मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्री गणेश लेखमाला २०२४ - फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार

चतुरानंद ·
फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार जगातील कुठल्याही समाजात काही गोष्टी सर्वसहमतीच्या असतात, तर काही गोष्टींबाबत दुमत असते. जगात जिथे जिथे मानवी समाज आहे, तेथे सत्ता, संपत्ती, स्त्री, जमीन आदी अनेक कारणांवर लोकांमध्ये वादविवाद असतात. या वादविवादात पूर्वी भांडणे आणि युद्धे होत आणि राजा तसेच राजघराणे बदलले जाई. औद्योगिक क्रांती आपल्याला मध्ययुगीन जगातून आधुनिक जगाकडे घेऊन आली. त्याबरोबर नवनवीन तंत्रज्ञान, विचारधारा, आयुष्याची नवनवीन मांडणी समोर येत गेली. नवीन तंत्रज्ञान घेऊन नवीन बाजारपेठा शोधत असणाऱ्या युरोपात जगाची बाजारपेठ ताब्यात घ्यायची स्पर्धा लागली.

नठ्यारा 16/09/2024 - 14:30
चतुरानंद, लेख चांगला आहे. एखाद दोन उदाहरणे दिली असतीत तर बरं पडलं असतं. उदा. : लिबियात गडाफीविरोधी आंदोलन रचून त्याला दूर केलं. पण त्यामुळे लिबियातील समस्या सुटल्या नाहीत. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/Factional_violence_in_Libya_(2011%E2%80%932014) किंबहुना प्रत्येक तथाकथित क्रांतीनंतर नागरी युद्धास सुरुवात झाली आहे. आपला नम्र, -नाठाळ नठ्या ता.क. : इस्रायलची निर्मिती मध्यपूर्वेत झाली आहे. ते मध्य आशिया चुकून पडलेलं दिसतंय.

ब्रिटिश लोकांनी पाडलेली फुट त्यांना राज्य करण्यास मदतगार झाली. आज देशात जी वेगवेगळी अंदोलने चालू आहेत त्यामागे असाच काहीसा विचार असू शकतो का ?

विजुभाऊ 16/09/2024 - 19:37
इस्लामी जगात असा दुभंग केंव्हा होईल? कट्टरपंथी वहाबी विचारसरणीत असा दुभंग आला तर बरे होईल. निदान धर्मांध कट्टर नेते जावून नवी मोकळी विचारसरणी असलेले नेते उदयास येतील त्यातून

चौथा कोनाडा 22/10/2024 - 21:34
लेख आवडला... छान विस्तार करून लिहिलाय.. मुद्देसूदपणा हे ठळक वैशिष्ट्य.
अनेकदा त्या आंदोलनाच्या नेत्याला / संघटनेलासुद्धा हे ठाऊक नसते की आपण जे करतोय - म्हणजे जे आंदोलन करतोय, त्या आंदोलनाचे मूळ प्रणेते कोण आहेत आणि अंतिम लाभार्थी कोण असेल ? अनेकदा देशांतील सरकार बदलण्यासाठी अशी आंदोलने उभी केली जातात आणि त्यात सहभागी असलेल्या सर्वांना आपली भूमिका नैतिक, रास्त आणि न्याय्य वाटावी अशी मांडणी केली जाते.
नेमकं लिहिलंय
एखादे आंदोलन एकटे, सुटे आणि स्वबळावर मोठे होते आहे किंवा त्याला कुणाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बळ मिळते आहे, याचा अंदाज घेता येईल.
बलात्काराचा निषेध म्हूणन सुरू केलेले आंदोलन कसा प्रवास करतो आहे ते दिसतेच आहे.

भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा कलासाधक: संकर्षण कर्‍हाडे

मार्गी ·

शाम भागवत 01/12/2024 - 16:34
मस्तच लिहिलंय. ओशो ध्यानवरून इथं आलोय. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी त्यांची एक कविता त्यांच्याच तोंडून युट्युबवर काही दिवसांपूर्वी ऐकल्याचं आठवतंय. त्यातून कटू सत्य सांगत असूनही ते विखारी नव्हतं तर विचार करायला लावणारं आहे असं वाटून गेलं. 🙏

लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ ‘व्हायफळ' गप्पा पॉडकास्टवर उलगडत जाणारा संकर्षणचा प्रवास ✪ ओळखीच्या चेहर्‍याच्या मागे असलेल्या दिलदार माणसाचा परिचय ✪ परभणी, अंबेजोगाई, औरंगाबादच्या आठवणी व लहानपणीच्या खोड्या ✪ प्रशांत दामले, श्रेयस तळपदे व सिनियर्सकडून त्याचं शिकणं आपण शिकावं असं! ✪ “स्टेजवरचा माज खाली दाखवलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल!” ✪ “तुला मनलं होतं‌ ना तुला बक्षीस द्यायचं हाय, रताळ्या!” ✪ “Soak the pressure and be there!” ✪ पुस्तकं‌ व माणसं वाचणारा अवलिया संकर्षण कर्‍हाडे! बस नाम ही काफी है! घराघरात पोहचलेला चेहरा! कलाकार, नाटककार, अभिनेता, सूत्र संचालक, लेखक आणि कवी!

श्री गणेश लेखमाला २०२४ - आनंदाचा कोपरा-माझी बाल्कनी

कर्नलतपस्वी ·
sr मोहम्मदवाडीचा सुर्योदय कवीवर्य अभिजित दाते यांची गझल सेवानिवृत्त मंडळींची कथा,व्यथा नेमक्या शब्दांत मांडते. गोंजारतो अताशा माझ्याच वेदना मी सांगा तरी नशा ही दुसर्‍या कशात आहे खेळात या नव्याने माझ्यात जन्मतो मी माझ्या शहास अंती माझीच मात आहे सेवानिवृत्तांकडे लोकांचे फारसे लक्ष नसते, जणू साईडला टाकलेली मालगाडी.

श्रीगणेशा 15/09/2024 - 16:16
आनंदाचा कोपरा आवडला! खूप छान वर्णन केलं आहे. असा समृद्ध निसर्ग बाल्कनीतून अनुभवायला मिळणं, ही आजच्या शहरी जीवनातील खूप मोठी दुर्मिळ गोष्ट.

कोतवाल, पावश्या,तांबट,बगळे,कबुतरं, मैना,शिक्रे आणी वर वर्णन केलेली मंडळी दररोजच दर्शन देतात. यांचे आवाज वेगवेगळे आणी एकत्र रिकाॅर्ड केले आहेत. कावळा,बुलबुल, नाचण,शिंपी आणी बया यांची घरटी सुद्धा आसपासच दिसतात. माळमुनीया तर कबुतरांना रोखण्या साठी जाळी लावली आहे त्यात घुसून बाल्कनीत घरटे बनवले होते. दोन आले होते चार होऊन उडून गेले. सर्व वाचकांचे धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2024 - 05:51
मस्तच लेख सर..अप्रतिम..पक्षी निरीक्षण जोरात चालू आहे तर..

नूतन 17/09/2024 - 23:17
आमच्या घराभोवतीही असाच निसर्ग आहे. त्यामुळे लेखातील वर्णनं आणि अनुभूती अगदी जवळची वाटली. प्रकाश चित्रंही खूप सुंदर.

चौकस२१२ 18/09/2024 - 09:29
मस्त कोणत्या मोठ्या शहराजवळ एवढा निसर्ग दिसतो ? सातारा ? रत्नागिरी? चिपळूण ? नाशिक च्या जवळ?

भगवंताची कृपाच म्हणायची. काल तर चक्क African Love Bird दारात येवून बसला होता. कुणाचा तरी पाळीव असावा. काय भन्नाट पक्षी. वेगळा लेख डकवेन म्हणतो. प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद.

