मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौनखेळ

पल्लवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ह्रुदयी तव ठेवुनी माथा,हलकेच मी विसावता भिनली ही नीज नयनी,शांत झाली आर्तता ! अवचित मग जाग येता,तुझ्या ह्रुदय्-स्पन्दनी मिटले नेत्र जाणती रे,व्यथा ज्या तुझ्या मनी ! मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! वाटे साद घाली, मज रातराणीचा सुगंध की सुवास हा तव तनुचा,नशीला अन मंद-धुंद ! बघ कसे बिलगुनी जाती,मोरपंखी लुब्ध वारे की श्वास हे तुझेच सखया,केसांतुन मम सळसळणारे ! राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! ~ पल्लवी ~

वाचने 4531 वाचनखूण प्रतिक्रिया 15

प्राजु Fri, 04/18/2008 - 09:34
पल्लवी, राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !, कविता अतिशय सुंदर आहे. हे खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Fri, 04/18/2008 - 09:57
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! ओहोहो खल्लास..! राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! क्या बात है.... चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! वा! सुरेख कविता.. पल्लवी, औरभी लिख्खो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर


मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी
जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !

राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध
मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द !

चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला
पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !


एकापेक्षा एक सुंदर ओळी आहेत !!! कविता आवडली.

 

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी Fri, 04/18/2008 - 10:21
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !
सुंदर!

आनंदयात्री Fri, 04/18/2008 - 10:24
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! व्वा उस्ताद वा !

पल्लवी Fri, 04/18/2008 - 15:58
त्रिवार धन्यवाद !!! इरसाल मराठमोळ्या चकाट्या आणि त्या पिटणारे त्याहुनही इरसाल वल्ली प्रचंड भावल्या ! एक नंबर कट्टा !! तर कट्टेकरी लोकहो, कवितेसाठीच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ठेंक्यु !!! तात्या, प्रत्येक शेरास दाद दिलीत,खूप ध्न्यवाद ! :)

शितल Fri, 04/18/2008 - 17:27
मस्तच काव्य रचना झाली आहे, आता आणखी आम्ही काय बोलु कविते बद्दल, मौनच बाळ्गतो.

सुवर्णमयी Fri, 04/18/2008 - 18:27
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! सुरेख कविता आवडली.

जयवी Sat, 04/19/2008 - 12:41
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! क्या बात है....... पल्लवी , खूप आवडली कविता. अगदी हळुवार भिनत जाताहेत ओळी.

उत्खनक गुरुवार, 03/28/2013 - 17:39
खूप नितळ कविता! खूप आवडली. मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी या ओळी अगदी खास..