मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री

प्रा सुरेश खेडकर · · जे न देखे रवी...

भारतीय क्रिकेट चमुस हार्दिक शुभेच्छा.

=====================
ऑफिसच्या रीक्रीएशन रूममधील एका संभाव्य चित्र "रेशमाच्या रेघानी"च्या धमाल चालीवर.
(आचार्य अत्रेंच्या "झेंडूची फुले" परंपरेतील व माझ्या "एप्रिल फुले" ह्या धमाल कार्यक्रमातील एक स्वरचित ताजे विडंबन गीत)
======================
अहो येता जाता सट्टा का हो लावता,
अन क्रिकेटच्या खेळाला बट्टा का हो लावता.

बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री
चंगळच चंगळ करूनी घ्या हो,
हात नका लावू कुणी कामाला

नवा कोरा टीव्ही लाख मोलाचा,
व्हॉल्युम तुम्ही ठेवा जरा जोराचा, हो जोराचा
नजर नका लावू कुणी, "युवराज-धोनी" जोडीला...
हात नका लावू कुणी कामाला

भीड नका ठेवू आल्या गेल्याची,
मस्त पार्टी करा आलूबोंडयाची,हो बोंडयाची
काय म्हणू बाई बाई, ह्या लोडशेडींगला
हात नका लावू कुणी कामाला.
===========
प्रा. सुरेश खेडकर
नागपूर

वाचने 4888 वाचनखूण प्रतिक्रिया 8

प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 03/06/2008 - 15:30
मित्रांनो, येत्या रविवारी ( ९ मार्च ०८) ला संध्याकाळी ५ नंतर मी डोंबिविली येथे असून एक दीड तासांचा स्वरचित विडंबन गीतांचा कार्यक्रम डोंबिविली किंवा जवळपास करू इच्छितो. एरव्ही मानधन स्विकारतो पण वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक कार्यक्रम नि:शुल्क करण्याचे योजिले आहे. निशुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा. अधिक माहिती साठी पहा: http://www.orkut.com/Profile.aspx?uid=44441327930350077 आणि : http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095