नवकवितेच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक,
"गण-मात्रांचे कृत्रिम बंधन सत्वर तोडुनी टाक !"
यतिभंगाचे भूत लेखणीस कायम भिववित होते
त्या भीतीने तरल काहिसे हातून निसटत होते
गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको अता मळलेली
वाट पुन्हा ती छंद-बद्ध कवितांची कोंदटलेली
वृत्त-छंद-मात्रांचे अवजड ओझे लेवुनी बसली..
..होती माझी कविता, विमुक्त होता निर्मळ हसली
त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2350
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट कविता.
मस्तच."मुक्तक लिही, पण ध्यानी
"मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"खुप आवडलं.जबरदस्त!
एस, पद्मावति, Sandy