जुइ 09/10/2024 - 20:39
फोटो आणि वर्णन खूप आवडले. अगदी निसर्गरम्य ठिकाणी राहत आहात! कधी हिवाळ्यातील पहाटेचेही / ऊगवतीचेही फोटो पाहायला आवडतील.

केला. नोव्हेंबर मधे दोन झाडाच्या मधून वर येणारे सुर्य बिंब अप्रतिम दिसते. याच महिन्यात उगवतीचे आकाश निरभ्र असते. विविध रंगांची पखरण खुपच सुंदर असते. याच लेखातील पहिले प्रकाश चित्र या प्रसंगाचे क्षणचित्र आहे. चित्रफित सुद्धा केली आहे. तू नळीवर टाकली तर लिंक देईन. सर्व वाचकांचे आभार.

कुण्या कवितेची ओळ

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
निबिडात दडलेल्या निळ्याभोर पाखराची लवलवती लकेर जेव्हा कानावर येते.... निळ्यासावळ्या निर्झरा फेसाळत, कवळून पाणभोवर्‍याची माया जेव्हा पैंजण बांधते... मावळतीच्या बिलोरी आभाळाला तोलूनिया एक इवले पाखरू जेव्हा पंखावर घेते... काजळल्या नभावर निळी रेष रेखाटत दिशा, कोन झुगारून जेव्हा उल्का कोसळते.... .....काळजात रुजलेल्या कुण्या कवितेची ओळ ध्यानीमनी नसताना तेव्हा ओठावर येते

श्री गणेश लेखमाला २०२४ -सिंदुरात्मक गणेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

माझे आजोळ आणि मामाचे गाव शेंदुरवादा. एक शेत सोडले की मामाची शेती आणि माझे आजी-आजोबा सख्खे शेजारी. बालपण इकडेच दोघामध्ये गेलेले. छत्रपती संभाजीनगरातील डोंगरातून सुरू झालेली ही खाम नदी शहरातून वाहत वाहत शेंदुरवाद्यास येते. पाच-पन्नास वर्षांपूर्वीच्या नदीपात्राच्या विविध आठवणी आहेत. गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा हे खाम नदीच्या काठावर वसलेले गाव.

sindurasur
सिंदुरासुर

गलेमा लेखासाठी लेखनाचे दोन व्हर्जने पाठवली होती. दुस-या व्हर्जनात हा बाजूचा फोटो लावला होता, वरील लेखात राहून गेला. बाय द वे, या गणेशाच्या डाव्या बाजूला सिंदुरासूर आहे, गावाकडं राक्षस म्हणतात. गणेशास आपलं गोडधोड नैवद्य तर, या राक्षसास वशट नैवद्य. असं बरेच दिवस होतं. हळुहळु आता बंद झालं. मध्वमुनींच्या रचनेवर स्वतंत्र लेखन कधी तरी करता येईल.

लेखास आवर्जून प्रतिसाद लिहिणारे सौंदाळा आणि मिपा वाचकांचेही आभार. गलेमा संयोजकांनी लेखाचा गलेमात समावेश केला प्रोत्साहन दिले. आभार. -दिलीप बिरुटे

सहसा लक्ष दिले जात नाही. एकाच जागी कित्येक वर्ष राहूनही त्या बद्दल स्थानिक लोकांना माहीत नसते. समयोचित लेखाद्वारे शेंदूरवादा गावाचा इतीहास व सिंदूरात्मक गणेशा बद्दल अख्यायीका वाचकांपर्यंत पोहोचवली या बद्दल धन्यवाद.

प्रचेतस 14/09/2024 - 15:26
व्वा...! खूप दिवसानंतर गणेश लेखमालेच्या निमित्ताने तुम्ही लिहिते झालात आणि ह्या मंदिराचे दर्शन घडवून आणलेत. मंदिर जरी पेशवेकालीन असले तरी येथे असलेला किर्तीमुख कोरलेला स्तंभ येथे यादवकालीन किंवा त्यापेक्षाही जुने मंदिर असले पाहिजे हेच दर्शवतोय. गजान आणि पाठीमागे असलेला सिंदुरासुर आवडला. मध्वमुनींच्या रचना किर्तनाच्या अंगाने जातात, सतत वेगवेगळी कवने करणार्‍या हरदासांवर केलेला त्यांचाच एक फटका असा- ओव्या श्लोकपदे प्रबंध रचना हे तो निघाली नवी टप्पे ख्याल कितेक गाति यमकें झाले फुकाचे कवी गीता भारत वेदशास्त्र न रुचे गेली जनाची चवी ऐसें देखुनि मध्वनाथ म्हणतो देवा मला वाचवी

In reply to by प्रचेतस

प्रचु फटका आवडला. मध्वमुनींच्या रचनेवर स्वतंत्र लेखन ओळख कधी तरी करुन द्यायला जमलं पाहिजे. 'एकाखडी' ही त्यांची रचना वेगळी आहे. क क क क कळो ये रे प्रपंच माईक' असे क्ष पर्यंत मुळाक्षरे घेऊन बोधपर रचना केली आहे. संसार सासरा अविद्या हे सासू | ईचा आला त्रासू मजलागी || वासना नंदन तोडी माझे लोळे | कोण इचे लळे पुरवावे || निष्फळ अहंकार भर्ता |करु नेदी वार्ता माहेरीची || कामक्रोध दीर मारिती हे लाता | याची मज व्यथा अहर्निश || ( रचना मध्वमूनी ) -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 17/09/2024 - 00:48
लेख, माहिती आणि फोटो सगळे आवडले. मध्वमुनीश्वर यांच्या रचनांबद्दल नक्की लिहावे. वल्लीने दिलेला शार्दूलविक्रिडितातला फटका पण मस्त. त्यामुळे त्यांच्या आणखी रचनांबद्दल उत्सुकता वाढली आहे. अनेक आभार.

झकासराव 18/09/2024 - 16:24
छान लेख. अशा छोट्या आडबाजूच्या गावातील मंदीर जास्त प्रसिद्ध नसतात. मूर्ती छान आहे.

टर्मीनेटर 14/10/2024 - 12:27
वाह! सचित्र लेख तर आवडलाच, आणि गलेमाच्या निमित्ताने आपण लिहिते झालात हे पण आवडले 👍 आता दिवाळी अंकातही तुमचा एखादा (मिपा १८+ किंवा राजकीय विषयवरील) लेख वाचायला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो!

In reply to by प्रचेतस

चावट लेखन जमणार नाही वाटतं. सारखं घसरत जाईल लहान लेकराच्या घसरणा-या चड्डीसारखं. चावटपणा जाऊन नागडं लेखन होईल असे वाटते. चावट म्हणजे कसं गच्च मुसमुसलेलं AI च्या माध्यमातून चित्र काढून जमवू की कसं ? ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 17/10/2024 - 08:26
पण माझा 'राजकीय विषय' तुम्हाला आवडणार नाही. ;)
आवडेल की नाही ते मायबाप वाचकांवर सोडु, पण तुम्ही लेख लिहाच अशी आग्रहाची विनंती...
तुम्ही चावट लिहा ना मग, ते सर्वांना आवडेल (असे वाटते).
ह्यालाही दणकुन अनुमोदन...

In reply to by सतिश गावडे

टर्मीनेटर 17/10/2024 - 08:45
गावडे साहेब, माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर, तीन-चार वर्षांपुर्वीच्या दिवाळी अंकातील लेखानंतर तुमचेही काही लेखन वाचायला मिळालेले नाही... तुम्ही पण घ्या की राव लिहायचं मनावर!

In reply to by टर्मीनेटर

सतिश गावडे 17/10/2024 - 09:49
गेली तीन चार वर्षे मी ही काही लिहीले नाही. परवा कर्नल तपस्वी काकांच्या जून्या लेखासंबंधी प्रतिसादात माझ्या धन्या या दुसऱ्या आयडीचा उल्लेख वाचून मला भरुन आले होते :) बघू पुन्हा लिहीते होण्याची अंत:स्फूर्ती केव्हा मिळते ते :)

In reply to by टर्मीनेटर

सगा पूर्वी प्रतिसाद लेखन चांगले करायचे. पण, दोन हजार चौदापासून त्यांचा लिहिण्याचा मुड गेला अशी सुत्रांची माहिती आहे. त्यांनी, राजकीय परिस्थिती, देशाचं होणारं वाटोळं याची चिंता करुन नये. आपलं जे व्हायचं ते होतच असतं. लिहिते राहावे. ;) -दिलीप बिरुटे

|| उत्कीर्ण विनायक ||

चौथा कोनाडा ·

चित्रगुप्त 13/09/2024 - 02:27
@ चौथा कोनाडा: लेख अतिशय आवडला. खूप रंजक आणि माहितीपूर्ण आहे. तुमच्याबरोबर श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या उत्कीर्ण कलाकृती बघायला मिळाल्या होत्या. आता त्यांचे दर्जेदार प्रदर्शन होत आहे, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही दोघेही खूपच हरहुन्नरी, मनमिळाऊ, कलाप्रेमी आणि सततोद्योगी आहात, याची प्रचिती तुमच्या भेटीतून आलेली होती. अनेक शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 15/09/2024 - 11:41
मनःपुर्वक धन्यवाद, चित्रगुप्त. हो, तो दिवस आनंदाचा होता.. खुप छान योग आले. त्याच्या सहवासात बरयाच कलाकारांच्या भेटीचे योग आले.. पाहूया पुन्हा योग कसे येतात ते !

सौंदाळा 13/09/2024 - 15:18
मस्तच, उत्कीर्ण शब्द पहिल्यांदाच ऐकला आणि आवडला. तुमच्या चिंचवड कट्ट्याच्या धाग्यात पण प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्याबद्दल तुम्ही थोडक्यात लिहिले होते. आता मात्र त्यांची विस्तारपूर्वक ओळख, त्यांच्या कलाकृतींची माहिती आणि त्यांना मिळालेले मान्यवरांचे आशिर्वाद, कौतुक बघून खूपच छान वाटले. प्रफुल्ल भिष्णूरकर यांचे प्रदर्शानासाठी अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 15/09/2024 - 11:45
हो, उत्कीर्ण शब्द भारी आहे ... मी ही "उत्कीर्ण" च्या प्रेमात पडलोय ! तुमचे अभिनंदन प्रफुल्ल भिष्णूरकर ला कळवतो ! मनःपुर्वक धन्यवाद, सौंदाळा.

राघव 13/09/2024 - 15:25
लेख खूप आवडला. चांगली माहिती. मागे एका कट्ट्याची माहिती तुम्ही दिलेली.. त्यात सुद्धा यांचा उल्लेख होता. प्रदर्शन बघण्याचा निश्चित प्रयत्न राहिल. शुभेच्छा!

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 18/09/2024 - 21:57
नो प्रॉब्लेम कर्नल साहेब ! एवढं टायपो तर चालतंच की ! (या पेक्षा भयानक आणि अति-अशुद्ध मराठी वाचायला मिळतं आजकाल ! आणि माफी बिफी मागायची तर पद्धतच नसते ! आपण (म्हणजे तुम्ही सुद्धा) पडलो अचूक शुद्ध मराठी लिहिण्याच्या बाण्याचे .. आपल्यासाठी तर फार निराशाजनक परिस्थिती आहे)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 19/09/2024 - 20:24
वाह ! मोठ्या कलाकाराची ओळक आवडली. चित्रं तर सुप्पर डुप्पर.
तुमचं कौतुक पोहोचवत आहे. मनःपुर्वक धन्यवाद, प्रा.डॉ. साहेब !

