Skip to main content

भोंडला खेळू

लेखक Bhakti यांनी रविवार, 06/10/2024 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
अ सखे फेर धरू ...गरागर जात्यावर दळण फिरे... गरागर पीठाचे मांडे करू...भराभर चुलीसाठी सरपण शोधू ...भराभर रानातून सरपण आणू... झरझरा अशी पावले टाकू...झरझरा रानात गवत पसरले...दूरवर मागे फिरू ,घर राहिले...दूरवर घरी पिल्लांचा लाडिकपणा...मनभर चिमणीच्या चोचीत दाणा...मणभर दाणे जवारीचे उडाले... घरभर हस्ताची समृद्धी पसरू दे...घरदारावर -भक्ती (भोंडला लिहिण्याचा एक प्रयत्न)
लेखनविषय:

वाचने 1090
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया