक व्हीडीयो सर्व पाहिले छान झाले आहेत. पुढील पर्यटनस्थळी प्रवासासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 20/08/2024 - 07:05
उत्तम लेखन. माथेरान आता बरंच बदललेलं दिसतंय. पुण्यावरून येताना माथेरानला येणे थोडे गैरसोयीचे ठरते. एक्सप्रेसने कर्जत आणि तिथून लोकल पकडावी लागते, परतीचा प्रवास तर अजून त्रासदायक होतो. एकदा टॅक्सीने आणि एकदा मिनी ट्रेनने माथेरानला गेलो होतो, भरपूर भटकलोय तिथं. सुंदरच आहे. भिवपुरी पण मस्त. भिवपुरी घाटमाथ्यावरून पाहिली आहे, खांडीच्या पुढे डांबरी रस्ता आहे पॉवरप्लान्टला उतरायला.

In reply to by प्रचेतस

कंजूस 31/08/2024 - 22:54
पुण्याहून एका दिवसात माथेरान - प्रगती एक्सप्रेसने ( 7:50 - 09:10)कर्जत - लोकलने नेरळ- टॅक्सीचे माथेरान. बारापर्यंत पोहचाल.. संध्याकाळी पावणेसहाची माथेरान-कर्जत बस सात पर्यंत थेट कर्जत स्टेशनला सोडेल. साडेसातची सिंहगड मिळेल. राहायचं झाल्यास सकाळी लवकर चेकाउट केल्यावर टॅक्सीने नेरळला आठपर्यंत येणे. साडे आठची डेक्कन एक्सप्रेस नेरळ वरूनच मिळेल.

गोरगावलेकर 20/08/2024 - 13:23
उपयुक्त माहिती आणि सुंदर फोटो/व्हिडीओ मजा घ्या आणि तुमचेही पावसाळी भटकंती फोटो टाका. हे घ्या काही फोटो रानसई धरण मित्र परिवारासहित छोटेखानी भटकंतीकरीता नव्या मुंबईकरांसाठी जवळचे आणि कमी गर्दीचे ठिकाण. शिडीवरून धरणाच्या भिंतीवर गेल्यास जलाशय आणि कर्नाळा सुळक्याचे मनोहारी दर्शन घडते .

श्वेता२४ 22/08/2024 - 08:26
रेल्वेच्या वेळा, तिकीट दर , त्याच्या वेळा , स्थानिक वाहतुकीच्या सोयी, अशा बारीकसारीक गोष्टी प्रवास नियोजनासाठी अत्यंत आवश्यक असतात. मुंबईला येऊन इतकी वर्ष झाले तरी माथेरानला जाणे मात्र झाले नाही. आता जायला हवे असे वाटते.