जोसेफिना आणि जेनचे किडनॅप
गोष्ट १९८७ सालची आहे. आम्ही एक नवीन बिल्डिंग बांधायला घेतली होती. पोलीस ठाण्याच्या पुढेच होती. कंत्राटदार केरळी नायर होता आणि बहुतेक कामगार ओरिसा मधील होते. पोलीस ठाण्याच्या बाजूलाच जोसेफिना ह्या ख्रिस्ती महिलेचे घर होते आणि तिला जेन नावाची एक सुमारे १५ वर्षांची मुलगी होती. जोसेफिनाचा पती दुबई मध्ये कमला होता आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. जोसेफिना अतिशय सभ्य, प्रामाणिक आणि जेन वर जीवापाड प्रेम करणारी आई म्हणून सर्वाना ठाऊक होती.