श्वेता२४ 18/09/2024 - 16:19
माझ्यासाठी चित्रकला हा अतिशय वेगळा असा विषय आहे. यातले फारसे काही कळत नसले तरी समजून घ्यायला आवडते. कुठेही चित्र प्रदर्शन असले तरीही आवर्जून जाते व समजून घेण्याचा प्रयत्न करते. लेख अतिशय आवडला. बरीच वेगळी माहिती समजली.

"काय नाव आहे म्हणे?" मी उत्सुकतेने विचारल. तो : उत्कीर्ण ! "काय? उत्कीर्ण? हे असलं कसलं म्हणे नाव? उत्तीर्ण वै ऐकलंय.. पण हे उत्कीर्ण वेगळंच काही तरी दिसतंय!" तो : "अरे, उत्कीर्ण म्हणजे खोदून किंवा कोरून तयार केलली कलाकृती" कोरलेलं .. अर्थात उत्कीर्ण Praf001a अच्छा असं आहे तर! माझ्या वाचण्या ऐकण्यात हा शब्द आला नव्हता.

श्री गणेश लेखमाला २०२४ - आली गौराई अंगणी

मी-दिपाली ·
आली गौराई अंगणी.. “गऊ, त्या झाडाच्या जवळ नको गं जाऊ सारखी. सोड एकटं त्याला थोडा वेळ.” आई खिडकीतून बघत ओरडली. “झाडांशीही बोलावं. कळतं त्यांना सगळं. पुस्तकात आहे आमच्या. आईला काही कळत नाही, हो नं?” नवीनच लावलेल्या प्राजक्ताच्या रोपट्यापाशी गऊचं हितगुज चालूच होतं. तोवर आई तिथे पोहोचलीच. तिला लेकीची झाडांवरची माया आणि हट्टी स्वभाव दोन्ही चांगलंच माहीत होतं. “अगं हो, पण तुझ्या बोलण्याकडे लक्ष देण्यासाठी त्याला थोडं स्थिर तर होऊ दे इथे. आपली माती सोडून आलंय ते इकडे. भांबावलं असेल.. आणि असंही.. एकदा झाड लावलं की थोडा वेळ काळजी घ्यावी.

पण त्याची भाषा समजावी लागते. मन तेव्हढेच संवेदनशील असावे लागते. लिखाण खुपच भावले. मी स्वतः निसर्गात तासंतास भटकत असतो. पक्षांची जीवन पद्धती समजून घ्यायला फार आवडते. गऊ डोळ्यासमोर उभी राहीली.

Bhakti 12/09/2024 - 14:30
खुप सुंदर गऊची निसर्गौची गौराई! अशी गोष्ट मला मुलीला नवरात्रीत सांगावी लागते :). गिरीजा -तू कशी उच्च विचारांचीसारखी होशील, म्हणून नवरात्रीत जन्मली.

चौथा कोनाडा 12/09/2024 - 14:40
व्वा ... सुंदर चित्रदर्शी लेखन .. हुबेहुब गऊ डोळ्यांपुढे उभी राहिली ! असं संवेदनशील निरगस लेखन पाहिलं की मिपावाचक असल्याचा आंनद होतो ! || पुलेप्र ||

टणटणीची फुले..

जयंत कुलकर्णी ·
... लहानपणी या फुलांचा आम्ही बराच वापर करत असू. त्याच्या हिरव्या टणक बियांचा वापर वर्गात मित्रांना मारण्यासाठी होत असे, तर त्याची टोके चोखून त्यातील साखर खाण्याची मजा वेगळीच असे. तसेच त्या बिया काळ्या झाल्यावर गोड लागत ते वेगळेच. अर्थात आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतलाच असेल.. टणटणीची फुले ! बरेच दिवस त्या फुलांची छायाचित्रे काढायचे मनात होते. काल गाडीने परत येताना रेसकोर्सच्या मागे ही फुले दिसली. त्यांचे रंग पाहताना मला राजस्थानी रंगीबेरंगी कपड्यांची आठवण झाली. लहानपणी शाळेत शिकलेल्या विवीध रंगसंगती आठवल्या. काही फुले घरी आणली आणि त्याचे फोटो काढले.

गवि 11/09/2024 - 12:59
माझा गणेशा झाला. ओ माय फ्रेंड गणेशा.. बाय द वे.. टणाटणीच्या वर्णनावरून ही बिट्टीची पिवळी फुले तर नव्हेत असे वाटून गेले. विशेषतः त्या मध चाखण्याच्या उल्लेखावरून.

सौंदाळा 18/09/2024 - 12:24
घाणेरीच्या फुलांचा गुच्छ उपटून देठाकडून त्याचा मध चो़खण्याची मज्जाच वेगळी होती. बागांच्या कुंपणासाठी ही झाडे असायची. फोटो झक्कास आले आहेत. दुसरा आणि शेवटचा फोटो विशेष आवडले.

हृदयाची गोष्ट...

भम्पक ·
लेखनविषय:
अगदी खरे सांगतोय ..अस्वस्थ ..भयंकर अस्वस्थ होतो मी आणि आहे सुद्धा .पण तरीही तुम्ही मला वेडा का म्हणाल ? त्या नैराश्याने माझ्या संवेदना अजूनच तीक्ष्ण केल्या आहेत. म्हणजे नष्ट तर नाहीच पण बोथट हि नाहीच नाही.अन वरकडी म्हणजे माझी श्रवण क्षमता तर भलतीच तीव्र झालीये म्हणजे मी पृथ्वीवरचे तर सोडा अन स्वर्गातलेही सोडा ..आपण एकदम नरकातल्या सुद्धा गोष्टी ऐकू शकतो. आता मला सांगा कि मी वेडा कसा ? आता मी जी काही सगळी हकीकत तुम्हाला शांतपणे अन अगदी तपशिलाने सांगणार आहे ती जरा ऐका. आता ती कल्पना माझ्या या डोक्यात कशी जन्मली ते सांगणे अगदी अशक्य आहे.

श्रीगणेश लेखमाला २०२४ - चारोळ्या - रंग मनाचे.. काही गडद, काही फिक्के

कर्नलतपस्वी ·
चारोळ्या - रंग मनाचे.. काही गडद, काही फिक्के गणपती बाप्पा मोरया. मिपाकरांना मिपा वर्धापन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संस्थापकांना नम्र अभिवादन. 1 डिस्क्लेमर - हे मुक्तक आहे. वडाची साल पिंपळाला लावू नये. निरीक्षण, अनुभूती यातून सुचलेले लिखाण आहे. संदर्भ, चूक-बरोबर शोधू नये.

'मी भिकारी : संपादका मी काय देऊर मी कर्जदार :संपादका कसा उतराई होऊर कृ.बु ने चित्र पेरले आणि म्या पामरास तारे: तकनिकी मागासवर्गीय मी,चारोळीस चार चांद लावीले.'​

'मी भिकारी : संपादका मी काय देऊर मी कर्जदार :संपादका कसा उतराई होऊर कृ.बु ने चित्र पेरले आणि म्या पामरास तारले: तकनिकी मागासवर्गीय मी,चारोळीस चार चांद लावले.'​

Bhakti 11/09/2024 - 14:25
ओर्कुटच्या काळात 'धागा धागा धागा द्या' यामध्ये कमाल चारोळ्या लिहियाचे सगळे, अत्यंत उत्स्फूर्त होतं ते. चारोळी म्हणजे उत्स्फूर्तपणा!
म्हातारा, म्हातारा म्हणू नये साठीला कितीतरी अनुभव त्याच्या गाठीला कणा त्याचा ताठ, वर मिशीचा आकडा झाला रुपेरी, तरी रुबाब मात्र फाकडा
मस्त!

