- "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४"
- "मराठी: अभिजात भाषा दर्जा प्राप्तीचे संभाव्य फायदे / सकारात्मक परिणाम"
- "मिपा १८+" (चावट/शृंगारिक कथा, कविता आणि लेख) नुकतीच मिपाने आपल्या वयाची १८ वर्षे पुर्ण केली आहेत. वयाने 'प्रौढ' झालेल्या मिपाला त्याबद्दल साजेशी मानवंदना देणे क्रमप्राप्त आहे! तर लेखक मंडळी, "मिपा १८+" ह्या लेखन विषय विभागासाठी आपण चावट / शृंगारिक कथा, कविता, लेख आणि आपल्या विद्यार्थीदशेत ऐकलेल्या चावट विनोदांचा संग्रह पाठवू शकता. अर्थात ह्या लेखन विषय विभागासाठी पाठवलेले लेखन बीभत्स किंवा अश्लीलतेकडे झुकणारे नसावे ही एकमेव अट आहे ह्याची नोंद घ्यावी.
गेल्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात "न भूतो, न भविष्यती" अशा अनेक घडामोडी घडल्या आहेत, ज्यात काही नवीन नैसर्गिक/अनैसर्गिक युत्या आणि आघाड्यांचा जन्म आणि अंत, प्रमुख प्रादेशिक पक्षांचे दुभंग आणि त्यातून निर्माण झालेले कायदेशीर पेच-प्रसंग, पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाविषयीच्या याचिका आणि खटले, आरोप-प्रत्यारोप अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.
वरील घटनांचे सर्वसामान्य मतदार आणि संबंधित पक्षांचे कार्यकर्ते ह्यांच्या मन:स्थितीवर आणि राजकीय दृष्टिकोनावर झालेले सकारात्मक/नकारात्मक परिणाम, तब्बल २८८ विधानसभा मतदारसंघांत होणाऱ्या ह्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या दोन राष्ट्रीय आणि चार मुख्य प्रादेशिक पातळीवरील पक्षांची प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती आणि जनमानसातील त्यांची प्रतिमा, पक्षांतर्गत हेवे-दावे आणि कुरघोड्या, संभाव्य बंडखोरीची शक्यता, मध्यंतरी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल असे अनेक पैलू असल्याने ह्या लेखन विषयाचा आवाका बराच मोठा आहे.
मिपावर राजकीय घडामोडींवर अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक लेखन करणाऱ्या सिद्धहस्त लेखकांची मांदियाळी सर्वज्ञात आहे. प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती, जुने-नवे राजकीय संदर्भ, सामाजिक समीकरणे, जातीय-धार्मिक ध्रुवीकरण, ह्या आधीच्या निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी/आकडेवारी ह्यापैकी एका किंवा अनेक अंगांना स्पर्श करत अभ्यासू लेखकांनी विश्लेषणात्मक लेख, निवडणूक निकालाविषयीचे आपले तर्काधारित अंदाज / भाकिते वर्तवून ह्या लेखन विषयाची शोभा वाढवणे अपेक्षित आहे.
अर्थात केवळ विश्लेषणात्मक लेख, अंदाज आणि भाकितांपुरती ह्या विषयाची व्याप्ती मर्यादित नसून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सत्य/काल्पनिक कथा, कविता, व्यंगचित्रे, विनोदी किस्से आणि अनुभवाधारित, जसे की एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता ह्या नात्याने आपल्याला आलेले बरे-वाईट अनुभव तसेच कॉलेज/विद्यापीठ, ग्राम पंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषद, विधानसभा/विधानपरिषद/पदवीधर किंवा शिक्षक मतदार संघातून आमदारकीची किंवा थेट खासदारकीची अशी कुठलीही निवडणूक पक्षाचा अधिकृत उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार म्हणून लढवली असल्यास त्यात मिळालेल्या जय किंवा पराजयाचा किंवा उमेदवारीचा एकंदरीत अनुभव, निवडणूक प्रक्रियेत 'इलेक्शन ड्यूटी' बजावताना आलेले बरे/वाईट/गमतीशीर अनुभव व्यक्त करणाऱ्या लेखनाचेही स्वागतच आहे, फक्त विषय महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित असावा एवढीच माफक अपेक्षा.
मंडळी, अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जवळपास अडीच हजार वर्षे प्राचीन आणि समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या मायमराठी भाषेला नुकताच 'अभिजात' भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो म्हणजे नक्की काय होते? तो मिळण्यासाठीचे निकष काय असतात? त्याचे भाषेच्या समृध्दीवर काय सकारात्मक परिणाम होऊ शकतात? भाषावृध्दीसाठी त्याचा काही उपयोग होऊ शकतो का? मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले? अनेक वर्षांपासुन सरकार दरबारी ही मागणी कोणी लावून धरली होती? अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारे माहितीपूर्ण लेखन "मराठी: अभिजात भाषा दर्जा प्राप्तीचे संभाव्य फायदे / सकारात्मक परिणाम"ह्या लेखन विषय विभागात अपेक्षित आहे.
- लेखन देण्याची अखेरची तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे.
- दिवाळी अंकासाठी कृपया कुठलेही पूर्वप्रकाशित लेखन पाठवू नये.
- आपले लेखन आपण साहित्य संपादक आयडीवर व्य,नि. द्वारे पाठवू शकता (त्यासाठी येथे क्लिक करा)
- किंवा sahityasampadak.mipa@gmail.com ह्या आयडीवर ईमेलद्वारेसुद्धा लेखन पाठवू शकता.
- आपण जर ईमेलद्वारे लेखन पाठवले असेल तर प्रेषक म्हणून आपला "मिपा आयडी" लिहायला कृपया विसरू नका.
मिसळपाव
प्रतिक्रिया
लैच भारी.
वाह !
प्रमाण भाषा सोडून रांगड्या,
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"मिपा १८+" (चावट/शृंगारिक कथा
व्वा छान..
शुभेच्छा. माझा अंक आजच राखून
अभिजात
इरलं घालून सचैल स्नान .... ?
शृंगारिक / मादक / बीभत्स
In reply to इरलं घालून सचैल स्नान .... ? by नठ्यारा
सुंदर चेहऱ्याचा मुका कोणाला
हा.... हा... हा....
In reply to सुंदर चेहऱ्याचा मुका कोणाला by सुबोध खरे
आणि हे एक,
In reply to हा.... हा... हा.... by चौथा कोनाडा
जवळजवळ
In reply to आणि हे एक, by भागो
' जवळजवळ झोपायची वेळ झाली '
In reply to जवळजवळ by चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
In reply to ' जवळजवळ झोपायची वेळ झाली ' by आग्या१९९०
बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर
हा हा हा
In reply to बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर by Bhakti
मिपाकर कन्या/महिला गौरी
In reply to बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर by Bhakti
नुकतेच तुनळी वर एक मुलाखत पाहिली
In reply to मिपाकर कन्या/महिला गौरी by चौथा कोनाडा
हे राम.
In reply to बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर by Bhakti
जबरदस्त विषय आहेत.
भारीच! अंकाची वाट बघतोय!!
अंक?
In reply to भारीच! अंकाची वाट बघतोय!! by अथांग आकाश
मी लिहितो यावेळेला.
या तीन थीम पलीकडचे लेखन चालेल
In reply to मी लिहितो यावेळेला. by मनिष
पक्षांची घटना
पक्षघटने बद्दल माहित नाही. पण
In reply to पक्षांची घटना by चौकस२१२
पन मी काय म्हंतो .......
In reply to पक्षांची घटना by चौकस२१२
राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना
In reply to पन मी काय म्हंतो ....... by चौथा कोनाडा
व्वा .... मंग तर भारीच व्हईल
In reply to राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना by चौकस२१२
येस्स्स ...
In reply to राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना by चौकस२१२
शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची घटना कुठे मिळेल
In reply to पक्षांची घटना by चौकस२१२
मिपा १८+ साठी कितपत 'शृंगारिक' चित्रे चालतील ?
दिवाळी अंक आणि शृंगारिक
In reply to मिपा १८+ साठी कितपत 'शृंगारिक' चित्रे चालतील ? by चित्रगुप्त
+१
In reply to दिवाळी अंक आणि शृंगारिक by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
खरंय !
In reply to दिवाळी अंक आणि शृंगारिक by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पूर्वी 'काकोडकर दिवाळी' नामक
In reply to खरंय ! by चौथा कोनाडा
येस्स... आठवला...
In reply to पूर्वी 'काकोडकर दिवाळी' नामक by प्रचेतस
मस्त
संपादक मंडळ ,
संपादक मंडळ ,
हा घ्या अजून एक.