✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी कोण होणार ? : भाग ४

आ
आनंद घारे यांनी
Fri, 02/29/2008 - 11:29  ·  लेख
लेख

Book traversal links for मी कोण होणार ? : भाग ४

  • ‹ मी कोण होणार? : भाग ३
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8940 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

ध
धमाल मुलगा Fri, 02/29/2008 - 12:02 नवीन

वा !!!हा भाग

वा !!!
हा भाग तर एकदम आवडला.
मस्त जमलाय. बढिया!!!

आपला
- ध मा ल.
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Fri, 02/29/2008 - 13:28 नवीन

वा !

वा आनंदघन!

मला तर ही माझीच गोष्ट वाट्ते आहे. फक्त मी इंजिनियर झाले नाही तर चित्रकार झाले. तुमची गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची आहे आणि माझी नऊ वर्षांपूर्वीची. मला दहावीनंतर योग्य अभ्यासक्रम निवडायचा होता. अभ्यासक्रम निवडताना योग्य मार्गदर्शक मिळाला नाही तर किती त्रास होतो हे मी  चांगलं अनुभवलयं. अशिक्षित आईबाबा आणि चित्रकारांबाबतच्या वावड्या यामुळे अडचण वाटली खरी, पण तेच अशिक्षित आईबाबा जेव्हा ठामपणे मागे उभे राहिले तेव्हा खरच नवी उभारी मिळाली आणि अर्धवेळ काम करून का होईना पण  माझे शिक्षण पूर्ण झाले.

धन्यवाद आनंदघन! आज तुमच्या लेखामुळे बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.

राजमुद्रा :)

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 02/29/2008 - 15:10 नवीन

जबरा एकदम .... इंजिनीयर स्पेशल

मलापण लहानपणी "इंजिनीयर" म्हणजे एकदम अचाट गोष्टी करणारे लोक वाटायचे. हे प्रकरण म्हणजे एकतर 'गोर्‍या चामडीच्या लोकांचे किंवा ईथल्या अवलिया व विक्षिप्त ' लोकांनाच साध्य आहे असा माझा समज होता[ त्याला माझ्या नात्यातल्या एका इंजिनीयर असलेल्या 'विक्षिप्त मामाने' बळकटी दिली ]. त्यामुळे लहानपणापासूनच मला त्याचे आकर्षण होतेच .
"मोठीपणी काय होणार ?"  याचे उत्तर लहानपणी प्रसंगानुरूप बदलत गेले , सांगायचे तर "दूसर्‍यावर सूड घेण्यासाठी त्याला इंजेक्शन देण्यासाठी मला डॉक्टर व्हावे असे वाटे , एस टी कंडक्टर चा मस्त प्रवास व हातातली पैशाने भरलेली बॅग बघून मला ते आवडे , भेळचा गाडा चालवणार्‍या भैयाची लै ऐश असेल असे मानून माझी भेळचा गाडा टाकायची ईच्छा होत असे, सिनेमे बघून तर विचारायलाच नको ( 'बॉर्डर' बघितल्यावर मी सैनिक होतो असे म्हणल्यावर पिताजीनी अशा नजरेने बघितले की मला तो विचार जागेवर्च सोडून द्यावा लागला. मग मी ठरवले की आधी मला विरोध करणार्‍या 'घरातील दूश्मनांशी लढू मग देशाचे  दूश्मन आहेतच की.'), 'डब्ल्यु डब्ल्यु एफ' बघून आम्ही 'फायटर' व्हायचे ठरवल्यावर पिताजींनी घरातील 'केबल कनेक्शन बंद' करून टाकले. पण त्यातल्या त्यात "इंजिनीयर " व्हायची ईच्छा मनात तशीच होती .............
पुढे १० वी व १२ वी ला जबरदस्त मार्क पडून बोर्डात आल्यावर आपोआप 'इंजिनीयरिंला जाण्याचे मार्ग' यक्दम सोपे झाले. शेवटी [कसेतरी] शिक्षण पूर्ण करून आज एका प्रतिष्ठित आस्थापनात नोकती करताना लहानपणाचे विचार आठलले की हसू येते ........