महाभारताचा लोच्या झाला म्हणून गीतेचा लोण्याचा गोळा मिळाला तसा तात्याला झटका आला म्हणून मिपाचा झणझणीत रस्सा मिळाला रस्त्याच्या वळणावर ती दुरूनच दिसली मला पाहून ती जराशी कावरीबावरी झाली मी जवळ गेलो तशी ती दूर जाऊ लागली दुरूनच दगड उचलून ती मला हाड म्हणाली पाण्याचं पिंप काठोकाठ भरलं होतं त्यावर एक फुल तरंगत होतं त्या फुलावर एक फुलपाखरू बसलं होतं भांडी घासण्याऱ्या अब्दुलच त्या कडे अजिबात लक्ष नव्हतं एक डास कानाशी गुणगुणताना घेत होता मालकंसाच्या ताना मी पण मग मान हलवताना दाद दिली त्याला हाकलवून देताना पैजारबुवा,

चौथा कोनाडा 13/09/2024 - 22:29
व्वा कर्नल साहेब, "अभ्यास नाही.. नाही" म्हणत चांगलंच अभ्यासू लिहिलंत की! झकास काव्य मेजवानी आणि चारोळ्यांची मुशाफिरी झाली !
बालपणाचे प्रेत घेऊन म्हातारपण चालत आहे इवल्याश्या झुळकेने पिवळे पान हलत आहे.....
चटका लावणारी चारोळी हास्य कवि संमेलन म्हटलं की काका हाथरसी, शैल चतुर्वेदी, हुल्लड मुरादाबादी, सुरेंद्र शर्मा आदि कविंच्या धमाल हास्यकवीता टिव्हीवर पहिल्या होत्या.. शैल चतुर्वेदी यांना तर हिंदी विनोदी सिरियल मध्ये सुद्धा पाहिल्याचे आठवते ! एक्दम धम्माल. . सुरेंद्र शर्मा यांच्या तर आताही यू ट्युब वर ऐकतो :-) मराठीत ही असे काही कार्यक्रम दुद वर व्ह्यायचे, पण तो प्रकार फारसा रुजला नाही ! चारोळ्या तर सगळ्याच मस्त !
ती आसते उंबरठा, तर तो घराचं छत ऊन-पाऊस पाठीवर घेत तो राखतो पत घर बांधून ठेवायचं असावं एकमत एकमेकांना सांभाळायचं हेच खरं व्रत
ही चारोळी वाचताना चंगोची चारोळी आठवली : घर दोघांचं असतं दोघांनी सावरायचं एकाने पसरवलं तर दुसर्‍याने आवरायचं' मला वाटतं तो १९९४-९५ चा काळ असावा... त्या पुर्वी चारोळी कधी वाचण्यात आली नव्हती.. पण चंगोचं मी माझा वाचला आणि त्या चारोळ्यांनी झपाटून गेलो.. कित्येक त्या वेळी पाठ झाल्याच आता ही आठवतात ! नंतर मात्र क्वचितच वाचण्यात आल्या , मोजक्या भावल्या ! माझ्या एका विनोदी चारोळीला जबरदस्त हंशा आणि टाळ्या मिळाल्या होत्या .. नंतर बक्षिसही मिळालं होतं झिजेल म्हणुन बॉलपेन मी वापरायचं थांबवलं तर ते माझ्या नकळत माझ्या मित्रानं लांबवलं (ओरिजनल चंगो: झिजेल म्हणून चंदन मी उगाळायचं थांबवलं कंटाळून ते म्हणालं माझं उगीच उरलं आयुष्य लांबवलं)

स्वराजित 24/09/2024 - 17:53
विक्रम-वेताळ बालपणाचे प्रेत घेऊन म्हातारपण चालत आहे इवल्याश्या झुळकेने पिवळे पान हलत आहे..... जबरदस्त अप्रतिम लिहीले आहे.