ख्रिस्त

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जे न देखे रवी...
11 May 2017 - 9:48 am

शांततेचे गात गाणे
अवतरलासी तू भूवरी या
पिचलेल्या गरिबांचा क्रूस
वाहिलास खांद्यावरी या

प्रेम दिधले तू जगाला
वेदना पचवूनीया
का न समजली दयार्द्रता तुझी
तुला खिळवणाऱ्या राक्षसांना

अजूनही संहार होतो
भाविकांचा प्रेमळ जनांचा
क्रूरपणे गिळता तयांना
दिसेल का क्रोध लाजताना

नसती जरी सगळेच प्रेषित
तुझ्यापरी देवाचे सुत
का प्रयत्नांना आज त्यांच्या
कुचेष्टेचे बिरुद लाभे

हात मी निढळावरी लावुनी
उभा इथे शतकानुशतके
वाट तुझी पाहताना
देह पंचत्वी विलीन होतसे

माझी कविताकविता

जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
11 May 2017 - 12:10 am

वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का?
बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का?

शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?

वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे
तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का?

फुंकली जाते तरी गंधाळते रे ती...
जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

आजही तो त्या विटेवर थांबला आहे
त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का?

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

मी....

ओ's picture
in जे न देखे रवी...
10 May 2017 - 7:16 pm

माझ्यात मी ,तुझ्यात मी
तरी उरुनी राहिलो शेष मी

बंदिस्त मी ,अन मुक्त मी
कैदेतले ही स्वातंत्र्य मी

शांत मी ,उद्विग्न मी
ह्या भावनांचे काहूर मी

आरंभ मी, अन अंत मी
पोहोचायचे ते गंतव्य मी

त्या गंतव्या पल्याड मी
त्याचा ठाव घेणारा शोध मी

शून्य मी ,संपूर्ण मी
राहतो पुन्हा अपूर्ण मी

अनादी मी ,अनंत मी
सचित्तातला आनंद मी

असलो सर्वत्र विखुरलेला
तरीही माझ्यात पूर्ण मी

नादात घुमतो झंकार मी
अनाहत नाद ओंकार मी

----© ओंकार जोशी

कविता

प्रेमाचं गणित

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जे न देखे रवी...
10 May 2017 - 6:12 pm

तुझं शंकुसारखं धारदार नाक
शुभ्रवर्णी दंतमाला
अन हसल्यावर उमटणारा
गालावरचा पॅराबोला

इंटिग्रेशनच्या चिन्हासारखे तुझे
लिमिटबद्ध लांबसडक केस
डोळ्यांमधले कूटप्रश्न अन
देहबोलीचे अॅनालॉग संदेश

तू मॉडमध्ये टाकल्यासारखी
नेहमी पॉझिटिव्ह असायची
अपुर्णांक होतो मी
वजाबाकीच फक्त जमायची

तू आयुष्यात आलीस अन मला
शुन्याचा शोध लागला
जगण्याचा भाव माझा
दसपटींनी वाढला

माझ्या खिशातल्या पाकिटाचं
व्हॉल्यूम तू कधी पाहिलं नाहीस
तुझ्या नातेवाईकांच्या स्वभावाचं
घनफळ मी मोजलं नाही

मुक्त कविताकविताप्रेमकाव्य

मिपाकरांचा "शेती" विषयक माहितीच्या आदान प्रदानासाठी व्हॉट्स-अप गृप.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
10 May 2017 - 5:30 pm

प्रिय मिपाकरांनो,

काल पासून शेती ह्या विषयात रस असलेल्या, मिपाकरां साठी, एक व्हॉट्स-अप गृप स्थापन करण्यात आला आहे.

ज्यांना शेतीची आवड असेल, अशा व्यक्तींनी खालील मिपाकरांशी संपर्क करावा.