असो. आपल्या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या ......

आठवणीत हरवलेला छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/29/2008 - 20:00 नवीन

मस्तच

हा भाग अयिशय छान झाला आहे.

'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?

हे वाचून हसू आले.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 02/29/2008 - 20:34 नवीन

झकास. त्या वयातील ......

भावना अगदी अचूक पकडल्या आहेत. छानच. धन्यवाद.

पु भा शु

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 02/29/2008 - 20:43 नवीन

हा हा!!!!

हा भाग एकदम चुरचुरीत झालाय :).. नर्मविनोद खासच!!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 02/29/2008 - 20:59 नवीन

मस्त!

हा भाग मस्त जमून आला आहे,

नर्मविनोद खासच!
ऋषिकेशशी सहमत.

स्वाती

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 02/29/2008 - 22:01 नवीन

अगदी जवळचं वाटतंय लेखन, आनंदघन.

पुढील भाग येऊदेत!

चतुरंग

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/02/2008 - 18:08 नवीन

हेच,

पुढील भाग येऊ देत! हेच म्हणतो. आनंदराव, खूप छान लिहिलं आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/29/2008 - 22:12 नवीन

सिव्हील इंजिनीयर

'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?

असे मला डाक बंगला म्हटले की वाटते. :) प्रत्येक डाक बंगल्यातून एकतर स्मगलिंग चालते किंवा त्यात भुते असतात असा माझा समज आहे.  :)

बाकी वर्णन छान. माझे एक काका सिव्हील इंजिनीअरची ऐट बघून सिव्हील इंजिनीअर झाले. ते म्हणत 'जीप मधून सफारी सूट घालून येणारा सिव्हील इंजिनीअर पाहीला की त्याच्या ऐटीचे आकर्षण वाटे. तसेच सिव्हील इंजिनीअरींग सोडून ईलेक्ट्रीकल, मेकॅनिकल अशा इतर शाखा असतात हे इंजिनीअरींग कॉलेज ला जाईपर्यंत माहीतच नव्हते.' त्यामुळे आपण लिहीलेला लेख वाचून मला माझ्या वयस्कर काकांची आठवण झाली.

तसेच माझ्या आजोबानी सागितलेल्या एका गमतीची आठवण झाली. ती अशी की एक 'डेक्कन कॉलेजचे' सुपरीटेंडंट असलेल्या गृहस्थांच्या वृद्ध आईने घरी आलेल्या पाहुण्याना 'आमचा बन्या ढेकूण कालेजात सुपारीटुण् टुण् आहे' असे सांगितले होते. :)

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments
र
रंजन Fri, 02/29/2008 - 22:37 नवीन

चालू द्या

तुमचे कथन चालू द्या ..
आमच्या वेळेस तर फावला वेळ कसा घाल्वायचा म्ह्णुन जायचे बॉ लोक इंजिनियर व्हायला.

  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Sun, 03/02/2008 - 16:07 नवीन

खरच...खुप

खरच...खुप छान आहे... हे वाचून आठवले की लहानपणि माझ्यासठी इंजिनियर चा अर्थ रेल्वे इंजिन चालक असा होता...आणी मलादेखिल तेच व्हायचे होते. राज....
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 03/02/2008 - 19:48 नवीन

+१

हाही भाग आवडला. अवांतर : मलाही रेल्वे इंजिन चालकाच्या पेशाबद्दल फार आकर्षण होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापु देवकर
आ
आनंद घारे Sun, 03/02/2008 - 19:36 नवीन

आभार

सर्व वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या मूळच्या नियोजनानुसार करिअरचे एक एक पर्याय मोडीत काढून अखेर इंजिनिअरिंगला या मालिकेचा शेवट झाला होता. आता त्यापुढे काय यावर विचार करून लिहावे असे वाटू लागले आहे. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा