रमलखुणांची भाषा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Sep 2017 - 11:44 am

जरी तुटले आतून काही, तरी नकोस ओळख देऊ
जाताना थांबून थोडे, तू नकोस मागे पाहू

दिसतील अनाहूत इथल्या, सावल्या गडद होणाऱ्या
हुरहुरत्या संध्याप्रहरी, पावलांत घुटमळणाऱ्या

खोरणात तेवत असता, फडफडेल इथली दिवली
मग उरेल काजळमाया, शोषून स्निग्धता सगळी

ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा
ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा

ते विसर उमाळे इथले, पुसताना प्राक्तनरेषा
उलगडेल अवचित अवघी, मग रमलखुणांची भाषा.....

माझी कवितामुक्तक

गवळीच्या चरणी कलात्मकता

डॅडीभाई's picture
डॅडीभाई in जनातलं, मनातलं
19 Sep 2017 - 10:33 am

बेरोजगार असताना फुकटचा पैसा मिळविण्याची चटक लागली की पावलं गुन्हेगारीकडे वळू लागतात. अरुण गवळी त्याला अपवाद नाहीच. ज्या काळात मुंबई हाजी मस्तान आणि करीम लाला या तस्करांच्या नावाने ओळखली जायची, त्या दशकात म्हणजेच सत्तर आणि ऐंशीच्या दशकात मुंबईत एक वेगळं गुन्हेगारी विश्व उभं राहात होतं. त्याला हळूहळू रक्ताची चटक लागत होती. स्मगलिंग पुरतं मर्यादित हे गुन्हेगारी विश्व विस्तारु लागलं आणि वर्चस्वासाठी लढाया सुरु झाल्या. त्या लढायांचं नाव होतं गँगवॉर. करीम लाला आणि हाजी मस्ताननंतर मुंबईचा डॉन कोण, तर दाऊद अशी स्थिती होती. या जगतावर त्याची पकड बसू लागली होती.

कलासमीक्षा

निरीक्षकाची स्थिती – गती चौकट आणि सहनिर्देशक पद्धती (Frame of reference and coordinate system)

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
19 Sep 2017 - 10:08 am

राजा विक्रम आजही चिंतित होता. वेताळाला एवढी उत्तरे देऊन, एवढे तर्क लढवून तो शेवटी असा काही प्रश्न विचारतो आणि निसटतो. हे जसजसं खोल गहन होत होतं तसं ते अधिक गूढरम्यही वाटत होतं. खरोखरीच रोजच्या जगण्यातल्या किती गोष्टींना ही भुतं लपेटून असतात, किती ठिकाणी केवळ तर्क आणि निरीक्षण नसल्याने अंदाज बांधणं अवघड जातं, पण वस्तुनिष्ठ पणे सोप्यासोप्या गोष्टींच्या उकलीतून मग अधिक गहन गुंत्याकडे कसं जाता येतं याचा वस्तुपाठच जणू तो गिरवत होता. वेताळ हा एखाद्या पिशाच्चापणे आक्रस्ताळा न होता हुशार शिक्षकाप्रमाणे विचार करायलाही लावत होता आणि फिरकीही घेत होता.

ह्रदयातुनी

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
18 Sep 2017 - 11:45 pm

धावत्या पायास माझ्या
लाभु दे आता विसावा
भाबड्या माझ्या मनाला
श्रावणाचा साज यावा

अंतरी आहेत ज्याही
वेदना जाव्या विरुनी
लाभुनी हळुवार माया
घावही यावे भरुनी

शोधतो आहे निवारा
त्या रुपेरी काळजाचा
वाटते यावा जरासा
गारवा आता सुखाचा

अंतरी वाहे झरा जो
माझिया ह्रदयामधुनी
अमृताचा गंध त्याला
ओंजळीने घे भरुनी

उगवु दे सूर्यास पुन्हा
जाळुनी अंधार सारा
संपण्या आता उन्हाळा
बरसु दे श्रावणधारा

कविता माझीकविता

प्रिय घरास

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
18 Sep 2017 - 7:28 pm

प्रिय घरास,

नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही.

धोरणमांडणीवावरवाङ्मयमुक्तकसाहित्यिकसमाजप्रकटनविचार

लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Sep 2017 - 12:32 am

आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात!

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानविचारलेख

सामाजिक कार्य करायचे आहे,सामाजिक संस्था/NGO सूचवा!!

सिंथेटिक जिनियस's picture
सिंथेटिक जिनियस in जनातलं, मनातलं
17 Sep 2017 - 10:04 pm

मी याआधीच्या अनेक लेखात माझी पार्श्वभुमी लिहीली आहे.नविन लोकांसाठी परत लिहीतो.मी शेतकरी आहे .सातार्यात राहतो.मी अल्पभूधारक शेतकरी आहे.माझ्यापुरतं मी कमावतो.आठवड्यातील पाच दिवस मी रिकामा असतो.एखादी नोकरी व कामधंदा केल्यास वेळ जाईल असे वाटल्याने एक धागा काढला होता.त्यात मी लीहील्याप्रमाणे मला सोशल फोबिया आहे.त्यामुळे सोशली इंटेंन्सीव्ह काम मला जमेल असे वाटत नाही.त्यामुळे रिकामा वेळ जावा व सत्कारणी लागावा यासाठी मी सध्या एखाद्या सामाजिक संस्थेत काम करावे असा विचार करत आहे.जेणेकरुन माझा वेळही जाईल आणि समाजाला काहीतरी मदत होईल.आणि माझा सोशल फोबिया कमी होईल हा आणिक फायदा.

समाजप्रकटन

सुगरणी च्या पाक गृहातुन.. एक रेसिपी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in पाककृती
17 Sep 2017 - 7:54 pm

सुगरणी च्या पाक गृहातुन..
एक रेसिपी
...............
केळीचे शिकरण
साहित्य..
केळी..(जळगावची..पिकलेली..पिवळ्या सालिवर ठिबके असलेली)
तापवुन थंड केलेले दुध...(शक्यतो चितळे यांचे)
साखर
कृति
स्टील चे पातेले घ्यावे..
केळी सोलुन कुस्करुन त्यात ठेवावी..
स्टील च्या चमच्याने मॅश करावी..
योग्य प्रमाणात साय व दुध घालावे..
चवि प्रमाणे साखर घालावी..
चमच्याने मिश्रण ढवळुन एक जीव करावे..
केळीचे शिकरण तयार..
तुम्ही जर चंगळवादी असाल तर मटार उसळ सोबतिला हवी..
शिकरण..मटार ऊसळ व मऊसुत पोळ्या...