जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का?
बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का?
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?
वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे
तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का?
फुंकली जाते तरी गंधाळते रे ती...
जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
आजही तो त्या विटेवर थांबला आहे
त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का?
—सत्यजित
गझलेबद्दल काही...
जिच्या सर्व शेरांत एकच विषय
गोंधळ काहीसा दूर झाला हे
काय एक से एक पोतडीतून बाहेर
आपली दाद सतत लेखनास
जबरा!!
वा!
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
कविता आवडली
धन्यवाद!