१. सुखी (मोबाईल नंबर =====> ९७६६३१४९५१)

२. अभिजित अवलिया (मोबाईल नंबर ====> ९१५८००९८४६)

आपलाच,

मुवि

समाजजीवनमानतंत्रबातमीमाहिती

पिझ्झारट्टू

सरनौबत's picture
सरनौबत in पाककृती
10 May 2017 - 3:18 pm

साऊथ इंडियन (दाक्षिणात्य) पदार्थ म्हणलं कि इडली, डोसा, उत्तपा आणि वडा सांबार ह्याच गोष्टी पट्कन माझ्या डोळ्यासमोर येतात. हे पदार्थ मुख्यतः पुण्यातील प्रसिद्ध शेट्टी हॉटेल्स (वैशाली, रूपाली त) खाल्ले. त्यामुळे ह्या व्यतिरिक्त इतर दाक्षिणात्य पदार्थांचे माझं नॉलेज अतिशय मर्यादित.

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग२

इडली डोसा's picture
इडली डोसा in जनातलं, मनातलं
10 May 2017 - 12:55 pm
जीवनमानराहती जागामौजमजाप्रकटनअनुभवमाहितीविरंगुळा

वॉटर purifier घेताना काय काय पाहावे?

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in तंत्रजगत
10 May 2017 - 11:26 am

एका मित्राने, नुकताच जांभूळवाडी, कात्रज तलाव येथे flat घेतला आहे. बोरिंगच्या पाण्याशिवाय तेथे पर्याय नाही. पाणी खूप जड आहे.
म्हटलं मिपाकरांचा जरा सल्ला घ्यावा, कारण मी water purifier कधीच वापरला नाही. मग अशावेळी त्यात काय काय फीचर्स असायला हवीत?
HUL चा साधा pureit वगैरे लगेच खराब होईलसं वाटत, शिवाय पाणी साठवून ठेवणाऱ्या purifier मध्ये क्षार अडकून तेही लवकर खराब होतात असं ऐकलं. मग करावं काय??
नुसता RO फिल्टर काम करेल का?
काही सल्ला देऊ शकलात तर उत्तम:)

टीप- पूर्वी असा धागा काढला असेल, तर त्याचा दुवा दिलात तरी फस्क्लास.

कटप्पाने ...... जानरावची परेसानी

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
10 May 2017 - 7:58 am

दोन बरस माणसाले येकच गोष्ट सतावत होती 'कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा.' आता आपल्याले परेशान्या का कमी रायते का जी. अमदा तूरीन पार खाउन टाकल. दरसाली अळी तूरीले खाते अमदा तूरीने आपल्याले खाल्ल. त्येच्यात हे परेसानी आणखीन कायले ठेवाची. बाहुबली येनार अस समजल तवाच म्या फोन करुन माया साडभावाले सांगतल मायासाठी दोन टिकिटा काढून ठेवजो. ज्या तारखेच भेटेन त्या तारखेच काढजो, म्या येतो. मी आन माया ढोरकी धन्या, त्याले मायासारखाच पिक्चरचा भारी शौक हाय. बायको पोरायले घेउन यवतमाळेले गेली. म्या बी मायी वावरातली काम आटपून घेतली. नाही कणच्या दिसाच टिकिट भेटन काही सांगता येत नाही न भाउ. रोज फोनची वाट पाहात होतो.

विनोदमौजमजाचित्रपटसमीक्षा

धुंद पाऊस

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
9 May 2017 - 10:46 pm

अनोळखी भेटीत धुंद पाऊस बरसला
थेंबा थेंबात प्रीत नक्षी आकारून गेला

पाने हलता मोती ओघळे
तुझ्या चाहूलीने गंधाळती मळे
गंध तुझा सावळ्या रानी विसावला

पावसाळी सावल्यांत मेघांचा झुला झुले
हळूवार प्रीतीत सरींचा पिसारा उमले
कोवळ्या सूराने दवांत पंख पसरला

विहग जलधारांचे पालवींत लोपले
गूज फुलपाखरांचे मंजिरींत साठले
ओलेत्या नभाने बांधली इंद्रधनुची मेखला

प्रेम कविताकविता