✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रिय घरास

श
शिव कन्या यांनी
Mon, 09/18/2017 - 19:28  ·  लेख
लेख
प्रिय घरास, नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही. इथे मी पायी कुठे जात नाही. गाडीत जाते. पायी चालले असते तर थबकले असते. वळून पाहिले असते. मग एखादे घर तुझ्यासारखे दिसले असते. मग खिडकीतून आत शिरले असते. पडद्यामागे लपून बसले असते. नाही नाही ते आठवले असते. उगीच तो दिवस रडून घालवला असता. म्हणून मी इथे गाडीतून गालिच्यावर, गालिच्यावरून गाडीत एवढेच पाय खाली ठेवते. जमिनीला पाय लागले की डोळ्यातून खळळकन तुझ्या भिंती कोसळतात. बर, डोळ्यातून कोसळणाऱ्याया भिंती परत बांधायच्या म्हणजे फार खर्चिक काम. नाही झेपत. इथे मी प्लास्टिकची भरपूर झाडीफुलंपानंवेली आणली आहेत. छानच दिसतात. कायम फ्रेश. रोज उठून पाणी नको की निगा नको. एकदा आणून ठेवली, अत्तराचा फवारा मारला, की झाले. ती गपचूप बसतात, मग मी माझे काम करायला मोकळी. नाही, मी इथल्या सुंदर सुंदर बागा, कातरून छान वाढवलेली झाडं असलं काही बघत नाही. डोळ्यांवर काळा काळा गॉगल लावून घेते. मला भीती वाटते, कुठून तरी चाफ्याचे अबोल झाड माझ्याशी बोलायला यायचे आणि मग तुझे दुष्ट सुगंधी अंगण मला इथे जगू द्यायचे नाही. भय वाटते. इथे मी झुंबर टांगलेत. हजार लोलकांचे. किणकिण वाजणारे. एक दिवा लावायचा अवकाश, की त्याची हजारो सप्तरंगी आवर्तनं परावर्तित होतात. घराचा कोपरा न कोपरा त्या सप्तरंगात खेळत बसतो. मी संध्याकाळ होण्याचीही वाट पहात नाही कधी कधी. संध्याकाळ कातर असते. सगळं कातरून काढते. म्हणून मी या घरात संध्याकाळची सावलीच पडू देत नाही. अजून सूर्य भगभगत असतो, तोवर झुंबरं लावून मोकळी होते. कुठे अंधार नको, आणि हो..... तुझ्या डोळ्यात तेवणारा मंद नंदादीप, उदबत्तीचा दरवळ, तुझे वाट पाहणारे गायी सारखे करूण डोळे ....... माझा गपकन जीव घेतील. नाही, बऱ्याचदा घेतला आहे. मी कशीबशी त्यातून उठ्लेय. आता बळ नाही. पेक्षा झुंबर बरे. तुझी आठवण कशी गाढून टाकायची, मनातल्या मनात तुला कसं पाडून टाकायचं हे शिकलेय. पण आजी सांगायची, तुझ्या अंगणात माझी नाळ पुरलीय. ती तेवढी कुणाला उखडता येत नाहीये.. म्हणून....... तुझी, Rootless मुलगी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
वाङ्मय
मुक्तक
साहित्यिक
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
5286 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

सुरेख!

पद्मावति
Mon, 09/18/2017 - 20:54 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

खरेच सुरेख

अनन्त अवधुत
Mon, 09/18/2017 - 21:32 नवीन
.
  • Log in or register to post comments

तुमचे लेखन, कविता आवर्जून

रेवती
Tue, 09/19/2017 - 02:13 नवीन
तुमचे लेखन, कविता आवर्जून वाचावे असेच असतात. हे लेखनही काळजाला भिडणारे आहे.
  • Log in or register to post comments

रेवती, किती मना पासून वाचतेस

शिव कन्या
Fri, 09/22/2017 - 23:18 नवीन
रेवती, किती मना पासून वाचतेस! पुढे लिहायला बळ येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

टोचलं काळजाला.

एस
Tue, 09/19/2017 - 02:46 नवीन
टोचलं काळजाला.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख... शेवट तर आवडलाच

पर्णिका
Tue, 09/19/2017 - 07:40 नवीन
अप्रतिम लेख... शेवट तर आवडलाच.
  • Log in or register to post comments

वाह. मस्तच

चाणक्य
Tue, 09/19/2017 - 09:18 नवीन
अतिशय हृद्य.
  • Log in or register to post comments

हम्म

पैसा
Tue, 09/19/2017 - 09:51 नवीन
हम्म
  • Log in or register to post comments

फार सुंदर लिहिलेत..

पुंबा
Tue, 09/19/2017 - 11:18 नवीन
फार सुंदर लिहिलेत..
  • Log in or register to post comments

खूप सुंदर

चष्मेबद्दूर
Tue, 09/19/2017 - 12:31 नवीन
शेवट अगदी वेगळा आणि म्हणूनच एकदम भिडला मनाला.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर लिखाण...

Naval
Wed, 09/20/2017 - 00:40 नवीन
फारच सुंदर लिखाण...
  • Log in or register to post comments

ओळ न ओळ अगदी आटीव...केवळ

Naval
Wed, 09/20/2017 - 00:53 नवीन
ओळ न ओळ अगदी आटीव...केवळ अप्रतिम! शेवट तर क्या बात है!!
  • Log in or register to post comments

सुरेख!

रुपी
Wed, 09/20/2017 - 01:03 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

सुरेख!!!!

पिलीयन रायडर
Wed, 09/20/2017 - 04:40 नवीन
सुरेख!!!!
  • Log in or register to post comments

जिवंत लेखन ! काळजात घरं

सस्नेह
Wed, 09/20/2017 - 10:48 नवीन
जिवंत लेखन ! काळजात घरं पाडणारं ..
  • Log in or register to post comments

अप्रतिम कस म्हणू? तरीही...

ज्योति अळवणी
Wed, 09/20/2017 - 17:29 नवीन
अप्रतिम कस म्हणू? तरीही... आवडलंच
  • Log in or register to post comments

+१

विचित्रा
गुरुवार, 09/21/2017 - 13:06 नवीन
आवडलं .
  • Log in or register to post comments

!

मितान
गुरुवार, 09/21/2017 - 20:00 नवीन
!
  • Log in or register to post comments

इतकं मनापासून वाचणार्यांचे

शिव कन्या
Fri, 09/22/2017 - 23:19 नवीन
इतकं मनापासून वाचणार्यांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

_____/\_____

चांदणे संदीप
Mon, 09/25/2017 - 12:12 नवीन
सुरेख... सुंदर.. अप्रतिम! Sandy
  • Log in or register to post comments

सुंदर.

जागु
Mon, 09/25/2017 - 12:37 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा